हेअर स्पा : गरज, फायदे आणि तोटे

Submitted by कच्चा लिम्बू on 24 February, 2019 - 11:11

माझे केस सध्या खूप गळतायत आणि विरळ झाले आहेत.
बऱ्याच जणांनी सांगितलं की हेअर स्पामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. हे खरं आहे का?
पार्लर आणि माझा संबंध एरवी केस कापण्यापुरताच येत असल्याने मला अगदीच बाळबोध प्रश्न आहेत स्पा बद्दल
कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

प्र.१ हेअर स्पा म्हणजे नेमकं काय करतात?
२. ते करायला किती वेळ लागतो आणि अंदाजे खर्च किती येतो?
३. एकदा करून उपयोग होतो का? की frequently जावं लागतं?
४. हेअर स्पा साठी पुण्यात चांगली salons कुठली आहेत??
५. लॉंग टर्म मध्ये काही तोटे आहेत का?

अजून प्रश्न पडतील तशी लिस्ट अपडेट करत राहीन
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हेअर स्पामध्ये, 1. केसांना ऑलिव्ह किंवा ब्रँडेड मेडिकेटेड ऑइलने हेअर फ़ॉलिकल्सना मसाज करतात. 2. केस आणि केसाखालची त्वचा शॅम्पूने स्वछ , अति स्वच्छ धुतात, मग केस वाळवून हेअर मसाज क्रीमने चांगला 15-20 मिनिट्स मसाज करतात. ही स्पा मधली मुख्य महागडी स्टेप. खूप मोठमोठे ब्रँड्स हेअर स्पा क्रीम्स बनवतात. 3. मग केसांना स्टीम देतात. 4. मग केसांना हेअर पॅक लावून ठेवतात. या स्पा क्रीम आणि मग पॅकमुळे केस स्मूथ आणि शायनी होतात. 5. पॅक 20-25 मिनिटांनी शॅम्पूने धुतात. हा फायनल वॉश असल्याने कंडिशनर पण वापरतात.
6. मग केस वाळवून आणि सेट करून दिले की जुल्फे उडवत मॉडेल सारखं घरी जायचं कारण end result अतिशय भारी असतो. स्मूथ, सिल्की, शायनी आणि खूप छान सेट केलेले केस एकदम सुंदर दिसतात.

फायदे - वर पॉईंट 6 मध्ये लिहिलेले. याने केस वाढतात (म्हणे), केसांचा कोरडेपणा गेल्याने हेल्दी दिसतात आणि तुटणे गळणे बंद होते. नेहमी केल्याने केसांच्या टेक्श्चरमध्ये सुधारणा होते. केराटीन ट्रीटमेंट किंवा मिरर पॉलिश यातल्याच पुढच्या ट्रीटमेंटस. या युट्यूब वर पहा. भीषण सुन्दर दिसतात केस Happy

तोटे - एकदा करून फार फायदा नाही, तेवढे आठवडाभर छान दिसतात. नेहमी केलं तरच चांगले रिझल्ट्स मिळतात. मोठा तोटा खिशाला, कारण कमीत कमी कॉस्ट 1 हजार ते 5-6 पर्यंत फटका झटका बसतो.

माझं फेवरीट - गझेल (कल्याणी नगर)
H2O - KP

मीरा +१
केस मस्त मौमौ होतात.मी रेग्युलरली करायचे तेव्हा फार छान होत केस. सध्या नेहमी जमत नाहीये , केस कोरडे झालेत खूप.

हेअर स्पा म्हणजे बेसिकली भरपूर आणि डीप कंडिशनिंग व क्लिनिंग.
तेवढा वेळ पार्लरमधे बसायचा पेशन्स असेल, परवडत असेल तर वर्थ इट.
नाहीतर स्पा किट घरी आणूनही करता येऊ शकतो.

रिचफील स्पा मला तरी खूप आवडलाय. सूट पण झालाय. सध्या वेळच मिळत नाहीये पण त्यांच्या नरीशरने केस गळणे बरेच कमी होते
हेअर नरीशर, ऑइल, मास्क, शांपू असे सगळे येते त्यात.
ते सगळं स्वतःचं स्वतः लावता येतंच. घरात कुणी असेल तर त्यांच्याकडूनही लावून घेता येतं.

स्पा करायला वेळ होत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी किमान भरपूर तेल लावून प्री कंडिशनिंग करायचे. स्काल्पला तेल लावा न लावा. केसांच्या टोकांपर्यंत तेल लावायचे. पार चपचपीत झाले पाहिजेत केस आणि प्रत्येक केसाला लागले पाहिजे तेल. जावेद हबीबचा व्हिडिओ आहे याबाबत. तो बघून घ्या.

