'असफल-प्रेम' कविता

Submitted by अ'निरु'द्ध on 6 June, 2020 - 08:13

'असफल-प्रेम' कविता

काल व्हाॅट्सॲप वर पावसाच्या निमित्ताने एक अग्रेषित हिंदी कविता/शेर आली/आला.


ते वाचून सहजच मला अनुवाद म्हणता येणार नाही पण भावार्थ म्हणा किंवा दुसरं काही म्हणा, फ्युजन म्हणा.. :
अशा खालील ओळी सुचल्या..

हा वारा गेला घेऊन माझ्या 'असफल-प्रेम' कविता.
त्या वाचून झाले गगन उदास, सांडत डोळा पाणी..
त्याला पाऊस पाऊस करित हा बेदर्द जमाना नाचे.
मी दुःखी आहे मनात, लोकं गाती पाऊस-गाणी..

तुम्हाला काही वेगळ्या ओळी सुचताहेत का..?
किंवा ह्या ओळींच्या पुढची कडवी कराविशी वाटताहेत का..?

तस असेल तर इथल्या सर्व इच्छुक कवींना आमंत्रण.

एका जरा वेगळ्या धाग्याची सुरुवात..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेर इतका सुरेख आहे की एक प्रयत्न करतेच Happy

दाटलेल्या नभी, वारा लिहितो माझी कहाणी
कालच घेऊन गेला तो माझी कवितेची वही
गलबले गगन सदन, कोसळती धारांवर धारा
जग चिंब नाचे अन वेडे म्हणती पाऊस आला

_तृप्ती_
अतिशय सुंदर...

असेच छान प्रतिसाद चालू राहिले तर हा एक वेगळाच धागा होईल. (याआधी अशा स्वरुपाचा धागा आला नसल्यास)

(कविता नाही जमली पण स्फुटलेखनाचा केविलवाणा प्रयत्न! Happy )

अशाच धुंद-बेधुंद क्षणी अवखळ वारा आला अन् माझ्या त्या दोन-चार प्रेमकविता चोरपावलांनी घेऊन गेला.. त्याने त्या कविता वाचल्या म्हणूनच कि काय आता तो बरसतोय.. माझ्या कवितांवर.. माझ्या मनावर.. कदाचित त्यालाही माझे दुःख त्याच तीव्रतेने जाणवले असावे.. आणि या लोकांना त्याचा तो आक्रोश एक प्रेमगीत भासतंय.. किती हा विरोधाभास..