खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व.. (यूट्युब आणि इंन्स्टा)

Submitted by अ'निरु'द्ध on 19 May, 2020 - 23:43

खेळकर आणि खोडकर मांजरांचं विश्व..
(यूट्युब आणि इंन्स्टा)

आमच्या टारझन बोक्यावर "टारझन द वंडर कॅट" हा पहिला भाग लिहिला आणि बऱ्यापैकी मांजरप्रेमींची ओळख झाली.
नंतर अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्यावर धागा आला आणि त्यावरही मांजरांबद्दल बऱ्यापैकी माहिती आली आणि प्रश्नही आले.
आमचा टारझन घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही मांजरांची वेडी असलेली माझी लेक त्यांचे व्हिडिओज् युट्युब आणि इंन्स्टा वर बघायची मला पाठवायची.
मांजरप्रेमी मायबोलीकरांनी हे व्हिडिओज् पहावेत हा मुख्य उद्देश आणि बहुतेक असा धागा मायबोलीवर नाही हे पाहून हा सबकुछ मांजरांसाठी असलेला धागा काढतोय.

मांजरप्रेमींनी यात वेळोवेळी भर घालावी ही विनंती.
यात युट्युब, इंन्स्टाच्या लिंक द्यायलाही हरकत नाही आणि घरच्या मांजरांचे व्हिडिओ, फोटोज् असतील तर फारच उत्तम..
पाळणाऱ्यांनी त्यांच्या काही आठवणी दिल्या आणि जाणकारांनी माहिती दिली की फावल्या वेळी कधीही इथे येऊन रमायला हरकत नाही.
हा धागा मांजरप्रेमीना तर आवडावाच पण इतरांसाठी स्ट्रेसबस्टर म्हणून उपयोगी पडेल असं वाटतं कारण मांजरं विशेषतः त्यांची पिल्लं हा एकंदरीतच भयंकर क्यूट प्रकार आहे..

सुरुवातीला धाग्यामधेच काही छान व्हिडिओजच्या लिंक्स देतोय..

https://youtu.be/bw5WtZmU-i0

https://youtu.be/MLhesmKn4Cs

https://youtu.be/okOVxfuSYPk

https://youtu.be/bhpP8jEm5ic

बाकीच्या प्रतिसादात येतीलच...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या टारझनची गर्लफ्रेंड...


>>>कधी पायात अंगाची कोलंबी करून झोपायची.<<< छान आणि अगदी समर्पक उपमा..
>>>आईसकट बाकीची पिल्ले, व्हिलनने मा.मा.मधे पाठवली.<<< पांडुगडी व्हिलन.. Proud

देवकी, तुमचा मस्त प्रतिसाद मिस झाला होता.

https://youtu.be/rbVp7QVsEdY

बेंगाॅल कॅटची सहा वैशिष्ट्यं ह्या व्हिडिओमधे आहेत.
छान आणि छोटासा व्हिडिओ फक्त १.२८ मिनिटाचा..

https://youtu.be/FVGhzxzx88M

बेंगाॅल कॅट : रानटी की घरेलु..? (Wild or Domestic)

आणि हे विशिष्ट मांजर पाळण्याबद्दल बरंच काही...
(कटप्पा, तुम्हीही ह्याचा विचार करु शकता)

वर्षा तुम्ही दिलेल्या लिंक्स विषेशतः काकडी आणि मांजरी मस्त आहे.रात्री सगळे झोपले असताना हसण्यावर कंट्रोल ठेवणे अवघड होत होते.

