वर्णद्वेष आणि पोलिसांकडून होणारी हिंसा

Submitted by maitreyee on 2 June, 2020 - 11:02

अमेरिकेत मिनिआपोलिस येथे काही दिवसांपूर्वी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. अटक करत असताना जॉर्ज प्रतिकार करत नव्हता, त्याच्याकडे शस्त्र नव्हते. त्याला ४ सशस्त्र पोलिसांनी घेरले होते. त्यापैकी एकाने त्याला जमिनीवर दाबून स्वतःचा गुडघा त्याच्या मानेवर दाबून धरला होता. आपण गुदमरतोय असे जॉर्ज जिवानिशी ओरडत होता हे येणार्‍या जाणार्‍या लोकांनी घेतलेल्या फोन व्हिडिओ मधे स्पष्ट दिसतेय, ऐकू येतेय.
या घटनेनंतर अमेरिकेत अनेक शहरांमध्ये या घटनेविरोधात निदर्शने घडत आहेत. अनेक शांततापूर्ण निदर्शने होत असतानाच काही ठिकाणी निदर्शकांनीदेखिल हिंसा , जाळपोळ सुरु केल्याचेही दुर्दैवाने पहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी परिस्थितीचा फायदा घेऊन लूटमारीच्या घटनाही घडल्या आहेत.
पोलिसांच्याकडून घडणार्‍या हिंसेची ही पहिलीच घटना नाही. कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचीही ही पहिली घटना नाही.
https://mappingpoliceviolence.org/
https://policeviolencereport.org/
पण या आणि इतर अनेक साइट्स च्या डेटा नुसार व्हाइट किंवा इतर कोणत्याही वर्णापेक्षा कृष्णवर्णीयांसोबत होणार्‍या हिंसेचे प्रमाण खूप जास्त आहे. अर्थात नेहमी ( डोळे उघडे ठेवून) बातम्या बघत असाल तर अशा स्टॅटिस्टिक्सच्या आधाराची गरज ही नाही.

**या विषयावर चर्चा NRI आणि समाजाचे दुटप्पी धोरण इथे सुरु झाली हिती. तीच सुरु ठेवायला म्हणून हा धागा उघडतेय.

Group content visibility: 
Use group defaults

his second term is certain, unless and until there is some major swing . >> बरोबर! Wink

>> पूर्वीचा इतिहास लक्षात घेता या दंगली टळाव्यात किंवा पसरु नयेत म्हणून काही करता आले असते का?

माझ्या अल्पमतीत, अशावेळी लीडरशीपने जो स्टॅंड घ्यायला हवा होता तो घेतला नाही आणि लोकं आधीच पुढे येणार्या परिस्थितीचा सामना कसा करावा या विवंचनेत होते मग त्यात आगीत तेल घालायचं काम सुप्रीम लीडरने केल्यावर जे होईल ते झाले. Sad

अश्चिगने सुचवलेली डाॅक्यु. टप्प्या-टप्प्याने पाहिली. मुख्य शेवटची तीस मिनिटं अतिशय कासावीस करतात. It’s probably not for an emotional mind but it opened my eyes over Reps and Dems. I am still undecided but am I voting? I still do not think that anyone has made their minds but there is always hope for some third party better candidate IMHO. Back to Education, more reading before even I can make up my mind Sad

जाता जाता ही आजची ट्रेवर नोआ लिंक. (आधी आली असेल तर कल्पना नाही)
Rayshard Brooks: Another black man killed by police
https://www.facebook.com/TrevorNoah/videos/619751178896528/?vh=e

देवियों और सज्जनों हे खालील आर्टिकल माहितीपूर्ण आहे. एका वेगळ्या अंगाने लिहिले आहे . शतकांपासूनची घट्ट बसलेली रेसिझम कॅपिटालिझम वीण आहे व सुबत्तेची जडण घडणच ह्या वर आधारित आहे. डेमोक्रॅट पण संधिसाधूच आहेत एका पूर्ण समाजाला खालीच दाबून ठेवणे व त्यावर आपल्या सुबत्ते चा त्या समाजाला कधी न तोडता येण्याजोगा पाया रचणे हेच मूळ उद्दीष्ट आहे. मग उगीच तोंड देखले लिबरल वक्तव्य हे नेते का करतात?

