फर्रर्रर्र करून दीप्ती च्या स्कूटी ने स्पीड घेतला आणि आशुतोष मागे पडता पडता वाचला.
“ ए थांब थांब “ म्हणून आशु ने दीप्ती ला घट्ट पकडले.
“ हा हा हा हो हो हो ..” दीप्ती चे खिदळणे ऐकून आशु अजूनच चिडला.
“ बर आहे US ला टू व्हीलर्स नसतात फार .. नाहीतर माझ अवघड होतं “
“ डू नॉट वरी डार्लिंग मी फोर व्हीलर मधून सुद्धा तुला पाडू शकते ..”
“ फार उड्या मारू नकोस .. अजून तुला घरून क्लिअरन्स मिळाला नाहीये ..”
“ वोह काम तो प्रीतस् ने ऑलरेडी कर लिया होगा जानेमन! अब दुनिया की कोई ताकत मुझे तुमहारे साथ एमआयटी जानेसे रोक नाही सकती ! “ दीप्ति चा उत्साह दुथडी भरून वहात होता . त्याला कारण सुद्धा तसंच होतं. एमआयटी सारख्या यूनिवर्सिटी मध्ये पूर्ण स्कॉलरशिप बरोबर मास्टर्स करण्याची संधी आणि ती सुद्धा आशु बरोबर. जिंदगी से और कया चाहिये असं दीप्ती ला वाटतं तर ते काही गैर नव्हतं. ती आणि आशुतोष हाय स्कूल स्वीटहार्टस होते. केजी पासून इंजीनीरिंग पर्यन्त एकत्र अभ्यास आणि भांडणे करता करता प्रेमात सुद्धा पडले. त्यांच्या पप्पी(puppy ) लव ची दोघांच्या ही घरच्यांना पूर्ण कल्पना होती आणि मूक संमती सुद्धा. दोघे ही हुशार गुणी आणि सारख्या कौटुंबिक पार्श्वभूमीतले. दादर च्या हिंदू कॉलॉनी मध्ये लहानाचे मोठे झालेले. परंतु त्यांचा एमएस चा प्लान अजून घरचयनपर्यंत पोहोचलेला नव्हता. आशु घरी डायरेक्ट आणि दीप्ती प्रीती च्या थ्रू गौप्यस्फोट करणार होते.
प्रीती दीप्ती ची मोठी बहीण. वयात 3 च वर्षांचे अंतर असले तरी दोघी 180 अंश वेगळ्या!
प्रीती शांत मनमिळावू गृहयकृत्यादक्ष आणि कलाकार .. एकदम “वाईफ मटेरियल “ तर दीप्ती दीक्षित उर्फ डीडी म्हणजे साक्षात टॉमबॉय . खटपटी चंचल वेंधळी आणि एकदम बिनधास्त. दोन्ही पाय खाली सोडून हॉर्न बडवत मुंबई च्या गजबजलेल्या रस्त्यांवरून स्कूटी हाणणारी! दिसायलाही दोघी वेगळ्याच होत्या. प्रीती ने सुषमा ताईंचे घारे डोळे गालांवरच्या खळ्या लांब सडक केस आणि गोरापान वर्ण बरोब्बर उचलला होता तर दीप्ती म्हणजे सुरेश दीक्षितांची कार्बन कॉपी! नाकी डोळी नीटस पण कायम अवतारात वावरणारी! जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून आर्किटेक्ट होऊन प्रीती एका मोठ्या आर्किटेक्चर फर्म मध्ये जॉइन झाली आणि वर्षभरातच भरत ने तिला मागणी सुद्धा घातली. दीप्ती इंजीनीरिंग च्या 2 रया वर्षाला असताना प्रीती आणि भरत चे लग्न झाले. आणि बरोब्बर 3 वर्षांनंतर आदित्य चा जन्म!
कोणत्या ही टिपिकल मावशी भाच्या प्रमाणेच डीडी आणि आदी ची गट्टी होती. त्याचा डायपर बदलणे आणि त्याला जेऊ घालणे एवढे सोडून दीप्ती त्याचं सगळं (म्हणजे फक्त मस्ती) करायची. त्या दिवशी सुद्धा दीप्ती ल कधी एकदा घरी जाऊन आदी ला करकचून आवळून त्याच्या पाप्या घेते असं झालं होतं.
घराजवळ च्या गल्लीत वळल्यावर दीप्ती आणि आशु चक्रावले. दीप्ति च्या घरासमोर लोकांची गर्दी जमली होती. अस्वस्थ शांतता आणि दीप्ती ला पाहून कावरे बावरे झालेले शेजारी बघून दीप्ती चरकलीच. गर्दीतून वाट काढत वेगाने ती दारांपर्यंत पोचली आणि आतले दृश्य बघून तिच्या हातातले “एमआयटी कडून आलेले Invitation Letter तिच्या पायातल्या त्राणा सारखेच गळून पडले...
****************************************************************************************************************************************
गाडी चा ऑटोकॉप परत दाबून दीप्ति ने गाडी बंद झाल्या ची खात्री केली आणि जड लॅपटॉप बाग सांभाळत तिने दारावर हळूच टकटक केली. गाडी चा आवाज ऐकून सुषमा ताईंनी हलकेच दार उघडले. अलगद आत येऊन दीप्तीने सोफ्या वर अंग टाकले.
“ कधी झोपला?” पाण्या चा ग्लास घेऊन आलेल्या सुषमा ताईंना दीप्ति ने विचारले
“ झाला तासभर. तुझी वाट बघून रडून झोपला बिचारा. आज खूप काम होतं का? “ दीप्ती च्या केसांवरून हात फिरवत सुषमा ताईंनी विचारलं.
“ हम्म.. नेहमीचच ते.. वेगळ काय त्यात..” म्हणत सुषमा ताईंचा हात डोक्या वरून हळूच काढून ताकत दीप्ती जागची उठली. तिचं ते माये च्या स्पर्शl ला टाळणे जाणवून सुषमा ताई कळवळल्या. जबरदस्ती मिठी मारून मुके घेणारी, हक्काने मांडीवर डोकं ठेवून झोपणारी दीप्ती हीच का असं त्यांना क्षणभर वाटून गेलं.
“ बाबांचा आजचा काय अपडेट?” टेबला वरची आलेली पत्र एकीकडे चाळत दीप्ती ने विचारले. तटस्थ पणे. एखाद्या प्रोजेक्ट चा अपडेट विचारावा तसं.
“ स्टेटस को. “ तिच्या च शब्दांत उत्तर देत सुषमा ताई उठल्या “ टेबल वर जेवणार आहेस की लॅपटॉप समोर बसून ? “ त्यांनी तुटक पणे विचारले.
“टेबल वर आणि लॅपटॉप समोर बसून. आज एक महत्त्वाचा रिपोर्ट पूर्ण करायचाय मला. मी फ्रेश होऊन येते.”
सुषमाताई दुखावल्या गेल्या आहेत असं दीप्तीलl जाणवलं
“ तू पण काहीतरी घे ना माझ्या बरोबर .. मिडनाइट कॉफी? “ तिने सारवासारव केली
“ हम्म..” किचन मध्ये जाणारा सुषमा ताईंचा आवाज विरत गेला
...
“ काय वाचते आहेस? “ जेवण संपवून दीप्ती पुन्हा लॅपटॉप वर काम करू लागली आणि स्वयंपाकघर आवरून सुषमा ताई पुन्हा पुस्तकात शिरल्या.
“ जॉर्ज ऑरवेल च रोड टु विगन पीएर मिळाल होतं लायब्ररी मध्ये “ जॉर्ज ऑरवेल सुषमा ताईंचा लाडका लेखक.
“ अररे वा! गुड ओल्ड ऑरवेल! पुन्हा वाचताना कसं वाटतंय? “ दीप्ति च्या लक्षात असलेलं बघून सुषमा ताईंची कळी खुलली.
“ BA च्या माझ्या शेवटच्या बॅच ला शिकवल्यावर आज वाचते आहे. खूप वर्षांनी एखादा मित्र भेटावा असं वाटतंय! किंवा जुना फोटो एल्बम पुन्हा पाहत असल्या सारखं..”
सुषमा ताई म्हणाल्या आणि अचानक दोघी ही स्तब्ध झाल्या. नेहमी प्रमाणेच.
कोणत्याही विषयाचा शेवट त्या अनघड स्तब्धतेतच व्हायचा. रस्त्या वरून चालणारी गाडी अचानक पुढे आलेल्या कड्यामुळे गचकन थांबावी तसे. सुरांची बरसात करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सतारीच्या तारा भर मैफलीत भंगाव्या तसे. सुजलेल्या डोळ्यांनी गाढ झोपी गेलेल्या आदी च्या निरागासतेत वसणाऱ्या वेदानेसारखीच स्तब्धता.
****************************************************************************************************************************************
“ ..धिस इज अॅब्सल्यूट्ली रेडीक्यूलस ..” पुटपुटत दीप्ति conferenceरूम मधून बाहेर आली आणि आपल्या केबिन मध्ये येऊन 2 घोट पाणी प्यायल्यावर शांत झाली.
2 महीने मेहनत घेऊन बनवलेली मार्केटिंग स्ट्रॅटजी यश म्हात्रे ने डायरेक्ट रीजेक्ट केली. “ म्हणे ओल्ड स्कूल आहे... ह्याला काय माहीत आहे इंडियन कॉँसुमर्स बद्दल? लंडन बिझनेस स्कूल मधून आला म्हणजे त्याला इंडियन मार्केट ची पल्स इतक्या लगेच कळली काय? UK ची स्ट्रॅटजी इंडिया मध्ये कशी काम करेल? Such a show off! आणी ओल्ड मॅन म्हात्रे लागले लगेच नातवाच्या तालावर नाचायला. शेवटी bloody blood is thicker than water ..” विचारांच्या नादात दीप्ति ने नवीन रीपोर्ट वर काम सुरू करण्यासाठी लॅपटॉप उघडला आणि इनबॉक्स मध्ये आलेला मेल बघून तिच्या पोटात एकदम गोळा आला. आशु इंडिया ला आला होता आणि त्याला दीप्ती ला भेटायचं होतं. ‘शनिवार ला 4 वाजता कॉफी ला भेटू. सेम प्लेस’ म्हणून दीप्ति ने रीप्लाय केला. तब्बल 4 वर्षांनंतर त्याला भेटायला कसं वाटेल? दीप्ति ला जॉर्ज ऑरवेल ची आठवण झाली. गुड ओल्ड जॉर्ज ऑरवेल. गुड ओल्ड आशुतोष पाटणकर.
****************************************************************************************************************************************
आशू ने दीप्ती चा हात घट्ट पकडला. समोर चं दृश्य बघून तो ही हबकलाच होता. सुषमाकाकू सोफ्या वर बसून रडत होत्या आणि सुरेश काका चक्क जमिनीवर डोक्या ला हात लावून बसले होते.
“.. क-काय झालं काकू ? कुणी काही सांगेल का प्लीज? “.. आशु कळकळीने म्हणाला
दीप्ति अजूनही धककयातच होती.
“ .. खाली बस दीप्ती ..” शेजारचे दामले काका दीप्ती ला म्हणाले..
“प्रीती आणि भरत नाशिक वरून येताना त्यांचा अॅक्सिडेंट झालाय ..”
“ आणी??? .. प्लीज काका ? “.. आशु ओरडला
“.. प्रीती आणि भरत ऑन द स्पॉट गेलेत ..”
पुढचं दीप्ती ला काही ऐकूच गेलं नाही..” पोस्ट्मॉर्टेम...पोलिस .. भरत चे आई वडील ..अंत्यसंस्कार .. बिचारा आदित्य”
दीप्ति ने चमकून बघितलं. बिचारा आदित्य. वयाच्या 8व्या महिन्यात पोरका झालेला आदित्य. तिचा लाडका आदित्य. आणि तिचे अश्रू आतल्या आत गोठून गेले. बहुतेक कायमचेच.
घरात येणाऱ्या लोकांच्या पायाखाली तिचं एमआयटी चं invitation letter केव्हाच चुरडून गेलं होतं..
****************************************************************************************************************************************
शनिवारी बरोब्बर ४ वाजता दीप्ती जिप्सी मध्ये शिरली. आशु आधीच टेबल धरून बसला होता. त्यांचं नेहमी चं टेबल. दीप्ति ला बघून त्याने हाताने इशारा केला. क्षणभर टी दारातच रेंगाळली. ४ वर्षांनंतर ती इथे येत होती. आशू समोर बसल्या नंतर दोघांनी एकमेकांना एक अवघडलेलं स्माइल दिलं.
“.. हे ..”
“.. हाय ..
“ लॉन्ग टाइम.. कशी आहेस?”
“ अप अँड रनिंग ..” दीप्ती चा पेटंट डायलॉग कितीतरी वर्षांनी त्याने ऐकलं
“.. तू?..”
“ .. डाउन अँड आउट ..”
दोघांच्याही चेहऱ्यावर आपले जुने डायलॉगस् ऐकून हलकेच स्मित उमटलं.
“ कधी आलास? “
“ परवा “
“ कधी परत जाणारेस? “
“ पुढल्या महिन्यात”
... दोघांनाही पुढे काय बोलायचं ते न सुचल्याने एक ऑकवर्ड पॉझ
“ कॉफी?” आशुतोष ने वेटर ला खूण केली
“ ब्लॅक. नो शुगर नो मिल्क “ दीप्ति ने आपली ऑर्डर दिली
“ अँड सम गोभी मंचुरियन मॅडम? “ वेटर ने त्या दोघांना बरोब्बर ओळखले होते.
“.. नो थॅंक्स. आय आम फाइन. “ दीप्ती हसत म्हणाली. वातावरणातला ताण जरा निवळला.
“.. बोल ?”
“ म्हणजे?” आशुतोष ने आश्चर्याने विचारले
“ काहीतरी सांगायला इथे बोलवलेस ना मला?”..
आशुतोष एकदम गंभीर झाला
“ तेवढी ओळखते मी तुला आशु.. आशु म्हटलं तर चालेल ना?”
“.. ऑफ कोर्स ..”
“मग ?”
“ मी लग्न करतोय ..”
“ कॉंगरॅज्युलेशन्स ..” काहीच झालं नाहीये इतक्या शांतपणे दीप्ति ने कॉफी चा घोट घेतला
“ तुला काहीच वाटत नाही का?”
“ मला काय वाटायचय... we broke up 4 years ago right?”
“...तू किती बदलली आहेस डीडी ..”
“.. लाइक आय हॅड अ चॉइस ”
“…येस यू डिड .. टु कम विथ मी ”
“डोन्ट यू स्टार्ट अगेन. इट वॉज ओवर देन अँड देअर.” दीप्ती चा आवाज किंचित चढलेला पाहून दोघेही पुन्हा गप्प झाले
“ सो हू इज द लकी गर्ल? “
“ लाइक यू केअर ..”
“ तू माझ्या शी भांडायला मला इथे बोलावलं आहेस का?”
“ नाही.. तुझा निरोप घ्यायला ..” आशु च्या डोळ्यातलं पाणी दीप्तीने न दिसल्या सारखं केलं
“ निरोप तर तू कधीच घेतला आहेस आशु...”
“ म्हणजे सगळा दोष माझा आहे की आपलं नातं तुटलं ?”
“ इथे आपण कोणीच दोषी नाहीओत. हा आपल्या आपल्या चॉइस चा प्रश्न आहे. तू निघून जाण्या चा निर्णय घेतलास आणि मी इथे राहण्याचा. दॅट इज ऑल ”
“ यू हॅव नो आयडिया हाऊ डिफिकल्ट इट वॉज फॉर मी ..” आशु घुसमटून म्हणाला
“ असेल.. पण मी तुझ्या साठी प्रायोरिटी नव्हते .. अजूनही नाहीये..”
“ मी होतो प्रायोरिटी तुझ्या साठी? तू कुठे सोडलंस तुझ्या फॅमिली ला माझ्या साठी? “
“ तू काय बोलतो आहेस तुला तरी कळतय का? कसं सोडणार होते मी त्यांना आशु? सांग ना ? कसं? प्रीती च्या जाण्या च्या तिसऱ्या दिवशी बाबा ला paralysis चा अटॅक आला. आदी ला सांभाळायला भरत च्या भावाने नकार दिला. कोणाच्या जिवावर सोडणार होते मी त्यांना? हेच जर तुझ्या बाबतीत घडलं असतं तर तू गेला असतास US ला? आणी मला जाऊ दिलं असतस? बोल ?
“ फोरगेट इट ..तुला तेव्हा ही कळलं नव्हतं आणि आत्ता ही कळणार नाही... गुडबाय आशु..आय विश यू ऑल द बेस्ट ऑफ लाइफ अँड लव “
बिला चे पैसे टेबल वर ठेऊन दीप्ती झपाझप जिप्सी च्या बाहेर आली. एकदाही मागे वळून न पाहता
****************************************************************************************************************************************
“.. काय म्हणाला आशु?” सुषमा ताईंनी आशेने विचारलं
“ लग्नाची पत्रिका दिली स्वतःच्या. जायचं का तुला? “
“ दीप्ति..”
“ आई चिल . मला काही फरक पडत नाही. माझ्या कडे आशु पेक्षा हॅंडसम हंक आहे.. हो ना डूड ? “ कडेवरच्या आदी ची पापी घेत दीप्ती नी विषय बदलला.
“ तू काय ठरवलं आहेस?”
“ कसलं ?”
“ लग्नाचं ?”
“कुणाच्या ? अगं आदि खूप छोटा आहे अजून “
“ मुद्दाम विषय टाळू नकोस “
“ मग काय करू? मी तुला किती वेळा सांगितले मला लग्न करायचं नाहीये म्हणून?”
“ पण..”
“ आई ह्या विषयावर मला बोलायचं नाहीये ...मी आणि आदी चौपाटी ला चाललोय जेवायच्या वेळेपर्यन्त परत येऊ ”
||१ ||
क्रमशः
[ही कथा मुंबई च्या पार्श्वभूमी वर घडत असल्याने मराठी ही इंग्रजी युक्त आहे . चूक भूल माफ करावी]२
देणं - भाग २
https://www.maayboli.com/node/73881
छान. वेगवान कथा आणि
छान. वेगवान कथा आणि उत्कंठावर्धक. पुभाप्र
आवडली.. मस्त..
आवडली.. मस्त..
छान आहे कथा.. कथेच्या ओघात
छान आहे कथा.. कथेच्या ओघात येणारं इंग्रजी खटकत नाहीये अजिबात!
मस्त सुरुवात. आवडली. येऊ देत
मस्त सुरुवात. आवडली. येऊ देत अजून
छान. वेगवान कथा आणि
छान. वेगवान कथा आणि उत्कंठावर्धक. पुभाप्र>>>>+1111
छान कथा. पुढचे भाग लवकर टाका.
छान कथा. पुढचे भाग लवकर टाका.
पण खरं तर ही एवढीही कथा पूर्ण असल्यासारखीच आहे.
छान!"छान आहे कथा.. कथेच्या
छान!
"छान आहे कथा.. कथेच्या ओघात येणारं इंग्रजी खटकत नाहीये अजिबात!"
अगदी अस्संच म्हणायचं होतं.
छान चाललेय कथा.
छान चाललेय कथा.
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद बघून
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद बघून खूप उत्साह आला. ही माझी पहिलीच कथा आहे मायबोली वर . मायबोलिकरांना खूश करण पुण्यात मैफिलीत टाळी घेण्यासारखच असतं असं म्हणतात .
पुढचा भाग टाकते आहे.
लोभ असू द्यावा ही विनंती !
दुसऱ्या भागांची लिंक
दुसऱ्या भागांची लिंक खालीलप्रमाणे :-
https://www.maayboli.com/node/73881
ही पहिल्या भागाला कनेक्ट कशी करू? प्लीज हेल्प!
आत्ताच ही कथा वाचायला सुरुवात
आत्ताच ही कथा वाचायला सुरुवात केलीय. पहिला भाग आवडला. उच्चमध्यमवर्गीय मुंबई शहराची भाषा चपखल पकडलीय.
उत्कंठावर्धक.