डालगोना ताक

Submitted by किल्ली on 24 April, 2020 - 15:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली कोणती रेसिपी असेल तर ती आहे उपरिनिर्दिष्ट डालगोना(ज्या शब्दाचा नेमका उच्चार मला माहित नाही तो शीर्षकातला शब्द) कॉफी.
पण भारताच्या भर उन्हाळ्यात ही कोल्ड कॉफी थंडावा देईल हे काही मनाला पटेना.
(फेटायचा कंटाळा हे खरे कारण, शिवाय कुठलाही ट्रेंड आला की आम्ही त्यात सामील न होता आपले वेगळेपण दाखवून देतो. असो. )
मग आमची स्वारी अस्सल देशी ताकाकडे वळली. त्यात नावीन्य आणायचा प्रयत्न केला आहे. नेहमीच काहीतरी आगळे वेगळे, खास आणि कुणीही आतापर्यंत न बनवलेले पदार्थ बनवण्याकडे अस्मादिकांचा Proud कल असतो हे सुजाण वाचकांना / मायबोलीकरांना माहिती आहेच.
तर मंडळी, lockdown आणि कोरोनाची शपथ घेऊन सादर करत आहे अत्यंत आरोग्यदायी पाककृती जिचे नाव आहे डालगोना ताक!!

मनुष्यबळ:
किमान ३ कुशल व्यक्ती, कामाची विभागणी खालील प्रमाणे असेल:
- ताक बनवणे
- ताक पिणे आणि छान झालंय असं सांगणे
- ताकामुळे खराब झालेली भांडी घुवून पुसून जागच्या जागी ठेवणे

पूर्वतयारी:
चांगल्या डेअरीचे दूध आपल्याला मिळेल अशी व्यवस्था करावी. (येथे दूध चांगले असणे अपेक्षित आहे, डेअरी नाही). दुधावर सायीचा छान जाड थर येणे अपेक्षित आहे. दूध तापवून ते कोमट होऊ द्यावे आणि निगुतीने दही लावावे. दही कसे लावावे हे समजत नसेल तर ह्याची डीटेल कृती आणि चर्चा इंटरनेटवर आहे, ती माहिती शोधावी, वाचावी आणि अंमलात आणावी.

साहित्यः
पूर्वतयारी केली असेल असे गृहीत धरून ही स्टेप सांगत आहे. पूर्वतयारी फार महत्वाची हे विसरू नये.
१. पूर्वतयारीमध्ये सांगितल्याप्रमाणे बनवलेले दही
घरातील ताक पिऊ इच्छिणाऱ्यांना व्यक्तींचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात दही किचन कट्ट्यावर आणून ठेवावे.
२. पिण्यायोग्य पाणी
RO फिल्टर चे पाणी वापरल्यास निराळी चव येते, आमच्याकडे पारंपरिक पद्धतीत हेच पाणी वापरतात
३. जिरे
घ्या चिमूटभर, एका पेल्यासाठी, जिऱ्याची पूड असेल तरी चालेल, पण ती feel देत नाही राव, दातात जिरा अडकला पाहिजे.
IT वाल्यानो हे atlassian Jira नव्हे , नाहीतर तिकीट शोधाल
४. काळं मीठ
एक चुटकी काले नमक की किमत तुम क्या जानो --(येथे स्वतःच्या नवऱ्याचे नाव ) बाबू

क्रमवार पाककृती: 

१. मिक्सर च्या juicer / jar मध्ये (again , जावा वाल्यानो हे jar म्हणजे भांडं बरं का, नाहीतर jar अपलोड कराल ) दही, काळं मीठ, पाणी घाला.
प्रमाण विचारताय? एवढ्या special पाककृतीमध्ये आम्ही basics देत नसतो.
Fundamentals clear पाहिजेत. काय हे आजकालचे लोक..
२. मिक्सरचे भांडे /jar मिक्सरला लावा. पिन सॉकेट मध्ये जोडा. कळ दाबा. मिक्सरचे आकडेदर्शक चाकसमान बटण फिरवा. गुर्रर्रर्र आवाज येईल. घाबरू नका. काहीतरी भारी घडत असताना दंगा तर होणारच !
३. थोडा वेळ फिरवल्यानंतर तुम्हाला ताक घुसळल्याची दिव्य जाणीव होईल. ह्याचे प्रतीक म्हणजे ताकावरती लोणी जमा झालेले दिसेल .
४. आता सगळ्यात कठीण स्टेप, अगदी काळजीपूर्वक पार पाडायची आहे.
एक काचेचा पेला घ्या (तोडफोड नकोय, बरं ).
(ह्या पेल्यातून कुशल व्यक्ती क्र २ ताक पिणार आहे.)
दीर्घ श्वास घ्या.
५. जारमधले घुसळलेले लोणीयुक्त ताक पेल्यात ओतायचे आहे. पण लोणी पडू न देता फक्त ताक ओता.
६. पेल्यात पातळ ताक आले आहे. आता त्यावर लोणी ओता.
७. जिरे टाका.