https://www.newyorker.com/magazine/2020/05/25/is-capitalism-racist

अ‍ॅटलांटातील काळ्या माणसाच्या मृत्यूचे प्रकरणः

रेशार्ड ब्रुक्स हा काळा माणूस नशेत होता आणि तो वेंडीजच्या ड्राईव्ह थ्रू च्या लाईनीत झोपला होता. पार्किंग लॉटमधे नाही. ड्राईव्ह थ्रू ह्या प्रकाराच्या व्याख्येत ड्रायव्हिंग येते त्यामुळे त्या लाईनीत नशा करून येणे हे डी यू आय लागू करण्याजोगे आहे. कोविड चालू असताना रेस्टॉरंटमधे येणारी गिर्‍हाईके बहुतांश ड्राईव्ह थ्रू पसंत करतात कारण आत बसून खायला बंदी. त्यामुळे अशा वेळी ड्राईव्ह थ्रू अडवून ठेवणे हे धंदा बुडवण्यापैकी आहे आणि वेंडीजच्या लोकांनी पोलिसाला बोलावले ह्यात काहीही चूक नाही.

पहिल्यांदा अगदी सुतासारखा सरळ वाटणारा रेशार्ड अटक करायला जाताच अंगात आल्यासारखा का वागला? कारण तो प्रोबेशनवर होता. कोव्हिडमुळे काही कैद्यांना तुरुंगातून तात्पुरते सोडण्यात आले त्यात हा एक. अनेक गुन्ह्याकरता त्याला शिक्षा झालेली आहे. आपल्याच मुलांशी क्रूरपणे वागल्याबद्दलही त्याला शिक्षा झाली होती. असले रेकॉर्ड असताना शिवाय डी यू आय खाली पकडले गेलो तर नक्कीच दीर्घ काळासाठी तुरुंगात जाऊ ह्या भीतीने त्याने पळून जायचा प्रयत्न केला. आणि दारूच्या नशेत असल्यामुळे काय करावे आणि काय नाही ह्याचे भान राहिले नसेल.

आता पोलिसांची काय चूक आहे? नशेतला माणूस, हातात टेझर. कुणी म्हातारा वा लहान बालक त्याच्या हाती लागले आणि त्यांच्यावर टेझर चालवले असते तर ते मेले असते. पोलिसावर चालवून पोलिस बधीर होताच त्याचे पिस्तुल पळवू शकला असता. आणि मग आणखी हिंसाचार. हे सगळे निर्णय काही सेकंदात घ्यायचे असतात. त्यामुळे पोलिसांनी गोळ्या घातल्या ह्यात काही चूक नाही. प्रोबेशनवर असताना दारू पिऊन ड्राईव्ह थ्रू मधे बेहोश होऊ नये एवढीही अक्कल नसलेला माणूस असेल तर अनर्थ होणारच.

आताच local nightly news मधे video दाखवला की एकाला gas station parking lot मधे ४ ते ५ काळया मुलांनी मारहाण केली. कारण की दुकानात ते लाईन कट करत होते आणि याने सांगितले की असे करु नका.
They waited outside and beat him up all at once when he came out. They even shouted BLM as bystanders heard it. All just aired on local news at 10 PM.

This behavior definitely hurts their cause. And is equally unacceptable as the discrimination they are unhappy about.

