कुठून आले? का आले?

Submitted by केअशु on 12 May, 2020 - 12:08

सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
आपणही आपल्याला माहिती असलेली भारतीय उपखंडातील प्राचीन काळ ते १९९० पर्यंतची अशी स्थलांतरे ज्यांची दखल घ्यावी किंवा फारशी प्रकाशात नसलेली स्थलांतराची माहिती असेल तर इथे लिहावे.त्या स्थलांतरांसंबंधी काही माहिती हवी असेल तर ती सुद्धा विचारावी.सदर विषयासंबंधी काही लेख,पुस्तके असतील तर ती सुद्धा सुचवावीत.
कोणत्याही जाती/पंथाच्या उच्चनीच्चतेच्या मोजमापासाठी सदर धाग्याचा वापर होऊ नये ही विनंती. _/\_

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults