महाराष्ट्रात राजकीय पेच - राज्यपालांनी मंत्रिमंडळाची मागणी फेटाळली.

Submitted by अज्ञातवासी on 30 April, 2020 - 11:05

कोरोनासारख्या संकटाशी सर्व जग लढा देत असताना महाराष्ट्रात एक गंभीर राजकीय पेचप्रसंग उभा राहिलाय. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करावं ही मागणी अमान्य करून निवडणूक आयोगाला त्वरित निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.
यावर साधकबाधक चर्चेसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I have not asked any one to show to me their love for their country. Just do your duty towards it. Do not worry about me and do not show your envy for me through your comments.

राज्यांची इस्पितळे व दवाखान्यांची क्षमता संपली की पक्षांची ऑफिसेस सरकारने घ्यावीत. त्यातही सत्तेत असलेल्या पक्षांची आधी व तरीही गरज पडलीच तर विरोधी पक्षांची ऑफिसेस घ्यावीत.

अर्थात इस्पितळात आणि दवाखान्यात जागा कमी पडतात अशी वेळ कधीही येऊ नये ही प्रार्थना.

९ हजार कोटी पाण्यात?
'जलयुक्त शिवार अभियान' या योजनेचा मूळ उद्देश भूजल स्तर वाढवण्याचा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेवर सुमारे ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पाण्याची अपेक्षित पातळी वाढली नाही. तसे ताशेरेच कॅगच्या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्याच आधारावर ठाकरे सरकारने या योजनेची चौकशी सुरू केली आहे. फडणवीस व भाजपला हा खूप मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/jalyukt-shivar-maha...

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून राज्य सरकार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवरून थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलताना ते याबाबत म्हणाले, 'जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात ७० टीएमसी जादा पाणी साठल्याची फसवी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ७० टीएमसी पाणी म्हणजे वारणा धरणाच्या दुपटीपेक्षा जास्त पाणी. ७० टीएमसी जादा पाणी साठवता आले असते तर, दुष्काळी भागाला त्याचा फायदा झाला असता. प्रत्यक्षात मात्र असे काहीच झालेले नाही. उलट निकृष्ट कामांमुळे जलसाठ्यांमधील गळतीचे प्रमाण वाढले. यामुळे पाणी वाहून गेले. याप्रकरणी चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.'

https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/jalyukt-shivar-yojana-...

images.jpg

डौल मोराच्या मानंचा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बैलगाडी अजून लक्षात आहे ही बाब कौतुकास्पद आहे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे आणणार अशी घोषणा काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार असताना फडणवीस यांनी केली होती. आज कृषी कायद्यांचं महत्त्व सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून बैलगाडी मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांनी हे कायदे शेतकरी हिताचे कसे आहेत हे देखील आपल्या भाषणात सांगितलं. यावर संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

.
काँग्रेस च्या नेतृत्वात दम नाही , पवारांनी पुढे यावे !
उठा ला पंतप्रधान पदी बसविणार !
राहुल मध्ये पंतप्रधान पदाचे गुण आहेत !
नेपाळ मध्ये हिंदुत्व संपत असताना तुम्ही काय करत होते ?
द्रोणाचार्य संजीवनी विद्या नाम का पर्वत लक्ष्मण के लिये लेके आये

मंडळी , वाचाळवीर संपादक ची अजुन काही विनोदी वक्तव्ये असतील तर चिटकवून टाका Lol

मागुन घुसणार्‍या समपादकाचे काय वेगळे गुण आणी मुक्ताफळे असणार? दररोज मुर्ख पेपरवाले राऊत संतापले, राऊत भडकले, राऊत चवताळले अशाच बातम्या देत असतात. आता खडसेंना ईडीची नोटीस आली त्यावर राऊत संतापले असे लोकसत्तात आले. आता खडसे राहीले बाजूला, ह्या बाबाजीची मुलाखत घेण्यापेक्षा खडसेंनाच का विचारत नाहीत?

उठा ला पंतप्रधान पदी बसविणार !>>>>> मग मी कशाला इतकी मगजमारी करतोय? इती भावी पंप्र.

