खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

आमच्या टारझन बोक्यावर "टारझन द वंडर कॅट" हा पहिला भाग लिहिला आणि बऱ्यापैकी मांजरप्रेमींची ओळख झाली.
नंतर अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्यावर धागा आला आणि त्यावरही मांजरांबद्दल बऱ्यापैकी माहिती आली आणि प्रश्नही आले.
आमचा टारझन घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही मांजरांची वेडी असलेली माझी लेक त्यांचे व्हिडिओज् युट्युब आणि इंन्स्टा वर बघायची मला पाठवायची.
मांजरप्रेमी मायबोलीकरांनी हे व्हिडिओज् पहावेत हा मुख्य उद्देश आणि बहुतेक असा धागा मायबोलीवर नाही हे पाहून हा सबकुछ मांजरांसाठी असलेला धागा काढतोय.

मांजरप्रेमींनी यात वेळोवेळी भर घालावी ही विनंती.
यात युट्युब, इंन्स्टाच्या लिंक द्यायलाही हरकत नाही आणि घरच्या मांजरांचे व्हिडिओ, फोटोज् असतील तर फारच उत्तम..
पाळणाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी दिल्या आणि जाणकारांनी माहिती दिली की फावल्या वेळी कधीही इथे येऊन रमायला हरकत नाही.
हा धागा मांजरप्रेमीना तर आवडावाच पण इतरांसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून उपयोगी पडेल असं वाटतं कारण मांजरं विशेषतः त्यांची पिल्लं हा एकंदरीतच भयंकर क्यूट प्रकार आहे..

सुरुवातीला धाग्यामधेच काही छान व्हिडिओजच्या लिंक्स देतोय..

https://youtu.be/bw5WtZmU-i0

https://youtu.be/MLhesmKn4Cs

https://youtu.be/okOVxfuSYPk

https://youtu.be/bhpP8jEm5ic

बाकीच्या प्रतिसादात येतीलच...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>फोटोवरुन आठवलं. माझ्या मांजराला गवत खायला खूपच आवडायचं. का माहित नाही.<<<

सगळी मांजरं गवत खातात. मांजर स्वछतेचं भोक्त असल्यामुळे त्याचं अंग सतत चाटुन स्वच्छ करत असतं. या उद्योगात त्याचे केस त्याच्या पोटात जातात. मांजराने गवत खाल्लं की हे केस गवताबरोबर फरबाॅल बनून बाहेर येतात. गवत खाल्ल्यावर किंवा अपचन झाल्यावर मांजर उलटी काढून हे पदार्थ बाहेर काढतात.
आपलं मांजर जर घराबाहेर आवारातही जात असेल तर हा कुठलाच प्रकार घरी घडत नाही.
(टारझन आजारी असताना व्हेटची औषधं दिली की उशीरा बरा व्हायचा आणि औषध न घेता खाली पळून किंवा रडून गेला तर गवत खाऊन बऱ्यापैकी लवकर टणटणीत होऊन परत यायचा.. Happy )
ही मांजरांच्या गवत खाण्याबद्दल थोडी माहिती आंजावरुन साभार..
https://www.purina.com/articles/cat/behavior/why-cats-graze

कुत्रे पण गवत खाता त व उलटी करून टाकतात. एक विशि ष्टच गवत खातात मात्र. एक हेड स अप फॉर टेल्स साइट आहे तिथे कुत्रा मांजर बाबतीत सामान मिळते. आम्ही नखे कापायचे हत्यार व वेट वाइप्स मागवलेल्या. इच वाइप्स. त्याने पुसून घेतले की कुत्रे फार स्वतःला चावत बसत नाही. वाइप ला कडू चव असते. लॉक डाउ न मध्ये सुद्धा आले पण सामान. आणि आम्ही घरीच कुत्र्याची नखे कापली. तिला चालायला त्रास होतो होता इतकी वाढली होती.

मी फेसबुक वर नवीन असताना पॉज अँड क्लॉ ज नावाचे एक पेज काढले होते. सिंगापूर हाँ ग काँग वगिअरे देशात व अमेरिकेत सुद्धा कुत्रे भुंकायचा त्रास होउ नये म्हणून त्यांचे स्वर यंत्र काढतात व मांजरांच्यात त्यांच्या पायाची नखे काढून टाकतात. पण ह्यामुळे त्या प्राण्यंना भयानक त्रास होतो. व स्व संरक्षणासाठी हातात काहीच उरत नाही. ह्या चालीच्या विरोधात काढले होते पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आता मांजराशी जास्त जवळीक झाल्यावर लक्षात येते आहे कि त्यांची धारदार नखे त्यांच्यासाठी किती महत्वाची आहेत ते. मला प्रेमाने पायाला
टवकार त असतात नुस्त्या हाताच्या एका चापटीने दुसरे प्राणी दूर सरतात.
https://headsupfortails.com/?gclid=EAIaIQobChMInrDku6_L6QIVGKmWCh2j4gAGE...

