इलाज नाही.....

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 31 May, 2020 - 09:19

इलाज नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)

आयुष्याला सलतो आहे..इलाज नाही
विरह तुझा मज डसतो आहे..इलाज नाही

जरी दिली तू टाळी नाही मला एकही
तुझी वाहवा करतो आहे..इलाज नाही

रस्ता बदलुन तू वळणावर वळल्यापासुन
नको तिथे मी वळतो आहे..इलाज नाही

तुला भेटले नाही घरटे हक्काचे अन्
मीही वणवण फिरतो आहे..इलाज नाही

चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही

इतकी वर्षे झाली पहिला गुलाब देउन
हात अता थरथरतो आहे..इलाज नाही

वाटाघाटी कितीक केल्या आयुष्या मी
अजूनसुद्धा करतो आहे..इलाज नाही

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही
मस्त.....वाह