केसांचे आरोग्य-१

Submitted by कमला on 15 March, 2020 - 03:38

केसांचे आरोग्य आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढत आहेत. पहिल्या धाग्याने 2000 चा टप्पा गाठला.यापुढील चर्चा इथे करा.
Hair treatments विषयक सल्ले, कोणाला कशाचा चांगला उपयोग झाला, इ. अनुभवांची देवाणघेवाण, पारंपरिक उपाय, निरनिराळी तेले,शांपू,कंडिशनर्स,सिरम, हेअर कलर्स ही आणि सर्व आनुशंगिक चर्चा इथे करता येईल.
आधीच्या धाग्याचा दुवा:
https://www.maayboli.com/node/2466

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उर्‍जीता जैन चे जास्व.न्द तेल , ओआर पी एल , नीम तेल लाऊन रात्री झोपायचे, सकाळी जास्वन्द जेल लावायचे, आणि कोणत्याही शॅम्पू ने धुवायचे, कन्डीशन करायचे. या उपायाने मी ह्य केस गळती त्रासातून बर्यापैकि मुक्त झालेय.
वीकली २ दा धुते, दर वेळी धुताना
जी काही थोडे गळतात, ते नॅचरल आहेत.

माझ्याकडून पण चिमूटभर.. जेवढे उपाय बाहेरन कराल त्यापेक्षा कैकपटीने आतून म्हणजेच पोटातून खाण्यातून करा.. जसे कि ओला नारळ खा.. भाज्यात घालून, मोड आलेल्या मेथीची भाजी खा(माबो रेसिपी आहे), पालेभाज्या, फळभाज्य, कडधान्य, चौरस आहार असू द्या. डाएट च्या नावाखाली तूप, गूळ, शेंगदाणे, तीळ, खजूर, दूध etc etc वगळू नका खाण्यातून.
माझा स्वअनुभव आहे, माझे केस अर्ध्या मांडी एवढे लांब होते, डिलिव्हरी नंतर 6 months नि कट केले खांद्या एवढे कापले.
आता तीन वर्ष होतील या ऑगस्ट मध्ये पुन्हा माझे केस कंबरे एवढे झालेत. पांढरे आहेत पण ते अनुवांशिक आहेत म्हणजे अगदी 12-13 वर्षाची असल्यापासून परंतु पोत आणि वाढ चांगली आहे.
शक्यतो hair ड्रायर टाळा, जास्त वेळा सेटिंग करत असाल तर फक्त कार्यक्रमा पुरता मर्यादित ठेवा.
अजून एक महत्वाची गोष्ट मी 80% पाळते ते म्हणजे, तेल लावल्याशिवाय केस धुवत नाही. आदल्या दिवशी लावला असेल तर उत्तमच, नाही जमले तर आधी एक तास लावा, चांगली चम्पी करा.
हो आणि मी मेहंदी लावते नुपूर, प्रेम दुल्हान, शेहनाज हुसेन च्या वापरले आहेत.

गहू दळतांना त्यात मूठभर मेथ्या व ३-४ मुठी राजगीरा घाला. रक्तवाढ व हिमोग्लोबीन साठी चाम्गले आहे.

Smoothening आणि स्ट्रेटनिंग मध्ये काय फरक आहे ? >>>> दोन्हीमध्ये केमिकल्स वापरतात, त्यामुळे दोन्ही वाईट, हे साम्य आहे.
फरक म्हणजे स्मूदनिंग मध्ये केमिकल्सने केस स्मूथ करतात, ज्यामुळे फ्रीझ आणि ड्रायनेस कमी होतो. अर्थातच smooth आणि soft झाल्यामुळे कर्ली केस सरळ दिसतात आणि केसांवर चमक येऊन हेल्दी 'दिसतात'.
स्ट्रेटनिंगचा उद्देशच केस सरळ करणे असल्याने केमिकल्सने रिबॉंडिंग करून कर्ली / वेव्ही केस पुर्णपणे सरळ करून देतात. जे पर्मनंट (म्हणजे केस परत वाढून नैसर्गिक कुरळ्या केसांची ग्रोथ होईपर्यंतच फक्त पर्मनंट. साधारण 4-6 महिने) किंवा टेम्पररी (केस धुवेपर्यंत साधारण आठवडाभर) स्ट्रेट करतात. ज्यांचे अगदी भस्स कुरळे केस असतील त्यांना बदल म्हणून स्ट्रेटनिंग करायला आवडतं, पण जर केसांना volume नसेल तर केस अगदीच पातळ आणि फ्लॅट दिसतात. केसांची टोकं अगदी खराट्याच्या कडीसारखी टोकदार आणि आर्टिफिशिअल दिसतात. बऱ्याच जणींना पार्टी किंवा ऑकेजन्सना स्ट्रेटनिंग आवडतं, ग्लॅमरस वाटतं. मला पर्सनली मेसी हेअर किंवा कर्ल्स आवडतात. त्याने थोडा वोल्युम ऍड झाल्यासारखा वाटतो. स्ट्रेटनिंगचा विचार करत असाल तर केस किती दाट / पातळ आहेत ते पाहूनच केलेलं चांगलं. नाही तर स्ट्रेटनिंग करून फ्लॅट लूक आणि विरळ पातळ केस नकोसे वाटले तरी नन्तर काही महिने काही करू शकत नाही.

