चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अनु >> पिकासो >>>> दशावतार चा भाग पाहिला.
या धाग्याचा विषय नाही. पण दशावतारावरच संसाराचा गाडा ओढणा-या कलाकारांचं वाईट वाटतं. तुमच्या पोस्टमुळे लगेचच कोकणच्या बालगंधर्वाची आठवण झाली. फक्त दशावतार हेच उत्पन्नाचं साधन असलेल्या या कलाकारावर अतिशय वाईट वेळ आली होती. शाहरूख खानच्या हस्ते त्याचा सन्मान झालेला आहे. स्त्रीपार्टी सध्याच्या काळात तरी इतकी ग्रेसफुल आणि महिलांचा आदर करणारी कुणीही करत नसेल.
https://www.youtube.com/watch?v=psK1x4pqItE

हो खरंच आहे. दशावतारी, त्यांचं आयुष्य, त्यातल्या समस्या हा पिकासोचा मूळ भाग आहे.
पाहताना मध्ये मध्ये खूप वाईट वाटतं. इतक्या निसर्ग समृद्ध, पावसाची, पिकापि, संस्कृतीची कृपा असलेल्या प्रदेशातही लोक इतक्या हलाखीच्या परिस्थितीत असावे याची खंत वाटते.

काल राजेश खन्ना चा बावर्ची पाहिला. खूप आवडला. बऱ्याच मंडळींनी पाहिलेलाच असेल, पण मी आताच पाहिला. राजेश खन्ना ची acting बहारदार. संपूर्ण चित्रपट भर एकाच पोशाखात असूनसुद्धा आणि बहुतांश चित्रीकरण फक्त घरातच झालेलं असूनही मजा येते पाहायला. साधीशी कथा आणि उत्कृष्ट storytelling हे आजकाल बघायला मिळत नसल्यामुळे असेल कदाचित. कुणी अजून पाहिला नसेल तर prime वर जरूर पहा.

हि स्वीटू आहे का ? रुही मध्ये पाहिली फक्त एका शॉट साठी होती डायलॉग पण नाही . >>>>>> कस शक्य आहे? रुहीच शुटिन्ग२०१९ ला झाल असेल, तेव्हा स्वीटूचा गर्ल्स रिलीज झाला होता.

स्वीटू कोण? >>>>>>>>> झीम बघता का चप्र्स?

पिकासो >>>>>> नुकताच ह्या चित्रपटाला कशासाठी तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच वाचलय.

बावर्ची बघणार असल्यास भोर आयी गया आंधियारा गाणे आजिबात मिस करू नका. उत्तम गाणे आहे. तसेच जया राजेश असे टॉपचे स्टार घरची भांडी घासणे, पायरीवर बसून . खराब झालेली फरशी घासून साफ करणे, भाजी काप णे चहा बनवणे अशी घरगुती कामे इतक्या सहजतेने करतात. कॉटन साड्या पिन अप न करता नीट नेसून पदराने चेहरा पुसतात. हे आजकालचे स्टार करू शकत नाहीत. अकरा वीतली मुलगी डिझायनर बॅग घेउन कॉलेजात जाते. राज रोहित टाइप हिरो घरा तली काही कामे करणे, आईच्या पदराला हात पुसणे वगैरे करणे शक्यच नाही.

हा घरगुती पणा थोड्या प्रमा णात रजनिकांतच्या भूमिकांमध्ये दिसतो. केरळी सिनेमात दिसतो.

हो बावर्ची मस्त आहे.
गोविंदाचं हिरो नं १ मध्ये साधारण असंच काम आहे. बाकी कथा वेगळी आहे अर्थात.

अमा ती स्टोरी ची डिमांड होती... आजकाल चे स्टार देखील या सगळ्या गोष्टी सहज करू शकतात... स्क्रिप्ट मध्ये असेल तर...

हि स्वीटू आहे का ? रुही मध्ये पाहिली फक्त एका शॉट साठी होती डायलॉग पण नाही . >>>>>> कस शक्य आहे? रुहीच शुटिन्ग२०१९ ला झाल असेल, तेव्हा स्वीटूचा गर्ल्स रिलीज झाला होता.>>>>>>>>>>>

पहिल्या फोटोत साईड फेस ने स्वीटू सारखीच। दिसते आणि स्वीटूच ते पेटंट स्टाईल ने कानामागे केस सारने ते सुद्धा सेम टू सेम होते

मी पण शनिवारी prime वर Bawarchi बघितला आणि रविवारी आनंद. इतके वर्षे झाली तरी दोन्ही चित्रपट परत आवडले

अमा, आजकालचे नट नट्या उलटच कष्ट घेतात भुमिकेसाठी. स्टोरी डिमांड असेल तर नक्कीच करतीचा> चांगले नट नटी घेतातच. माझे म्हण णे सो कॉल्ड स्टा र्स बद्दल आहे. राजकुमार राव, खुराना ब्रदर्स करतातच

बावर्ची हा सिनेमा तपन सिन्हांच्या गैल्पो होलो सत्ती या सिनेमाचा अधिकृत रीमेक आहे. तपन सिन्हांची कथा कुठल्याशा मुक्तकावर आधारित आहे. या मुक्तकावर बिशप्स वाईफ हा सिनेमा आधीच येऊन गेला आहे. बंगाली सिनेमावरून तमिळ, तेलगू सिनेमे बनले आहेत. कन्नड मध्ये शांतीनिकेतन नावाने बनला आहे.

