केसांचे आरोग्य-१

Submitted by कमला on 15 March, 2020 - 03:38

केसांचे आरोग्य आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढत आहेत. पहिल्या धाग्याने 2000 चा टप्पा गाठला.यापुढील चर्चा इथे करा.
Hair treatments विषयक सल्ले, कोणाला कशाचा चांगला उपयोग झाला, इ. अनुभवांची देवाणघेवाण, पारंपरिक उपाय, निरनिराळी तेले,शांपू,कंडिशनर्स,सिरम, हेअर कलर्स ही आणि सर्व आनुशंगिक चर्चा इथे करता येईल.
आधीच्या धाग्याचा दुवा:
https://www.maayboli.com/node/2466

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस प्रचंड प्रमाणात गळत आहेत. जवळ जवळ ५०% volume शिल्लक राहिला आहे आणि लांबी पण अचानकच कमी झाल्यासारखी वाटते आहे. काय करता येईल

मला ताज्या काढलेल्या नारळाच्या दुधाने केस गळतीला खूप चांगला फरक पडला होता. घट्ट दूध केसांच्या मुळांना लावून 20-30 मिनिटांनी धुवायचे.
एकदा skin specialist or डॉक्टर ना पण दाखवून बघा की thyroid किंवा बाकी काही कारण तर नाही ना ते.

साधना ताई, तुमची मागे इथे पोस्ट वाचून मीही मेंदी प्लस इंडिगो करून बघितले. आणि केस छान काळे झालेत. नुसती मेंदी अणि नंतर इंडिगो ne खरच केस चांगले कुळकुळीत काळे झाले. आता कंटाळा करून मेंदी मध्ये इंडिगो मिसळून लावते. तेही बरेच बरे काळे होतात Happy त्या पोस्ट करता धन्यवाद Happy

मलाही मागच्या पानावर पोस्ट chi पहिली ओळ वाचून वाटले नक्कीच साधना ताई chi असणार!

मेंदी च्या निम्मी इंडिगो पावडर घेते. केस किती दिवस काळे राहतील हे तुमच्या केसांच्या वाढीवर आहे. मला महिन्यातून एकदा करावे लागतात.

केस प्रचंड प्रमाणात गळत आहेत. जवळ जवळ ५०% volume शिल्लक राहिला आहे .>>> same here Sad .

केसाला कंगवा किंवा हात लावायची भिती वाटते.
विंचरताना केसांचा अक्षरशः सडा पडतो.
नारळदूध लावून बघते.

आर्यन, थायरॉइड दोन्ही चेक करा.८ तास झोप होतेय का? स्ट्रेस आहे,वाढला? प्रीमेनोपॉज किवा मेनोपॉज मधे भरपुर केस गळतात तस काही आहे का?
प्रिटी-प्रेरणा या युट्युबरचे व्हीडियो आहेत ते बघा, खुप उपाय दिलेत त्याने गोन्धळ वाढतो खरा पण तुम्हाला जमेल ते करा.
साधना, मेन्दीत एक चमचा ऑलिव्ह ऑइल टाका त्याने फरक पडतो, मेन्दी आणी इन्डीगो दोन्ही केसाना ड्रायच करतात.

Thanks prajakta. Check-up करून घेते. Baghate प्रेटी प्रेरणा.

रोझमेरी एसेन्शीअल ऑईल केसांसाठी चांगले असते हे सध्या फार ऐकते आहे .
मागवली एक बॉटल , बघते एक महीना वापरून .

नुसती मेंदी अणि नंतर इंडिगो < हे करतांना किती गॅप ठेवायचा? एक दिवस मेंदआ, दुसर्या दिवशी ईंडिगो चालेल का? मेंदी न लावता फक्त ईंडिगो केलं तर चलतं का?मेंदी का लावावी लागते?- रंग तर नंतर काळाच होउन जातो ना?

आंदले दिवशी मेंदी आणि दुसरे दिवशी इंडिगो (२४ तासांचा फरक) हे सगळ्यात उत्तम रिझल्ट्स देत. मेंदी न लावता नुसताच इंडिगो लावला तर केस रंगणार नाहीत. कारण केसांना फक्त मेंदीचा रंग चिकटतो (मग मेंदीला इंडिगो चा रंग चिकटतो). ही दोन दिवसांची प्रोसेस नको असेल तर मेंदी आधी भिजवून ऐन वेळी त्यात इंडिगो मिसळुन एकत्र लावता येईल. पण त्यात काळा रंग येत नाही (मरुन/तपकिरी रंग येतो).