इतके कठीण आणि महान प्रयास केल्यानंतर अत्यंत आरोग्यदायी आणि चवदार असे डालगोना ताक तयार झाले आहे.

कुशल व्यक्ती क्र २ आणि ३ ला त्यांचे काम करू देत. तुम्ही क्र १ वाले , तुमचे काम झाले आहे. ताकाचा फोटो काढून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची जबाबदारी पार पाडत किचनमधनं सटका.

IMG-20200425-WA0001.jpg

वाढणी/प्रमाण: 
मनावर
अधिक टिपा: 

आता अधिक काय सांगु, वरती खुप लिहिलेय तेच बास आहे Proud

माहितीचा स्रोत: 
अस्मादिकांचा सुपीक मेंदू
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली तै ने फारच अवघड पाकृ टाकली आहे. तिची अगोदरच क्षमा मागून या धाग्यावर थोडे अतिक्रमण करतोय. माफी असावी. मी जर पाकृ समजण्यात यशस्वी झालो असेल तर याच धाग्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा.

समजले समजले!!! ११४ वेळा वाचल्यानंतर यातील घटक आणी
कृती समजली, ते वाचकांना समजून सांगायचा प्रयत्न करतो. (कित्तीऽऽऽऽ ही आवघड पाकृ आहे.) Biggrin

पाकृ साहित्य घटक: अनुक्रमांक १ "बाबू ", अनुक्रमांक २ ही त्या प्रदेशाची "ग्रृहमंत्री". आणि व्यक्ती अनुक्रमांक ३ हा अनुक्रमांक १ चा डू आयडी .

थोडक्यात पाकृ:
घरबंदीच्या कठीण काळात, मानेवर खडू ठेवून सक्तीचा गृहपाठ करताना लहान पाणी प्यायच्या सुट्टीत या पाकृचा फायदा होतो. वर पाकृमधे एक सिक्रेट घटक पदार्थ सांगायचा राहीला. त्याचा उल्लेख पुढे येईलच. शिणलेल्या डोळ्यांना , विटलेल्या कानांना आणि थकलेल्या मेंदूला चालना देण्यासाठी आपल्यासाठी घोड्यावरून आलेल्या सुकुमार सुशील ( कसले कसले Blush ) शोना/ डार्लिंग बाबूला डा.ता. बनवायची गळ घालावी. बिचारा तुमच्यासारखाच गृहपाठ करून तुमच्या एवढाच तो कावलेला असतो. पाकृच्या यशस्वीतेसाठी आपल्या चेहर्यावरील भाव बापूडवाणे ठेवावे त्यामुळे "तो" लवकर पाघळतो. जर त्या हीमखंडाला पाझर फुटत नसेल तर आपला सिक्रेट घटक वापरावा. ढ्याटड्या ऽऽऽ "शोले कॉईन" . या "चित मै जिता पट तू हारा" घटकाने पटकन ग्लोबल वॉर्मींग चा कॅटलिस्ट मिळून पाकृ झटपट व्हायला मदत होते. अधिक पाकृ समजवायला किल्लीतैनी वर प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न ज्याने त्याने समजून घेणे.

माझी पाकृ समजवायची पध्दत कशी वाटली ते प्रतिसादात कळवा.

क्रमवार पाककृतीत एक पायरी गाळलेली आहे. त्यामुळे डिझॅस्टर होण्याची शक्यता १०१ टक्के आहे.
लॉकडाउनच्या दिवसांत लोकांना कामाला लावायचं किल्लीताईंचं कुटील कारस्थान दिसतंय.

सारखं आयटीवाल्यांनो , आयटीवाल्यांनो असं लिहून तुम्ही कोणालातरी ट्रोल करताय वाटतं.