अजून एक पूर्ण घरगुती स्पा प्रकरण आहे. देते तपशील थोड्यावेळाने जर तुम्हाला हवे असेल तर.

पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. ते हार्ड वॉटर असेल तर पाणी ट्रीटमेंट केल्याशिवाय अजिबात घरात करू नका स्पा. काहीही उपयोग होत नाही. केस धुवायचे पाणी उकळून मग थंड केलेले असेल तरच अर्थ आहे.
माझ्याकडे वसईत पाणी विचित्र आहे. उकळून थंड केले की त्यावर मिनरल्सचा (बहुतेक) जाडसर तवंग येतो. त्यामुळे उकळून गार केलेले पाणी गाळूनही घ्यावे लागते.

धन्स मीरा, नीधप.
नी, ते घरगुती स्पाचे तपशील पण द्याना प्लीज.
अजून एक शंका-
रेग्युलरली करावं म्हणजे किती रेग्युलरली? महिन्यातून एकदा, सहा महिन्यांतून एकदा??

एकदा करून उपयोग होतो का? की frequently जावं लागतं?<<
कुठल्याही ब्युटी ट्रीटमेंट एकदा करून फायदा नसतो. रेग्युलर करत राहावं लागतं.
आंघोळ करणे, नखे कापणे, पाणी पिणे, फळे खाणे, व्यायाम करणे या आरोग्यासाठी गरजेच्या गोष्टी जश्या एकदा करून भागत नाहीत. कायमच करत राहावे लागते. तेच स्पा चे आहे.

रिचफील स्पा मी तरी महिन्यातून एकदा करायचे.
हल्ली फक्त भरपूर तेल लावणे एवढेच करते.
घरगुती स्पाच्या मास्कची माझी रेसिपी होती कुठेतरी माबोवरच. शोधते.
आता कैक वर्षात मी ही ते केलेले नसल्याने मलाही विसरायला झालीये.

केसांना लावा मेयॉनिज -
केस मऊ आणि शाईनी हवे असतील तर केसांना मेयॉनिज जरुर लावा. केसांना चांगल्या प्रकारे कंडिशन देण्यासाठी तुम्ही मेयॉनिजचा हेअर मास्क लावू शकता, त्यामुळे केसांना चांगले पोषण मिळेल. प्लेन मेयॉनिज घेऊन ते ओल्या केसांना मसाज करुन लावा. मेयॉनिज केसांना २० मिनिट ते १ तासापर्यंत लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने केस धुवून टाका.

मेयॉनिज केसांना २० मिनिट ते १ तासापर्यंत लावून ठेवा. त्यानंतर पाण्याने केस धुवून टाका.
नवीन Submitted by shital Pawar on 25 February, 2019 - 00:15 >>

यं बाय गो.. ते सँडविच वालं प्लेन मेयॉनीज केसांना लावायचं का..??

मी एकदाच हेअर स्पा केला होता. करून घेताना एकदम मस्त वाटलं. केसही अगदी छान झाले होते. पण नंतर ३-४ दिवस त्या कंडिशनरचा वास मला येत राहिला. आणि त्यामुळे माझं डोकं ३-४ दिवस दुखत राहिलं Sad तेव्हापासून परत धीर झाला नाही माझा.

मी पण एकदा हेअर स्पा केलेला. पण फायनली धुतल्यानंतर तिने माझे केस सेट करुन दिले नाहीत Uhoh
का तर म्हणे स्पा केलय म्हणुन ब्लो ड्रायर वापरायचा नसतो Uhoh

no blow dryer after spa is correct.
the heat makes the deep conditioning stickier.

थँक यू, लोक्स
सध्या तरी हेअर स्पा करून घ्यावा असं ठरवतेय.
दर महिन्याला की कसं ते या अनुभवावरून ठरवावं म्हणते.
@मीरा, कोथरूड- FC रोड, प्रभात रस्ता इ. परिसरात असतील का हेअर स्पा करणारी salons? KP, कल्याणी नगर पर्यंत जाण्याचा उत्साह नाही हो..

घरगुती हेअर स्पा. (केसांना ऐवज लावायला मदत मिळाली तर जास्त बरे!)
आदल्या रात्री किंवा सकाळी बेसिक नॉर्मली लावतो तसं तेल लावायचं केसांना. हे तेल साधे शुद्ध खोबरेल तेल चालेल. आयुर्वेदिक प्रकारे सिद्ध केलेली जास्वंद किंवा तशी तेले चालतील. केमिकल्स, परफ्युम्स वगैरे घातलेली तेले नकोत.
तसेच रात्री चमचाभर (किंवा लांब केस असल्यास जास्त) मेथ्या भिजत घालायच्या. आदल्या दिवशीच नारळाचे दूध काढून ठेवायचे.

सकाळी मेथ्या भिजवलेल्या पाण्यासकट वाटून घ्यायच्या मिक्सरमधे.
वाटलेल्या मेथ्यांचा जेलसदृश गोळा + नारळाच्या दुधाचा वरचा तेलकट भाग (आदल्या दिवशी काढले असेल तर फ्रिजमधे ठेवल्यावर मस्त वडीसारखी साय येते ती. आयत्यावेळेला काढले ना दू तर पहिल्या घाण्यात येते ते.) + नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व पावडरी एकेक चमचा (मेंदी ऐच्छिक आहे.) असे सगळे एकत्र घोटायचे. खूप घट्ट वाटले तर ना दू चा खालचा पातळ भाग किंवा सेकंडरी ना दू (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दू मिळते ते) घालून हव्या त्या कन्सिस्टन्सीला आणायचे. कन्सिस्टन्सी केसांना मेंदी लावताना जी असते तीच.
केस खूप ड्राय असतील तर चमचाभर ऑलिव्ह ऑइल यात टाकायला हरकत नाही.
केस मुळातच खूप चपचपीत असतील तर आधीचे तेल हे जेमतेम लावा.

तेल लावून झाल्यावर किमान तासाभराने एकेक बट घेऊन मुळांपासून केसाच्या टोकापर्यंत हे मिश्रण चोपडत जायचे. स्काल्पलाही लागले पाहिजे आणि प्रत्येक केसाला मिश्रण नीट लागले पाहिजे. मिश्रण पसरायला सेकंडरी ना दू मधे मधे हातावर घेता येईलच.
हे असं सगळं लावून झाल्यावर सेकंडरी ना दू स्काल्पवर हलक्या हाताने चोळून मसाज करून घ्यायचा जर दुसरे कोणी करायला असेल तर. तासभर ठेवायचे हे सगळे. किंवा डोकं जड होईपर्यंत.
मग नुसत्या पाण्याने सगळा पॅक काढून टाकायचा. थोडं जास्त पाणी लागेल कारण कुठल्याही पावडरीचा, मेथ्यांचा एकही कण राहता कामा नये.
केस व्यवस्थित चिकट जाणवतील. ते तसेच राहूद्या. ड्रायर मारत बसू नका. टॉवेलने व्यवस्थित पुसा. घसाघसा नको.
जर कुठे बाहेर जायचे नसेल, कुणी येणार नसेल तर राहूदेत केस चिकट. दुसर्‍या दिवशी सकाळी माइल्ड शाम्पूने धुवून टाका.

गझेल (gazelle) - भांडारकर रोड ब्रँचला जाऊ शकता. मोरोक्कनऑईल हेअर स्पा करा. फार सुरेख रिझल्ट आहेत त्याचे.

Gazelle Bhandarkar road is still there? Awesome place Enrich is good. Loreal has hair spa products too.

माझे ही गझेल आवडते आहे! गो फोर हेयर स्पा..इट'स वर्थ इट! घरी करायचे असेल तर लोरियल चे डब्बे पण मिळतात पण पार्लर चा फील वेगळाच!

ंमी पण इथले वाचूनच हेअर स्पा करवून घेणार आहे. माझे बेसिक केस मित्र म्हणजे पॅराशुट कोकोनट ऑइल व महाभ्रिन्ग राज तेल. आठ तास एक्सेल मध्ये काम केल्यावर डोक्याचा पार भुगा होतो तेव्हा, जनरली सोमवारी रात्री, महाभ्रिंगराज तेलाने हेड मसाज करून झोपते. चढलेले डोके शांत होते. खोबरेल तेल वीकांताला अभ्यंग स्नान. लोक्स बिग बास्केट.कॉम वर ब्युटी स्टोअर चेक करून बघा. हर प्रकारची तेले आहेत. मी सध्या एक लवेंडर व इतर वाले तेल घेतले आहे पॅराशूट तेला पेक्षा जास्त घट्ट ( व्हिस्कस आहे) पण लावल्यावर फार वास येत नाही. मंद आहे. केस मौ वाटले इतकेच. ग्लोबल व हाय्लाइट्स ( कलर ) व हेअर स्पा असा मार्च चा प्लॅन आहे. धागाकर्ते धन्यवाद.

