महाराष्ट्रात राजकीय पेच - राज्यपालांनी मंत्रिमंडळाची मागणी फेटाळली.

Submitted by अज्ञातवासी on 30 April, 2020 - 11:05

कोरोनासारख्या संकटाशी सर्व जग लढा देत असताना महाराष्ट्रात एक गंभीर राजकीय पेचप्रसंग उभा राहिलाय. राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करावं ही मागणी अमान्य करून निवडणूक आयोगाला त्वरित निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.
यावर साधकबाधक चर्चेसाठी हा धागा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निवडणुका झाल्या तर चांगलंच की. विधान सभेतून विधान परिषदेच्या जागांसाठी निव डणूक हे तुलनेने फार वेळखाऊ आणि रिसोर्सेस लागणारं कम नाही. सगळ्यांनी तारतम्य दाखवलं तर बिनविरोध ही होऊ शकतील.

Good !
-
राज्यपालांनी त्यांच्या कोर्टातील चेंडू, निवडणूक आयोगाच्या दिशेला टोलावला आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेते ते पाहयचे.

माझा असा अंदाज आहे की भविष्यात महाराष्ट्र हा एक वेगळा देश तयार होईल आणि महासत्ता बनेल.

बोकलत कुठे गेले?>>>व्वा व्वा बरोबर ओळखलंत. स्पिचलेस. सगळ्यांचे डू आयडी असतात म्हणून बोललो आपला पण एक तयार करावा.

आता राज्यपाल निर्णय ना घेत असण्याचा वाद न्यायालयात पोहोचलाय.

राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 9 जागांच्या निवडणुका घ्यायला सांगितलंय.

पुढचं चित्र कदाचित असं असेल.

निवडणूक आयोग काही दिवस परिस्थितीचा अंदाज येण्यासाठी घेईल व निवडणुकांना उपयुक्त वातावरण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आधी कोरोना ला आळा घाला म्हणून सांगेल. कारण या आधी निवडणुका पुढे ढकलल्या तेव्हा कोरोना चे रुग्ण आताच्या मानाने दहा टक्केही नव्हते.

मग निवडणूक आयोगाच्या मागणी विरुद्ध कोणीतरी न्यायालयात जाईल. तिथे बराच उहापोह होईल, न्यायालयही स्वतचा वेळ परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी घेईल.

तोपर्यंत कदाचित 28 मे आलेला असेल.

कुठलेही संकट असो, कुठल्याही पदाचा वाद असो, संविधानाने आखून दिलेल्या मर्यादेत काम करणे व त्यातील नियम पाळणे हेच सर्वांचे मुख्य उद्देश्य असले पाहिजे.

आपल्याला आमदार बनायला फक्त 6 महिन्याचा कालावधी आहे व हनिमून सुरू असताना हे पहिले सहा महिने सहा दिवसासारखे चटकन उडून जाणारे असतात हे उ ठाना माहीत नव्हते काय?

सुरवातीचे पाच महिने वाया घालवल्यानंतर आता एक महिन्यापेक्षाही कमी काळ उरला तसे हे जागे झाले. गेल्या 5 महिन्यात ज्या राज्यपालांच्या यांच्या मुखपत्राने रोज प्रेमळ आरत्या केल्या त्यांनी आयत्या वेळेस यांना मदत करावी अशी अपेक्षा. किती तो निरागसपणा.

असो, कोरोनाचे संकट उभे आहे हे बघून राज्यपालांनी यांना आमदार करून घ्यावे आता. कायदा काय म्हणतो हे मायबोलीचे सर्वविषयतज्ञ सांगतीलच.

पण विधान परिषदेच्या निवडणुका किचकट नसतात , मतदारही मोजके असतात
तर होऊन जाऊ दे

म्हणजे मोदी कोशारी फडणीस भाजपे व त्यांचे नक्षत्र मंडळ सगळेच शांत होऊन जाईल

पाच महिने वाया घालवले?
त्यातले चाळीस दिवस लॉकडाऊन आहे. तर याआधीचे दहा दिवसही करोनाशी युद्ध चाललंय.
अर्थात भाजप समर्थकांना हे दिवस वाया घालवणंच वाटणार.
कोरोनाचं संकट घरात शिरलेलं असताना हे मध्य प्रदेश सरकार पाडायच्या उद्योगात होते.
त्यासाठी लॉकडाउन आणि विमानवाहतुकीला बंदी पुढे ढकलले.
याला वेळ सत्कारणी लावणे म्हणत असणार.
मध्यम प्रदेशला महिनाभराने पाच मंत्र्यांचं मंत्रीमंडळ मिळालंय.
अख्खा आरोग्यविभागच कोरोनाग्रस्त आहे.

महाराष्ट्रातल्या विधानपरिषद निवडणुका तशाही due होत्या.

या आताच्या निवडणुकीसाठी मतदार विधानसभेतले आमदार आहेत.
पदवीधर, शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्था हेही मतदारसंघ असतात.

आगबबुला, ह्युमर थोडा कमी पडतोय. Original आयडी नेच लिहा...>>>>मी सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासलोय. लवकरच कोतबो मध्ये धागा काढणार आहे. धन्यवाद.

