इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
आता नवा वाद निर्माण केला आहे. काय तर म्हणे अमुक तमुक तिथीला अमकं काम केले तर तमकं होते.
त्यांच्या वक्तव्याला विरोध करणारांना सोशल मीडिया वर शिव्या दिल्या जात आहेत आणि बहुसंख्य लोक इंदोरीकर महाराज देशमुख यांना सपोर्ट करत आहेत. पण ते स्वत: बॅकफूटवर आले तरीही आपण चुकीचं बोललो नाही असे म्हणतात.
पुढे काय होते ते पाहणं आपल्या हाती आहे. महाराज लोक आपण सर्वज्ञ असल्याचं भासवत काहीही रेटून बोलत असतात. हे म्हणजे पृथ्वी सपाट आहे असं काही लोकांना वाटतं तसं आहे.
इंदोरीकर महाराज नवा वाद
Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कमी शहाण्या माणसाने अति
कमी शहाण्या माणसाने अति शहाण्यांना शिक्वू नये.
बसा मग आपसात खेळत कोण्ही
बसा मग आपसात खेळत .
आणि स्वतःच खुश व्ह समविचारी लोकांचे अमूल्य विचार ऐकून.
कोणी ही ह्या धाग्यावर उपस्थिती लावणार नाही जे योग्य विचाराचे आणि स्वतःची बुध्दी चालवणारे आहेत ते .
तुम्ही एक विचारी मंडळी करा चर्चा
म्हंजे ज्यांनी आतापर्यंत
म्हंजे ज्यांनी आतापर्यंत उपस्थिती लावली ते योग्य विचार करणारे आणि खुदकी बुध्दी चालवणारे होते की नव्हते राजेश एक आठाठ
पुणे किंवा मुंबई शहरात
पुणे किंवा मुंबई शहरात माणसाचा आय क्यू ( बुध्दीमत्ता निर्देशांक) तपासायची सोय असेल तर कळवा. राजेश १८८ या माणूसरुपी आयडीचा आय क्यू मला तपासून घ्यायचा आहे. काय लागेल तो खर्च मी करीन.
'x' स्त्री (फक्त तिचे विचार
'x' स्त्री (फक्त तिचे विचार आपल्याला पटत नाहीत म्हणून) 'y' ची बटिक (याचा अर्थ माहित असेलच..) आहे असे म्हणणे हा कुठल्या ॲंगलने स्त्रियांचा सन्मान करणे आहे? राजेश, काय वाट्टेल ते बोलताय तुम्ही.
एक निरीक्षण आहे. मुलींचे
एक निरीक्षण आहे. मुलींचे प्रमाण कमी होणे, अवास्तव हुंडा मागणे हे आहेच.
मुलगाच होण्याच्या युक्त्या कुणी सांगणे यास कारण काय असेल?
महाराजांनी वक्तव्यातून माघार घेतली तरी समाजातून विचार जाणे हे गरजेचे आहे.
असो. तर परिस्थिती बदलो हीच अपेक्षा.
धन्य आहे. हे जे इंदोरीकर
धन्य आहे. हे जे इंदोरीकर महाराज म्हणलेत ते गुरु चरीत्रात आहे. त्यांनी त्याचा दाखला न देता नुसतेच म्हणले त्यामुळे जाम गदारोळ झाला. आता त्या तृप्ती देसाई ला म्हणावे, की ज्यांनी गुरु चरीत्र लिहीले त्यांच्याशी जाऊन पण भांडुन ये.
श्री गुरु चरीत्र अध्याय ३७ यातले पान क्रमांक २५२-२५३ आहे. बेळगावच्या श्रीमती शीला चोळापचे यांनी हे शोधले / लिहीले आहे. मला कायप्पावर आले म्हणून् त्यांचे नाव दिलेय.
पुराणातली वांगी पुराणात अशी
पुराणातली वांगी पुराणात अशी म्हण उगाचच नाही पडली. एक हिंदू धर्मीय म्हणून मला काही लोक ओढून ताणून पुराणातील सर्व गोष्टी सत्य असल्याचे ठासून लिहितात, बोलतात या गोष्टीचा त्रास होतो.
पुराणातली वांगी पुराणात >>>>>
पुराणातली वांगी पुराणात >>>>> वांगी नव्हे वानगी!
गर्भलिंग तपासणी बेकायदेशिर
गर्भलिंग तपासणी बेकायदेशिर आहे, मुलींना घरात्/समाजात दुय्यम स्थान आहे, मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे आणि हा सामाजिक प्रश्न आहे.
हे सगळं मान्य आहे.
,माझा प्रामाणिक प्रश्न -
'मुलगा किंवा मुलगी होण्यासाठी प्रयत्न करणे' - अर्थात कायद्यात बसणारे, पशूबळी/नरबळी/तंत्र इ. प्रकार नसलेल्या गोष्टी करणे हे बेकायदेशीर आहे का?
