हुमान..कोडे आहे का ?

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 29 April, 2020 - 12:25

हुमान..कोडे आहे का ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)

सामान्याला सहजासहजी सुटण्याजोगे आहे का ?
जीवन म्हणजे चकवा, गुंता, हुमान..कोडे आहे का ?

ऐन तिशीतच देह येथला किती लागला वाकाया
जगण्यावर इच्छांचे सांगा इतके ओझे आहे का ?

नजर पेरण्याच्या आधी बस् हवे मला हे बघायला
तिच्या पापण्यांइतके ती'चे मनही ओले आहे का ?

फक्त एकदा फसले होते तिला दिलेल्या शब्दाने
पुन्हापुन्हा हे फसायला मन साधेभोळे आहे का ?

दोन चुंबने दिली मला अन् विचारते की, "भरले का ?"
भरायला सांगा माझे मन म्हणजे पोते आहे का ?

जिथे तिथे ह्या सुखावरी त्या दबाव दिसतो दु:खाचा
वयामधेही दु:ख सुखाहुन थोडे मोठे आहे का ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली (पोते हा शेर एकूण मुडशी किंचित विसंगत वाटला)

जमीन मस्त!

पापण्या हा शेर काल फेसबुकवर वाचल्याचे आठवते

दोन चुंबने दिली मला अन् विचारते की, "भरले का ?"
भरायला सांगा माझे मन म्हणजे पोते आहे का ? >>>> Lol