कांदा कापायची सोपी पद्धत (डोळ्यात पाणी न आणता)

Submitted by अजय on 17 May, 2020 - 16:20

कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून नेटवर अनेक उपाय सापडतील.

१) कांदा कापताना आधी अर्धा करून लगेच पाण्यात टाका. आणि नंतर कापा. हा उपाय बरेच जण सांगतात. हे करून पाहिलं पण मला तरी काही काही फरक पडला नाही.
२) कांदा आधी काही वेळ फ्रीज मधे ठेवा. याचे काही प्रयोग करून पाहीले आणि योग्य वेळ जमली तर हा उपाय नक्कीच उपयोगी पडला.

आता कायम फ्रीज मधे १-२ कांदे असतात. जे कमीत कमी एक दिवस अगोदर पासून फ्रीज मधे असतात. ते कापताना अजिबात डोळ्यात पाणी येत नाही. एक कांदा वापरला की पुढील उपयोगासाठी पुन्हा दुसरा ठेवून देतो. कांदे न सोलता थेट तसेच ठेवतो.

थोडा वेळ कमी असेल तर , कापायच्या अगोदर १ तास फ्रीजर मधे ठेवला तरी हा परिणाम साधता येतोय. पण १ तासापेक्षा कमी वेळ ठेवला तर मात्र थोडेसे पाणी आलेच. थोडक्यात असे दिसतेय कि हा उपाय यशस्वी होण्यासाठी कांदा पुरेसा आतून थंड झाला असला पाहिजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हो, कांदे सोलून फ्रीजमध्ये ठेवणे आणि हवे तेव्हा बाहेर काढून बारीक चिरणे हा डोळे न झोंबण्यासाठी खात्रीशीर उपाय आहे. तुम्ही लिहिलं तसं, ऐनवेळी थोडाच वेळ ठेऊन उपयोग नाही. पूर्ण थंडगार होणं आवश्यक आहे. आम्ही एक लॉक & लॉक चा डबा भरून कांदे सोलून ठेवतो. घाईत सोलण्याचा वेळ वाचतो आणि डोळ्यात अजिबात पाणी येत नाही.

दुसरा अगदी खात्रीशीर उपाय म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स लावून कांदा चिरणे. समोर बसलेल्या माणसाचे डोळे झोंबतील एवढा तिखट कांदा असेल तरी आपल्या डोळ्यात टिपूसही येत नाही. हा अपघाताने लागलेला शोध आहे. Happy

हा हा भारीच मीरा…
अजय चांगले उपाय

अजून एक विनोदी उपाय आहे साबांनी सांगितलेला मी कधी केला नाहीये
कांदा चिरताना त्याची साल आपल्या डोक्यावर ठेऊन चिरला तर पाणी येत नाही.

मीरा, काँटॅक्ट लेन्स चा उपाय जबरदस्त इफेक्टीव्ह आहे. एका भारतवारीत कुठल्यातरी प्रसंगी असाही शोध लागलाय की यज्ञ वगैरे प्रकार अटेंड करायचे असल्यास आवर्जून काँटॅक्ट लेन्सेस वापराव्यात. डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही. आजूबाजूला पब्लिक डोळे चोळत आणी पुसत बसले असताना आपण निवांतपणे बसून वाचन, खाणे, पिणे ई. चालू ठेवू शकतो.

पहले मुझे भी यह समस्याए काफी सताती थी | एकबार सोचा जिंदगी से कांदा निकाल ही दु | तभी एक दोस्त ने दोरी चॉपर के बारे मे बताया और मेरी तो जिंदगी ही बदल गयी | अब हसते हसते पडोसन को बोलती हुं, कांदा काटना हो तो रख जाओ | आप भी अपनाये, दोरी चॉपर !!
(हुश आयुष्यभराचे हिंदी एका दमात लिहिले, दम लागला.)
दोरी चॉपर नसेल तर नळाखाली अर्धा कांदा धुवून चिरल्यास फरक पडतो.

मी कांदा न सोलता थेट तसाच फ्रीजमधे ठेवतो. कारण कापायच्या अगोदर वर आणि खाली मुळाकडे एक काप घेतला की सोलायलाही वेळ लागत नाही. आणि सोलतानाही डोळ्यात पाणी येत नाही.

मी तर सरळ दुसरया रूममध्ये निघून जातो. तरीही पाणी येतंय असे वाटले तर सरळ दार लावून घेतो Happy

जोक्स द अपार्ट ,
आमच्याकडे आई आज्जींच्या मते पाणी येऊ द्यावे. डोळे साफ होतात. हि निसर्गाने केलेली तरतूद आहे.