धन्यवाद मीरा, माझे केस सरळच आहेत म्हणून पार्लरवलीने स्मूदनिंगचा पर्याय सुचवलाय . मी नंतर सांगेन अस म्हणून आलेय .

केसांच्या volume बद्दल मिरा यांना अनुमोदन.

पातळ विरळ सरळ केस खूप विचित्र दिसतात. छान जाड वेणी येते त्यांना बरे दिसतात स्ट्रेट केस. अन आपली चेहरापट्टी कशी आहे यावर ही अवलंबून आहे, प्रत्येकीला शोभत नाही.

अन ते खराटा तर खूपच बेक्कार दिसतात.

स्मूथनिंग म्हणाल तर त्यासाठी घरगुती उपाय वापरा जर शक्य असेल तर, छान चमक येते केसांना

जाई, केसांना चमक व सुळसुळीतपणा हवा असेल तर बाजारात वेगवेगळे हेअर मास्क आहेत ते वापरन बघ. त्यात थोडी कोरफड घालून अगदी एकेक बट घेऊन मालिश करायचे. अर्धा एक तास जातो हे करायला पण केस छान दिसतात, सतत केले तर परिणाम दीर्घकाळ राहतो. माझ्या ल
लेकीला मी करून दिले दोनदा. दुसऱ्या वेळेस खूप चांगला परिणाम दिसायला लागला.

Smothaning थोड्या काळापुरते टिकते. एकदा करून बघायचे. स्ट्रेटनिंग जास्त काळ टिकते. ज्यांचे केस दाट आहेत व एकेक केस जाड आहे त्यांना स्ट्रेटनिंग खूप छान शोभते. मूळ केस खूप कुरळे किंवा अनमॅनेजीबल असतील तर केस वाढायला लागले की डोक्यावर बोचके दिसते, भयंकर प्रकार Happy

काही जणींचे स्ट्रेटनिंग केल्यावर लगेच खराटा दिसायला लागतो. ते तर अजून भयंकर.

मुंबईच्या हवेत केस कायम चांगले दिसणे जरा कठीण आहे.

हो , साधना , स्ट्रेटनिंग वगैरे प्रकार मलाही योग्य वाटत नाहीत. पार्लरवाली जरा जास्तच पाठीशी लागली म्हणून तिला कटवलं आणि इथे विचारलं.
बाकी तू म्हणतेस तर बरोबर मुंबईच्या हवेत जास्त वेळ केस टिकून राहणं अवघड

मला केस गळणे ही  समस्या मेंदी लावायला सुरुवात केल्यापासूनच झाली , मग अनेक प्रकारे  R N  D  करून झाल्यावर , एका उपायावर  मी स्थिर झाले तो तुम्हाला कोणाला आवडला तर नक्की करून बघा , मला चांगले रिझल्ट आले आहेत . 
१. कलर करण्यासाठी मी राजस्थानी मेहेंदी (तिचा रंग टिकाऊ असल्याने महिन्यातून एकदाच लावली तरी चालते ) बीटाच्या  रसात भिजवते . (एक आख्ख  बीट  किसून त्याचा पिळून रस काढते , भरपूर निघतो . बिटामुळे  केसांना पोषक तत्व मिळतात आणि हेअर कलर लाल न होता बरगंडी किंवा कॉपर  होतो ,त्यामुळे छान  दिसतो . त्यात आवळा पावडर मिक्स केली तर अजून छान . सकाळी मेंदी लावण्याआधी त्यात अर्धा चमचा दही आणि एक लिंबू पिळून घालते , त्यामुळे केसांचं टेक्शचर खूप छान  सिल्की आणि चमकदार होतं  आणि केस कोरडे पडत नाहीत आणि गळतही  नाहीत . 
२. केस खूप पातळ झाले असतील तर आठवड्यातून एकदा कांदा खिसून त्याचा रस कापसाने स्कॅल्प ला लावल्यानेही खूप फायदा होतो . 
हे दोन्ही उपाय नियमित करायला  लागल्या पासून माझे केस चांगले झालेत . 