मस्त लिहि लेय आम्ही डालगोना कॉफी पण केली नाय. आता होप्फुली लॉक डाउन संपत आल्यानी. आमच्या इथे इस्टात एक मस्त मिठाईवाला आहे त्याकडे जगात भारी बेस्ट दही मिळते. प्री करोना मी आठव्ड्याला त्याचे चार कप मागवुन ठेवायची प्लस मँगो श्रीखंड एक कप. ह्या दह्याचे डालगोना ताक अनेक वेळा केले आहे. आय आम मिसिन्ग इट नाव. कब खुलेगा ये लॉक डाउन.

फोटो मस्तच पैकीच्या पैकी मारक.

IT वाल्यानो हे atlassian Jira नव्हे , नाहीतर तिकीट शोधाल
>>
बरं झालं सांगितलेत ते.

@पाफा : तुमचा प्रतिसादाला ताक_सविस्तर असे शीर्षक द्यायला हवे, छान लिहिले आहे Happy
@स्वस्ति आणि @भरत : कोणती पायरी गाळली गेली माझ्यकडून? मी पामर आहे हो, जमेल तसे सविस्तर लिण्याचा प्रयत्न केलाय. काही मिस झाले असेल तर आपण सांगावे आणि ज्ञानात भर पाडावी Happy
@च्रप्स : प्रयत्न करुन तर पहा, जमेल Happy
@ भरतः शीशे के घरो मे रेह्नेवाले दुसरो पे पत्थर फेका नहि करते Happy मीच बापुडी आयटी वाली, माझा नव्रा पण आयटीवाला अजुन कुणाला ट्रोल्ल करणार Proud

@धनुडी : that's the spirit, my girl! नक्कि करुन पाहा आनि झब्बु द्या'\
@अज्ञातवासी : आभार. राक्षस्मंदिर पेक्षा सोपी आहे पाकृ Light 1 Light 1 Proud बघा मला लिहिता पण आलं नाही ते.
@अमा : आभार Happy
@राजसी , @पिकु: आभार Happy
@ MazeMan : Happy Happy
@mi_anu : आभार. आलेय, दार उघडा Happy
@मस्त मगन : आभार. होउन जाउ द्या मग बेत! Happy

पाकृ Lol

बाई दवे,
तो फिकट गुलाबी रंग कसा आलाय? की मलाच तसा दिसतोय

मी बरेचदा ताकात हलकेसे अमृत कोकम टाकतो. लागतेही छान चवीला आणि कलरही छान येतो. कोकमने पित्त शमते आणि अमृतने दिर्घायुष्य लाभते.

तो फिकट गुलाबी रंग कसा आलाय? की मलाच तसा दिसतोय>>>> मलाही दिसतोय!
डाताची रेसिपी धन्य आहे.दातात आलेले जिरे आवडत नसल्याने भा.जिरेपूड घातली जातेय.

तो फिकट गुलाबी रंग कसा आलाय? की मलाच तसा दिसतोय>>>> मलाही दिसतोय! लिहिण्याची शैली झकास आहे.
डाताची रेसिपी धन्य आहे.दातात आलेले जिरे आवडत नसल्याने भा.जिरेपूड घातली जातेय.

Lol
>>१. मिक्सर च्या juicer / jar मध्ये (again , जावा वाल्यानो हे jar म्हणजे भांडं बरं का, नाहीतर jar अपलोड कराल ) दही, काळं मीठ, पाणी घाला.>>
स्टेप १ मधे दुरुस्ती करा हो किल्ली ताई. मिक्सरच्या जारला झाकण लावा हे राहिलं.
आणि स्टेप ३ मधे दुरुस्ती लोणी जमा झाले की मिक्सरच्या जारचे झाकण उघडा

बाकी डालगोना ताक मस्त दिसतयं! लहानपणी आई ताक केलेकी लगेच छोट्या पेल्यात ताजे ताक, त्यावर लोणी घालून देत असे ते आठवले.

मस्त! पण खरंच तो गुलाबी रंग कसला आहे?>>> तो आमच्या रेसीपीतील ताकाचा फोटू नाही.
आंतरजालावरून सांबार ..... ओह ! साभार>>>>
Happy

आम्ही पण अस्संच डालगोना ताक बनवतो बरं का! आणि कुशल व्यक्ती क्र. 1,2,3 आम्हीच असल्याने फोटो बिटो न काढता गूपचुप पिऊन टाकतो. तर आमची ही सिक्रेट रेसिपी मायबोलीजाहीर केल्याने आता फोटो काढावा लागेल. Wink
मस्तच लिहिलंयस किल्ली.

Pages