चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधुरीचा बेटा छान होता. वरच्या एका पोस्टमध्ये कोणीतरी जमाईराजा चित्रपटाचा उल्लेख केलेला. पण तो अनिल कपूरचा त्याच्या सासूशी जुगलबंदीचा पिक्चर होता. माधुरी त्यात शोभेला होती. पण बेटा मात्र माधुरीचा तिच्या सासूशी जुगलबंदीचा चित्रपट होता. ती सासू म्हणजे अरुणा ईराणी. या दोघींचे दिल तो पागल है मध्ये सुद्धा छान सीन होते.

केआरकेचे रिव्यू प्रामाणिक वाटत असतील तर....

आयुषमान या वेळी देखील एक संदेश देणारा चित्रपट घेऊन आला आहे. मात्र, हा चित्रपट केआरकेच्या पसंतीस उतरला नाही. या चित्रपटाला रिव्ह्यू देत केआरकेने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये आयुषमानच्या या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न म्हटले आहे. “मला माफ करा पण मी चुकलो ‘चंदीगड करे आशिकी’ हा चित्रपट सॉफ्ट पॉर्न फिल्म नाही. खरं तर ही एक पंजाबी सॉफ्ट पॉर्न फिल्म आहे”, असे ट्वीट त्याने केले आहे. केआरकेने हा चित्रपट पाहिल्यानंतर लगेच इंटरव्हलमध्ये रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली. त्याचे नाव ‘चंडीगढ करे आशिकी’ नसून ‘सेक्स इन चंदीगड’ असावे, असे त्याने सांगितले.

केआरके पुढे त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला, “या सॉफ्ट पॉर्न फिल्मच्या प्रत्येक डायलॉगमध्ये सेक्स या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाच नाव ‘सेक्स इन चंडीगढ असले पाहिजे. या चित्रपटात अश्लीलता आणि समलैंगिक संबंध दाखवण्यात आले आहेत आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मला वाटते की बॉलिवूडमध्ये बरेच समलैंगिक लोक काम करतात. याचा असा अर्थ नाही की समलैंगिक कथेवर चित्रपट बनवला पाहिजे. मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की लोक अशा प्रकारचे खराब चित्रपट पाहण्यासाठी जाणार नाहीत.”

केआरके मूर्ख माणूस आहे. आधी म्हंटल्याप्रमाणे एक सॉफ्ट पॉर्न प्रसंग आहे. पण नेटफ्लिक्स वगैरे सरावलेल्या नजरांना तो अगदीच सपक वाटेल.

दुसरी गोष्ट समलैंगिक संबंध वगैरे अजिबातच दाखवले नाहीयेत. त्याने कोणतातरी दुसरा पिक्चर पाहिला असावा. वाटेल ते बरळत असतोय.

केआरके मूर्ख माणूस आहे.
>>>>
हो, हे माहीत आहे Proud
पण त्याचे ट्वीटही आहेत हे इंग्रजीत.
ईतकी टिका हा तारतम्य न बाळगता करतो तरी याला कधी मार का पडत नाही मला प्रश्न पडतो Happy

नेटफ्लिक्स वर ट्रेन्डिंग दिसला आणि सिनॉप्सिस, कास्ट चांगली वाटली म्हणून Red Notice पाहिला. थोडक्यात सांगायचे तर रोहित शेट्टी आणि आब्बास मस्तान यांनी एकत्र येऊन धूम २ डिरेक्ट केला तर जे काय होईल तसा हा मूव्ही आहे Lol टिपी बर्‍यापैकी झाला पण.

त्याला सगळे राखी सावंत सारखं सोडून देतात.फार मनावर घेत नाहीत.

मराठी 'बळी' पाहिला.बराच प्रभावी वाटला.शेवट जरा प्रचारकी आहे.पण जी भीती पोहचायची ती व्यवस्थित पोहचते.हाताळणी मध्येमध्ये तुंबाड सारखी वाटेल.स्व जो चा अभिनय आणि पात्र बरंच समांतर मधल्या सारखं वाटेल.