रोझमेरी एसेन्शीअल ऑईल केसांसाठी चांगले असते हे सध्या फार ऐकते आहे >>> कुठले मागवले स्वस्ति? आणि कुठून? डिटेल्स दे ना प्लीज.

रोझमेरी एसेन्शीअल ऑईल केसांसाठी चांगले असते हे सध्या फार ऐकते आहे >>>
मी Soulflower चे रोझमेरी अँड लव्हेंडर ऑइल मागवले आहे. त्याचा बेस एरंडेल तेलाचा आहे. त्यामुळे चिकट आहे. लावले कि बाहेर जाण्यापूर्वी केस धुणे गरजेचे आहे.
फार वापरले नाही त्यामुळे गुण येतो की नाही हे कळायला वेळ लागेल.

त्याचा सुगंध मला आवडला. आणि लव्हेंडर असल्याने झोप छान लागते.

मी मागचे दोन महिने रोजमेरी एसेंशिअल ऑईल वापरलाय. रोज नाही पण हेडवॉशच्या आदल्या रात्री. गळणार्या केसांचा पुंजका बराच लहान झालाय. केस तुटणं पण बरंच कमी झालंय. नवरा रोज सकाळी पॅराशूट ऑईल मध्ये 2-3 थेंब टाकून लावतो. त्याचाही हेअरफाॅल बराच कमी झाला आहे.
मी Alps Goodness चं मागवलं होतं purplle.com वरुन. चांगले रिझल्टस् मिळाले.

मी अमेझॉन वरून pilgrim च मागवलयं. दिवाळीत येईल म्हणतोयं.
Instructions मध्ये ---

How to use : Always dilute the essential oil with a base/carrier oil before use. Mix 2-3 drops of essential oil with 1 tablespoon of carrier oil like coconut or almond oil. Gently massage on scalp and hair.

हो. अगदी असंच वापरायचं.
वर कुणीतरी सांगितलं आहे प्रीती प्रेरणा चॅनल बद्दल. तिथूनच आयडिया घेतली.
तिची नवीन केस उगवण्यासाठी एक रेमेडी आहे. कलौंजी सीड्स, लवंग, लसूण इ. पाण्यात उकळून घ्यायची. ते पण वापरलं आणि खरंच नवीन केस उगवले. पण आमच्यात सातत्याचा अभाव. जेमतेम 15-20 दिवस केलं. तरी नवीन केस जागेवर आहेत. पण बेबी हेअर असल्याने कायम पिसारा फुलल्या सारखे दिसतात.

हो. रात्री झोपण्यापूर्वी स्प्रे करायचं किंवा कापूस बुडवून केसांच्या मुळाशी धावायचं. थोडा मसाज करायचा अलगद. पाणीच असतं त्यामुळे केस ऑइली वगैरे होत नाहीत. पण लसूण असते त्यामुळे थोडा वेगळा वास येतो. पण फार त्रासाचा नाही.

अच्छा . मला मेथी भिजवलेल्या पाण्याने फायदा झाला . Baby hair आले. रात्रभर मेथी दाणे भिजवून ते पाणी आठवडाभर वापरते. दिवसातून दोन वेळा स्प्रे करायचं.

रोझमेरी एसेन्शीअल ऑईल वापरायला सुरुवात केलीय. जास्त दिवस नाही वापरले अजुन. केस गळणं 4-5 % कमी झालयं पण केसाचा पोत सुधारलेला वाटतोय. Ponytail feels voluminous.

@ मी चिन्मयी -
कलौंजी सीड्स, लवंग, लसूण इ >>> बाकीचे ingredients काय आहेत? व्हिडिओची लिंक देऊ शकशील प्लीज?

500 ग्रॅम नारळाच्या तेलात रोझमेरीच्या 20-25 काड्या, एक चमचा
कलोंजी आणि एक चमचा मेथीदाणे उकळून तेल तयार करुन ठेवलं आहे. आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळाशी मसाज करते. खूप फायदा होतो आहे

rmd सॉरी. खूप दिवस इकडे येणं झालं नाही. मनिम्याऊनी दिलेली लिंक नक्की बघा. मी माझ्या जावेला बनवून दिलं काही दिवसांपूर्वी. तिलाही चांगला फरक जाणवलाय.

होहोबा, केश कांती वगैरे तेल मी लावते केसांना. आर्गनही लावणार होते परंतु नशीबाने कालच एक क्लिप पाहीली ज्यात मोरोक्कन शेळ्यांच्या लेंड्यांपासून हे ऑइल बनते असे दाखविले(सांगीतलेले)

Pages