अत्तर - ४

Submitted by सामो on 9 May, 2020 - 04:34

अत्तर - ३

https://comps.canstockphoto.com/gypsophila-baby-breath-flowers-in-glass-stock-image_csp78341163.jpg
.
आता जेवणात काय होतं आणि त्यांनी रेड वाईन घेतली की अन्य कोणती या बारकाव्यांत काय ठेवलय? मुद्द्यावर येउ यात. जेवणानंतर, ती संध्याकाळ निव्वळ heady जाणार होती. तो सौम्य आहे की त्याच्यात जरब आहे, तो मनमिळाऊ आहे की चांगला श्रोता असणे , ऐकून घेणे या त्याच्या calculated moves आहेत हे तिला कधीच कळणार नव्हते कारण आजच्या थरारानंतर, सुंदर अनुभवानंतर तिला त्याच्याकडे स्वच्छ खरं तर rational दृष्टीने कधीच पहाता येणार नव्हते. असं काय घडलंत्या संध्याकाळी? डिनरनंतर dessert खात असतेवेळी, त्याने कधी तिचा हात हातात धरला, ती त्याच्या मीठीत कधी बद्ध झाली हे तिला कळलेसुद्धा नाही. दोघांना फार प्रयत्न करावा लागला नाही, इतक्या दिवसांच्या anticipation नंतर दोघांच्यातील आकर्षण तीव्र बनले होते. त्याच्या मिठीत , त्याच्या बाहूपाशात बध्द होता होता तिला एकच कळत होते की तो अतिशय धसमुसळा, सुखावणारा असा कोणीतरी वेगळाच व्यक्ती आहे. पबमध्ये तिला भेटणारा तो, हा तो नाही, त्रिवार नाही. हा तर त्याच्या आवडत्या स्त्रीला लगाम घालणारा, काबूत आणणारा, तिच्यावर स्पर्शसुखाचा वर्षाव करत , तिला भिजवुन टाकणारा कोणी परकाया प्रवेश केलेला Larger than life, धुंदावुन टाकणारा तिचा प्रियकरआहे. हे सर्वच भोवळ आणणारे होते. त्याचे हे transformation कसे कधी झाले . आणि हे आधी कधीच का झाले नाही? हाच का तो फ्रॅन्क सिनात्राची गाणी ऐकून त्यावर मार्मिक टिप्पणी देणारा, हळूवार प्रेमगाण्यांवरती बोलणारा, तिचा प्रत्येक शब्द झेलणारा, ऐकणारा, तिच्यावर अवधानाची वर्षा करणारा. मग हा असा का वागतोय? अचानक हा असा irrationally violently desirable का वाटतोय? He is a beast, he is so clearly an animal हा मला खाऊन टाकेल. मी वेळीच याला slay केले नाही तर हा मला consume करेल. कोणीतरी एक वाचणार यातून. तो किंवा मी. तो ...... की ...... मी? मला हे आवडतय, मला हा कल्लोळ अनावर होतो आहे. सुखाच्या लाटांवर उत्कट लाटा तो हे जे करतो आहे ,हे अतिशय धुंदावणारं आहे, माझ्या राजा नको थांबुस. मला फार फार हवं आहे. मी नाही वाचणार....मला वाचायचही नाही. कोलाहल, शरीरातील कणाकणाने बंड पुकारलेले तिला कळत होते. अमृतकल्लोळ आणि असीम आनंद ......जे काही होता होतं ते heady आणि intoxicating होतं,
You kissed my body to a cloud-
Stratus, cirrus, nimbus,
Gasses swirling,
Furniture for angels,
Punctuation in the changing
Sentence of the sky.
Blown and altered
By the winds of breath,
I float above the landscape
Of our bed.
First cumulo-nimbus,
Then a castle of cumulo-pileus.
I expand, surround you,
Filled with dust and seas,
A plane, a bird,
Turbulence and hail.
I fill with dew.
Light shines through me,
And the earth brightens.
- Alison Stone
मी नाही खाऊन टाकू शकत त्याला मी नाही consume करु शकत he is far too big to be consumed. तो अजस्त्र आहे, आक्रमक आहे तो मृगया करतो आहे, आणि तो आणि त्याचे हे दुखावणं मला हवय. किंबहुना हेच हेच मला हवय. हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक सुखाचा क्षण आहे. हा क्षण अस्साच, इतक्या प्रतीक्षे नंतर इतका तीव्र झालेला भोगण्याकरताच मी जन्म घेतला आहे.
.
her head hanging down and her
tongue long and dark as an anteater’s
going toward his body, she was so clearly an
animal, she was an Indian creeping
naked and noiseless, and when I looked at her
she looked at me so directly, her eyes so
dark, her stare said to me I
belong here, this is mine, I am living out my
true life on this earth.
-Sharon Olds