सध्या कोणीही 'मला मुलगा हवा आहे' अशी साधी इच्छा जरी व्यक्त केली तरी त्याव्यक्तीवर सगळे तूटून पडतात.
इंदुरीकर हे कीर्तनकार आहेत, ते हुंडा घेउ नका, लग्नात उधळपट्टी करू नका, दारू पिउ नका, शेतकर्यांनी जोड-धंदे करा, कामाला लाजू नका असं बरच काही सांगत असतात. मुला / मुलींच्या वाइट वर्तवणूकीबद्दल आई-वडिलांवर ताशेरे ओढतात. मुलींनी केलेल्या प्रगतीचं बरंच कौतुक सुद्धा करत असतात. बलात्कारा सारख्या गुन्ह्यासाठी मुलग्यांच्या आई-वडिलांच्या संस्काराला दोष देतात.
कोणत्या गोष्टीला किती किंमत द्यायची हे शेवटी ऐकणार्यावर आहे.
प्रत्येक गोष्टीत अंधश्रद्धा वगैरे शोधायला गेलं तर चांदोबा मासिक, हॅरी पॉटर इ. गोष्टींवर पण बंदी घालावी लागेल.
तृप्ती देसाई/भूमाता ब्रिगेड जरा हिंगण्घाट/ सिल्लोड सारख्या घटनेत लक्ष घालतील तर बरं होईल
हो ना! थोडे बरोबर, थोडी
हो ना! थोडे बरोबर, थोडी करमणूक. मुलगा न होण्याची चिंता रामायण काळापासून आहे. आता सर्वांनाचा तशी प्रसादाची खीर कशी मिळणार?
आमच्याकडे वांगी म्हणतात वो.
आमच्याकडे वांगी म्हणतात वो.
इंदोरीकर महाराज किर्तनकार
इंदोरीकर महाराज किर्तनकार झाले नसते तरी काय फरक पडला नसता.
ही तर पुराणातली वांगी
ही तर पुराणातली वांगी
Maharashtra Times | Updated: 11 Jan 2015, 12:17:00 AM
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणारे कितीतरी प्रकार घडले. प्राचीन ग्रंथांचे दाखले देत विज्ञानाच्या वेष्टनात गुंडाळून अवैज्ञानिक दावे केले गेले. या सगळ्याला ‘पुराणातली वांगी’ या पलीकडे कसलाही आधार नाही, उलट समाजाला स्मरणरंजनात गुंतवून ठेवत देशाला मागे खेचण्याचा हा प्रकार आहे.
बाळ फोंडके यांचा लेख आहे .
बाळ फोंडके यांचा लेख आहे .
बाळ फोंडके एकटेच कायकाय करणार
बाळ फोंडके एकटेच कायकाय करणार?
'मी तसं बोललोच नाही...',
'मी तसं बोललोच नाही...', इंदोरीकर महाराजांनी केला अजब दावा
इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे.
SHARE THIS:
NEWS18 LOKMAT
LAST UPDATED:FEBRUARY 20, 2020, 7:07 PM IST
अहमदनगर, 20 फेब्रुवारी : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर यांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. 'यूट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंगदेखील करत नाही. मी तसं वक्तव्य केलं नाही,' असा दावा या उत्तरात इंदोरीकर महाराजांनी केला आहे.
'मी ते वाक्य बोललोच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यात कीर्तन केलं नाही. मी समाज प्रबोधन करत असल्याने महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाला आहे. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,' असं म्हणत इंदोरीकर महाराजांनी आपली बाजू मांडली आहे
इंदोरीकरांवर कारवाई होणार?
इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठं रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई होणार का, यावर चर्चा सुरू आहे. यावर बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप मुरंबिकर म्हणाले की, 'इंदोरीकर महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी तसं बोललं नसेल तर उत्तर समाधानकारक आहे. मात्र ज्या वर्तमानपत्रात इंदोरीकर महाराज यांनी असं वक्तव्य केल्याचं छापून आले आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही नोटीस पाठवली आहे की, तुम्ही कोणत्या आधारे असा दावा केला आहे. त्यांनी मात्र उत्तर अजून दिले नाही. त्यांनी पुरावे द्यावे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही.
काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज?
'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाइमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,' असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटल्याचं एका व्हिडिओत दिसत आहे.
पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी
पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, कुंभकर्ण आणि शूर्पनखा जन्माला आले,
ती इच्छा कैकसेची होती, पुलत्स्य बोललेही होते की मुले राक्षस कुलीन होतील, तरी त्यानी कैकसेची इच्छा पूर्ण केली,
पण नंतर कैकसीला पश्चाताप झाला , व ऋषिनीही एक चांगला पुत्र होईल असा आशीर्वाद दिला व बिभीषण झाला.
