केसांना कोणता कलर लावावा?

Submitted by इंद्रा on 13 March, 2019 - 08:28

माझे केस पांढरे होत आहेत. डोक्याचा मध्यभागी जास्तच. मेहेंदी लावून झाली, पण पांढऱ्या केसांचे प्रमाण वाढत आहे.
त्वचा 'सेन्सिटिव्ह 'प्रकारात मोडते. एकदा कलर लावेल कि ने हमी लावावा लागेल हे माहित आहे.
आता पर्यत लॉरियल,मॅट्रिक्स, बी ब्लॅट ,गोदरेज , गार्नियर , हे सर्व केमिकल मिश्रित आहेत असे ऐकले आहे. खादी , बायो टेक , यांनी कलर
नीट होत नाही .
कृपया मार्गदर्शन करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पांढरे झालेले केस रंग लावून लपवता येतात. पण पांढरे पणा थांबवता येत नाही बहुतेक.
मेंदीत बिट किसून त्याचे घट्ट पिळलेले पाणी, कॉफी घालू शकता, चांगला रंग येतो. पण याने केस पांढरे होणे थांबणार नाही. बाकी तुम्ही लिहिलेले सर्व कलर्स हे केमिकल वाले आहेत नक्कीच.

अगदी शुद्ध माक्याचे तेल (घरी रस काढून आटवून बनवलेले) नियमित लावल्यास केस पांढरे होणे थांबते असे वाचले आहे घरगुती औषधे पुस्तकात.
बाकी केमिकल फ्री हवं असेल तर मेंदीची पानं तोडून घरीच बारीक वाटून त्यात नीळ किंवा कॉफी मिक्स करून चांगला रंग बनेल.मेंदी रंगवायच्या हेतूने लावायची असल्यास किमान 5 तास तरी ठेवावी लागेल.शिवाय लावण्यापूर्वी केस कमीत कमी तेल/नो कंडिशनर शाम्पू ने चांगले स्वच्छ धुतलेले हवे.तेल किंवा कंडिशनर केसात असेल तर मेंदी रंग नीट बसत नाही.
बाकी बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक मेंदी पावडर मध्ये थोडेफार केमिकल असणारच.
नुपूर ने माझे केस जन्मात धड रंगलेले नाहीत.हाताची राजस्थानी मेंदी आणि नीळ किंवा कॉफी असे लावून सारंगीवाला(केसात तेल राहिले असेल तर) किंवा मान्सून वेडिंग वाली रेडहेड(तेल नीट गेले असल्यास, चांगले रंगल्यास) असे 2 लूक मिळतात.हल्ली 10 किंवा 12 केसांना इतका व्याप करण्याचे वैतागून लोरियाल ला आपले म्हटलंय.
पार्लर ला लावला नाही अजून.खूप खर्च येतो.पण ते एकदम प्रो लावून देतात.घरी शिवलेला फ्रॉक आणि पंपकिन/मॉम अँड मी/बीन स्टोक ब्रँड चा फ्रॉक इतका फरक असतो ☺️☺️

दक्षिणा, मेहेंदिचे सर्व सोपस्कार झाले . आवळा पावडर घालून , लोखंडाच्या कढई वापरून , बीट घालून, पण आता कलरचे म्हणते आहे
मेहेंदीचा लाल रंग नको वाटतो . अनु बरोबर आहे, कलर करते आता . @भरत आहो तो धागा खूपच मोठा आहे. त्याच्या शेवटी प्रतिक्रिया येणार,कदाचित येणार नाहीत म्हणून हा धागा.
लेकाची मौंज ३ आठवड्यावर आली आहे.त्यामुळे जास्त मनावर घातले बाकी काय

तेवढ्यापुरता वन टाइम अ‍ॅप्लिकेशनने काही मेजर फरक पडणार नाही , केमिकल फ्रि कलर अस बहुधा कोणताच नाहिये त्यातला त्यात लेस हार्मफुल निवडा ( अमोनिय फ्रि वैगरे )

Inoa by L'Oréal Professionnel is the revolutionary oil-based, ammonia-free permanent hair colour system. मी कायम हाच वापरते. बेस्ट आहे. खूप दिवस टिकतो. भरपूर महाग आहे, पण number of applications कमी असल्यामुळे एकुणात तेवढीच किंमत पडत असावी. ,पूर्वी फक्त प्रोफेशनल्सना मिळायचा, आता individual users पण विकत घेऊ शकतात असं ऐकलं आहे. केसांचं टेक्शचर खराब न करता जास्त टिकणारा कलर म्हणून हाच रेकमेंड करेन. झकास शेड्स आहेत.

मी पण लॉरियल वापरते , अमोनिआ फ्री. पण केस खूप पातळ झाले आहेत. जिथे कलर लावला जातो तिथे तर अजूनच पातळ.
मेंदी लावता येत नाही कारण वरचेवर सर्दीचा त्रास. शिवाय ३ तास तरी ठेवणे शक्य नाही.