आता केंद्राने आंतरराज्य प्रवासालाही सूट दिलीय की.
हे तर राज्यातच आहे.
आणि भाजपचे आमदार उठसूट राज्यपालनिवासात जातच असतात.
विधिमंडळात यायला काय?

भरत, यवतमाळ मधली जानेवारीत झालेली विधानपरिषद निवडणूक आठवते का? सेनेच्याच उमेदवाराने जिंकली ती... तेव्हाही कोरोना होता की काय?

यापूर्वी या प्रकारे सरळ मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी आपली आमदारकी कश्या प्रकारे मिळवली होती याचा अभ्यास सेनेने करणे गरजेचे होते. मागील पन्नास दिवस सोडले तर बाकी दिवसांचे काय? आपले काम इतरांनी दाती तृण धरून करावे. आम्ही समोरच्या व्यक्तीच्या पदाचा, वयाचा कोणताही विचार न करता सार्वजनिक रित्या अपमान करावयास स्वतंत्र आहोत हा अहंकार आणि काम झाले नाही की त्याला राजकारण म्हणून सध्याच्या अडचणी पुढे करून गळा काढायचा. आता मुळात ज्या पदावर विराजमान होण्याची गरज आहे त्या जागेची मुदत किती? माझ्या माहिती प्रमाणे ही मुदत २० जून अखेरीस संपत आहे. त्यानंतर काय? जर तोवर लॉक डाऊन वाढले आणि निवडणूक आयोगा ने पुन्हा निवडणूक घेणे लांबवले तर काय?

अगदी!
--
राज्यपालांनी आमदारकी नाकारली तर भाजपा राजकारण करतेय म्हणून गळा काढणार व आमदारकी दिली तर भाजपा व राज्यपाल तथाकथित ढाण्या वाघासमोर झुकले, अश्या बढाया सामन्यांतून मारणार. अश्या दुटप्पी भूमिकेमुळे, राजकारणात शेणेच्या वार्याला कोणी उभे राहात नाही.
---
#कोतळा,खंजीर, वाघनखे, म्याव...म्याव...

या नालायक कॉंग्रेसींची राज्यपालांविषयी भाषा पाहा. मग कश्याला राज्यपाल या महाभिकार्यांना दारात उभे करतील.
---
https://www.facebook.com/1190373854366805/posts/3734977546573077/?app=fbl

राजकारणात शेणेच्या वार्याला कोणी उभे राहात नाही.>>> एक वर्ष वय असल्यावर छान टाईप करता येतं की. नवी पिढी खूपच हुशार.. (एक वर्ष वय एव्हढ्याकरता, की गेल्यावर्षापर्यंत भाजपा सेनेला वारा घालत होती या गोष्टीची कल्पना तुम्हाला दिसत नाही! जन्म नसेल झाला बहुधा तुमचा तोवर.. )

(एक वर्ष वय एव्हढ्याकरता, की गेल्यावर्षापर्यंत भाजपा सेनेला वारा घालत होती या गोष्टीची कल्पना तुम्हाला दिसत नाही! जन्म नसेल झाला बहुधा तुमचा तोवर..
--
भाजपा सेनेच्या वार्याला उभी होती कि सेना भाजपाच्या, हे समजणे तुमच्या सारख्या पप्पू भाटाच्या आकलन क्षमते पलिकडचे आहे. Lol

श्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवर निवडण्याची सद्यस्थिती. राष्ट्रीय कायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लिहिलेला शोधनिबंध :-दुवा देत आहे

सर्व लोकांनी चर्चा करण्याआधी वस्तुस्थिती जाणून घ्यावी ही विनंती
The Wire: Uddhav Thackeray's Nomination: Least Risky Option or Subversion of Democratic Process?.
https://thewire.in/law/uddhav-thackeray-legislative-council

समजणे तुमच्या सारख्या पप्पू भाटाच्या आकलन क्षमते पलिकडचे आहे.>> भक्तांचा हा गुण बाकी वाखाणण्याजोगा आहे, बोलती बंद झाली की मुद्दा सोडून काहितरी बरळायचं, पप्पू भाट वगैरे.. मुद्देसूद बोल की बाळा.. ४० पैशाचा खाऊ हवा का तुला?

मुद्देसूद बोल की बाळा.. ४० पैशाचा खाऊ हवा का तुला?
नवीन Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 May, 2020 - 00:00
---
तुझ्या सारख्या भाटाला खाऊसाठी ४० पैसे देखील खर्च करायची गरज नाही. तो पप्पू त्याच्या पाळीव कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेली बिस्किटे, भेटायला आलेल्या तुझ्या सारख्या भाटांना फुकट खायला घालतो, ती खा व पप्पू स्त्रोत गात बस गपगुमान.

निरंकुश सत्तेच्या मस्तीतून इंदिरा गांधींनी, राज्यपालांना हाताशी धरून देशातील कॉंग्रेस विरोधी सरकारे बरखास्त करायचा धडाका एकेकाळी लावला होता त्यावरून सगळेच राज्यपाल हलकट असतात असा समज या सामन्य माणसाने करून घेतला आहे, असे दिसते.

Pages