साहित्य : ओंजळ भरून घोळची भाजी,अर्धी वाटी बेसनाचे पीठ,चवीनुसार मीठ,लाल मिरचीचे तिखट, अर्ध्याचमचा जिरेपूड ,थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ,चार लसणाच्या पाकळ्या, दोन डाव तेल,फोडणीसाठी मोहरी,जिरे, हिंग,चिमूटभर हळद.
घोळची भाजी स्वच्छ धुवून घ्या व मग पाने निवडून घ्या. दुसरीकदे भज्यासाठी भिजवतो तसे बेसन पीठ भिजवून घ्या.
आता गॅसवर तवा तापत ठेवा. तवा तापला की त्यावर फोडणीसाठी तेल तापायला घालून ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी व जिरे घालून छान तडतडले की हळद,हिंग ,लसूण ,चिरलेली कोथिंबीर घालून परतून घ्या. मग त्यात घोळ च्या भाजीची पाने घालून चांगले परता, आता त्यावर भज्याचे भिजवून ठेवलेले पीठ घालून उलथण्याने मिक्स करून घेऊन नंतर झुणक्याची खरपुडी होईपर्यंत परता.
हा खमंग झोळ भाजीचा तवा झुणका पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.
घोळाची भाजी फार गुणकारी असते
घोळाची भाजी फार गुणकारी असते म्हणतात. मिळाली तर असा झुणका नक्की करून पाहीन.
छान . आम्ही याला घोळ भाजीचं
छान . आम्ही याला घोळ भाजीचं बेसन म्हणतो.
खुप दिवस झाले करून . इथे
खुप दिवस झाले करून . इथे समरमध्ये मिळते. आता करुन बघेन.
मला ही भाजीच माहीत नाही.
मला ही भाजीच माहीत नाही. पाककृती टेस्टी वाटते.
मी नक्की करनार
मी नक्की करनार
https://www.google.com/search