अमा,
नख काढण, स्वरयंत्र काढण ह्याबाबतीत मला काहीच ठाऊक नव्हते.. Sad Sad

सिंगापूर, हाँग काँग मध्ये कुत्रा फार भुंकू लागला तर शेजारी तक्रार करू शकतात व तुमचे पेट सरकार परत घेउन मारून टाकतात. तसेच इन्स्टाग्राम वर जे फार फेम्स कुत्रे आहेत क्रुसो वगिअरे त्यांचे पण स्वरयंत्र काढून टाकलेले आहे कारण ते व्हिडीओ शूट करताना भुंकले तर डिस्टर्ब होते व व्हिडीओ क्वालिटी खराब होते. मी तिथेच क्रुसो च्या मालकांना निषेध व्यक्त केला होता. पण त्यानी त्या कुत्र्याला पैसे कमविण्याचे साधन केले आहे. मांजरांचे सुद्धा नखे काढून टाक ली तर ते स्वतःचे संरक्षन कसे करतील? कुत्रा बांधून ठेवला व आग लागली, बिल्डिंग पडली तर भ भुंकून स्वतःची सुटका करायचा प्रय्त्न करेल. पण हे काढून टाकलेले कुत्रे नुसते चिरकतात अगदी ऐकवत नाही ते. स्पेशली ब्रीड केलेली मांजरे कुत्रे हे पण एक स्वतंत्र रॅकेट आहे. त्यात त्या प्राण्याचे स्पिरिट गायबच होते व एक खेळणे उरते. असे नाही पाहिजे. नैसर्गिक मांजरे कुत्रे फार गोड वागतात व त्यांच्या गरजा फारच कमी आहेत. त्यांना फक्त वेळो वेळी मेडिकल अटेन्शन मिळाले, लसीकरण केले की बास असते. झोपायला
बाळंत पणी आडोसा व घार वगिअरे पक्षांपासून संर क्षन लागते. कारन ते पपी किटन चोरोन खाउन टाकू शकतात. कावळे पण फार त्रास देतात.
पण आपल्याकडे गैरसमजाचे डोंगर असतात. व मुद्दामून ह्या प्राण्यां ना त्रास देणारे, मारणारे खूप अस्तात.

https://youtu.be/5_nWGG_TFDM

मांजरीची मस्तीखोर खरं तर वांड, व्रात्य मुलं....
आणि करु देत मस्ती जरा वेळ...
तरच नंतर बराच वेळ शांतपणे झोपतील हे उमजललेली शांत आई..

आजचा रविवार स्पेशल व्हिडिओ...

>>>पण मांजरे कुत्र्याइतकी जीव लावू देत नाहीत. त्यांचे "नो स्ट्रिंग्ज एटॅच्ड" तत्व असते. इमानदारी, खाल्ल्या अन्नाला जागणे, वेळप्रसंगी मालकासाठी प्राणाची बाजी लावणे असली काही देवघेव नाही. "तुझे खरेच निरपेक्ष प्रेम असेल माझ्यावर तर घाल मला खायला, नाहीतर हा मी चाललो थोड्याच वेळात" असा मांजराचा सरळ साधा सोपा व्यवहार असतो Lol जर तुम्ही नियमित खायला देत असाल तर मांजर तुम्हाला सोडून जाणे महामुश्कील.<<<< @ atuldpatil, अगदी.... अगदी...

मन्या Sad ह्रद्य आठवण. : +१

@ अमा, या पानावरचे दोन्ही प्रतिसाद छान आणि माहितीपूर्ण...