त्यामुळे पोलिसांनी गोळ्या घातल्या ह्यात काही चूक नाही. प्रोबेशनवर असताना दारू पिऊन ड्राईव्ह थ्रू मधे बेहोश होऊ नये एवढीही अक्कल नसलेला माणूस असेल तर अनर्थ होणारच. >>>>>>
काय सांगता ?
ते काहीही असो !
या केस मध्ये सुद्धा पोलिसच दोषी आहेत .
तो काळा होता ना ? मग संपला विषय !
खरं म्हणजे त्याच्यावर कारवाई करण्या ऐवजी शाल श्रीफळ देवून त्याला घरी सोडण्यात यायला हवे होते .
ड्राईव्ह थ्रू मध्ये गाडी लावून झोपणे , बनावट नोटा चलनात वापरणे , दुकाने लुटणे आणि रस्त्यावर अत्याधुनिक शस्त्रांनी गोळीबार करणे या घटना इथून पुढे गुन्ह्यात मोडत नाही असे एकदाचे ट्रम्प ने सांगितले की काळ्याची इज्जत अफजाई मध्ये आपसूक वाढ होणारच !

या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍यांपैकी सर्व जण फक्त एकाच दिशेने प्रतिसाद देत आहेत. अपवाद शेंडेनक्षत्र, राज, वटवृक्ष आणि मी. सबब, अल्पसंख्यांकांना लागू असणारे संरक्षण आणि इतर सवलती आम्हा चौघा आयडीज ना या धाग्यापुरत्या तरी मिळायलाच हव्यात.

माबो चा आत्तापर्यंत चा इतिहास पाहता
' हा धागा आपल्या साठी वाचनीय मात्र सुध्दा नाही '
हि सवलत आपल्या चौघांना नक्कीच मिळेल Happy

https://www.washingtonpost.com/world/2020/06/16/un-human-rights-council-...

UNHRC’s Wednesday event will focus on “systemic racism, police brutality and violence against peaceful protests” in the United States, after a request by all 54 African countries, who highlighted the death of George Floyd, a black man who died in police custody last month, sparking a protest movement.

अमेरिका मानवाधिकार समितीतून बाहेर पडलीच आहे. आता युनो मधूनही बाहेर पडा आणि युनोला अमेरिकेतून बाहेर काढा.

वरच्या बातमीतलं आफ्रिकन कंट्रीज वाचून , कोरोना संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचा उल्लेख करताना त्यांना आफ्रिकन विशेषण लागलेलं पाहिलं होतं, ते आठवलं.

या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍यांपैकी सर्व जण फक्त एकाच दिशेने प्रतिसाद देत आहेत. अपवाद शेंडेनक्षत्र, राज, वटवृक्ष आणि मी.///

पण एक दोन लोक आत्ताच कुंपणावरून उडी मारून तुमच्या कंपूत शिरताना दिसले हां. सोशल मीडियावर ट्रम्पबद्दल हतबुद्धता वगैरे व्यक्त करून प्रत्यक्षात त्यालाच मतदान करणारेही खूप असतात की Wink

माबो चा आत्तापर्यंत चा इतिहास पाहता >>>
वटवृक्ष, किती वर्षांचा इतिहास? मी १५ वर्षे आहे. केवळ विचारांमुळे किंवा मतांमुळे कोणाचाही आयडी उडाल्याचे बघितलेले नाही. पण वादांमधे एका लेव्हलनंतर काही आयडी मनात आलेली वाक्ये तशीच्या तशी लिहून बसतात, आणि मग उडतात. आणि मग त्यातले बरेच इतर सोशल नेटवर्क्स वर "आपल्या विचारांना" माबोवर स्वीकारत नाहीत असे लिहीतात. यात सर्वजातीय, सर्वमतीय आणि सर्वपक्षीय समर्थक पाहिले आहेत Happy

त्यामुळे सगळी मते एकत्र केली तर मायबोली ही एकाच वेळी ब्राह्मणी, हिंदुत्त्ववादी, संघी, काँग्रेसी, पुरोगामी/फुरोगामी व हिंदुद्वेषी अशी साइट आहे असे वाटेल.