हिरो नंबर वन मधे ही थीम आहे. राजेश खन्नाच्या रोटी व दुश्मन मधे ही थीम वेगळ्या पद्धतीने आहे. घरात आलेल्या आगंतुकामुळे घरातले वातावरण बदलले जाते ही थीम. संजय दत्तचा खूबसूरत पण या थीमवरच आहे.

पण बावर्ची इतका दुसरा सुंदर सिनेमा थोडासा रूमानी हो जाये हा आहे. बावर्ची एखाद्या आल्हाददायक गाण्यासारखा उलगडत जातो. तर रुमानी स्वतःच एक गाणे आहे. मुक्त असा सिनेमा आहे. यातली पात्रं कवितेत बोलतात, गाणी गातात. तो एक एक स्वप्न देत असतो जे खोटं आहे हे प्रत्येकाला माहीत असतं तरी प्रत्येक जण त्या स्वप्नाच्या प्रेमात पडत असतो... मूळ सिनेमाचा हा पद्य अवतार पण खुप सुंदर आहे.

बिशप्स वाईफ मधे प्रत्यक्ष देवदूत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी येतो. बावर्ची मधे हे टाळले आहे.

अगोदर कल्पना होतीच तरीही..धडक पाहिला. टाईमपास म्हणून..
अजिबात नाही आवडला.. सैराट च्या तुलनेत काहीच नाही. रिमेक दुसर्या भाषेत बनवत्ताना मुळ पिच्चर मधील फिलींग्स कुठेच जाणवत नाहीत.
सैराटच्या पहिल्या अर्ध्या भागात आपण आर्ची आणि पर्शा शी जोडले जातो...ते ईथे अजिबात नाही जाणवत. . मुळात त्या दोघांमध्ये प्रेम आहे, ते खुलतयं, हे ही जाणवत नाही...!! सैराट ची गाणी म्हणजे जान एकदम..! पण धडक ची गाणी क कुणास ठाऊक नाही आवडली. याड लागलं आणि पहली बार है जी.. याची एकमेकां सोबत तुलना च नाही ..!
जानवी तर आर्ची समोर काही च वाटत नाही.. पण ईशान आवडला..

ईशान छान काम करतो.
मुळात सैराट मधला क्लास डिफ्रन्स इथे मारून टाकून रंगीत कपड्यांवर लक्ष केंद्रित केलंय Happy
शिवाय धक्कादायक शेवट मधला धक्का बदलल्याने पण फार जास्त क्लिक नाही झाला.
झांवी(हो तिचं नाव इंग्लिश बातम्यांत असंच लिहितात) थोडी स्टीफ वावरली आहे पहिला चित्रपट असल्याने
एकदोन पिक्चर नंतर असं काम करायला हवं होतं.

अमा, रानभुली पोस्ट्स छान.

सिरीयलमधले काही कलाकार भूमिकेच्या डिमांडनुसार लादी पुसणे, नवरा बायकोपैकी कोणाचा पाय मुरगळला तर लेप लावणे, तेल लावणं, करताना दिसलेत.

बऱ्याचदा कुटुंबाबरोबर बसुन कोणता सिनेमा पाहता येईल अशी विचारणा होते, अशा लोकांनी Yes Day पाहुन टाका. Esp टीनएजर्स बरोबर Happy

बावर्ची अजून पाहिला नाही.. आता पाहणार..
>>>

अरे इसने बावर्ची नही देखा..... (अरे ये पी एस पी ओ को नही जानता :))

उभट हसरा चेहरा, पूर्वी शालेय विद्यार्थ्यांचे कापायला लावत तसे कानाला न लागता वरती कट मारलेले केस - असा राजेश खन्ना दिसला की रोल व पिक्चर चांगला असण्याची गॅरंटी. आडवा व थोडा माज असलेला चेहरा व अर्धा कान झाकलेले स्टायलिश केस - असा दिसला की बहुधा उतरत्या काळातील पिक्चर Happy

बावर्ची पहिल्या कॅटेगरीतील.

बावर्ची बघितलाय, छान आहे.

आईच्या पदराला हात पुसणे वगैरे करणे शक्यच नाही. >>>>>>>> आता अस काही दाखवल असत चित्रपटात तर ' शी, काय हा गलिच्छपणा' म्हणून त्या हिरोला ट्रोल केल असत.

पण धडक ची गाणी क कुणास ठाऊक नाही आवडली >>>>>>>> ह्याच टायटल सॉन्ग चान्गल आहे.

Pages