फिटनेस कसा मेनटेन करावा?

Submitted by कटप्पा on 29 April, 2020 - 00:05

मित्रांनो -लॉकडाउन सुरु झाला आणि घरी नवनवीन पदार्थ बनवण्याचे फॅड सुरु झाले . आधीच वर्क फ्रॉम होम म्हणजे शारीरिक हालचाल कमी , त्यात घरचे रोज बेकिंग कूकिंग करतायत . न खावे तर त्यांचा रोष ओढवून घ्या , खाल्ले तर वजन वाढतेय .
हा माझ्या एकट्याचा नाही सर्व जनतेचा प्राब्लेम असणार म्हणून हा धागा . घरी राहून कसे फिट राहता येईल? तुम्ही व्यायाम करताय का? डायट कसे मॅनेज करताय?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात घरचे रोज बेकिंग कूकिंग करतायत . न खावे तर त्यांचा रोष ओढवून घ्या>>>हे खरं असेल तर त्यांना तसे सांगणे गरजेचे आहे,या काळात अतिशय पौष्टिक पण हलका सात्विक आहारच घेणे must आहे असे माझे मत आहे,आणि मी त्याचं अतिशय काटेकोर पालन करते,s

एकभुक्त रहाणे हां एक ह्यासाठीचा सर्वात सोप्पा उपाय. अपवादात्मक स्थितीत काहीजणांना ते जमु शकणार नसेल तर इतर पर्याय आहेतच.

घरगुती व्यायामासाठी अनेक वीडियो उपलब्ध आहेत... स्वत:च्या वस्तुमान, आकारमान आणि उपलब्ध वेळ ह्यानुसार उचित व्यायामप्रकार निवडून लाभ घेऊ शकता.

मी 3 किलो वजन कमी केलं या काळात

नाही म्हटलं तरी आता थोडा वेळ रिकामा मिळतोय, सो मी व्यायाम चुकवत नाहीये. रेसिपी ट्राय केल्या तरी त्या थोड्याशा जेवण्याच्या वेळेत टेस्ट करते. खूप आग्रह कोणी करत नाही, कारण मी सध्या गॅसेस होतायेत, खूप पोटात दुखतयं असे खोटे नाटक करते.
सारखं अधे मध्ये काहीही तोंडात टाकत नाही.

महत्त्वाचं काय तर पचत नाही असे नाटक करा, अन्यथा किमान 5 किलो वाढायची तयारी ठेवा Happy

सो मी व्यायाम चुकवत नाहीये. >>>>> हे मी २३ मार्चपासून जाम ठरवलेले.१०-१२ दिवस नेमाने पाळले.नंतर काम करायचे.पण घामगळतीमुळे इतकी हैराण झाले की सकाळी नो व्यायाम.संध्याकाळी घरात २५-३० मिनिटे चालणे.आधी सोसायटीच्या आवारात फिरायचे.मग बंद केले.

Portion control is the key... गुलाबजामून तुम्ही जर 5-6 खात असाल तर 2च खायचे, पुरीचे पण तसेच. सगळे खा परंतु within limit.. आणि सॅलड, उकडलेले कडधान्य रोज खायचे. हा नियमच करायचा. सॅलड मध्ये अगदी फॅन्सी नाही पण काकडी गाजर टोमटो कलिंगड यापैकी एक असेल त्याच्या फोडी आणि वरण भाताच्या कुकर बरोबर भिजवलेले कडधान्य वाफवून घ्यायच. वेगळा काही करावं लागत नाही.
जरी घरी काही काही करत असले तरी हे करायचा. मग हे दोन्ही एक एक वाटी खायचा आधी मग उरलेले जेवण..

सारखं खाऊ नका. एखादा घास पण. जे काय आवडीचं आहे ते जेवताना आधी खा. मग भूक असेल तेवढंच जेवण करा. रोजचा आहार एकदम कमी केला तर metabolism कमी होईल. पण तडस लागेल इतकही जेऊ नका. दर दोन दिवसांनी एकभुक्त रहा. ठरवून वजन कमी होईल.

वर्षा दीक्षीत डायेटने भूक नाही लागत का गं? किती दिवस लागतात अ‍ॅडजस्ट व्हायला Sad
तू म्हणालेलीस उत्तम असते ते डायेट. इतके दिवस गेलं, मी अजुन सुरु केलेले नाही. पश्चात्ताप होतोय. आज सुरु करतेच.
.
म्हणतात ना आज सुरु केलत तर आज तुम्ही १५ दिवसांनंतरच्या, '१५ दिवस अहेड' असणार आहात Happy तेवधाच आशेचा किरण व उमेद.

आज करतेच सुरु.

FitByAmy videos पहा. शिवाय रामदेव बाबांचा ओबेसिटी साठी आसनाचा video चांगला आहे. मी करायचे. आणि विविधता ठेवा. Don't make it boring.
दोन खाण्यात snack or meal कमीतकमी तीन चार तास जाऊ द्या. I do exercise bike or treadmill or walk for 40 min everyday. Resistance training and stretches for upper body + meditation for 30 to 45 min. I follow this at least 5 days a week. Make it a routine.
सगळे सामान घरी आहे. Thanks to Amazon .
सुरू करा आणि सातत्य ठेवा. तुम्हाला शुभेच्छा.
रोज सकाळी वजन करून पहा स्केल असेल तर.