मला चित्रपट आवडला.लहान मुलांचा अकसेंट सोडून बाकी सर्वांचे (आणि लहान मुलांचा पण) अभिनय चांगला आहे.वन टाईम वॉच.

(स्व जो च्या स ला इथे आधी वाचल्या प्रमाणे प्रॉब्लेम आहे.श होतो.पण हा काहीतरी हेल्थ इश्यू असेल, सौम्य स्ट्रोक वगैरे.त्याला लवकर त्याचा उपाय मिळो.बाकी वावर, पर्सनॅलिटी आवडली.यातला दुसरा डॉक्टर कलाकार आहे त्याने पण कमी वेळेत चांगला अभिनय केलाय.)

बळी IMDb रेटींग ८.९ आहे
आताच ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहून वाटतोय तितकाच हॉरर आहे का?
स्वप्निल जोशीची अदाकारी मात्र कडक दिसतेय. त्यामुळे बघावासाही वाटतोय. पण ट्रेलर बघून भितीही वाटतेय.. काय करू? काय करू?

अवांतर - स्व जो च्या स ला इथे आधी वाचल्या प्रमाणे प्रॉब्लेम आहे.श होतो.पण हा काहीतरी हेल्थ इश्यू असेल, सौम्य स्ट्रोक वगैरे.>> हि नवीन माहिती आहे माझ्यासाठी. कधी जाणवले नाही हे.

त्याला सगळे राखी सावंत सारखं सोडून देतात.फार मनावर घेत नाहीत.
>>>

ते ही खरेय. त्याला अगदी शाहरूखवरही पातळी सोडून वैयक्तिक टिका करताना पाहिलेय. किंबहुना तेव्हाच तो जास्त फॉर्मला येतो. पण उद्या शाहरूखही त्याच्या टिकेला पर्सनली घेऊन राहिला तर मग तो सुपर्रस्टार शाहरूख कसला. सेलेब्रेटींचे मला हेच आवडते. वैयक्तिक टिकेला डिल करतानाच त्यांचे कॅरेक्टर कळते.

बळी छान आहे.
मला आवडलो..स्व जो ची ऐक्टींग पण छान आहे.
पुजा सावंतचं कैरेक्टर पण तीने मस्त रंगवलय.
मराठी मधे असा सिनेमा बघायला आवडलेच. साऊंड इफेक्ट्स, पिक्चरायजेशन, ओव्हरॉल सगळंच छान आहे.
बघून टाका Happy

चंदीगड करे आशिकी पाहिला
इंटर्व्हल नंतर एकही 'तसा' सिन नाही
शेवट 'गोड' होतो,इतकंच..

थिएटरच्या साऊंड सिस्टीम चा दोष की पंजाबी भाषा समजणं अवघड(मला) ..बरेचशे डायलॉग कळत नाहीत, गाणी पण पंजाबी,नाही रिलेट होत त्यामुळे...

बळीमधला लहान मुलगा माझा कट्टा मधे सर्वात पुढे जो छोटेखानी पत्रकार बसतो त्याच्यासारखा आहे दिसायला.
भांग पण तसाच पाडतो.

खूप भीतीदायक नाहीये.
त्यातली एक मुख्य भीती कळली की पुढे फार जास्त आश्चर्य नाहीयेत.

गाणी पण पंजाबी,नाही रिलेट होत >> हिंदी चित्रपटांमध्ये पंजाबीचा अतिरेक झालेला आहे. पूर्वी खरे तर इतके डायरेक्टर प्रॉड्युसर पंजाबी होते पण त्यांनी त्याचा अतिरेक नाही केला. आता तर मराठी सिरीयल्स मध्ये पण मधूनच बल्ले बल्ले चं म्युझीक वाजतं !