( मुळात कैकसी राक्षस कुलीनच होती , तिने कधीही मुले जन्माला घातली तर ती तिच्याच कुलातली होणार ना ? रावणपिता पुलत्स्य यजुरवेदी होते)
म्हणजे आंतरजातीय विवाह होता
म्हणजे आंतरजातीय विवाह होता की तो, आंतरवर्णीय म्हणावं काय?
ही घ्या लोकसत्ता मधील ताजी
ही घ्या लोकसत्ता मधील ताजी बातमी.
नेमकं काय म्हणाले कृष्णस्वरुप दासजी
"ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत"
" मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसं? " असंही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं आहे
Submitted by Sharadg on 18 February, 2020 - 11:51
हे जे कृष्ण स्वरूप दास आहेत त्यांच्या संस्थेने चालवलेल्या काँलेज मधे मुलींची कपडे काढून (घ्रुणास्पद) तपासणी केली होती. त्यावर त्याने वरिल विधान केले आहे
shocking! bhuj college forces girl students to strip to check if they were menstruating - भुज: खुले में पड़ा मिला सैनिटरी पैड, प्रिंसिपल ने 68 कॉलेज छात्राओं के कपड़े उतरवाकर ली तलाशी, Watch news Video | Navbharat Times - https://navbharattimes.indiatimes.com/video/news/shocking-bhuj-college-f...
खबर पसंद आई तो Navbharat Times ऐप डाउनलोड करें https://go.onelink.me/cMxT/b256ac1
https://youtu.be/H_DNHTNQtKI
https://youtu.be/H_DNHTNQtKI
Indurikar कीर्तनात बऱ्याच
Indurikar कीर्तनात बऱ्याच गोष्टी बोलतात.
त्या मध्ये मुलगा आणि सूनेकडून आई वडिलांचा छळ ह्या पासून दारू पिण्या मुळे संसाराची होणारी हानी,
नोकरी पेक्षा धंधा करा,उनाड पने पुढारी लोकांच्या पाठी फिरू नका खूप वेगवेगळ्या विषयावर बोलून ते समाजातील वाईट प्रवृत्ती वर हल्ला चढवत असतात.
आणि त्यांच्या विनोदी भाषे मुळे लोकांना त्यांची चूक सुधा समजते आणि त्यांचा राग सुद्धा येत नाही.
सम आणि विषम तारखेला संग केल्या मुळे मुलगा होईल किंवा मुलगी होईल असे ते बोलले असतील तर लगेच काही सर्व लोक तो प्रयोग करणार नाहीत किंवा ते बोलले म्हणजे ते सत्य च आहे असे सुधा कोण्ही समजणार नाही.
आता लोक शिकलेली आहेत समजदार आहेत y किंवा x chromosomes che kary sarvana mahit aahe.
जनतेला काही कळतच नाही अशी खूप लोकांची धारणा आहे त्या मुळे टीव्ही वर पण काही अती शाहणे xy chromosome che ज्ञान
पाजळत असतात जसा हा शोध ह्यांनीच लावला आहे आणि बाकी लोकांना काही माहीतच नाही
इंदुरिकार जे बोलले त्या वर जास्त पॅनिक होण्याची गरज नाही.
जी लोक विरोध करायचा आव आणत आहेत मुळात त्यांचा हेतू हा शुध्द नाही इंदुरीकर् च्य आडून ते हिंदू धर्मावर टीका करत आहेत आणि त्यांचा मूळ उद्देश च हिंदू धर्म बदनाम करणे हा आहे.
समाजहित शी त्यांचे काही देणेघेणे नाही .
आणि त्या मुळेच हिंदू नी इंडूरीकर च्या पाठीमागे राहिले पाहिजे.
सतत कोणत्या कोणत्या कारणाने हिंदू धर्मावर चर्चा घडवून आणायची,आकड तांडव करायचे आणि हिंदू ना बदनाम करायचे हे मोठ्या षडयंत्र चा भाग असावा अशी शंका यावी एवढ्या मोठ्या प्रमाणात ते चालू आहे
समाजातील वाईट प्रवृत्तीनवर
समाजातील वाईट प्रवृत्तीनवर हल्ला करायला हरकत नाही पण मग त्यांनी स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेऊ नये. कीर्तनाचा मूळ उद्देश अध्यात्मिक प्रबोधन आणि लोकांना ईश्वरभक्तीकडे वळवणे हा असतो. कीर्तन करताना मुख्य गाभा आध्यात्मिकच राहिला पाहिजे. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात अध्यात्मिक संदेश कमी आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलणे जास्त असते.