रेशार्ड ब्रुक्सच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्या मते केवळ काळ्या लोकांचे लांगूलचालन करण्याकरता उचललेले एक घातक पाऊल आहे. अशाने पोलिस दलाचे नीतीधैर्य खच्ची होणार आहे. चांगले लोक पोलिसात भरती होणार नाहीत. वाईट, भ्रष्ट लोक, कामचुकार लोक पोलिस होऊ लागतील. अशाने गुन्हे वाढत जाणार. पोलिस कारवाई करायला कचरणार आणि गुन्हेगार जास्त माजणार. अ‍ॅटलांटाच्या काही पोलिसांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त आहे.

खुनाचा गुन्हा दाखल केला ते ठीक आहे. पण कोर्टात हे सिद्ध करणे अवघड आहे की पोलिसाने खून केला आहे. मयत मनुष्याचे वागणे पाहता अशा प्रकारचा आरोप टिकणे कठिण आहे.

>>
कोर्टात टिकणे अवघड आहे तर 'कर नाही त्याला डर कशाला' हे आर्ग्युमेंट इथे वर कोणी केलेलं बरं?
<<
कोर्टात टिकणार नाही पण कोर्ट काही क्षणार्धात निर्णय घेत नाही. त्यामुळे तो निर्णय होईपर्यंत संबंधित पोलिस तुरुंगात सडणार. चौकशा, पेपरवर्क ह्यांचे पेव फुटणार. त्या पोलिसाची काही वर्षे बरबाद होणारच. आणि असल्या प्रसंगी प्रशासन आपल्या मागे उभे रहात नाही ही भावना निर्माण होणार आणि त्याचा पोलिसांवर दूरगामी परिणाम होणार.

कुठे गुन्हा घडला की आरोपी, संशयित व्यक्ती ज्या वंशाची असेल त्या वंशाच्या पोलिसाला कारवाईसाठी पाठवावे असा काही बदल केला तर निदान पदोपदी रेसिज्मचा जप केला जाणार नाही.

>>कोर्टात टिकणार नाही पण कोर्ट काही क्षणार्धात निर्णय घेत नाही. त्यामुळे तो निर्णय होईपर्यंत संबंधित पोलिस तुरुंगात सडणार. चौकशा, पेपरवर्क ह्यांचे पेव फुटणार. त्या पोलिसाची काही वर्षे बरबाद होणारच. आणि असल्या प्रसंगी प्रशासन आपल्या मागे उभे रहात नाही ही भावना निर्माण होणार आणि त्याचा पोलिसांवर दूरगामी परिणाम होणार. >> EXACTLY!

I have been reading the comments written here. In today's paper read the following: "Did it not occur to the officers involved to use a little restraint and a lot of commonsense? Our Aussie coppers i.e. policemen would have let him run off. After all the matter was quite trivial. The driver's car would have been impounded immediately. He would have turned up at the local station seeking car's whereabouts. That is when he could have been charged with abundance of offences". If the officers had followed this path a life and a family would have been saved. Just because the police are given a gun does not mean they have to use it. Gun has give US police arrogance which has come back to bite them.

ऑस्ट्रेलियातल्या पेपरमधलं इंग्लिश असं कसं?

Australia's I cant breathe moment
https://www.smh.com.au/national/nsw/david-dungay-screamed-for-help-said-...

When Mr Dungay again says he can't breathe, officers respond, "If you can talk you can breathe". About a minute later, he is unresponsive.

या केसचं पुढे काय झालं?

https://www.loksatta.com/agralekh-news/tuticorin-custodial-death-father-...