काँग्रेस च्या नेतृत्वात दम नाही , पवारांनी पुढे यावे !>>>>>> याचा अर्थ राहुलने संन्यास घ्यावा का?

नेपाळ मध्ये हिंदुत्व संपत असताना तुम्ही काय करत होते ?>>>>>> ते कधीच संपलेय. यांनी जायचे होते ना तिथे झेंडे गाडायला.

http://www.misalpav.com/node/48128

मिसळपाववर फडणवीस भक्तभैय्ये रडत बसले आहेत , ठाकरे सरकार किती वाईट आहे , बिहार युपी गुजरात ह्यापेक्षा बरे आहेत म्हणे
डॉकटर साहेब आणि श्रीगुरुजी उर्फ मास्तुरे आघाडीवर आहेत

Proud

तिथे राजेशभाऊ सोडले तर बाकी कोणी ओळखु येईना. तिथली धुळवड इथल्यापेक्षा जास्त भारी असते का? मला त्या साईटचा इंटरफेस नावडल्याने/न उमजल्याने रजिस्टर नाही केलं अजूनपर्यंत.

खरे इकडे फिरकत नाहीत हल्ली. त्यांना विरोध झेपत नाही. लगेच भंपक, बिनडोक, मूळव्याध असले शब्द फेकतात

हे जुनंच आहे की. त्यांनी अजूनपर्यंत ऐकलं / वाचलं नसेल होय?

ज्याने आपल्याविरोधात गाडीभर पुरावे आहेत असा दावा केला, त्याच्या मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारा आणि घाऊक क्लीन चिट वसूल केलेला माणूस आहे तो.

ते बरोबरच आहे.
पण विद्यमान उपमुख्यमंत्री व सामनाचे संपादक समोरासमोर आल्यावर निदान हे आठवत असणारच नां.
स्वतःबद्दल इतक्या खालच्या पातळीवर लिहीलेले विद्यमान उपमुख्यमंत्री विसरतील असे वाटत नाही.

नक्कीच भरत. त्यांना ते तसे आठवायलाच पाहिजेत नसतील आठवले ते त्यांच्या सारखे निर्लज्ज तेच.(हे सरसकटीकरण तर नाही नां? कारण सगळीकडे सगळ्यांनाच आठवायला हवे असलं काही कर्म केले असेल तर)

“ग्रामपंचायत निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीतील ८० टक्के जागा महाविकासआघाडीमधील पक्षांना मिळालेल्या आहेत. महाविकासआघाडीवर जनतेने विश्वास दाखवला आहे. आम्ही केलेल्या कामांवर लोकं समाधानी आहेत.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींचे निकाल समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने घेतलेल्या पत्रकारपरिषदेनंतर, काँग्रेसने देखील पत्रकारपरिषद घेत या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाची माहिती दिली.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “कोल्हापूर, नंदुरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, उस्मानाबाद, वाशी, बुलढाणा या १३ जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष राहिलेला आहे. याशिवाय विदर्भामधील यश लक्षणीय आहे, ५० टक्के जागा काँग्रेसला मिळाला असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निर्विवाद यश विदर्भात काँग्रेसला मिळाल्याचं दिसून येत आहे. मराठवड्यात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला यश मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजून अनेक ठिकाणचे निकाल समोर यायचे आहेत. एकूणच १४ हजार ग्रामपंचायतीं पैकी चार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्या आहेत.”

तसेच, “राज्यात भाजपाची पिछेहाट या निवडणुकीतून दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी प्रदेशाध्यक्ष यांची स्वतःची गावं देखील त्यांच्या ताब्यात राहिलेली नाहीत. या ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आलेला नाही. मात्र खोटं बोलण्यात ते पटाईत असल्याने ते माध्यमांवर कदाचित वेगळं काही सांगू शकतात. पंरतु हे स्पष्टपणे दिसत आहे की या निवडणुकीत भाजपाची मोठी पिछेहाट झालेली आहे. महाविकासआघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे.” असं देखील थोरात यांनी यावेळी सांगितलं

https://www.loksatta.com/maharashtra-news/in-gram-panchayat-elections-co...

Pages