कोणीतरी कृपया शिकेकाई, आवळा, नागरमोथा, रिठा इत्यादी सर्वाचे प्रमाण लिहाल का माहित असेल तर? मागील अनेक पाने वाचून काढली आणि हे सर्व मिक्स करुन पावडर करण्याचा उपाय पटला आहे परंतु नक्की प्रमाण कुठल्याच उत्तरात मिळाले नाही.

हे मी सेव्ह करून ठेवले होते. इथेच लिहिलेय कोणीतरी, मला आठवत नाही:

तुम्ही एक प्रयोग करून बघा....

आठवड्यातून दोनदा रात्री झोपायच्या आधी खो. तेल सोसवेल इतकं गरम करून त्याने डोक्याला मसाज करायचा. जवळजवळ अर्धी वाटी तेल जिरवायचं. दुसर्‍या दिवशी मसाला शिकेकाई वापरून केस धुवायचे.

मसाला शिकेकाईचं प्रमाण : एक कि. शिकेकाई, पाव कि. रिठे, नागरमोथा गव्हलाकचोरा वाळापूड हे पाव कि, संत्र्याची आणि लिंबाच्या सालीची पूड दीडशे ग्रॅम, चंदन पूड (ऐच्छिक) शंभर ग्रॅम

खो. तेलात माक्याचं आणि जास्वंदीचं तेल समप्रमाणात एकत्र केलं, तर फार चांगलं

शिकेकाईत अजूनही कायकाय घालतात. पण ग कचोरा आणि नागरमोथा हे मुख्य असतं

म्हणजे? शिकेकाईची मसाला पूड कशी वापरायची असं का?

दोन तीन चमचे दोन फुलपात्री पाण्यात मिसळायची. उकळायची. कोमट झालं की गाळून घ्यायचं आणि गाळलेल्या पाण्याने केस धुवायचे.

हा निधपने लिहिलेला पॅक:

हा माझा हेअर पॅक. रेग्युलर केला गेला तर खूप उपयोग होईल.
हाताशी वेळ असेल तेव्हा करून बघा.
एक चमचा मेथ्या रात्री भिजत घालायची.
त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा
असं सगळं चांगलं घोटून मिक्स करायचं. गरजेप्रमाणे पाणी/ नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दू मिळते ते) घालायचे.
केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करायची.
एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावायचे. अर्धा-पाऊण तास ठेवायचे आणि नुसत्या पाण्याने धुवून टाकायचे.
रात्री डोक्याला तेल. दुसर्‍या दिवशी सकाळी माइल्ड शांपू.
मस्त होतात केस.

मसाला शिकेकाई चे प्रमाण हवे होते. खूप धन्यवाद. तुम्ही म्हणाला तसं वेळ हाताशी असेल तेव्हा(कुठला असायला म्हणा !) निधप यांचा pack करून बघेन.
कालच घाण्याचे अर्धा लिटर खोबऱ्याचे तेल,६-७ ताज्या आवळ्यांची पेस्ट, कढीलिंबाची पंधरावीस पाने , एकेक चमचा मेथ्या-ब्राम्ही- मका आणि जास्वंद फुलांची पावडर घालून आणि उकळून घरगुती तेल तयार केले आहे. ते वापरून काय उपयोग होतो हे ते लिहिन पण जरा वेळ लागेल आत्ताशी वापरायला सुरुवात केली आहे.