मायबोलीवरच वाचलेला आणि हमखास उपयोगी पडलेला आणि रोज वापरात येणारा उपाय म्हणजे, एक्झास्ट फॅन चालु करुन तिथे कापायचा. यामुळे फ्रीजमधे ठेवला नसेल तरी काम होते.

हेल्मेट घाला आणि कांदा कापा.. इट्स सिंपलं..

भराभर कापता आलं तर सहसा पाणी येत नाही...उभ्या उभ्यानेच थोडं अंतर ठेऊन कापावं.. बसून कापाल तर हमखास पाणी येतचं.

आतापर्यंतचा हा माझा अनुभव..
बाई द वे गोगल किंवा चश्मा लाऊन कापला तरी पाणी येत नाही

अजय, पुल स्ट्रिंग पद्धतीचे फूड चॉपर मिळतात. ते म्हणत असावी मी_अनु.
https://www.amazon.com/String-Chopper-Manual-Processor-Peppers/dp/B073B6...
मी तो नाही पण हा एलेक्ट्रिक चॉपर वापरते:
https://www.amazon.com/BLACK-DECKER-1-5-Cup-Electric-Chopper/dp/B000I0DV6W
त्यामुळे डोळ्यात पाणी वगैरे भानगड नाही Happy

भराभर कापता आलं तर सहसा पाणी येत नाही...
>>>>
हो बहुतेक .. आमच्याकडे आई विळी उघडायची आणि कोणाला पत्ता लागायच्या आधीच भरभर कांदा कापून विळी मिटून जागेवर गेली असायची. सुरी जास्त त्रास देते.

चस्मा लावून भसाभस पाणी येतं की! स्विमिंग गॉगल म्हणत असाल तर मग करेक्टिव नसल्याने बोटं हात काय वाट्टेल ते कापलं जाईल. फ्रीज चा उपाय बरा आहे.
गेल्या भारतवारीत ये पीएस्पीपो नही जानता इतका भयंकर फेमस स्ट्रिंग चोपर आणण्यात आला आहे.
रिकाम्या लोकांना एक कल्पना: कांदाकापा च्यालेंज फेमस करा. डोळे बांधून कापा आणि सचिनला टॅग करा. Wink आम्ही व्हिड्यू बघायला आहोतच डबल रिकामे.

रोज एक डझन कांदे कापा. त्यामुळे डोळ्यात पाणी येणं बंद होत नाही पण सवय होऊन जाते.

काहीही धागे यायला लागले.
वेगळे धागे आहेत ना अशा टिप्स देणारे? तिकडे का देत नाहीत या क्लृप्त्या?

लसुन कसा सोलावा आणि लिंबातून जास्तीत जास्त रस कसा काढावा अशा विषयांवरही येवूद्या स्वतंत्र धागे.

काहीही धागे यायला लागले.
वेगळे धागे आहेत ना अशा टिप्स देणारे? तिकडे का देत नाहीत या क्लृप्त्या?
>>> ज्याची बॅट त्याची बॅटिंग...मायबोली संस्थापक आहेत हे ....

अ‍ॅडमिन नाही. मायबोलीचे मालक.

मला शीर्षक वाचून युसांयुसु वर वाचलेला काँटॅक्ट लेन्स वाला प्रतिसाद आठवला. हे सगळे उपाय तिथे येऊन गेलेच आहेत.

पण कांद्यासोबत मिरची चिरायची असेल (आणि ती बहुधा चिरावी लागतेच) तर काँटॅक्ट लेन्स काढताना सहन होत नाही, सांगता येत नाही. धरलं तर चावतं - सोडलं तर पळतं असा भयंकर त्रास होतो. साबण लावून हात धुतले तरी मिरचीचा अंश राहतोच. अगदी स्वत : नाही कापली आणि नुसती बोटांनी उचलून फोडणीत टाकली तरीही. (आता यावर ग्लो व्हजचा उपाय नको). यापेक्षा कांदा पाण्यात बुडवून ठेवायचा किंवा फ्रीजमध्ये ठेवायचा उपाय चांगला आहे.

एकदा फ्रिजमधे ठेवलेला कांदा बारिक चिरुन भेळीत मिक्स केलेला. तोंडाची चव गेली राव भेळ खाताना. तेव्हापासुन फ्रिजात कांदा ठेवण बंद!

आईबापानं वाढवलं, कांद्यान रडवल अस म्हणत त्याला गिल्ट देत चिरायचा कांदा! हाकानाका.

