हिंदू धर्म संकटात आहे काय?

Submitted by आर्यन वाळुंज on 2 March, 2020 - 10:44

डोळे उघडून जगाच्या नकाशावर नजर टाकली तर कित्येक राष्ट्रं मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची आहेत. कम्युनिस्ट देशांनी धर्म काही वर्षे बंदिवासात टाकला होता पण अलिकडे तिकडे धर्म परत जागा होत आहे.
जगात हिंदू राष्ट्र एकच शिल्लक आहे पण त्याला हिंदू राष्ट्र म्हणायचं नाही कारण का तर शेक्यूलिरीझम. भारतात ढळढळीत हिंदू धर्म बहुसंख्यांकांचा आहे तरी नीच लोकांनी निधर्मी राष्ट्र ठरवलं आहे. या हिंदू राष्ट्राचे फाळणीच्या रुपाने लचके तोडून समाधान झाले नाही तर जाणीव पुर्वक धर्मांतरं घडवून हिंदू धर्म संपवण्याचा घाट घातलेला दिसून येतो.
नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे की नाही यावर मला शंका आहे. मावोवादी लोकांच्या तालावर तेथील सरकार चालतं असं मला वाटतं. भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याच्या योजना बहुतेक वेळा नेपाळमधून अंमलात आणल्या जातात.
हिंदू धर्मीयांना असे का वाटत नाही की जगात हिंदू धर्म वाढावा आणि एकापेक्षा अधिक हिंदू राष्ट्रं बनावित?
हिंदू कायम बचावात्मक पवित्रा का घेतात. हिंदू धर्मातील आधुनिक लोकांना मंदिरात जाणे, उत्सव साजरे करणं हे मागासपणाचं लक्षण वाटते. आपलेच लोक आपल्या धर्माला रोज नावे ठेवतात. हिंदू धर्मानं अति स्वातंत्र्य दिल्यानं लोकांना धर्म महत्वाचा वाटत नसावा काय?
असे काय आहे हिंदू धर्मात की इतर धर्मियांच्या डोळ्यात हिंदू धर्म सलतो आहे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नेपाळ पूर्वी हिंदू राष्ट्र होते, पण 3-4 वर्षांपूर्वी संसदेने कायदा करून सेक्युलर केले,

2-4 वर्षांपासून चीनने व नेपाळने करार केला की चीनचे शिक्षक नेपाळी पोरांना चिनी भाषा शिकवतील , म्हणजे चीनच्या बाजारपेठेत त्यांना नोकर्या मिळतील,
बरेच आहे , तसेही 2014 नंतर भारतातच ढीगभर चौकीदार होऊन बसलेत, बहुदा त्यामुळे नेपाळी सरकारने तसा निर्णय घेतला असेल, बिचाऱयांची चायनीज मोबाईल , चायनीज खेळणी वगैरे जोडाजोडी करून पोटे तरी भरतील
Proud

वाळुंज, तुमचा अजेंडा, जालीय वय अन तुमची आकलनशक्ती पाहू जाता, दाताड काढण्याबद्दल काहीही बोलण्याची तुमची पात्रता नाही, असे नम्रपणे नोंदवितो.

बाकी, तुमच्या लेखाबद्दल, उत्तर आहे : होय.

तुम्हा हिंदूत्ववाद्यांचा तथाकथित हीन्दू "धर्म" नक्कीच संकटात आहे. अन त्याचे मूळ कारण तुम्हीच आहात.

खरे हिंदू तुमच्यापेक्षा बरेच सेन्सिबल अन मानवतावादी आहेत. बाकी चालू द्या.

खरे हिंदू तुमच्यापेक्षा बरेच सेन्सिबल अन मानवतावादी आहेत. बाकी चालू द्या.

Submitted by आ.रा.रा. on 2 March, 2020 - 22:18 >>

नेमके शब्द मांडल्याबद्दल ढन्यवाद आणि सहमत, नेमक्या याच गोष्टीमुळे हिंदू धर्म संकटात आहे...

तुम्हा हिंदूत्ववाद्यांचा तथाकथित हीन्दू "धर्म" नक्कीच संकटात आहे. अन त्याचे मूळ कारण तुम्हीच आहात.
खरे हिंदू तुमच्यापेक्षा बरेच सेन्सिबल अन मानवतावादी आहेत. बाकी चालू द्या. >>> जरा विस्ताराने सांगाल का आपल्याला काय म्हणायचे आहे?

माझ्या मते नक्कीच तो कमी झाला आहे आणि होत देखील आहे. नाहीतर एकेकाळी पार गांधार पासून इकडे जावा सुमात्रा पर्यंत पसरलेला हिंदू धर्म आता फक्त भारतापुरता मर्यादीत राहिला आहे. याची कारणे अनेक असतील परंतु एक सर्वात महत्वाचे कारण म्हणजे हिंदूंमधील फुटीरवाद... आज देखील हिंदू म्हणून आपण एक आहोत का? सेकुलर किडा चावलेलीच जास्त दिसतील

होय संकटात आहे.
नाही तर अफगणिस्तान, पाकिस्तानातून आपल्या डोळ्यादेखत नाहीसा कसा काय झाला असता?
बरं झाला तो झाला नवीन धर्मामुळे त्या देशांची काय वाट लागली ते पाहताय ना?
आता तरी शहाणे होऊ या आणि 'कुठल्याही' धर्मा पेक्षा या सर्व system उभ्या करून आपला जीवन सुखकर बनविणाऱ्या आपल्या देशालाच फक्त सर्वोच्च मानू या.
जय हिंद।

अतुलभौ, शेतकरी शेतात चांगलं पीक यावं म्हणून सगळ्यात आधी काय करतात? तर तण काढून टाकतात.. कारण काहीही उपयोग नसलेल्या तणाचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर अख्या पिकाला ते खाऊन टाकत, कारण स्वार्थ आणि भोग यांच्याच मागे धावण्याची तणाची मुळ प्रेरणा असते. तणांचा वाढीचा वेगही मुख्य पिकापेक्षा जास्तच असतो. तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल तेव्हढे तण आणखी पसरत जाते. तुम्ही तण खाऊ शकत नाही, कारण स्वतः पेक्षा वेगळ्या सजीवांना काही देण्याचा गुणधर्म त्याच्यात नसतो, उलट ओरबाडून दुसऱ्याच्या हक्काचे कसे घेता येईल याकडेच त्याची ओढ असते. त्यामुळे ते मुख्य पिकासाठी असलेल्या खतावरच फोफावत असते. वेळीच मशागत करून तणाचा बंदोबस्त करणे हा एकच उपाय शेताला सुस्थितीत आणण्यासाठी असतो.

हीच प्रातिनिधिक गोष्ट आयुष्यात सगळीकडे लागू होते.

हिंदू धर्म आधी अफगाणिस्तान पासून अगदी इंडोनेशिया पर्यंत जेंव्हा पसरले होते तेंव्हाचा काळ वेगळा होता..त्यावेळी इतर धर्म अस्तित्वात नव्हते (जे आज प्रामुख्याने आहेत) आणि दळणवळणाची साधनेही कमी होती. जगात सध्याचे जे प्रमुख २ धर्म आहेत त्यांची विस्तारवादी भूमिका बघता आणि आपल्या धर्मातील लोकांची धर्माविषयीची अनास्था पाहता पुढील ५०-१०० वर्षांनी हिंदू धर्म धोक्यात नक्कीच असेल. परंतु एक जमेची बाब अशी की आज हिंदू धर्म आणि योग याविषयीचे पाश्चात्यांचे आकर्षण पाहता धर्म नाही तरी धर्मातील काही महत्वाची तत्वे जगामध्ये पोहोचत आहेत आणि लोक त्याचा स्वीकार करत आहेत.
आपली भूमी ही दिव्य साक्षात्कारी पुरुषांची आणि संतांची भूमी आहे त्यामुळे काळाच्या कसोटीवर आखडून असला तरी धर्म टिकून राहील असा विश्वास वाटतो. स्वामी विवेकानंद एकदा म्हणले होते की जगातून जर हिंदू धर्म नष्ट झाला तर धर्म आणि आध्यात्म यांचा पायाच नष्ट होईल आणि पर्यायाने जगसुद्धा. त्यामुळे संपूर्ण धर्म नष्ट होणे कदाचित खूपच अवघड गोष्ट असेल पण इतिहास पाहता एकजूट होउन आपल्या धर्मातील तत्वे, ज्ञान याची माहिती करून घेऊन ती पुढच्या पिढीला देणे ही आवश्यक बाब झाली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली धर्माची जी टिंगलटवाळी, विरोध सुरु आहे त्याला वेळीच आळा घातला नाही तर मात्र अवघड आहे.

अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स ह्या सारखी प्रगत राष्ट्र ख्रिस्त धर्म जास्त असणारे देश असतील पण ती Christan desh नाहीत.
सौदी,दुबई सारखी राष्ट्र मुस्लिम बहुल आहेत पण त्या देशात दुसऱ्या धर्मातील लोकांना बिलकुल त्रास नाही तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता.
पाकिस्तान,अफगाणिस्तान सारखे देश कट्टर धर्म वादी आहेत म्हणूनच मागास आहेत.
भारत हिंदू जास्त असलेला देश आहे म्हणून भारत हिंदू झाला पाहिजे असा विचार योग्य नाही.
प्रगती हवी असेल तर समानता हवीच .
पण हिंदू नी आपल्या धर्मावर होणाऱ्या टिके कडे बिलकुल दुर्लक्ष करू नये.
आपल्या परंपरा रीतिरिवाज सोडू नयेत.
मीडिया मध्ये जाणूनबुजून हिंदूच्या महान संस्कृती वर चर्चा घडवून आणल्या जातात आणि टिंगल टवाळी केली जाते त्याचे सडेतोड उत्तर दिले पाहिजे.
काही अती शाहने लोकांचा बुध्दी भेद करायचा प्रयत्न करतात त्यांचे डाव ओळखता आले पाहिजे.
हिंदू धर्म हा पहिल्या पासून विज्ञान वादीच आहे.
हिंदू धर्मात अनेक विषयावर ग्रंथ आहेत
मग आरोग्य असू ,समाजशास्त्र असू ध्या, वास्तू शास्त्र असू ध्या ,नाहीतर कामशास्त्र सर्व विषयच सखोल अभ्यास फक्त हिंदू धर्मात केला गेला आहे
बाकी कोणत्याच धर्मात असा अभ्यास झालेला नाही त्या मुळे बाकी धर्मीय हिंदू वर जळत असतात.
आणि आपल्या पुरातन विज्ञान ल धोतांड आहे असे सिध्द करण्याचा प्रयत्न करत असतात.
पण योग जगाने स्वीकारला आहे,

हो. त्याचे मूळ वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णूता यावरच संकट ओढावले आहे. सर्व प्रकारच्या बाह्य प्रभावांना पचवून सतत उत्क्रांत होत राहिलेला हा धर्म आता आतूनच पोखरला जात आहे. त्याची अंगभूत लवचिकता हा त्याचा दोष आहे असे भासवून त्याला जास्तीत जास्त कट्टर बनवण्याचा डाव आहे. एवढे मोठे अरिष्ट त्यावर याआधी कधीच आले नव्हते

त्याचे मूळ वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णूता यावरच संकट ओढावले आहे. सर्व प्रकारच्या बाह्य प्रभावांना पचवून सतत उत्क्रांत होत राहिलेला हा धर्म आता आतूनच पोखरला जात आहे. त्याची अंगभूत लवचिकता हा त्याचा दोष आहे असे भासवून त्याला जास्तीत जास्त कट्टर बनवण्याचा डाव आहे. एवढे मोठे अरिष्ट त्यावर याआधी कधीच आले नव्हते. >>>

लसावी...वरील गोष्टींची काही उदाहरणे आहेत काय? आणि आधी काय स्वातंत्र्य होते जे आता नाही हे समजून घ्यायला आवडेल

त्याची अंगभूत लवचिकता हा त्याचा दोष आहे असे भासवून त्याला जास्तीत जास्त कट्टर बनवण्याचा डाव आहे. एवढे मोठे अरिष्ट त्यावर याआधी कधीच आले नव्हते
>> असहमत. हिंदू बुळे आहेत हा समज काही लोकांचा बनू पहात होता. त्यांना योग्य समज मिळणं गरजेचं होतं.

पण बुळें नसणे म्हणजे कट्टर असणे असे होत नाही. त्यामुळेच मी उदाहरणे विचारली म्हणजे प्रतिसाद नक्की कुठल्या घटनांवर किंवा गृहितकांवर आधारित आहे हे समजेल...

इतरांनी धर्माचा अभिमान मिरवायचा, हिंदूंनी अभिमान बाळगला की हिंदूंना नावं ठेवायची हा कुठला न्याय आहे?

इतरांनी धर्माचा अभिमान मिरवायचा, हिंदूंनी अभिमान बाळगला की हिंदूंना नावं ठेवायची हा कुठला न्याय आहे?
हिंदू च बुध्दी भेद करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत .
हुशार लोकांना पैसे देवून खरेदी केले जात आहे.
हिंदू ना ज्ञान शिकवणारे हिंदू च आहेत.
ते पण उच्च शिक्षित.
निवृत्त अधिकारी,etc

जा मग तिकडे तू. पीडा जाईल भारताची. ते नित्यानंद तूला राजवैद्य म्हणून ठेवून घेतील. इथं कंपौंडरकीत तूझं काय भागत असेल?

लोकसंख्यावाढीचा दर हा धर्माशी निगडित नसून तो साक्षरता, रोजगार, आरोग्याच्या सोयीसुविधा, महिलांचे सक्षमीकरण यांच्यावर आधारित आहे. ज्या राज्यांमध्ये या घटकांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होते, त्या राज्यांत प्रत्येक धर्माचा जन्मदर कमी आहे. उदा. उत्तर प्रदेशचा जन्मदर ३.३ हा संपूर्ण भारताच्या २.२ या एकत्रित जन्मदरापेक्षा जास्त आहे. तर केरळचा जन्मदर १.८ आहे. या दोन्ही राज्यांमधील मुस्लिमांची लोकसंख्या २००१ ते २०११ मध्ये अनुक्रमे २५.१९ टक्के आणि १२.८३ टक्केने वाढली आहे. २०११च्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशची साक्षरता ६९.७ टक्के होती, तर केरळची ९३.९ टक्के होती. उत्तर प्रदेशमध्ये ४८.४ टक्के मातांना बाळंतपणाच्या सुविधा देण्यात आल्या, तर केरळमध्ये ९९.७ टक्के. २१ वर्षे वयावरील मातांचे प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये ४७.६ टक्के, तर केरळमध्ये ७४.९ टक्के होते. २००५-०६ मधील राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण-३ नुसार केरळमधील हिंदू जन्मदर १.५३ होता, तर मुस्लीम जन्मदर २.४६ होता. परंतु उत्तर प्रदेशमधील हिंदू जन्मदर ३.७३ पेक्षा केरळमधील मुस्लिमांचा जन्म दर कमी होता. अर्थात साक्षरता, आर्थिक परिथिती, रोजगार आणि आरोग्याच्या सुविधा यांचा जन्मदरावर प्रभाव पडतो, धर्माचा नव्हे.

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, लैंगिक शिक्षण, विकसित अर्थव्यवस्था, रोजगाराच्या संधी यांसोबतच सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सुधारली, तर लोकसंख्यावाढीच्या प्रमाणात कमालीची घट होईल, हे क्लिष्ट, परंतु बोलक्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. परंतु असे धोरण ठरविणाऱ्या धुरिणांनी पूर्वग्रहदूषित दृष्टी न ठेवता बहुसंख्याकांना भ्रामक आनंद देण्यापेक्षा उपरोल्लेखित पायाभूत घटकांकडे लक्ष द्यायला हवे.

लहान पोरांना आजादी लेके रहेंगे शिकवणारे माय बाप या भारतात असल्यावर हिंदु संकटात नसणार नाही तर काय? इतक्या लहापणीच विष ओतलय कानात. चड्डी सांभाळत जाणारं ते पोरगं वाट्टेल ते बडबडत होतं. ( व्हिडीओ पाहीलाय म्हणून लिहीले)

>>> जा मग तिकडे तू. पीडा जाईल भारताची. ते नित्यानंद तूला राजवैद्य म्हणून ठेवून घेतील. इथं कंपौंडरकीत तूझं काय भागत असेल? >>>

डोकेदुखीवर धनगराकडून जडीबुटी घेणारा राजवैद्य?

>>लहान पोरांना आजादी लेके रहेंगे शिकवणारे माय बाप या भारतात असल्यावर हिंदु संकटात नसणार नाही तर काय? इतक्या लहापणीच विष ओतलय कानात. चड्डी सांभाळत जाणारं ते पोरगं वाट्टेल ते बडबडत होतं.<< बरोब्बर !!!!!! कुणी काही म्हणा पण हा असा hatred कुठलाही, अगदी कुठल्याही जातीचा हिन्दू आपल्या पोरांना शिकवीत नाही. !!!!

हिंदू आणि प्रसारवादी धर्मांत हाच मुख्य फरक आहे. मुख्यतः अद्वैत तत्त्वज्ञान हिंदूंना अतिसहिष्णू बनवते. हे विश्वचि माझे घर ही शिकवण आपल्याला आपला धर्म देतो. कोणाही जीवाचा न घडो मत्सर ही संतांची शिकवण, एकनाथांनी यवन कितीतरी वेळा अंगावर थुंकला तरी क्रोध केला नाही ही शिकवण आपल्याला मिळते. दुसरीकडे आपल्याहून वेगळ्या ईश्वराची पूजा, उपासना पाप आहे व अशा लोकांना काहीही करून आपल्या धर्मात ओढावे नाही तर जीवे मारावे अशी शिकवण बालमनांवर धर्माची शिकवण म्हणून कोरली जाते.
ख्रिश्चनांमध्ये प्रॉटेस्टंट पंथ आहे पण तेही धर्मप्रसार आपलं काम आहे असं समजतात.

कुणी काही म्हणा पण हा असा hatred कुठलाही, अगदी कुठल्याही जातीचा हिन्दू आपल्या पोरांना शिकवीत नाही. !!!!.. असहमत. फक्त आपल्याच जातीतल्या मुलांशी लग्न करा, त्यांच्याशीच धंदा करा हे एक प्रकारे द्वेष पसरवणेच आहे. त्यात धर्म प्रसार हा हेतु नसेल ही पण द्वेष नाही असे कसे म्हणता?

Pages