अत्तर - ३

Submitted by सामो on 9 May, 2020 - 04:34

अत्तर - २

नियंत्रण? खरच? दिवस गेले आणि हळूहळू त्याचे अस्तित्व हेच तिचे पबमध्ये जाण्याचे मुख्य कारण बनू लागले होते, तिच्याही नकळत. एखाद्या शुक्रवारी तो आला नाही तर आता तिची घालमेल होऊ लागली, तिचा सोमवार का मरगळलेला जाऊ लागला होता. दोघांचे पबमधील आवडते गाणे होते फ्रॅन्क सिनात्राचे-
Every kiss, every hug seems to act just like a drug
You're getting to be a habit with me
Let me stay in your arms I'm addicted to your charms
You're getting to be a habit with me

एकदा सलग २ शुक्रवार तो आलाच नाही. तीसर्या शुक्रवारी मात्र तो दिसला आणि तिने ऊठून धावत जाऊन त्याला ग्रीट केले "कुठे होतास रे? मी वाट पाहीली. गेले २ शुक्रवार आला नाहीस.मला खूप कंटाळा आला. मी तुला मिस केले. एवढे काम होते तुला की आठवड्यातील एक दिवस वेगळा काढता आला नाही?" अरेच्च्या व्हायोलेटच्या लाजाळू गुच्छात एक बाळ सूर्यफुलही होते तर, उत्कट, प्रांजळ, no false pretenses! त्याने ते सूर्यफूल पाहिले. तिला झालेला २ आठवड्यांचा विरह त्याला कळत होता. आणि त्याच्या पुरुषी वृत्तीने ताडले ती बेसावध आहे, desperate आहे, हाच तो दिवस आहे . मनसोक्त गप्पा मारल्यावरती, त्याने जाताजाता सहज तिला विचारले, "उद्या माझ्या घरी डिनरला येशील का? सहजच, अर्थात no force तुला योग्य वाटलं तरच.. मधुरा भोळी होती पण स्त्रीसुलभ सिक्स्थ सेन्स तिलाही होताच की. ती क्षणभर थबकली, विचार करु लागली जावे की न जावे? होकार द्यावा की नकार? पण इतका मनमिळाऊ, सौम्य असा तो , तो थोडी ना तिला सक्ती करत होता. त्याच्यापासून तिला काय धोका होता? काहीच नाही. She was in control. परिस्थितीवर तिचे नियंत्रण होते. तिने खुशीने होकार दिला. आताशा अंतर्मनात खरं तर पबमधील गर्दी नकोशी तिलाही होऊ लागली होती. ऊबदार गर्दी आता अडसर वाटू लागली होती. आनंदी लोक , hyper वाटू लागले होते. अरेच्च्या पब बद्दलचे हे मत आपले कधी बनले? कधी गर्दीतून दूर त्याला भेटण्याची निकड तिला वाटू लागली - तिलाही कळले नाही की नक्की केव्हा आणि कशाचा अडसर ती गर्दी बनत होती? हम्म खरं वाटतय का तुम्हाला तरी, की एका प्रौढ स्त्रीला खरच गर्दीचा अडसर नक्की कशात आहे ते कळत नव्हते?
.
दुसर्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता ती त्याच्या घरी गेली. तो स्वयंपाक करीत होता. किती उत्साहाने आणि नीटनेटकेपणाने, asparagus चे तुरे , पातीचा करकरीत कांदा कापत होता, एका बाजूला एका भांड्यात काही शिजत होते तर दुसरीकडे लगबगीने अन्य कोणत्या पदार्थाची तयारी चालली होती. बरे एवढ्या धामधुमीतही त्याने तिची विचारपूस करुन, सी डी लावउन, पुस्तके चाळण्यास देऊन रिलॅक्स होण्यास संगीतले होते. एकीकडे गप्पाही मारत होता. मुख्य तो तिच्याकरता, खास तिच्याकरता म्हणून काही बनवत होता.
We reach across the plates and glasses
sparks arc between our finger tips--
we have to have each other for dessert.
After, back in the kitchen,
you call me to you,
unfold your robe
and draw my hand into our wetness--
I fall onto my knees in worship
and to taste of it.
- jay farbstein

बरं या कवितेचं काय? आत्ता आठवण्याचं प्रयोजन काय? त्याला किचनमध्ये पाहून, हीच कविता आपल्याला का आठवावी? Naah! shrug it off. उगाच घाबरु नकोस. अगं किती साधा, मनमिळाऊ आहे तो. त्याने थोडीच तुला काही अंतर्हेतूने बोलावले असेल? No way. जेवण एन्जॉय कर. Just chill. त्याचा सहवास उपभोग. You are in control of the situation. एका नक्की होते relaxation ती त्याच्याबरोबर नीट अनुभवु शके. किती गप्पिष्ट आणि सहज असावं माणसाने! All guards & barriers down, ती त्याच्यापुढे सहज मोकळी होत असे. तशीच ती आजही झाली.

अत्तर - ४

Group content visibility: 
Use group defaults