या धाग्याचा उल्लेख आइकडे केला असता तिने अजून आठवणी चाळवल्या.अजून एक मांजर होती.एक डोळा निळा आणि दुसरा पिवळा होता.व्हिलनकृपेने (आजी आणि पांडुगडी) फार काळ घरी राहिली नाही.त्यानंतर जी पिल्ले मोठी झाली त्यतला काळू बोका गोंडस होता.मजा म्हणजे यापैकी कुठलेच मांजर घरी आणून पाळले नव्हते.माशाच्या वासाला येत असवीत सारी.न्मजा म्हणजे त्या काळात मांजरे कशी कोण जाणे पण गायब होत होती.आमचीच नव्हे तर एकूण गल्लीतली मांजरेही.
असाच एक गोंडस बोका.आमच्या खालच्या मजल्यावर रहाणार्‍यांचा होता.पण सारा वेळ आमच्याकडे असायचा.तो प्रथम आमच्याकडे आला,त्यावेळी चष्मेबद्दूर सिनेमा चालू होता.त्यात चमको साबण पावडरीचे गुणवर्णन फारूक शेख करत असतो.तितक्यात हे पिल्लू आले.पूर्ण सतेज पांढरे. कानालाआणि शेपटीला जरासे पिवळा सोनेरी रंग अशा पिल्लाचे बारसे लगेच चमको म्हणून झाले.मग शेजारीही त्याच नावाने बोलवायचे. अतिशय गुणी मांजर आपलं बोका!कधीही चोरून खाल्ले नाही.काकडीसाठी वेडापिसा व्हायचा.काकडी कापली की याचा म्यांवम्यांवाट चालू व्हायचा.नंतर चमको वयावर आला आणि खाली हिंडू लागलाक्फार दिवसही झाले नसतील ,गाडीखाली कसा कोण जाणे आला.अशा तर्‍हेने एक अध्याय संपला.
नामा-मनी अशी काळीकुट्ट जोडी होती. नामाच्या गळ्याकडे हल्कासा पांढरा डाग होता.त्यामुळे नामा हे नाव मिळाले.या जोडीने मात्र वात आणला. सगळी दुनिया सोडून शी करायला घरी यायचे आणि तीही गॅसखाली.आज सुधारतील उद्या सुधारतील म्हणून वाट पाहिली शेवटी भावाने मा.मा.मधे रवानगी केली.नंतर मात्र एकही मांजर घरी आले नाही . आम्हीही त्यांना विटलो होतो.

माझी शेवटची 3 मांजरे अशीच गायब झालीत. तीनही मांजरे मी घरात पाळली होती, घुसखोर नव्हती. आमच्याकडे गल्लीत एक मोठा बोका आहे, नामचीन गुंड असल्यासारखा तो सगळीकडे फिरत असतो. आमच्या घरातली फेरी मारून जातो. तोच घरातील मांजरे उडवतो असा शक आहे. मी आता म्हणून मांजर पाळायचे नाही असे ठरवले आहे.

बोके असतील तर मांजरींच्यामागे निघून जातात. माझ्या वडिलांकडे पुण्याला पण असे बरेच बोके, मधले काही काळ गायब असायचे पण नंतर यायचे.

@ धनुडी, मीना टी च्या आठवणी मस्त..
@ देवकी, काळू बोका, (मिस) मिस्टर चमको, आणि नामा-मनी ही छान.. पण बेस्ट म्हणजे आजी आणि पांडूची व्हिलनकृपा...
एका विशिष्ट पिढी सोडता मिस चमको कुणाला फारसं कळणारही नाही...

आणि विशिष्ट प्रतिसादकांना : हो. आहे बुवा आमची एक सून गोरीपान...

बंगाल कॅट चा व्हिडीओ पाहिला निरू . सुंदर आहे .
घरात toddlar आहे त्याला त्रास नाही देणार ना हा विचार येतोय . रानटी असेल तर प्रॉब्लेम असेल ना . उगाच पंजा वगैरे मारला तर
.

बेंगाॅल कॅट रानटी नाहीये.
रानटी कॅट पाळायला भारतात तरी परवानगी नाही आहे.
आणि माझ्या माहितीप्रमाणे जी मांजरं (ज्या जाति) डोमेस्टीक कॅट म्हणून पाळल्या जाण्यासाठी प्रमाणित करतात त्यात रानटी जातीची कमीतकमी तीन पिढ्या डायल्युशन असणं आवश्यक आहे जेणेकरुन त्यांच्यात कोणताच हिंस्त्रपणा राहू नये असं कुठे तरी वाचल्याचं स्मरतंय.