बादवे तो नवीन छोरी आला आहे तो मराठी लपाछपी चा रिमेक आहे का? ट्रेलर वरून तसाच वाटला. कोणी पाहिला असल्यास सांगा.

हिंदी चित्रपटांमध्ये पंजाबीचा अतिरेक झालेला आहे>>>> काही वर्षापुर्वी शाहीद करीनाचा एक चित्रपट पाहीलेला, त्यात करीनाच्या घरातील लोकान्ना गुजराती की तिकडचीच कुठलीतरी भाषा सोडुन बाकीव्काही कळत नसते पण जेव्हा गायला तोन्ड उघडतात तेव्हा थेट पन्जाबीत गायला सुरवात करतात. :डोक्याला हातः

रच्याकने, वर कतरीनावरची चर्चा बघुन परत आठवले. कतरीनाने चेहर्याला काहीतरी भयाण करुन घेतले आहे. इतके भयाण की आता ती हसते तेव्हा गाल वर जाउन डोळे बन्दच होतात आणि तोन्ड तर फाटल्यासारखे वाटते. इतकी गोड दिसायची, तिचे खुप चित्रपट थेटरात पाहिलेले आहेत . मुद्दाम तिला पाहायला म्हणुन नाही पण जे पाहिले त्यात तिही होती आणि खुप आवडलेली.

तिच्या लग्नामुळे तिचे खुप विडिओ इन्स्ताग्रामच्या फिड मध्ये दिसताहेत आणि त्या सगळ्यात तिचे आधीचे रुप व आता यातला फरक ठळक दिसतोय.

ह्या मुळच्याच सुन्दर मुलीना अजुन किती सुन्दर दिसायचे असते? ती आयेशा टाकिया पण इतकी गोड दिसायची, अजुन गोड दिसायच्या नादात चेहर्याचे पुर्ण भजे करुन ठेवले तिने.

वाणी कपूर चा चेहरा मुळात पुरूषी आहे. त्यात तिची शस्त्रक्रिया बिघडलीय. बेल बॉटम मधे पहिल्यांदा पाहिली. अभिनय पण बेताचाच आहे.

मोठ्या चेहर्‍याच्या हिरविणी आता येतच नाहीत. अपवाद असेल तर माहिती नाही. सौंदर्याच्या कल्पना पूर्णपणे बदलल्या आहेत. पण मोठा चेहरा तर भारतियांंमधे मोठ्या प्रमाणात असतो.

साउथी नागार्जुनच्या बाबतीतही असेच झाले होते. मला तो खुप आवडायचा, मध्यन्तरी दिर्घकाळ त्याचे चित्रपट पाहीले गेले नाही. त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस त्याचे फोटो झळकायला लागले.. मी फोटोत नागार्जुनाला शोधुनही तो सापडेना. फोटोतले सगळे ओळखुन उरलेला तो नागार्जुन हे लक्षात आल्यावर अपरिमित दु:ख झाले होते Lol

वाणीबद्धल म्हणत असाल तर .. सर्जरी आधी ओके ओके होती... सर्जरीनंतर खराब... आता करेक्शन्स करून अप्रतिम दिसते.... सुंदर...

ह्या मुळच्याच सुन्दर मुलीना अजुन किती सुन्दर दिसायचे असते? >>> कत्रिनाच्या केस मधे वाढलेल वय बोटॉक्स आणि इतर उपाय करुन लपवण्याचा आटापिटा असणार.

पण जेव्हा गायला तोन्ड उघडतात तेव्हा थेट पन्जाबीत गायला सुरवात करतात. :डोक्याला हातः >> संग्राम भालेराव हा आणि गायला लागला की एकदम ढोलणाच.... https://youtu.be/hejXc_FSYb8?t=11 "मॅडम, ऐसे हिरवी साडी पहनकर इथं बाकडेपर झोपणेका नै" डायलॉग कुठे आहे...

Pages