महाराष्ट्रात राजकीय पेच - राज्यपालांनी मंत्रिमंडळाची मागणी फेटाळली.

Submitted by अज्ञातवासी on 30 April, 2020 - 11:05

कोरोनासारख्या संकटाशी सर्व जग लढा देत असताना महाराष्ट्रात एक गंभीर राजकीय पेचप्रसंग उभा राहिलाय. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करावं ही मागणी अमान्य करून निवडणूक आयोगाला त्वरित निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.
यावर साधकबाधक चर्चेसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच की ते... फुक्कटचं खाऊन डोळ्यांवर तंद्री आली की गोग्गोड स्वप्नं पडतात ना त्यांना Proud

आता काही कालावधीनंतर पोटाला भूक लागल्यावर जेंव्हा यांना जाग येईल तेव्हा आमच्या राजकारणात कुळं घुसली अन त्यांनी आम्हाला सत्तेतून हद्दपार केलं अध्यक्ष महोदय (उजव्या हाताने समोर बसलेल्यांना खाली दाबण्याची खूण करत..!) अशी आवई उठवतील हे..! Proud

तोरसेकरांचा ताजा विडिओ जस्ट आत्ताच पाहिला. त्यांच्या पक्षाला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने ते नाराज होते त्यामुळे शीर्षक आहे - ग्रामपंचायत नाही तर महापालिका निर्णायक. कारण काय तर गावागावांत स्थानिक आघाडीची समीकरणे असल्याने त्यांच्या निकालाने नाहीतर महापालिकांच्या निकालांनी जनमताचा कौल कळतो. म्हणजे एवढ्या १२७०० ग्रामपंचायतीच्या मतांना लोकशाहीत काहीच किंमत नाही पण शहरातील मतदान मात्र लोकशाहीत जनमत ठरवत असते. पंचायतराज व्यवस्थेचा अब्यास भाऊंनी पत्रकारिता शिकताना ऑप्शनला टाकला होता बहुतेक. हे गृहस्थ वयाप्रमाणे दिवसेंदिवस भंजाळत चाललेत.

मीरा भाईंदर: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले आहेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (devendra fadnavis reaction on thackeray government)

मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही हा पक्ष विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच पण आम्हीच फासा पलटवून. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं फडणवीस म्हणाले.

https://www.tv9marathi.com/maharashtra/devendra-fadnavis-reaction-on-tha...

बिना शिडीचा प्लटणार म्हणे

हा काय सापाच्या तोंडात पडणार काय ?

राज्याने पेट्रोल वरचे कर कमी करावेत , असा सल्ला देणारा फडणवीस , स्वतःच्या कार्यकाळात आमदारांचा पगार तिप्पट केला होता ह्याने , हे मात्र विसरतो

अहो त्यांनी एकट्या भाजपा शिवसेनेच्या आमदारांचा पगार वाढवला नव्हता तर बाकी तुमच्या लाडक्यांचा पण पगार वाढवला होता. उगाच एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात का हे नेते?

कुकुचकुने लोणार सरोवराचा फोटु काढला. लोकसत्ता वाले म्हणाले ओळखा पाहु कोण आहे ते? तर लोकांनी भयाण प्रतीक्रिया दिल्यात. Rofl

Pages