माझे बेसिक केस मित्र म्हणजे पॅराशुट कोकोनट ऑइल व महाभ्रिन्ग राज तेल.>>>
सेम पिंच. त्यातल्या त्यात गाडी इंदूलेखापर्यंत सरकल्येय माझी.. पण शून्य फरक पडलाय केसांच्या हेल्थमध्ये

पण शून्य फरक पडलाय केसांच्या हेल्थमध्ये>> बेसिक आहार चेक करा तो चौरस हवा. फ्रूट्स व्हेजिटेबल्स प्रोटीण विटामिन सर्व प्रमाणात हवे ओव्हर ऑल हेल्थ जबरदस्त असली की ते केस व नखात रिफ्लेक्ट होतेच. नाहीतर ते काही जिवंत अवयव नाहीत प्रोसेस्ड फूड खाउ नका कोक फँटा पिउ नका. ऑफिसातला नाश्टा खाउ नका तो मोस्टली हाय फॅट असतो. ट्रान्स फॅट वाले सर्व पदार्थ सोडा. बेकरी गुड्स. बिस्किटे वगैरे.

मानसिक ताण असेल तर योग्य उपाय योजना करा.

मी तर केस पण घरीच भादरत असते पण यावेळी पार्लरात जाउन कट मारून आले. इतके पैसे मोजायचे म्हणजे त्याचा वेगळा स्ट्रेस येइल. पण यावेळी ़ केश संवर्धनात उडी मारणार आहे.

कोणी केश king तेल वापरले आहे का ? जाहिरात बघून बाटली आणली आणि एकदाच लावलं. पण या तेलाचा वास इतका भयंकर आहे की केस धुतले तरी दोन दिवस डोकं भणभण करत होतं.
उरलेले तेल तसेच पडुन आहे आता

केश किंग बकवास तेल आहे. महाभृंगराज मस्तय. मला नवरत्न तेल पण आवडतं अधून मधून. डोक्याला मसाज करायला मी घाण्यावरचे खोबरेल वा बदाम तेल वापरते. अधूनमधून नारळाच्या दुधाने मसाज आणि महिन्यातून एकदा सलोनमध्ये हेअर स्पा. केस चांगले राहतात.

महाभृंगराज मस्तय. >>>+१
मी वापरते.
शिवाय एरंडेल्+ऑलिव्ह्+बदाम मिक्स करुन ठेवलं आहे. ते ही अधीमधी वापरते.
आणि बजाज आमंड पण अधी मधी.
शाम्पू-कंडीशनर मॅट्रिक्स बायोलेज स्मूथ्प्रूफ.
केस बर्‍यापैकी आहेत.

नीधपने लिहिलेय तसा स्पा डोक्याला लावून हे लिहितेय Happy
या आधी केलाय हा प्रयोग माझ्या व लेकीच्या डोक्यावर. फरक जाणवतो खूप. आता नियमित करेन असे म्हणतेय.

केस धुण्याच्या आधी रात्रभर तेल चोपडून ठेवा. दुसऱ्या दिवशी केस धुवा आणि कंडिशनर फक्त occasionally वापरा. तेल भरपूर लावले असल्याने कंडिशनर नाही लागत. शाम्पू direct केसावर चोळू नका, थोड्या पाण्यात शाम्पू कालवा आणि ते वापरा. मोड आलेल्या मेथीची भाजी खात जा, इथे मायबोली वर आहे recipe.
वरून केसांना काही बाही लावणे जमत नाही एवढे मला so जास्त food intake वर भर देते. आणि धुण्या आधी तेल न पाण्यात कालवून शाम्पू हे routine आहे माझे केस बऱ्यापैकी मऊ आहेत. महिन्यातून एकदा रोगण बदाम तेल लावते.

रोगण बदाम तेल काय असते. तेल पूर्ण निघून जाईल ईतका शांपू नाही लावत का. एकदाच शांपू लावला तर तेल निघत नाही. तेल आणि पाण्यात शांपू कालवला तर तेल कधी जाणारच नाही, मग कंडिशनरची गरज नाही.

<<< हेअर स्पा म्हणजे बेसिकली भरपूर आणि डीप कंडिशनिंग व क्लिनिंग. >>>
माझ्या माहितीनुसार हेअर ट्रीटमेंट करतात त्या "ठिकाणाला/जागेला" स्पा असे म्हणतात, प्रत्यक्ष ट्रीटमेंटला न्हवे. चूभूदेघे.

Pages