Submitted by मन्या ऽ on 26 May, 2020 - 09:44
रेंगाळतो आहे..
आजतोवर वाचलास तु
हा एक योगायोग आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
भरल्यापोटीचे तुझे भुकेचे डोहाळे
काही केल्या संपत नाहीत
डोळे उघडुन बघ जरासे
गरजुंची आज दैना आहे
एक नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे
अपेयासाठी रांगा लावुनी
काय तु कमावतो आहेस?
आज तु वाचलास परि
तु उद्याचे बुकींग करुन ठेवतो आहेस
जीवाचा आटापिटा करत
तुझ्याच हितासाठी
देव स्वतः झुंजतो आहे
तरीही क्षुल्लक कारणे देऊन
तु रस्ते धुंडाळतो आहेस
क्षणभर नजर टाक बाहेर
तुझा मृत्यु दारात रेंगाळतो आहे..
-दिप्ती भगत
(९मे,२०२०)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म्म!!! करोनावर कविता आहे
ह्म्म्म!!! करोनावर कविता आहे. आवडली.
(No subject)
आता तरी लोकांनी करोनाला
आता तरी लोकांनी करोनाला सिरीअसली घ्यायची गरज आहे.
सुंदर कविता!!!
सुंदर कविता!!!
छान कविता.. आवडली
छान कविता.. आवडली
आवडली
आवडली
वाह!... छान.. आवडली कथा..
वाह!... छान.. आवडली कविता.. सध्याच्या घडीला परफेक्ट...
सामो, खुशादा, राव पाटील,
सामो, खुशादा, राव पाटील, अज्ञातवासी, रुपाली, तेजो, अजयदा प्रतिसादासाठी धन्यवाद!
छान कविता
छान कविता
छान (बुकिंग ऐवजी मरण शब्द
छान (बुकिंग ऐवजी मरण शब्द योजला तर?)
वाहह, काय coincidence आहे मी
वाहह, काय coincidence आहे मी सुद्धा असच काहीतरी लिहिलंय
कविता आवडली
कविता आवडली
किल्लीताई, यतीन प्रतिसादासाठी
किल्लीताई, यतीन प्रतिसादासाठी धन्यवाद!
@राजेंद्र, धन्यवाद!
बुकिंगऐवजी मरण>>>
बुकींग हा शब्द २ कारणांसाठी लिहिला आहे.
१. दारु पिऊन कोणाच भल होणार आहे! आणि
२. दारु इतकी महत्वाची नाही कि दारुसाठी रांगा लावुन स्वतःसोबत कुटुंबातील इतर सदस्यांचा जीव धोक्यात घालावा..
@प्रतिकदा, हो आत्ताच वाचली तुझी कविता. मस्त लिहिलीये..
आवडली !!! दारूला विरोध म्हणून
आवडली !!! दारूला विरोध म्हणून जास्त आवडली !!!
मला कवितेतले काळत नाही पण या कवितेचा सोल खूप छान वाटला .
दिवसेंदिवस तुमचे लिखाण आणखी चांगले होत चालले आहे . पुलेशु .
वा वा! उत्तमच!
वा वा! उत्तमच!
अप्रतिम..... जीवनाचे अंतिम
अप्रतिम..... जीवनाचे अंतिम सत्य सुंदर शब्दात रेखाटले आहे.... अभिनंदन
कटप्पा, मंगेश, तुषार आपल्या
कटप्पा, मंगेश, तुषार आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद!
लोकांना कळत पण वळत नाही
लोकांना कळत पण वळत नाही
छान आवडली
छान आवडली
@डॉ.काका, हो न्युज वाचताना
@डॉ.काका, हो न्युज वाचताना-बघताना तेवढी एकच खंत मनाला आत पोखरत होती. त्याचेच प्रतिक म्हणजे ही कविता..
@ नौटंकी, धन्यवाद!