कांदा कापायची सोपी पद्धत (डोळ्यात पाणी न आणता)

Submitted by अजय on 17 May, 2020 - 16:20

कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून नेटवर अनेक उपाय सापडतील.

१) कांदा कापताना आधी अर्धा करून लगेच पाण्यात टाका. आणि नंतर कापा. हा उपाय बरेच जण सांगतात. हे करून पाहिलं पण मला तरी काही काही फरक पडला नाही.
२) कांदा आधी काही वेळ फ्रीज मधे ठेवा. याचे काही प्रयोग करून पाहीले आणि योग्य वेळ जमली तर हा उपाय नक्कीच उपयोगी पडला.

आता कायम फ्रीज मधे १-२ कांदे असतात. जे कमीत कमी एक दिवस अगोदर पासून फ्रीज मधे असतात. ते कापताना अजिबात डोळ्यात पाणी येत नाही. एक कांदा वापरला की पुढील उपयोगासाठी पुन्हा दुसरा ठेवून देतो. कांदे न सोलता थेट तसेच ठेवतो.

थोडा वेळ कमी असेल तर , कापायच्या अगोदर १ तास फ्रीजर मधे ठेवला तरी हा परिणाम साधता येतोय. पण १ तासापेक्षा कमी वेळ ठेवला तर मात्र थोडेसे पाणी आलेच. थोडक्यात असे दिसतेय कि हा उपाय यशस्वी होण्यासाठी कांदा पुरेसा आतून थंड झाला असला पाहिजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>> रोजच स्वयंपाक करणार्‍याला नाही अश्या बाबींच काही वाट्त.<<
न करणार्‍याला पण . प्रत्येक माणसालाच होतो असे नाही.
पण, इतक्या महिन्यांनंतर हा प्रश्णावर धागा?
मग लॉकडॉउनच्या दोन महिने काळात मग कांदा कोण कापत होतं? त्यांनाच करा डेलिगेट.. ( आम्हाला काय)..

असे प्रत्येक गोष्टींवर , ‘धागा काढणे‘ हे एक प्रकारे प्रोत्साहित करण्याचे काम असेल मायबोली मालकांचे.. लॉकडॉउन मोटिवेशन करून बेजार करताहेत घरी-दारी( ऑफीसमधे),
आम्हाला काय, करतो कौतुक... Wink ( ह. घ्या.)

आलं लावलं का ह्या वर्षी? का आलं आलय तर काय आणि कसे करू? हा धागा येइल?

यज्ञ वगैरे प्रकार अटेंड करायचे असल्यास आवर्जून काँटॅक्ट लेन्सेस वापराव्यात.

>> अशी चूक चुकूनही करू नका. कुठल्याही प्रकारच्या आगीजवळ लेन्स घालून बसणे अतिशय धोकादायक आहे. अगदी डोळे कायमचे जाऊ शकतात. इथे अवांतर होईल म्हणून जास्त लिहीत नाही. हवं तर गुगल करा.

काय हे
माबो मालक हे माबोसाठी देव असले तरी त्यांना सामान्य जन फेस करत असलेल्या समांतर समस्या येऊ शकतात की ☺️☺️
इथे अमका आयडी तमका आयडी आहे का वगैरे धागे चालतात मग एक जेन्यूईन धागा काऊन जड हून रायला लोकांले.

पियू +७८६
लेन्स + आग = डेंजर

अवांतर - धाग्यावर दोन जेन्युईन माहितीपुर्ण छान प्रतिसाद येत आहेत तर दोन धागा बिनकामाचा आहे म्हणत टिका करणारे. आणि असे दोन दोन प्रतिसाद आलटून पालटून येत आहेत. त्यामुळे डोके भंजाळून गेलेय. एक तर चतुर बोला नाहीतर घोडा बोला.

इमोशनल सिनसाठी हीरोइन रडत असेल तर पिक्चरला एक डायलॉग टाकायला हरकत नाही.
कानशिलात कांदा ठेवू का तुझ्या आता उगी उगी ..गप रडू नको ××× (हीरोइनचा नाव)

मूळात ही काळजी घ्यायचीच कशाला? डोळ्यातून पाणी न येऊ द्यायची?