मांजराना व्हेट कडे नेलं कि तपासणी फी मधे नखं ट्रीम करुन देणं Included होतं. मांजरबाळ एकटं असेल, म्हणजे आई किंवा भावंडं मस्ती करायला, रग जिरवायला नसतील तर थोडा नखांचा प्रसाद आपल्यालाही मिळतो... तेव्हा ही नखं काढली तर आपल्यालाही बरंच वाटतं.
त्यात डाॅक्टरही ते नखं काढायचं आयुध आपल्या गळ्यात मारतात. ही नखं न दुखवता काढता आली तर एक वेळ काढणं ठीक.
पण जर आपलं मांजर बाहेर जाणार असेल तर मात्र ही नखं काढणं योग्य नाही कारण त्याच्या स्वसंरक्षणाचं एवढंच काय तर त्याच्या वावराचं पण ही नखं हे एक प्रमुख साधन आहे.
टारझनला बाहेर सोडण्यापूर्वी आम्ही एक-दोनदा त्याची नखं कापली होती पण बाहेर जायला लागल्यावर मात्र त्याची नखं किंचितही न कापण्याचा आम्ही निर्णय घेतला.
इतर बोक्यांशी प्रत्यक्ष मारामारी, मांजरींबरोबर प्रियाराधन (ह्यात एकमेकांची ओळखही हे लोक्सं एकमेकांचे शत्रू असल्यासारखी करुन घेतात. प्रेमयाचना कमी आणि गुरकावणी, दटावणीच जास्त)
एवढंच काय तर अंगावर आलेल्या कुत्र्यालाही गुरकावून दाखवायचा आत्मविश्वास विचकलेले दात आणि फुलवलेल्या केसांच्या जोडीने ही नखं धारदार असतील तरंच येतो.
आणि पळून जाऊन झाडावर चढायची वेळ आली तर ही नखंच कामाला येतात.
आता ज्यांना मांजर पाळायचीय ते ह्या नख प्रकरणामुळे धास्तावून जायला हवेत कां.... तर अजिबात नाही.
कारण बाळ माऊ चावतं किंवा डावली मारताना त्याची नखं लागतात ती फार अपाय करत नाहीत...
ती तेवढीच लागतात जेवढे लहानपणी आपल्या धाकट्या बहिणीचे चिमकुटे आपल्याला लागतात.. Happy
तेव्हा त्या बाळासाठी आपण अपरीचित असतो. त्याचा तेवढा आपल्यावर विश्वास नसतो.
पण जसं जसं हे बाळ मोठं होतं, त्याचे दात मोठे आणि ताकदवान होतात, त्याची नखं लांब, जोमदार आणि धारदार होतात तसतसं आपली ओळख, प्रेम आणि आपल्यावरचा विश्वास वाढल्यामुळे आपल्यासाठी ती वापरलीच जात नाहीत.
लहानपणी आपण प्रेमाने थोपटलं तरी पावलांच्या गादीमधून प्रतिक्षिप्त क्रियेने सपकन बाहेर येणारी त्याची नखं मोठेपणी धसमुसळेपणाने आपण जरी उचलून घेतलं तरी तळव्याच्या मऊ गादीच्या आतच रहातात..
दातंही लावतो कधी कधी पण तेही त्याला बोलता येत नाहीत म्हणून.. आणि ते ही आपण चुकीच्या/जास्त दाबाने धरलं असेल, पायाने त्याला आपल्याला बाजूला करता येत नसेल, तरच...
ते ही दाताने आपलं मनगट धरुन हळूच बाजूला करतो.
पण दातात जोर मात्र आई पिल्लांना धरते तेवढाच.. त्यात हिंसेचा कुठलाही भाग नाही.

सो नखं न काढण्याच्याच पक्षात मी आहे..

माझ्याकडे सध्या मांजरे नाहीत असे लिहून शाई वाळत नाही तेवढ्यात देवाने एक मांजर 4 पोरांसकट माझ्या गळ्यात आणून टाकले. ही मांजर दोन आठवड्यापूर्वी माझ्या घराची रेक्की करून गेली होती पण तिला खिडकीतून उतरताना पाहिले असल्यामुळे रेक्की नक्की कशासाठी हे तेव्हा कळले नाही. आज उलगडा झाला. (शेजारी म्हणाले देवाने तूमची सोय केली Happy Happy )

आज सकाळी कुंडीतल्या झाडांना पाणी देत असताना कोपऱ्यातल्या पिवळ्या अबोलीच्या दिशेने पाईप वळवला आणि गुरगुर ऐकू आली, दचकून बघते तर ही बया ताणून बसलीय, कुशीत 4 कापसाचे गोळे आणि चेहऱ्यावर भाव 'काय अक्कल आहे का तुला??' ..

