कलिंगडाचे घावन

Submitted by TI on 23 April, 2020 - 00:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कलिंगडाचा गर-एक ते दिड वाटी-अंदाजे घेते.
तांदूळ २ वाट्या
गूळ चवीप्रमाणे/ आवडीप्रमाणे - साधारण पाव वाटी/ ४ चमचे
मीठ चिमूटभर
तूप किंवा नारळाचे दूध serving साठी

क्रमवार पाककृती: 

वरील वेळात रात्रभर/ ८-९ तास भिजवण्याचा वेळ धरला नाहीए!
कलिंगडाचा पांढरा गर किसून घ्यायचा. आता २ वाट्या तांदूळ धुवून १० मिनिटे भिजवून ठेवायचा. १० मिनिटांनी तांदळातले सगळे पाणी निथळून कलिंगडाचा किस त्यात मिक्स करायचा. हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचे. छान भिजलेल्या ह्या मिश्रणात बेताचा गूळ आणि चिमूटभर मीठ घालावं.
मिक्सर मध्ये छान गुळगुळीत वाटून घ्यावं. मिश्रण जास्त वाटावं लागतं.
तयार मिश्रण ५-१० मिनिटे झाकून ठेवावं.
नॉन-स्टिक पॅन वर सुरेख जाळीदार घावन तयार होतात.

वाढणी/प्रमाण: 
आवडी प्रमाणे
अधिक टिपा: 

हे घावन गरम गरमच छान लागतात. पटापट करून लागलीच संपवायचे. नारळाच्या दुधात थोडा गुल आणि वेलची पूड घालून त्यासोबत serve केल्यास अप्रतिम लागतात, ते शक्य नसल्यास साजूक तुपासोबत खावे!
वरील माप २-३ जणांसाठी पुरेल.
watermelon ghavan2.jpg

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे वा सोपी आहे पाकृ! काल दहा दिवसांवी भाजी फळे मिळाली. सिझनमधलं पहिल कलिंगड मिळालंय ... आज कापीन तर नक्की करीन पण गोड नाही करणार तिखट करीन.... गोडाचा कंटाळा आलाय. मागच्या आठवड्यात एक किलो ला.भो मिळाला त्याचे घारगे झाले. भाजी नव्ती म्हणून काल गाकर झाले त्याचे थोडे चुर्म्याचे लाडू केले. हे तिखट करून पाहीन. जिरे तीळ ओवा, हि.मिरची घालून. त्याच्या बरोबर उसळ चांगली लागेल ना ?

हे गोड आहेत. ह्यांनाच धोड्डप असे काहीसे म्हणतात का? की यातल्या तिखट्या प्रकाराला? तीन चार वर्षांपूर्वी मिसळपाव आणि ऐसी वर कलिंगडाच्या सफेद गराच्या उत्तप्प्याची एक पाकृ आली होती. तिचे नाव असेच काहीसे होते. वेगळी चव म्हणून बरी वाटली होती. काकडीची चव येते ह्या प्रकाराला.

हे तिखट करून पाहीन. जिरे तीळ ओवा, हि.मिरची घालून. त्याच्या बरोबर उसळ चांगली लागेल ना ? ho he pan chan lagel, mala goad bhayanak awadta tyamule me goad ch karte nehmi Happy
@Hira, naav mahiti nahi,c kadachit aselhi dhoddap- काकडीची चव येते ह्या प्रकाराला>>+11 hoo agdi, pan kakdiche hi karte me ase ghavan goad kiva titkhat, chavit badal mhanun changla lagta!
@ shailaja- Thank you for sharing this recipe, me naral navhta mhnun naral nahi ghatla ani aai naralachya dudha brbr serve karte, pan me aaj tupasobat khalle, next time naral watun ghlte

Unfortunately mazya sasri konalahi awadle nahit, pan on a brighter side mala ektila chopta ale! Lol next time me titkhat karnar ahe Happy

मीही तिखटाचे केले होते गेल्या आठवड्यात.
पण रात्रभर भिजवलं नव्हतं. पांढरा भाग किसून त्यातच तांदुळाचं पीठ आणि लसूण कोथिंबीर मिरच्या वाटून घातल्या. एक अंडंही फेटून घातलं. छान झाले होते.
हेही छान वाटतायत. तांदुळाचे गोड घावन आवडतात.