पण काही ही म्हणा निरूदा, तुमच्या "घाटी" (टारझन) ने अगदी "कोकणस्थी" भाटी (जेन ) गटवली आहे. नशीब काढले पोराने. Wink

कुत्रे आयुष्यात एकदाच पाळले. काही वर्षे होते ते. पण शेवटी ज्या विदारक पद्धतीने ते सोडून गेले तो अनुभव घेतल्यानंतर परत आजतागायत मला कुत्रे पाळायचे धाडस झालेले नाही Sad कुत्री फार फार जीव लावतात!

मांजरे म्हणूनच बरी वाटतात. अर्थात, प्राणी पाळला आहे म्हंटल्यावर थोडाफार जीव हा लागतोच. पण मांजरे कुत्र्याइतकी जीव लावू देत नाहीत. त्यांचे "नो स्ट्रिंग्ज एटॅच्ड" तत्व असते. इमानदारी, खाल्ल्या अन्नाला जागणे, वेळप्रसंगी मालकासाठी प्राणाची बाजी लावणे असली काही देवघेव नाही. "तुझे खरेच निरपेक्ष प्रेम असेल माझ्यावर तर घाल मला खायला, नाहीतर हा मी चाललो थोड्याच वेळात" असा मांजराचा सरळ साधा सोपा व्यवहार असतो Lol जर तुम्ही नियमित खायला देत असाल तर मांजर तुम्हाला सोडून जाणे महामुश्कील.

एक घटना आठवते. शाळकरी वयात असताना पाळलेल्या मांजराची. हे आमच्या मांजरीला झालेले एकमेव पिल्लू. बोका होता. लहान होता तेंव्हा एक दिवस अचानक कुठेतरी तो गायब झाला. त्यानंतर हा गायबच. काही दिवस वाट पाहून मग आम्हाला वाटले कि झाले असेल याचे काही बरेवाईट. घरापासून जवळच मोठा रस्ता होता. कित्येक वाहने सुसाट ये जा करत. कल्पना करून वाईट वाटले. पण त्यानंतर कित्येक महिन्यांनी एक दिवस पहाटे पहाटे स्वारी घराच्या दारात हजर. डोळ्यावर विश्वास बसेना. निरखून पाहिले. तोच होता. कापऱ्या आवाजातून "कसा परत आलो माझे मला माहित" असा सूर. आम्ही अक्षरशः आश्चर्याने थक्क झालेलो. इतके दिवस कुठे होता, कसा जगला, कुठून कसा परत आला काय माहित. त्यानंतर कित्येक दिवस तो घाबरून घरातच दडी मारून बसला होता. बाहेर पडायचा नाही. विशेषतः शाळेच्या गणवेशातली मुले दिसली तर फारच घाबरायचा. बाहेरच्या बाहेर कुणीतरी शाळकरी मुलगा त्याला पिशवीत बांधून पाळायला घेऊन गेला असावा बहुतेक. जो कुणी घेऊन गेला त्याने नक्कीच त्याचे खाणेपिणे नीट बघितले नसणार. मांजरे याबाबत प्रसिद्ध असतात. रस्ते लक्षात ठेवतात. कित्येक मैलांचा प्रवास करून अन्नदात्याच्या घरी परतलेली आहेत. यावर नेटवर सुद्धा बरीच माहिती उपलब्ध आहे.

मांजरं तशी सेन्सिबल असतात. घरातले वातावरण, माणसांचा मूड हे सगळे त्यांना थोडेफार का असेना पण नक्की कळत असावे. घरात दु:खी किंवा तणावग्रस्त वगैरे वातावरण असेल तर एकतर बाहेर निघून जातील किंवा कुठेतरी कोपऱ्यात शांत बसून राहतील. पायात पायात येऊन म्यांव म्यांव करायची हि वेळ नाही हे त्यांना चांगले समजते.