तुम्ही जर रोज किमान दोन कांदे चिरत असाल आणि डोळ्यांतून मुक्तपणे घळाघळा पाणी वाहू देत असाल तर तुम्हाला दूरचा चष्मा कधीच लागणार नाही जो अनेकांना भर तारुण्यात आगतो.

प्रयोग करुन पाहा.

अमेरिकेत राहणारे लोक फ्रिज मध्ये कायपअण ठेवतात आनी शिळे गरम करून खातात त्यांना चालत असेल पण मला नाही चालत. >>> Rofl

आता इतके उपाय आलेच आहेत तर माझ्याकडून एक- कांदा चिरताना एक्झॉस्ट सुरू ठेवला आणि चष्मा लावलेला असेल तर पाणी येत नाही डोळ्यातून.

>>> अमेरिकेत राहणारे लोक फ्रिज मध्ये कायपअण ठेवतात आनी शिळे गरम करून खातात त्यांना चालत असेल पण मला नाही चालत.
Biggrin

चॉपरमधला कांदा जास्त पाणी सुटून उग्र होतो असा माझा अनुभव आहे - त्यामुळे कच्चा खायचा कांदा (कोशिंबिरींसाठी किंवा वरून घ्यायचा) त्यात डेफिनेटली नाही कापत - शक्यतो कांदा नाहीच कापत चॉपरमध्ये.
मलाही एखाददुसरा कांदा फ्रीजमध्ये ठेवायची सवय आहे. सोललेला कांदाही हवाबंद डब्यात किंवा चांगल्या क्वालिटीच्या झिपलॉकमध्ये असला तर नाही बाकी कशाला वास लागत.

कांद्यामुळे डोळ्यात पाणी येण्याचा त्रास सर्वांनाच सारखा होत नाही - तुमचं शरीर त्या सल्फॉक्साइड्सना कसं/किती रिअ‍ॅक्ट करतं त्यावर, शिवाय हवामान, कांद्याचा प्रकार, कांद्याचं तापमान, कांद्याचं वय (इथे अनेकदा ओलसर /उग्र कांदे मिळतात) अशा अनेक बाबींवर ते अवलंबून असतं.

लॉकडाऊनमध्ये कांदा कापून कापून मालकांच्या डोळ्यात पाणी आले, ही खरी व्यथा आहे आणि तिकडे कुणाचेच लक्ष गेले नाही, हे बघूनच खरंतर टडोपा आले. Light 1

शिजवायचा कांदा एखादवेळी चालेल chopper मधून पण कच्चा खायचा कांदा अजिबात नको हँड किंवा मशीन chopper मधून, मजा नाही येत. बाकी अति प्रमाणात एकाच वेळेस कांदा लागणार असेल तर मग मात्र मशीन झिंदाबाद.

मला तरी हा धागा चांगला वाटला . शंभर प्रतिसाद होऊ शकतात मायबोली मालकांना प्रोत्साहन म्हणून .
मूळ मुद्यावर चर्चा मस्त होईल .
बाई दवे कांदा कापताना डोळ्यात पाणी नको असेल तर कांदा कापणाऱ्यापासून लांब उभे राहणे हाच उत्तम उपाय Happy

हा धागा अतिशय महत्वाचा आहे. माझ्यासाठी. पण तज्ञ मंडळींच्या हे नजरेत आणून दिल्यावर, त्यात काय हे मला माहित आहे अस उत्तर मिळाले. पण माझ्या डोळ्यातील पाणी काही ठरत नाही आणि आमची यावरूनची भांड्णे काही सरत नाहीत. Happy

पण नुकतेच मी भाज्या शिकत असताना कंपल्सरी कांदा चिरावा लागल्याने चष्मा घातल्यावर पाणी येत नाही याचा प्रत्यय आला. Happy