कोणत्याही कारणाने पोलिसांना निरंकुश अधिकार दिले की काय होते याचे सुन्न करणारे उदाहरण तमिळनाडूत गेल्या आठवडय़ात घडले. त्यात पोलिसांकडून झालेल्या अमानुष अत्याचारापेक्षाही अधिक सुन्न करणारी आहे ती देशभरातील या संदर्भातील शांतता. अमेरिकेत मिनेआपोलीस शहरात पोलिसांच्या अत्याचारात जॉर्ज फ्लॉइड हा कृष्णवर्णीय मारला गेल्यानंतर सारा देश पेटून उठला आणि आपल्याकडेही अनेकांनी अमेरिकी पोलिसांवर दुगाण्या झाडून घेतल्या. या दोन्ही घटनांतील साम्य असे की, पोलिसांची प्रतिक्रिया प्रत्यक्ष कथित गुन्ह्य़ाच्या तुलनेत कितीतरी पटीने हिंसक होती. अमेरिकेत पोलिसी अत्याचारात एक व्यक्ती मृत झाली. आपल्याकडे दोन. तेदेखील वडील आणि मुलगा. पोलिसांतील अकारण हिंसक प्रवृत्तीविरुद्ध अमेरिकी नागरिकांचा भडका उडाला आणि देशभर हिंसक निदर्शने घडली. त्या तुलनेत आपल्याकडील शांतता कानठळ्या बसवणारी. अमेरिकेत त्यानंतर पोलीस सुधारणांचा व्यापक कार्यक्रम सर्वोच्च पातळीवरून हाती घेण्यात आला. आपल्याकडे तसे काही होण्याची सुतराम शक्यता नाही.

भयंकर आहे!
आपल्याकडे उन्मादी वातावरण आणि कोणाला धडा शिकवला की होणारी प्रशंसा हे अगदी वर्मावर बोट ठेवले आहे.

तमिळनाडू प्रकरणावरुन हैदराबाद एन्काउंटरची आठवण झाली. त्तेव्हा पोलिसी कारवाईचे अनेकांनी समर्थन केले होते, आनंद व्यक्त केला होता.

>>
कॅलिफोर्निया सिस्कोतील दलित द्वेष प्रकरण
<<
ह्याचा ह्या चर्चाविषयाशी दुरान्वयानेही संबंध नाही. इथे वर्णद्वेष आणि पोलिसांच्या वागणूकीवर चर्चा चालू आहे. सिस्को प्रकरणात पोलिस कुठेही गुंतलेले नाहीत. तेव्हा हा विषय वेगळ्या व्यासपीठावर न्यावा ही विनंती.

जॉर्ज फ्लॉईडच्या खुनानंतर सिएट् ल शहरातील मध्यवर्ती भागात CHAZ/CHOP ह्या नावाचे क्षेत्र निर्माण केले गेले. सिएटलने पोलिस दल रद्द करावे, तमाम काळ्या कैद्यांना मुक्त करून त्यांच्यावरील खटले पुन्हा चालवावेत आणि त्यांचे ज्यूरी फक्त काळे असावेत अशा "साध्या" "सोप्या" मागण्या होत्या. सुरवातीला शहराच्या महापौर बाईंनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले. त्याला वसंत ऋतूतील प्रेम सोहळा (summer of love) अशा भाषेत गौरवले! पण हळूहळू ह्या डोकेफिरू आंदोलकांनी आपले रंग दाखवणे सुरू केले. धाकदपटशा, खंडणी, दुकाने लुटणे ह्या प्रकरणावरून गाडी गोळीबार, खुनाखुनीवर आली. अनेक स्थानिक उद्योग आणि रहिवाशांनी सिएटल सरकारविरुद्ध केस केल्या. अनेकदा त्यांच्यावर ९११ कॉल करून मदत मागवायची वेळ आली. पण ह्या प्रेमाच्या सोहळ्यात पोलिसांना प्रवेशबंदी असल्यामुळे ९११ ऑपरेटरने आपली हतबलता व्यक्त केली! अशा प्रकारे गुंड लोकांना मोकळे रान देऊन कायदा पाळणार्‍या लोकांना वेठीस धरणे हे महाग पडणार होते हे दिसतच होते.
तर ह्या आनंदसोहळ्यत खुनाखुनी सुरू झाल्यावर अत्यंत नाईलाजाने महापौर बाईंनी कारवाईचे आदेश दिले. आता हा बिनडोक प्रकार आवरण्याची सुरवात झाली आहे. अनेक लोकांना अटक केली आहे. सशस्त्र पोलिस मोठ्या संख्येने कारवाई करत आहेत.
एक विशेष गोष्ट म्हणजे ह्या CHOP/CHAZ प्रकरणात अग्रभागी क्षमा सावंत नामक मराठी स्त्री नेतृत्व करत आहे. (महापौर बाईंपेक्षा ह्या जास्ती डाव्या होऊ पहात आहेत. त्यामुळे महापौर आणि सावंत बाईंमधे वितुष्ट आले आहे!)
डाव्या मंडळींच्या ह्या रणधुमाळीत सामान्य जनतेकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. आणि ह्यातून सिएटलच्या सुप्रसिद्ध सुईच्या (Space Needle) अग्रभागी मावेल इतकाही न्याय काळ्या लोकांना मिळणार आहे का नाही देव जाणे!