@सामो,
नाही लागत भूक खरोखर पोट व्यवस्थित भरले असले तर. हवं तर सुरुवात तीन वेळा खाण्याने करावी मग दोन वर यावे असं मला वाटतं. (पण हे डॉक्टरांना स्वतःला मान्य नाही त्यांच्यानुसार डायरेक्ट दोन वेळा खाण्याचीच पद्धत चालू करावी.)
इथे मला वाटतं भरपूर चर्चा झालीय दिक्षित डाएट वर. पण ते सर्व वाचायचं नसेल तर माझा कट्टा वरील त्यांची मुलाखत नक्की ऐक. त्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तुला.

एकदम सुरुवात केली की पहिल्याच दिवशी खूप अवघड वाटते आणि मग बंदच पडते. सुरुवातीला आठवडाभर 3 वेळा आणि नंतर 2 वेळा असे यशस्वी होणे सोपे आहे.

सध्या लॉकडाउन असल्याने मी जमिनीवर पाय ठेवत नाही त्यामुळे मी टेरेसवर जातो. आमच्या आजूबाजूला भरपूर झाडी आहे. जवळच्याच एका झाडाची फांदी पकडून टारझन सारखा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत संपूर्ण शहर फिरून येतो. चांगला व्यायाम होतो.

Light 1 अजुन एक असाच देशी टार्झनी उपाय ―
क्रमवार कृती खालील प्रमाणे
१) एक खड़ू आणि अडीच फुट लांबीची सुतळ घ्यावी.
२) सुतळीचे एक टोक घट्ट एका बिंदुवर धरून दुसऱ्या बाजूने खडूच्या साहाय्याने एक वर्तुळ काढावे.
३) नगीनामधले श्रीदेवीचे गाणे सुरु करून वर्तुळात अर्धगोलाकार झोपावे.
४) तालासुरात नागिन डान्स सुरु केल्यावर सलग अर्ध्या तासानेच थांबावे.
५) वर्तुळाच्या बाहेर पाय आणि हात आल्यास फाउल धरण्यात येईल आणि अजुन एक सेशन रिपीट करावे लागेल.
.
ग्रुप प्रैक्टिस करायची झाल्यास वर्तुळाचा व्यास थोड़ा वाढवून अश्या प्रकारे व्यायाम करत फिटनेस साधावा

दिक्षित डाएट.
संध्याकाळी यू ट्यूब बघून low impact HIIT cardio.
खूप छान विडीओ आहेत. आम्ही "टीम बॉडी प्रोजेक्ट" चे व्यायाम करतो. बदल म्हणून इतर सुद्धा. सलग १ महिना होउन गेला. मजा येते. लॉक डाउनच्या आधी हे जमल नव्हत.
३ किलो वजन कमी झालय. Happy

आम्ही मैत्रिणी सध्या रोज एक व्यायाम प्रकार करुन व्हॉट्स अप ग्रुप वर टाकतो. आमचे मेसेज बघुन ईतर जणीही चॅलेंज म्हणुन व्यायाम करु लागल्या. नक्किच फायदा होत आहे. प्रत्येकाच्या कुवती प्रमाणे दिलेले टारगेट दिवस्भरात पुर्ण करायचे. घरात असल्यामुळे नक्किच जास्त खाल्ल जात आणि केलही जात. पण घरातल्या घरात हलका व्यायाम अथवा योगा केल्यास फरक पडतो. सुरुवातिला आठ दिवसांत कंटाळा आला होता. पण आता ईतकि सवय झाली की व्यायाम चुकला तर शरिर जड वाटायला लागते.

बायकोशी काम एक्स्चेंज करत राहावे.
अध्येमध्ये तिला आपले ऑफिसचे वर्क फ्रॉम होम करायला लावावे आणि आपण धुणीभांडी केर साफसफाई करून घ्यावी.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 May, 2020 - 00:19
>>>>>

काहीही करा. पण चालत करा जसे की फोनवर बोलणे. जसे की मायबोलीवर पोस्ट करणे. घरच्यांशी गप्पा मारणे.ब्रश करणे. चूळ भरणे. आंघोळ केल्यावर अंग पुसणे.. मोबाईल हातात घेतला की चालायला सुरुवात करायची... माझे जे काही थोडेबहुत फिटनेस आहे त्याचे हेच रहस्य आहे

सर्वांचा आभारी आहे . काही कारणास्तव मला स्वतःचाच धागा चेक करण्यास वेळ मिळाला नाही . आज सकाळी उठल्याबरोबर आरशात स्वतःला बघून वजन वाढले असे परत जाणवले . आणि मग हा धागा आठवला .
चांगल्या सूचना आहेत .

Pages