>> केसांचं टेक्शचर खराब न करता जास्त टिकणारा कलर म्हणून हाच रेकमेंड करेन > ओके. मी पण वापरून बघते. पण माझी लावण्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. दर १०/१२ दिवसांनी लावावा लागतो.

काहीतरी लोशन का क्रीम आली आहे केस मुळापासुन काळे होउन पुन्हा पांढ्रे केस येत नाहीत त्यासाठी. राधिका आपटे येते जाहिरातीत.
ट्रु रूट्स ???

लॉरिअल मस्त आहे. अमोनिआ फ्री. केस कलर करणॅ हा मेजर डिसीजन आहे. कारण ते परत परत कलर करावे लागतात. पण घरी कार्य असल्यास ट्रीटमेंट पार्लर मधूनच करून घ्या. ग्लोबल प्लस मग हायलाइट्स. व कट छान करून घ्या. कार्याच्या दिवशी साठी चांगली फॉर्मल हेअर स्टाइल करून घ्या. आंबाड्यात सजवायला छान मोती, केसांचे दागिने मिळ तात. साडीला शोभून दिसतील असे घ्या व सारी ड्रेपर ला पण बोलवा. ह्या सर्व तयारी मुळे तुमचे फोटो फेसबुक/ इन्स्टा वर छान येतील व मुलांच्या साठी छान आठवण तयार होईल. आवड्त असल्यास राजस्थानी बोरला, पंजाबी परांदी वापरता येतील कार्याच्या गरजे नुसार. फुले तर आहेतच.

हिरवी मेहंदी ची पाने, थोडे तीळाचे तेल,कॉफी, आवळ्याची पावडर व कढीपत्ता पावडर एकत्र करून लावल्यास फायदा होतो ( भिजवण्यास फक्त्त दही वापरा ). २ तास लावा त्यानंतर केस कोमट पाण्याने धुऊन टाका.
हि पेस्ट Hair Mask म्हणून हि वापरता येते .

* काळे केस पांढरे झाले असल्यास तीळाचे तेल व कढीपत्ता एकत्र करून लावा.
* नैसर्गिक व घरगुती उपाय आहे काहि दुष्परिणाम होत नाहि .

नवीन Submitted by बाबा कामदेव on 14 March, 2019 - 12:11. >>>>. बाबाजी, एकदम बरोबर. केसांना रंग येतो, पण टेक्शचर खराब होत. मेंदी लावली की त्यावर हेअर कलर बसत नाही किंवा मेंदी पूर्ण जायची वाट पहात अर्धवट डी-कलर झालेले केस घेऊन फिरावं लागतं. लावायला लावतात मेंदीवर कलर, पण ते प्रोफेशनल नसणाऱ्या ब्युटीशीअन्स. मोठ्या / प्रोफेशनल हेअर सलोन्समध्ये मेंदी पाहिली तर हेअर कलर लावायला नकार देतील.

ओके.. माझा अनुभव सांगतो- केस कलर बद्धल नाहीय तरी.
3 वर्षांपूर्वी माझें केस थोडे गळायला लागले, मला वाटले स्ट्रेस मुळे असेल, थोडे केस पांढरे झाले होते स्ट्रेस मुळे.
दीड वर्षापूर्वी एकाने रेकमण्ड केले एक तेल, ते लावायला सुरुवात केली, सहा महिन्यात केस गळायचे थांबले आणि नंतर तर पांढरे केस पण काळे झाले, सध्या एकही पांढरा केस नाही.
ते तेल म्हणजे महा भृंग्रज.

पुरुषांचे केस गळणे ह्याला ॲन्ड्रोजेनीक अलोपेशीया म्हणतात. यावर finasteride किंवा minoxidil ही दोनच औषधे उपाय आहे ,पण याने गेलेले केस परत येत नाहीत ,राहिलेले टिकवता येतात.

yes. mahabhringraj oil is terrific . head massage with this oil.brings down stress.

मराठीत आपण डोके चढले आहे असा एक शब्द प्रयोग वापरतो ना. ते च्ढलेले डोके कमी होते तेल मसाजने. बीपी कमी राखायला मदत होते.

स्ट्रेस ने केस गळतात तसेच एकारात्रीत देखील पांढ रे होउ शकतात. पण बिकॉज यु आर वर्थ इट. करायचे.

भृंगराज अथवा इतर तेलांचे जे पांढरे केस काळे करण्याचे दावे आहेत, ते केस अकाली पांढरे झाले असल्यासच आणि या तेलाने रोज जमल्यास उत्तम अन्यथा आठवड्यातून ३ - ४ वेळा केसांना आणि टाळूला लावून १० ते १५ मिनिटे मालीश करणे आणि मग किमान तासभर तरी अंघोळ न करणे, आणि हे सर्व दीर्घकाळ केल्यास काळे केस पांढरे होतात असे दावे आहेत.