एक पूर्णपणे इजिप्शियन माऊचे रूप; दुसरेही तसेच आहे पण खालून गोरे आहे; तिसरे पूर्ण पांढरे आणि तीनचार ठिपके माऊ+जिंजर असा जुळा स्पॉट असलेले आणि चौथे अंगभर माऊ+जिंजर स्पॉट्स असलेले अशी 4 बाळे आहे. 1 आठवड्याची असावीत, चालताना दारुड्यासारखी चालताहेत आणि डोळे अगदी जरासे उघडलेत.

दूध वगैरे दिले बाळंतिणीला. चपातीही दुधात कुस्करून दिली. आता बघितले तर बाळे झोपलीत आणि बाळंतीण गुल. मी तोवर जीव टांगवून बसलेय, तो गुंड आला तर पिल्ले खाईल ह्या भीतीने. त्याची फेरी असते आठवड्यातून एकदा व दुपारची तर हमखास असतेच.

अजून मी हात लावला नाहीये, तिने जशी ठेवलीत खोपचित तशीच आहेत, एक मोठा बॉक्स तयार ठेवलाय, नंतर उचलून आत ठेवेन.

अगदी अडचणीच्या जागी आहेत पण तिथे सेफ आहेत, गुंड खूप जाड आहे, तिथे पोचणे कठीण आहे त्याला. मी चारी बाजूने पॅक करून ठेवलेय फक्त.

फोटो इथे अर्धाच का पेस्ट होतोय देव जाणे.

आता झोपलीत

आई 12 वाजता गडप झालीय, अजून परतली नाही. तोवर मुलांना बॉक्समध्ये ठेऊन बाजूने पडदे लावलेत, तिने जिथे मुलांना ठेवले तिथे ऊन येते 3 नंतर. जिथे ठेवलेय तिथे तिथेच ठेवले फक्त बॉक्समध्ये ठेवले. मागेही 4 पोरे व आई सगळी अशाच बॉक्स मध्ये सुखाने राहिली होती.

आई नसली तरी पोरे घोडे विकून झोपलीत. मी उचलले तर मला नखे मारायला लागली Happy

आली एकदाची... किती उशिरापर्यंत भटकत होती.... माझी आई म्हणाली तू बाळंतिणीला मासे बिसे खिलवायचे सोडून दूध दिले तर तीचे कसे होईल?? गेली असेल उंदिरयुक्त प्रोटीन आहार शोधत.... Lol

बॉक्सची खुडबुड ऐकू आली म्हणून जाऊन बघितले तर बया बॉक्समध्ये जाऊन पोरांना पाजतेय. अर्धा तासभर लागून पाजले आणि आता बाहेर येऊन टेचात बसलीय. वाघोबा बसतो ना दोन पाय पुढे टाकून, छाती पुढे काढून तशी, आणि नजर माझ्यावर... उद्या मासे हवेत अशी ऑर्डर मिळेल मला थोड्या वेळाने Happy

१.. आमच्या जुन्या घरी असताना जिन्यात एक मांजर असायची.. कारण आमच्या वरच्या मजल्यावरचे तिला नेहमी खायला प्यायला द्यायचे.
एके दिवशी ही तीन पिल्लं घेऊन आली आणि आमच्या केनच्या सोफ्याखाली बस्तान मांडलं.
आणि मग पिल्लांना पाजायला मात्र सोफ्यावर..


२.. ही पिणारी पिल्लं...


३.. आणि हे सुटे वीर..


<<आमच्या टारझनची गर्लफ्रेंड...>>
निरू दा, आमचा स्नोई दिसायला एकदम तुमच्या सुनेसारखा आहे..
पूर्ण पांढराधोप.. गुलाबी नाक आणि गुलाबी कान.
कोणती breed असेल?

>>>निरू दा, आमचा स्नोई दिसायला एकदम तुमच्या सुनेसारखा आहे..
पूर्ण पांढराधोप.. गुलाबी नाक आणि गुलाबी कान.
कोणती breed असेल?<<<

@ धनवन्ती, Khao Manee cat नांवाने सर्च देउन बघा ना, स्नोई तसाच आहे का म्हणून.
मित्रकडची मांजर मिक्स ब्रीड आहे आणि त्यालाही नांव माहिती नाही..

उत्सुकांसाठी:

इथे मांजरांच्या जगातील सर्व ब्रीड ची यादी आहे:
https://www.catbreedslist.com/all-cat-breeds/

आपल्याकडे (भारतात) आढळणारे मांजर हे मिक्स-ब्रीड आहे असे एका पशुवैद्यांनी मला सांगितले. तरीही मला आपल्याकडील सामान्य मांजरांचे अरेबियन माऊशी अधिक साधर्म्य जाणवते.

Pages