कलर करण्यासाठी मी राजस्थानी मेहेंदी (तिचा रंग टिकाऊ असल्याने महिन्यातून एकदाच लावली तरी चालते ) बीटाच्या रसात भिजवते . (एक आख्ख बीट किसून त्याचा पिळून रस काढते , भरपूर निघतो . बिटामुळे केसांना पोषक तत्व मिळतात आणि हेअर कलर लाल न होता बरगंडी किंवा कॉपर होतो ,त्यामुळे छान दिसतो . त्यात आवळा पावडर मिक्स केली तर अजून छान . >>>>

मी काल मेंदी भिजवताना चहाचे पाणी व एका बिटाचा रस घातला, 2 चमचे दही घातले, इथे हवा थंड आहे म्हणून 2 थेंब निलगिरी घातली व भिजवून ठेवले. 4 तासांनी मेंदी केसांना लावली. मेंदीच्या निम्मे आवळा पावडर घेतली होती.

केसांना डाय करून 2 महिने झाल्यामुळे मस्त 1 ईंची पांढरा पट्टा तयार झाला होता Happy मेंदी लावली की पांढऱ्यावर नारिंगी रंग येतो तो न येता बऱ्यापैकी कॉपरसदृश्य रंग आलाय. परत पुढच्या शनिवारी लावेन म्हणजे रंग अजून गडद होईल. मला मेंदी व आवळा पावडर इथल्या आयुर्वेदिक दुकानात मिळाली पण इंडिगो पावडर मिळाली नाही.. ती वापरली तर अजून चांगला परिणाम दिसेल.

१२-१३ वर्षे वयाच्या मुलाचे केस पांढरे झालेले दिसत आहेत. मैत्रिणी चा मुलगा आहे. ती काळजीत पडलीय. पुण्यात विश्वासू व माहिती चे होमिओपॅथी अथवा आयुर्वेदिक डॉक्टर माहिती असेल तर प्लीज कळवा. तीला हा आणि आधी चा धागा वाचायला देत आहे.

माझ्या केसात खूप कोंडा व्हायला लागलाय. मी दही, निंबु लाऊन पाहील दही निंबू मिक्स करून लाऊन पाहील तेलाने मसाज करून पाहील कोरफड लाऊन पाहील अंडा दही कोरफड मिक्स करून लाऊन पाहील ग्लिसरीन गुलाब जल अँटी danfruff शाम्पू सगळ लाऊन पाहील पण काही म्हणजे काहीच फरक पडलेला नाही.
घरी बोअरवेल च पाणी येत खूप शार युक्त असत त्यामुळे केस ड्राय पण झालेत. पुण्याला होती तेव्हा सॉफ्ट होते.
कोंद्यामुळे कपाळावर आणि पाठीवर बारीक पुरळ पण यायला लागलेत. आता डॉक्टर कडे जायचा विचार चालू आहे पण त्या आधी हा धागा दिसला म्हणून शेवटचा एकदा domestic उपाय करून पाहावा असं वाटतंय.
कुणी मदत करू शकेल का?

मी असा डाय बनवतेय सध्या...

एक आख्ख बीट किसून , शिजवून घेते, त्यातच चमचाभर क्लौंजी बिया भरडून टाकते, एक चमचा कॉफी घालते. गार झाल की त्याचा पिळून रस काढते , भरपूर निघतो . त्यात दोन चमचे आयुर्वेदीक मेंदी घालते सध्यातरी. बिटामुळे केसांना पोषक तत्व मिळतात आणि हेअर कलर लाल न होता बरगंडी किंवा कॉपर होतो ,त्यामुळे छान दिसतो . त्यात आवळा पावडर मिक्स केली तर अजून छान . ती भाजून काळी केलेली असावी. सकाळी मेंदी लावण्याआधी त्यात अर्धा चमचा दही घालते. त्याने केस कोरडे पडत नाहीत. फक्त तासभर ठेवली तरी रंग छान येतो.
भक्क पांढरे केस दिसण्यापेक्षा कॉफी कलरचे दिसतात.

वेदिक्स किट कोणी वापरून पाहिले आहे का??
किंवा hairfall वर उपाय म्हणून कोणते तेल/सिरम वापरता येईल.

हो स्पा, स्टीम, हर्बल पॅक ह्याने मॉइस्चर परत येते. (मेथी असेल तर अजून छान)
कढत पाण्यात बुडवलेला टॉवेल गुंडाळून ठेवणे कुणीतरी मागे ईथेच लिहिले होते!

मी लॉकडाऊनमध्ये केस रंगवायचे सोडुन दिले होते, हळूहळू रंग निघुन जाऊन पुर्ण केस पांढरे झाले. काही महिने हा लुक मिरवला. नंतर त्या पांढर्याचा कंटाळा आला (लोकानी तोंडावर आजी म्हटलेले आवडेनासे झाले ना... Happy ) बाजारात असलेले रंग वापरायचे नव्हते आणि मेंदी हवा तो परिणाम देत नव्हती. तो विचित्र लाल रंग नको होता. त्यामुळे पांढर्यावरच टिकुन राहिले.