हा बोका पुढे कित्येक वर्षे आमच्याकडे होता. अतिशय गुणी बोका होता. कसलाही त्रास नव्हता त्याचा. मार्जारकुळाला शोभणार नाही इतका नरम आणि शांत. गम्मत म्हणजे प्रसंगी मोठ्या उंदराला सुद्धा घाबरायचा. जन्माला आल्यापासून जवळजवळ सातएक वर्षे होता आमच्याकडे. एक दिवस बाहेरून येऊन वडीलांच्या पायाशी घुटमळला. त्याचे ते घुटमळणे नेहमीचे नव्हते हे जाणवत होते. वडिलांना वाटले भूक लागली असेल म्हणून त्याला खायला दिले. तर त्याने तोंड लावले नाही. बहुतेक तब्येत ठीक नसावी. मग तोंडाने एकदोन वेळा म्यांव म्यांव केले नी जो बाहेर गेला तो पुन्हा कधीच परतला नाही. अंत जवळ आलाय हे कळताच अनेक पशु पक्षी दूर कुठेतरी जाऊन एकांतात देह ठेवतात म्हणे. त्या दिवशी "हि आपली शेवटचीच भेट, आता मी जाणार ते पुन्हा येणार नाही" हे सांगण्यासाठीच जणू तो आला असावा असे वडील त्यानंतर नेहमी बोलून दाखवत.

मांजर सेन्सिबल असतात. >>> अतुलदा, हे बाकी खरं आहे. माझे आजोबा गेले त्यावेळची गोष्ट.
ते जाण्याआधी मांजराच पिलु आणुन जेमतेम महिना झालेला. अण्णा गेले त्याच्या 2दिवस आधीपासूनच ते अचानक शांत कोपर्यात बसायला लागल. आम्हा घरातल्यांना वाटलं. बिचारं पाहुण्यांच्या वर्दळीला बघुन कोपर्यात बसत असेल. खाण-पिणसुद्धा कमी केलेल माऊनी. अण्णांना कुत्री-मांजर अजिबात आवडायची नाहीत पण त्यांच्या शेवटच्या दोन-चार दिवसात रात्रभर माऊ पायाशी बसुन आहे. हे माहिती असुन "त्याला बाजुला करा" अस त्यांनी मला-ताईला सांगितल्याच आठवत नाही.. Sad

पण काही ही म्हणा निरूदा, तुमच्या "घाटी" (टारझन) ने अगदी "कोकणस्थी" भाटी (जेन ) गटवली आहे. नशीब काढले पोराने. Wink
Submitted by पाथफाईंडर on 22 May, 2020 - 15:20
—>>> सिरियसली ? फक्त गोरी म्हणजे कोकणस्थ? स्टीरीओटाईप प्रतिसाद .

मन्या Sad ह्रद्य आठवण.
काय मन जुळतात की प्राण्यांची धन्याशी आपल्याला कळू शकत नाही.
आदिश्री

इथे फोटो पोस्ट करताना आधी आपल्या खाजगी जागेत ते अपलोड करावेच लागतात ना? माझे आधीचे फोटो एवढे झालेत कि नवीन अपलोड केलेले फोटो शोधत बसावे लागतात. हल्ली फोटो पटकन अपलोड ही होत नाही तर, काही दुसरा उपाय आहे का फोटो अपलोड करण्याचा

>>>इथे फोटो पोस्ट करताना आधी आपल्या खाजगी जागेत ते अपलोड करावेच लागतात ना? माझे आधीचे फोटो एवढे झालेत कि नवीन अपलोड केलेले फोटो शोधत बसावे लागतात. हल्ली फोटो पटकन अपलोड ही होत नाही तर, काही दुसरा उपाय आहे का फोटो अपलोड करण्याचा<<<

@ धनुडी, तुम्ही गुगल फोटोज् वर तुमचे फोटो अपलोड करुन त्याची लिंक इथे देउ शकता.. हे हल्ली मोबाईलवरुनही होतं आणि लॅपटॉप/डेस्कटाॅपवरुन पूर्वीही होत होतं.
तुमच्या अन्य प्रयोजनासाठी तुम्ही नातेवाईक/परिचितांबरोबर फोटोज् चा संपूर्ण अल्बमही शेअर करु शकता.. (पिकनिक्स, कौटुंबिक समारंभ वगैरे)

धन्यवाद निरू, बघते तसं करून, पण इथे खाली "मजकूरात image किंवा link द्या च्या ठिकाणी क्लिक केलं कि आपल्या खाजगी जागेतच जायला होतय.

Pages