मी कुठेतरी वाचलं होतं की बरेच कांदे कापायचे असतील तर जवळ एक मेणबत्ती पेटवून ठेवायची. कांद्यातून बाहेर पडणारं केमिकल कंपाउंड पेटलेल्या मेणबत्तीमुळे जळून जातं बहुतेक.

हो मैत्रेयी.
अरेबापरे, भारताबाहेर 10 डॉलर ला आहे?भारताबाहेर अजिबात घेऊ नका.भारतात शॉपिंग फेस्ट मध्ये वगैरे ऑफर्स घेऊन अगदी 100-150 ला पण मिळेल.
अजून इंडियन ग्रोसरी वाल्यानी कसं ठेवलं नाही हे प्रॉडक्ट दुकानात?
कांदे कापून सवय होते हे खरंच मामी.डोळ्यातून पाणी येऊन डोळे धुतले गेले असं होतं.

अरे पण 80 रूपये किलो ( ऐवरेज भाव) कांद्यासाठी साध्या वन टाईम युझवाल्या लेन्स जरी घेतल्या तरी त्या 150 रूपयाला पडतात..हे म्हणजे चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाल्यासारखचं झालं..

बाई द वे लेन्स जास्त वेळ लेन्स घालून ठेऊ शकत नाही आपण.. शक्यतो कुठल्याही धुर, धुळ, आग ह्यापासून खुप जपावं लागतं..
मी वापरल्या आहेत..डोळे आणि डोकं खुप दुखायला लागतं.. चश्मा बरे गडे आपला..

धागा भरकटू नये म्हणून इतकंच सांगेन की तुम्हांला लेन्स सूट होत नसतील. मी पंचवीस वर्षे वापरतोय. पूर्वी दूरच्या नंबरासाठी सेमी सॉफ्ट.
चाळिशीनंतर बायफोकल मंथली डिस्पोझेबल.

फ्रिज मध्ये कांदा ठेवला तर कांद्याची चव जाते आणि इतर वस्तूंना पण त्याचा वास लागतो. अमेरिकेत राहणारे लोक फ्रिज मध्ये कायपअण ठेवतात आनी शिळे गरम करून खातात त्यांना चालत असेल पण मला नाही चालत. फ्लेवर खराब होतात व मिक्स होतात. मी कापते तसाच डिरेक्ट. चश्मा असतोच. रोजच स्वयंपाक करणार्‍याला नाही अश्या बाबींच काही वाट्त. पर आप मालिक है. जो भी चाहा लिख सकते है.

इतके कांदे कापून काय बण विले? बिर्याणी का पिठले. का पोहे. का ग्रेव्हीवाली भाजी मटण चिकन अंडी फिस? द नेशन वांट टु क्नो.

ज्याची बॅट त्याची बॅटिंग...मायबोली संस्थापक आहेत हे .... म्हणून तर म्हणतोय ना crups. मराठीत एक म्हण आहे "बापाने उभं राहून सु सू केली की पोरगं रिंगण काढतं" मायबोलीवर यामुळचं रिंगणं काढायची कामे सुरु आहेत. रिंगण काय, सध्या अनेकजण रांगोळीच घालत आहेत साऱ्या मायबोलीवर.
चालूद्या बॅटींग.

मी पंचवीस वर्षे वापरतोय. पूर्वी दूरच्या नंबरासाठी सेमी सॉफ्ट...... खरंच 25 वर्षे? मानलं तुम्हाला.
पूर्वी एकाच डोळ्याला नंबर होता .म्हणून 1 लेन्स होती. इडलीसंबार खाताना कधी ती पडली.खूप शोधले तरी मिळाली नाही.चेष्टेचा विषय झाला की खाताना पोटाठी गेली असेल.
दुसरी घरात घालताना पडली ती मिळाली नाही.एकाच डोळ्याला नंबर असल्याने फारसे अडत नव्हते.तशीच ऑफिस laa gele.alयावर शोधली तेव्हा मिळाली.पण चरे पडल्यामुळे बाद झाली.दीड वर्षात 2 झाल्यावर गड्या अपुला चष्मा बरा यावर आले.
आता परत लेन्स घेण्याचा किडा वळवळतोय.

इलेक्ट्रिक चॉपर न कापलेला कांदा मलई कोफ्ता किंवा ग्रेव्ही भाज्यांमध्ये वगैरे चालतो. पण पोह्यामध्ये वगैरे अति बारीक होतो असा अनुभव आहे.
पाणि चालू ठेवूण सिंकजवळ कांदा कापला तर कमी पाणी येत डोळ्यात अस वाटत.

Pages