मग कधीतरी कामा आयुर्वेदची जाहिरात पाहिली. मुलीने त्यांचे काही प्रोडक्स्ट मागवले होते, तिचा रिपोर्ट चांगला होता. मूंबईला गेले तेव्हा मॉल मध्ये कामा मेंदी पाहिली. मेंदी + इन्डिगो पावडर दोन्ही मिळुन १५०० रु. होते. (१०० ग्राम प्रत्येकी) वहिनीला एक पॅक घेण्यासाठी उचकावले. तिने घेतले, त्यात लिहिले तसे वापरले आणि तिचे केस मस्त काळे झाले. ते बघुन एक पॅक ऑन्लाईन मागवुन वापरला. रिझल्ट मस्त आला.

आधी मेंदी लावायची, मग ती धुवुन केस वाळवुन मग इंडिगो पावडर लावायची. इंडिगो मेंदीत भिजवली तर परिणाम तितका होत नाही. नुसती इंडिगो लावली तर ती एका धुण्यात धुवून जाते. त्यामुळे आधी मेंदी, मग इंडिगो असेच करायचे. (कामाच्या जाहिरातीत समिरा रेड्डीनेही असेच सांगितले).

पण हे केल्यावर परत एक जुना त्रास सुरू झाला. मध्यंतरी केस रंगवणे सोडल्यावर केसांचा नैसर्गिक नरम पणा आणि कर्ल परत आलेला. केस स्टेप कट कापले होते जे कर्ल मुळे मस्त दिसायचे. मेंदी लावल्यावर केस कोरडे झाले आणि नरमपणा व कर्ल दोन्हीवर पाणी पडले. केस सरळ झाले. हात लावायची इच्छा होईना.

मग कुठेतरी वाचले की मेंदी भिजवताना कोरफड जेल घालायची म्हणजे कोरडेपणा येत नाही. यावेळेस उर्जिता जैनची कोरफड जेल घालुन बघितली. केस बरेच नरम झाले. प्युर एलेमेंट्सचे जास्वंद जेल मुलीने मागवलेले पण ते पडुनच होते, तेही केसांच्य मुळांना फासले. केस मस्त मऊ झाले आणि कर्ल पण बर्यापैकी परत आला.

मेंदी भिजवताना मी अशी भिजवते - केस आता खांद्यापर्यन्त असल्यामुळे ५० ग्रम मेंदी पुरते, तर त्यासाठी पुरेश्या पाण्यात दोन चमचे कॉफि घालते (चिकोरीयुक्त कॉफी आहे, नॉन - इन्स्तंटंट ) आणि थोडा वेळ उकळून घेते. त्या उकळत्या पाण्यात मेंदी घालते, दोन चमचे कोरफड जेल घालते आणि बीट असेल तर त्याचा रस एखाद चमचा घालते. हे सगळे रात्रभर साध्या भांड्यात ठेऊन दुसर्या दिवशी केसांना लावतत, तिन चार तास ठेवते. धुवुन कोरडे करुन ५० ग्रम इंडिगो पावडर साध्या पाण्यात भिजवुन लगेच १०-२० मिनिटांनी लावते व तासभर ठेवते. मस्त बर्गंडी रंग येतो. इंडिगो पावडर जास्त वेळ ठेवली तर रंग अधिकाधिक गडद होत काळ्याकडे जातो पण मला तो आवडत नाही. मला हा बर्गंडीच आवडतो.

अर्थात माझे मम मन १५०० रु घालवायची परबानगी देत नाहीच. त्यामुळे कामाची मेंदी संपल्यावर खात्रीच्या आयुर्वेदीक दुकानातुन ३० रु ला पाव किलो भावाने मेंदी आणली आणि ब्रँडेड इन्डिगो पावडर १०० रु ची १०० ग्राम आणली. Happy कामा ची मेंदी कोरडेपणा आणत नाही असे त्यांचे म्हणणे आहे पण माझे केस थोडे कोरडे झाले आणि त्यांनंतर साधी मेंदी वापरल्यावर खुप कोरडे झाले. अधुन मधुन कामा वापरुन पाहिन असे म्हणतेय. Happy

Pages