माझे २ सेंट्स - इथे घरगुती वापरासाठी मिळणारे चॉपर कांदा चॉप्ड्/डाइस्ड करण्या करता काहि कामाचे नाहित. त्यातुन बाहेर पडणारा माल मिंस्ड कॅटगोरीत मोडतो. जो स्वैपाकात बर्‍याचवेळा, आणि मिसळ/भेळ, पावभाजी, पिठलं इ. कंफर्ट फुड्स करता कांडिमेंट्स म्हणुन तर अजिबात चालत नाहि. शिवाय या उपकरणांची बांधणी प्लस्टिक/पॉलिकार्बोनेट्सची असल्याने तुटण्याचं प्रमाण जास्त. (आमच्याकडे आतापर्यंत २-३ तोडुन झालेले आहेत) मागे मी खुप रिसर्च करुन हा हँड प्रेस चॉपर संबंधितांकडे पुट फॉर्वर्ड केला होता. अर्थात फेटाळण्यात आला...

https://www.amazon.in/dp/B072JGTLSM/ref=cm_sw_r_wa_apa_i_vTRWEbAX3QPH0

हे स्वस्त dicer put forward करुन बघा Happy मी वापरलं नाहीये.
घरात दोरी chopper fans खूप आहेत. त्यांच्याकडे जाऊन दोन कांदे चिरताना माझे हात भरून येतात ते पुरेत.

दोरी चॉपर अतिउत्तम.बारीक नकोय?मग कमीवेळ दोरी उपसा.
कोणाही मेम्बर च्या हातात द्या.नकार येणार नाही.
कालच कैरी कांदा कोशिंबीर केली नव्या कोऱ्या फ्लिपकार्ट चॉपर मध्ये.(67 रुपये वाला दोरीची पुली तुटलेला भंगारात टाकला.भंगार लॉकडाऊन संपल्यावर जमा करून पैसे मिळतील.हल्ली काच घेत नाही तो.फक्त प्लास्टिक,कागद,पुठ्ठा किंवा मेटल घेतो.)

पब्लिक डिमांडवर आला...
लोकं चॉपर चॉपर करत होते..
मग बॉलीवूडच्या ईतिहासातली आजवरची बेस्ट हिरो एण्ट्री जर चॉपरमधूनच असेल तर ती व्हायलाच हवी होती Happy

आणि बघताय ना.... गॉगलही लाऊन आलाय.. कांदा काआयच्या फुल्ल तयारीत Proud

>>कांदा काआयच्या फुल्ल तयारीत

एकदम सरोज खरे आठवली Wink

जे पु.ल. देशपांडे वगैरे वाचण्यात / ऐकण्यात (उगीच) वेळ घालवत नाहीत त्यांनी या कमेंटचा विचार करण्यात वेळ घालवू नये. Happy

रच्याकने - एक चित्रपट होता बेफिक्रे... त्यात रणवीर आणि वाणी कपूर चे भरपूर लंबे लंबे किस आहेत...
रणवीर वाणी ला त्रास द्यायला किस सीन्स च्या आधी मुद्दाम कांदा खाऊन यायचा म्हणे ....
नंतर वाणी लसूण खाऊन येऊ लागली मग त्याने बंद केले...

कोण सरोज खरे?
तसे एस्सारकेशी ईनिशिअल मॅच होताहेत

रणवीर वाणी ला त्रास द्यायला किस सीन्स च्या आधी मुद्दाम कांदा खाऊन यायचा म्हणे ....
>>>>

मार्केटींग अफवा असेल. एवढा बावळट नसतो कुठलाच पुरुष

जे पु.ल. देशपांडे वगैरे वाचण्यात / ऐकण्यात (उगीच) वेळ घालवत नाहीत त्यांनी या कमेंटचा विचार करण्यात वेळ घालवू नये. Happy
>>>>

मी गूगल करण्यात वेळ घालवला Happy

कोण सरोज खरे?
-->>> जुने मायबोलीकर आहेत बहुतेक . गूगल करून कसे समजणार .

Lol

मायबोली मालकांना ५००० धाग्यांमधे एक तरी धागा काढु द्यातकी व १७ लाख प्रतिसादांत २-३ तरी प्रतिसाद लिहु द्यातकी. Happy

Pages