फिटनेस कसा मेनटेन करावा?

Submitted by कटप्पा on 29 April, 2020 - 00:05

मित्रांनो -लॉकडाउन सुरु झाला आणि घरी नवनवीन पदार्थ बनवण्याचे फॅड सुरु झाले . आधीच वर्क फ्रॉम होम म्हणजे शारीरिक हालचाल कमी , त्यात घरचे रोज बेकिंग कूकिंग करतायत . न खावे तर त्यांचा रोष ओढवून घ्या , खाल्ले तर वजन वाढतेय .
हा माझ्या एकट्याचा नाही सर्व जनतेचा प्राब्लेम असणार म्हणून हा धागा . घरी राहून कसे फिट राहता येईल? तुम्ही व्यायाम करताय का? डायट कसे मॅनेज करताय?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशाला सायकल चालवुन त्रास करुन घेता. मस्त लोळत पडा आणि तुमच्याच धाग्यांवर तहान भूक हरवुन चर्चा वाढवत रहा. टाइमपास पण होईल आणि डायेट पण होईल.

वीरू टाईमपास वेगळा आणि फिटनेस वेगळा . दर वीकएंड सायकलिंग चा प्लॅन आहे . चांगला सोशल डिस्टन्स वाला एक्सरसाईझ आहे . ट्रेल्स ओपन आहेत . आता मागे हटणे नाही .
या धाग्यामुळे एक जरी माणूस फिटनेस साठी सिरीयस झाला माझा धागा काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल .

कपडे धुणे { मशिनने नाही} हा चांगला व्यायाम होऊ शकेल. चादरीही धुवाव्यात. लादी पुसणेही चालू करावे.
काम के काम और पाकिट में दाम।

मी घरगुती HIIT करते. 250 x 4 असे दोरीच्या उड्यांचे सेट. आणि प्रत्येक सेटच्या नंतर एक्सरसायकल वर 10 मिनिटं किंवा 12 सूर्यनमस्कार. आणि 20 तास फास्टिंग.
पण हे मेंटेन करायला खूप जास्त कष्ट पडतायत रिकामेपणामुळे.

हसू नका, पण खरं तेच सांगतेय, आम्ही बिल्डिंग मधल्या तीन जणी आणि लहान मुलं संध्याकाळी ६ नंतर टेरेसवर जमतो. आणि पूर्ण २ तास विषामृत, दोरीच्या उड्या, उभा खो खो, असे अजून बरेच खेळ खेळतो. चिक्कार घाम येतो. अंधार झाला की गाणी लाऊन डान्स करतो.. खूप म्हणजे खूप दमायला होते... पोरांना पण चांगली भूक लागते.. वजन पण कमी होतेय.. पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतंय..

अवांतर- इथे ग्रीन झोन आहे.. जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळताहेत त्यामुळे बाहेर कोणाशी संपर्क नाही. त्यामुळे टेरेस वर बिल्डिंग मधल्या लोकांना भेटण्यात काहीही गैर नाही.

अजून एक.. आम्हाला कोणीही नावे ठेवली नाहीत. घरी पण कोणी नापसंती दाखवली नाही.. Happy

चांगले सल्ले/उपक्रम
@ नौटंकी- खूपच छान आयडिया, असे विविध खेळ मुलांना आजकाल माहीतही नसतात

देवकी - आज खरंच 22 ( खरं तर 25 ) माईल चालवली सायकल.
दुपारी चार ला निघालो आणि थोड्या वेळापूर्वी आलो परत.
रस्त्यात फक्त इकडचे लोक दिसत होते ट्रेल वर ते हि भरपूर - भारतीय एकही नाही. खेद वाटला.

घरच्यांशी गप्पा मारणे.ब्रश करणे. चूळ भरणे. आंघोळ केल्यावर अंग पुसणे???? हे तर आपण (म्हणजे मी) नेहमीच करतो. व्यायाम म्हणुन वेगळ करायची काय गरज?

आज खरंच 22 ( खरं तर 25 ) माईल चालवली सायकल.>>>> ग्रेट! लॉकडाऊनमधे एकही दिवस व्यायाम चुकवायचा नाही असे ठरवूनही तो संकल्प पाळता आला नाही.

Pages