आता अकाली चा अर्थ प्रत्येकजण वेगळा लावतो. माझं आणि त्याचं / तिचं वय सारखंच आहे , त्याचे / तिचे आजू झाले नाहीत म्हणजे माझे अकाली पांढरे झालेत असे आपण म्हणतो. अशा वेळी याच सारख्या वयातील बऱ्याच जणांचे पांढरे झाले आहेत, किंवा आपल्यापेक्षा कमी वयाच्याही बऱ्याच जणांचे झाले आहेत याकडे आपण सहज काणाडोळा करतो. त्यात मी आणखी भर घातली : माझ्या दाढी मिशीत एकही पांढरा केस नाही म्हणजे माझे केस अकालीच पांढरे व्हायला सुरुवात झाली आहे.
मग मी जवळ जवळ रोजच भृंगराज तेलाने रात्री मालिश करू लागलो. आणि उशीवर जुना टॉवले टाकून झोपायचो, सकाळीच केस धुवायचो. टूरला जातानाही न सांडणाऱ्या बाटलीतून, ती दोन तीन प्लास्टिकच्या पिशव्यांत पॅक करून घेऊन जायचो. ८ - १० महिने हे केले असेल. आरशात एकेका पांढऱ्या केसाकडे निरखून बघायचो, हा होतोय का काळसर, की तो जरा वाटतोय. दरम्यान केस गळणे एकदमच कमी झाले होते, थांबलेच म्हणण्यास हरकत नाही. आणि मालिश केल्यावर छान वाटायचं, डोकं शांत वाटायचं, झोप चांगली यायची, केस जरा अधिक दाट वाटायचे.
महिन्या मागून महीने गेले आणि एक दिवस लक्षात आलं की अगदी समोर दोन नवे पांढरे केस आपल्याला खिजवत खिदळताहेत. तेव्हा मात्र मला आपले केस अकाली पांढरे झाले नसून, आपले वय, जीवनशैली, अनुवंशिकता आणि अजून जे काय असेल त्यानुसारच पांढरे होत आहेत, हे मान्य करावे लागले.
मग फक्त पांढऱ्या झालेल्या केसांनाच रंग लावता येईल का? डाय की मेंदी ? कोणता/कोणती? घरी की पार्लर मध्ये? घरून मेंदी कालवून नेली तरी पार्लर मध्ये लावून देतील का? अशा अनेक चौकशा करून कधी मेंदी कधी हा डाय करत पुढील दीड-दोन वर्षांनी नेमाने डाय लावू लागलो.

तरी सुद्धा ज्यांचे अकाली पांढरे झाले आहेत याची ज्यांना खात्री आहे त्यांनी भृंगराज ट्राय करावे असे मी सुचवेन, नाही पांढरे झाले तरी केस गळणे कमी होईल, शांत झोप लागेल, केस अधिक आकर्षक दिसतील.

आजकाल फोटो पोस्टिंग कल्चर मुळे सुंदर व तरूण दिसायचे भरपूर प्रेशर आहे. त्यानुसार ब्युटी व हेअर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. मी पहिले लक्ष देत नसे व जनरल साधी राहात असे. घरीच हेअर डाय वगैरे. पण रिपोर्टिंग किंवा ज्युनीअर पब्लिकला अपील व्हायला किंवा त्यांच्यातले एक व्हायला केस काळे, कपडे मॉडर्न व परफेक्ट मेक अप. असे असण्याची गरज भासली. ह्यामुळे आपली इमेज सुधारते असे कळले . थोडक्यात असामी असामीतला बाबा कसा एका दिवशी सूट घालून येतो तसे झाले माझे.
चश्मा असला तरी आय मेक अप केला ( मॉल मध्ये मुलीकडून करवून घेतला) केस ट्रीट केले व वेस्टर्न कपडे घातले की कौतुकाच्या लहरी येउन पोहोचतात.

हेच एकदम टॉप क्लास मेक अप व साडी नेसले की.

मधला जनरल चुडीदार लेगिन्ग नो मेक अप व केस मागे घट्ट बांधलेले असा अवतार करून गेले की लोक्स इग्नोर करतात. मला म्हातारीला काय करायचा आहे मेक्प व हेअर ट्रीट मेंट असे म्हणून चालत नाही. आपले फोटो नीट आले पाहिजेत. फेसबुक व इन्स्टावर लाइक्स मिळाले पाहिजेत. तर त्यासाठी मेहनत व प्रोफेशनल ट्रीटमेंट हवी. फिल्टर तर नंतरची बात आहे.

म्याडम तुमच्या डाय व हेअर स्टाइलचे फोटो टाका हो.

अमा आणि मानव जी छान पोस्ट
आजकाल फोटो पोस्टिंग कल्चर मुळे सुंदर व तरूण दिसायचे भरपूर प्रेशर आहे. >> अगदी खरय हो

>> बाकी बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक मेंदी पावडर मध्ये थोडेफार केमिकल असणारच

इशारा: नुकतेच उदाहरण पाहिले आहे. मेहंदी नावाखाली विकल्या जाणाऱ्या पावडर मध्ये रसायने असतात. अनेकांना त्याची अलर्जी असते व त्यामुळे चेहऱ्याला सूज येऊ शकते. मेहंदी नावाखाली विकले जाणारे हेअरडाय वापरू नका किंवा वापरल्यास दीर्घकाळ केसांत राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Pages