घोळ भाजीचा तवा-झुणका

Submitted by प्रमोद् ताम्बे on 23 April, 2020 - 02:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य : ओंजळ भरून घोळची भाजी,अर्धी वाटी बेसनाचे पीठ,चवीनुसार मीठ,लाल मिरचीचे तिखट, अर्ध्याचमचा जिरेपूड ,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ,चार लसणाच्या पाकळ्या, दोन डाव तेल,फोडणीसाठी मोहरी,जिरे, हिंग,चिमूटभर हळद.

क्रमवार पाककृती: 

घोळची भाजी स्वच्छ धुवून घ्या व मग पाने निवडून घ्या. दुसरीकदे भज्यासाठी भिजवतो तसे बेसन पीठ भिजवून घ्या.
आता गॅसवर तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर फोडणीसाठी तेल तापायला घालून ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी व जिरे घालून छान तडतडले की हळद,हिंग ,लसूण ,चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या. मग त्यात घोळ च्या भाजीची पाने घालून चांगले परता, आता त्यावर भज्याचे भिजवून ठेवलेले पीठ घालून उलथण्याने मिक्स करून घेऊन नंतर झुणक्याची खरपुडी होईपर्यंत परता.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्ति
अधिक टिपा: 

हा खमंग झोळ भाजीचा तवा झुणका पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

माहितीचा स्रोत: 
स्वतः
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults