मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलीकडेच एका धाग्यात लेखिकेने जंगलाचे आवाज रेकॉर्ड करण्याच्या कामाबद्दल लिहिलं होतं. पण धाग्याचा मूळ विषय तो नव्हता/नसावा. कुणाला आठवतोय का तो धागा?

एकाला पिक्चर बनवायचा आहे.
चेटूक + ब्लॅक मॅजिक + थरार अशी कथा पाहिजे.
किंवा तसे बदल करायची तयारी पाहिजे.

LA ऑलिम्पिक २ ० २ ८ तिकीट विक्रीचा एक धागा होता तो सापडत नाहीये. कोणी लिंक देऊ शकेल का ?

एक चिनी की कोरियन फार सुंदर कवितेबद्दल लिहिलेलं होतं. ज्यात कवी म्हणत असतो तुला शांत झोप लागावी म्हणून वार्‍याला सांगेन सळसळ बंद कर.. पाण्याला सांगेन जास्त खळखळ करू नकोस... उंदरांची खळबळ तुला ऐकू येऊ नये म्हणून.. अस काहीस होतं... आणि शेवटी होत कवी त्याच्या प्रिय या जगातून गेलेल्या व्यक्तीसाठी जी कबरीत आहे, तिच्यासाठी लिहीत होता.... तर मी कविता खूप शोधली मला सापडतच नाहिये. कोणाला सापडली तर कळवा ना please

>>>>>एक चिनी की कोरियन फार सुंदर कवितेबद्दल लिहिलेलं होतं. ज्यात कवी म्हणत असतो तुला शांत झोप लागावी म्हणून वार्‍याला सांगेन सळसळ बंद कर.. पाण्याला सांगेन जास्त खळखळ करू नकोस... उंदरांची खळबळ तुला ऐकू येऊ नये म्हणून.. अस काहीस होतं... आणि शेवटी होत कवी त्याच्या प्रिय या जगातून गेलेल्या व्यक्तीसाठी जी कबरीत आहे, तिच्यासाठी लिहीत होता....

होय आठवतेय मला अश्या आशयाची कविता. सापडली तर देते.

Submitted by ऋतुराज. on 10 August, 2026 - 13:07
>> धन्यवाद ऋतुराज! हाच तो धागा. यासंबंधी एक बातमी वाचनात आली होती. त्यामुळे आठवण झाली होती. त्या धाग्यावर लिहिते.

एकाला पिक्चर बनवायचा आहे.
चेटूक + ब्लॅक मॅजिक + थरार अशी कथा पाहिजे.
किंवा तसे बदल करायची तयारी पाहिजे. >>> Please connect to बोकलत!!

आशु२९ , करप्रणाली सतत बदलत असते. मायबोलीवर अद्यावत माहिती मिळेल असा धागा नाही.
हा एक धागा आहे. https://www.maayboli.com/node/39537. त्यावर शेवटची पोस्ट २०२३ ची आहे.
AI चांगले शंकानिरसन करतो, असा माझा अनुभव आहे. आयकर खात्याच्या संकेतस्थळावरही पाहता येईल. पण कायद्याची भाषा , कलम , पोटकलम, सगळ्यांनाच समजेल असं नाही.

किंवा वर दिलेल्या धाग्यावर तुमचा प्रश्न विचारून पहा.

Pages