ऑनेस्टली, माझ्या मते सावंतबाईं सारख्या दोन-तीन समाज सेविका प्रत्येक सॅंक्चुअरी सिटीज मधे अ‍ॅक्टिव असाव्यात. इक्वलिटि, वेल्थ क्रिएशन इ. च्या समाजवादि व्याख्या/अ‍ॅप्रोच - पुलिस फ्री झोन्स, स्प्रेड द वेल्थ इ. ह्या किती फोल आहेत हे त्याशिवाय लोकांच्या ध्यानात येणार नाहि...

Submitted by shendenaxatra on 1 July, 2020 - 21:53 >>> यावर खोलात जाऊन बातम्या वाचल्या/पाहिल्यावर मला तर त्या "द पर्ज" सिनेमातील दृश्ये आठवतायेत.

क्षमा सावंत या मराठी नाहीत. बाईंचं मूळ नाव क्षमा रामानुजन अय्यंगार असं आहे. सावंत नामक मराठी व्यक्तीशी त्या काही काळ विवाहित होत्या पण ते लग्न मोडलं व आता त्यांचा पती गोरा अमेरिकन आहे.

>>
क्षमा सावंत या मराठी नाहीत. बाईंचं मूळ नाव क्षमा रामानुजन अय्यंगार असं आहे. सावंत नामक मराठी व्यक्तीशी त्या काही काळ विवाहित होत्या पण ते लग्न मोडलं व आता त्यांचा पती गोरा अमेरिकन आहे.
<<
दुरुस्तीबद्दल आभार.

असेही ऐकिवात आहे की सावंतबाईंचा डावा धिंगाणा अनेक दिवस चालू आहे. पण जेव्हा बाईंनी मोर्चा थेट महापौर बाईंच्या घरावर नेऊन तिथे घोषणाबाजी सुरू केली तेव्हा मात्र महापौर डर्कन ह्यांनी क्षमा बाईंना धडा शिकवण्याचे ठरवलेले दिसते आहे! सामान्य नागरिकांचे हाल होत असताना डर्कन बाई आंदोलकांच्या बाजूने उत्साहाने टाळ्या वाजवत होत्या. ट्रंपने त्यांना आपल्या शहराला ताळ्यावर आणण्याचे उपदेश केले ते तुच्छतेने झिडकारत होत्या पण स्वतःच्या घरावर संक्रांत आल्यावर मग मात्र कारवाई सुरू केली.
अशा प्रकारे ढोंगी, स्वार्थी, आप्पलपोट्या अतिडाव्या नेत्यांना पुढच्या निवडणूकीत मतदार घरी बसवतील अशी अंधुक आशा आहे.

स्वतंत्र देशात शांततेने मोर्चा काढून घोषणाबाजी करण्याचे स्वातंत्र्य होते असे मला वाटत होते. पण माझी माहिती चुकीची होती बहुतेक ...

खंडणी मागणे, दुकाने लुटणे, गोळीबार करून लोकांना मारणे, पोलिसांना, रुग्णवाहिकांना प्रवेशबंदी करणे ह्या गोष्टींना शांततापूर्ण आंदोलन मानले जात नसावे बहुतेक.

हो त्या सावंत रामानुजन बाई जरा डोक्याने अधू वाटतात त्यांनी भारताच्या अंतर्गत कायद्यामध्येही लुडबुड ,निषेध वगैरे केला होता.

Pages