इंदोरीकर महाराज नवा वाद

Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14

इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
आता नवा वाद निर्माण केला आहे. काय तर म्हणे अमुक तमुक तिथीला अमकं काम केले तर तमकं होते.
त्यांच्या वक्तव्याला विरोध करणारांना सोशल मीडिया वर शिव्या दिल्या जात आहेत आणि बहुसंख्य लोक इंदोरीकर महाराज देशमुख यांना सपोर्ट करत आहेत. पण ते स्वत: बॅकफूटवर आले तरीही आपण चुकीचं बोललो नाही असे म्हणतात.
पुढे काय होते ते पाहणं आपल्या हाती आहे. महाराज लोक आपण सर्वज्ञ असल्याचं भासवत काहीही रेटून बोलत असतात. हे म्हणजे पृथ्वी सपाट आहे असं काही लोकांना वाटतं तसं आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

१३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात स्त्री अत्याचाराच्या ज्या घटना असतात त्याची तुलना लोकसंख्या शी केली तर नगण्य म्हणता येईल.
आणि असे गुन्हे करणारे हे गुंड वृत्तीचे लोक असतात पुरुष प्रधान संस्कृती शी त्याचा काही संबंध नाही
उलट संस्कृती आणि धर्म ह्या मुळे स्त्री चे रक्षणच होते

होय बरं का राजेश भाऊ. स्त्रीला बुरख्यात ठेवले पाहिजे आणि शिक्षण वगैरे बंद करून घरात कोंडले पाहिजे. असंच ना? तालिबानी खरंच स्त्रियांना किती सुरक्षित ठेवतात हो धर्माच्या आधारे?

होय बरं का राजेश भाऊ. स्त्रीला बुरख्यात ठेवले पाहिजे आणि शिक्षण वगैरे बंद करून घरात कोंडले पाहिजे. असंच ना? तालिबानी खरंच स्त्रियांना किती सुरक्षित ठेवतात हो धर्माच्या आधारे?

असे मी कुठेच म्हटलं नाही

संस्कृती आणि धर्म स्त्री वर अत्याचार करा सांगतो?

नाही तुमची काहीतरी गफलत होत आहे.
पर स्त्री ही माते सामान असते
स्त्री वर हात उचलू नका ,स्त्री वर हात उचलणारा पुरुष मरयादापुरुषोत्तम असूच शकत नाही.
सेक्स ची भावना कोणकोणत्या स्त्री शी ठेवू नये हे सुधा धर्म आणि संस्कृती सांगते

वाळुंज साहेब
तुमच्या धाग्यावर आमची उपस्थिती खटकत नाही ना.
नाही तक्रार कराल admin कडे

कीर्तनकार कसे असतात ? याची व्याख्याच जिथे करवत नाही ते कीर्तन म्हणजे इंदुरीकरांचे. सातत्याने महिलांचा अपमान करणे, पांचट भाषा वापरणे, भेदभावा संदर्भात संदेश देणे.यासंदर्भात सुरुवातीला मी जे बोललो ते योग्यच बोललो ,ग्रंथाचा आधार घेऊन बोललो असे सांगणारे अचानकच पलटले आणि मी ते वाक्य बोललोच नाही असे लेखी लिहून दिले आणि तिथेच आणखी खोलात पाय अडकायला सुरुवात झाली. जरी पीसीपीएनडीटी आणि सायबर सेलने तुर्तास दिलासा दिला असला तरी अनेक कीर्तने सध्या पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर तृप्ती देसाईंची दहशत आहे, कारण महिला सन्मानासाठी आम्ही मागेपुढे पाहत नाही हा आमचा पण इतिहास आहे. >> तृप्ती देसाई

Pages