.
अनेक कविता कोळून प्यालेली ती त्या रात्री पहिल्यांदा कविता जगली, Sharon Olds यांची कविता ती जगली. फुलांच्या गुच्छातील baby breath चे तुरे त्याने अलगद वेगळे केले होते आणि त्यांची जागा धुंद धुमारे फुटलेल्या, मारव्याने, केवड्याने, मोगर्याने घेतली होती.
.
नंतर अनेक शुक्रवार आले, गेले, परत दोघे तासंनतास गप्पा मारु लागले , लोकंही येत जात राहीली. कदाचित लोकांना वाटले किती मैत्री आहे दोघांत, किंवा नसेलही वाटले. वाटले असले तरी काय चूक होते? खरच सुंदर मैत्रीच होती. पण मर्मबंधातील कुपीतील अत्तराचे जे काय दोन चार थेंब होते, फक्त दोघांचे होते. ना त्याचा सुगंध कोणाला अनुभवता येणार होता ना कोणी त्याची कल्पना करु शकणार होतं. हा सुगंध केव्हा लुटायचा, केव्हा त्या सुगंधांत वाहून जायचे ते दोघे ठरविणार होते. तसं पहाता परत वाहून जायचेच असेही बंधन नव्हती, होती ती फक्त एकमेकांकरता आणी निसर्गाकरता, कृतज्ञता. त्यांचं निशब्द, न सांगता एकमेकांना कळणारं deep understanding व प्रेम होते-आहे-राहील.

- समाप्त -

फोटो (मुक्ताधिकार) - https://www.pexels.com/photo/shallow-focus-photography-of-red-rose-1233416/

Group content visibility: 
Use group defaults

कथा संपलेली नाही ना? आणखी वाचायला आवडेल. सध्यातरी ही कथा भावनांच्या कल्लोळावर अलगद तरंगत राहिलेली अशी वाटते. अर्थात प्रत्येक कथेला ठाशीव शेवटच हवा असे नाही. अस्पष्ट अमूर्त असेही काही असू शकते.
लिहीत राहा.

सामो, छान मांडणी केली आहे.
कथा इथेच संपली आहेही आणि नाहीही असं वाटतंय.....
आणि हे ४ भाग सलग एकाच दिवशी अपलोड केलेत त्याबद्दल खूप आभार.

सगळे भाग एका दमात वाचले. सुंदर आहे कथा. त्यातल्या कविता ही सुंदर . त्या कथेचा प्रवाह बरोबर पकडतात आणि कथेला अधिक खूलवतात.
तो अजस्त्र आहे, आक्रमक आहे तो मृगया करतो आहे, आणि >>>>> हे वाचून तिची काळजी वाटायला लागली. Lol
पण मोरपीशी ,हलका ,तरल नकळत झालेला अलगद सुखान्त आवडला.
धन्यवाद.

सामो, छान आहे कथा. साधी सरळ. पात्रांच्या नात्यात उगा गुंतागुंत नसलेली. कथेचे नावसुद्धा मस्तच!
I am in control असे मधुराला वाटता वाटता ज्या तरलपणे तुम्ही कथेचे वळण बदलले विशेषतः कवितेतून (त्यातले ढगांचे रूपक अगदी समर्पक!) ते आवडले. पुलेशु!

Hats off.. सामो, किती तरल किती सुंदर लिहिलीयस गं.. फुलांनी अन् कवितांनी चार चाँद लावलेत कथेला..
असच लिहीत राहा..

सामो
खूपच तरल अन संवेदनशील लेखन
छान जमलंय
काहीतरी वेगळ अलंकारिक

Mast