काकडी - पोहे

Submitted by योकु on 23 April, 2020 - 17:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सध्या सगळे जण घरी असाल लॉकडाऊन मुळे! काळजी घेत असालच. स्टे सेफ Happy
तर काहीतरी वेगळा प्रकार म्हणून रुचिरा मध्ये दिलेले हे काकडी पोहे करून पाहीलेत. चवीला अतिशय सुरेख आणि कमी सामानात चविष्ट प्रकार होतो. काही जिन्नस नव्हते ते वगळून तर त्याबदल्यात काही दुसरं घालून जमवले आहेत. नक्की करून पाहा.

२ मध्यम मोठ्या काकड्या
ओंजळ भर + जरा वर जाडे पोहे
थोडं सुकं खोबरं
२ हिरव्या मिरच्या (कमी तिखट व्हेरायटी)
२ चमचे तेल
मोठी चिमटीभर मोहोरी
चिमटीभर हिंग
साखर, मीठ चवीनुसार
अर्ध्या लिंबाचा रस

क्रमवार पाककृती: 

काकड्या स्वच्छ धूवून शेंडा बुडखा काढून सोलून जाड जाड किसाव्या (काकडी पिळून पाणी काढून टाकायचं नाहीय)
सुकं खोबरं ही असंच जाडं भरडं किसून घ्यायचंय. हा कीस २-३ टेबली चमचे तरी व्हायला हवा.
पोहे चाळून धूवून घ्यावेत.
मिरच्या धूवून, डेखं काढून आवडेल तश्या जाड/बारीक चिरून घ्याव्यात
पोह्यांतलं पाणी संपूर्णपणे निथळलं की काकडीचा कीस, खोबरं आणि पोहे एकत्र कालवून १५ मिनिटं तरी ठेवून द्यावे.

एका लहान कढल्यात २ चमचे तेल गरम करून मोहोरी तडतडू द्यावी आणि मग यात मिरची आणि हिंग घालून काही सेकंद होऊ द्यावं. ही चरचरीत फोडणी कालवलेल्या पोह्यांवर ओतावी आणि साखर, मीठ, लिंबाचा रस घालून मस्तपैकी कालवून हे फिकट हिरव्या रंगाचे पोहे खायला घ्यावेत.

thumbnail_IMG_0244.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोन लोकांकरता ब्रेफा किंवा संध्याकाळचं काही खायला म्हणून
अधिक टिपा: 

- मूळ कृतीत ओलं खोबरं आणि त्याशिवाय कोथिंबीर, डाळ्यांचं कूट इ. आहेत. हो आणि पोहे स्पेसिफाय केलेले नाहीत सो ते पातळ पोहे असावेत, मी इथे नेहेमीचे फोडणीच्या पोह्यांना वापरतो ते जाड पोहे वापरले आहेत
- पोहे कालवल्यानंतर काही वेळ ठेवून देणे आवश्यक आहेत, यामुळे मस्त मॉईस्ट होतात काकडीच्या सुटलेल्या पाण्यानी आणि अर्थात चवही येते.
- माझ्यामते जरा किसलेलं आलंही यात चांगलं लागेल
- फोडणीत कुटाची मिरचीही चांगली लागेल बहुधा
- पातळ पोहे वापरणार असाल तर ते आधी धूवून घ्यायची आवश्यकता नाही (मूळ कृतीत पोहे धूवून वापरलेले नाहीत)
- गरमीच्या दिवसांत काही खावंसं वाटत नाही त्यावेळी हा पदार्थ खाल्या जाईल असा आहे. जरा गार करूनही छान लागेल.

माहितीचा स्रोत: 
रुचिरा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यादिवशी खोबरं किसायचा कंटाळा केला अन जरा वाटीत असलेलं भाजक्या दाण्यांचं कूट होतं (एखाद दोन टीस्पून असेल) ते दिलं ढकलून यात. तेही व्हेरीएशन मस्त लागलं. वर केश्वी म्हणालीय त्याप्रमाणे खमंग काकडी वरून आयड्या ढापली मग...

IMG20200506215540 (1).jpg

ओट्स, काकडी खिस, थोडे ताक, मीठ.. सगळे एकत्र करून भिजवले.. वरून मोहरी जिरे मेथी कडीपत्ता हिंग शेंगदाणे हिरवी मिरची फोडणी

कच्च खायचं नाही इज पॅनिक लॉजिक Happy
भाज्या /फळं स्वच्छ धुणे, सालं काढून खाणे हा कॉमन सेन्स आहे/ सेफ आहे.
आमच्या घरी आईच्या दडप्या पोह्यांमधे कच्ची काकडी, कान्दा, कोथिंबिर, टोमॅटो, नारळ, पापड हे मस्ट असते.

असो, तर दहीबुत्तीसारखे दहीपोहे ऑप्शन पण उन्हाळ्यात फार आवडत मला .
दही पोहे, त्यात किसलेलं अ‍ॅपल , आलं आणि काकडी, वरून कढीपत्ता मिर्ची हिंगाची फोडणी, तेलात परतलेले दाणे असं काँबो भारी लागतं, बरोबर लिंबाचं लिंवा कुठलही आवडतं लोणचं.

योकू तुम्ही 1 2 दिवसा पूर्वी हिरव्या वाटणा संबंधी काहीतरी टीप दिली होती,वाटण करताना xxxx घातल्यास वाटनाचा रंग हिरवागार आणि टेक्सचर पण छान राहते असे,तर तो xxxx पदार्थ कोणता ते मी विसरले आहे Lol
Plz सांगा

रणवीर ब्रार च्या रेस्पीज मध्ये बर्‍याच टीप्स मिळाल्यात त्यातली ही एक आजकाल नेहेमी वापरतो.
कुठलंही ओलं वाटण करताना त्यात ३-४ आईस क्युब्ज घालाव्यात आणि मग पुढे वाटण वाटावं. वाटणाचा पोत, रंग आणि सुवास इनटॅक्ट राहातो. मिक्सरच्या फिरण्यानी जी हीट जनरेट होते ती बर्फानी मिनिमाईज होते. स्पेशली हिरवे वाटणं मस्त हिरवेगारच राहातात.>>>>>>>>>> हे का आदू? युक्ती सुचवा च्या ५ व्या भागात आहे

Pages