आनि तसाच एक आहे कि होता..ते
आनि तसाच एक आहे कि होता..ते आरारारारा अस काहि तरी म्हनुन जुन्या व्याधि, तसेच मोठे रोग बरे करनारा...पुष्पा दीवाड्करफेम
किर्तनकाराचं मुख्य काम
किर्तनकाराचं मुख्य काम समाजाला ईश्वराभिमुख करणं आहे. नवविध भक्तीचे प्रकार सांगून लोकांमध्ये प्रेम, सहिष्णुता, बंधुता वाढेल असे कार्य करणं.
इंदोरीकर यांनी फक्त समाजप्रबोधन करावं. किर्तनाचा बाज सोडून एक पात्री प्रयोग सुरू करावेत. किर्तनात थिल्लरपणा अपेक्षित नाही.
ते आता संयमित विंचु चावला
ते आता संयमित विंचु चावला विंचु चावला हो किर्तनं भारुडं सादर करतील.
ठेच लागली की मग माणूस नीट
ठेच लागली की मग माणूस नीट खाली पाहून चालतो.
कीर्तनाचा मूळ उद्देश
कीर्तनाचा मूळ उद्देश अध्यात्मिक प्रबोधन आणि लोकांना ईश्वरभक्तीकडे वळवणे हा असतो. कीर्तन करताना मुख्य गाभा आध्यात्मिकच राहिला पाहिजे. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात अध्यात्मिक संदेश कमी आणि बाकीच्या गोष्टींबद्दल बोलणे जास्त असते.>>>>>
कीर्तनाचा मूळ उद्देश हाच होता यात शंका नाही. पण मुळात अध्यात्माकडे वळण्यासाठी आधी वाईट व्यसने, कलह, दुर्बुद्धी नष्ट व्हायला हवी. त्यासाठीही प्रबोधन व्हायला हवे. ते कसे होणार? कीर्तन ही एक सोय आहे, तिथे चांगले विचार कानी पडले तर बरेच आहे.
इंदुरीकर महाराजांनी दारू पिऊ नका म्हटले ते किती जणांनी ऐकले? किती सासवा सुनांनीं भांडणे मिटवून गळ्यात गळे।घातले? मग किती जण सम विषम बघणार आहेत? नंतर परदेशात जाऊन किंवा देशातच चोरून गर्भलिंगनिदान करण्यापेक्षा सम विषम कमी धोकादायक आहे. महाराजांनी मुलगा मुलगी भेद करू नका हे ज्ञान आधी दिले असणारच. तरीही जे लोक सुधारत नाहीत त्यांच्यासाठी सम विषम डोस.
लोक ज्या आवेशाने सम विषम वर तुटून पडले तितक्या आवेशाने स्वतःच्या गावात/तालुक्यात/शहरात असलेल्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर तुटून पडले तर प्रबोधनापेक्षाही थेट काम होईल. पण प्रत्यक्ष हा धंदा करणाऱ्यांविरुद्ध समाज कायम गप्प बसतो हे बघितले आहे. माहीत सगळ्यांना असते पण कोणी बोलत नाहीत. अमुक डॉक्टरला पकडले हे पेपरात वाचायला मिळते, तो काही दिवसात सुटून येतो, त्याचे लायसेन्स रद्द झाले असेल तर दुसऱ्या डॉक्टरच्या नावाखाली धंदा सुरू ठेवतो पण समाज अशावेळी गप्प बसतो. समाजाला कंठ तेव्हाच फुटतो जेव्हा त्याला स्वतःचा काहीतरी व्यक्तिगत फायदा दिसतो.
मुलींची कमी होणाऱ्या संख्येवर
मुलींची कमी होणाऱ्या संख्येवर सुद्धा indorikar महाराजांना अनेक वेळा कडक ताशोरे ओढले आहेत .
आता येथून पुढे मुलांना लग्नाला मुलीचं
च मिळणार नाहीत असे कीर्तन ना मधून समाजाला सुनावले आहे आणि मुलींच्या कमी होणाऱ्या समस्येवर बोट ठेवलं आहे.
रांग लावावी लागेल मुलींच्या घरासमोर.
आणि मुली उत्तम शिक्षण घेवून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि मुल व्यासणात जीवन बरबाद करत आहेत हे त्यांनी खूप वेळा सांगितलं आहे.
स्त्री पुरुष भेदभाव त्यांच्या मनात सुद्धा नाही.
लोक ज्या आवेशाने सम विषम वर
लोक ज्या आवेशाने सम विषम वर तुटून पडले तितक्या आवेशाने स्वतःच्या गावात/तालुक्यात/शहरात असलेल्या गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांवर तुटून पडले तर प्रबोधनापेक्षाही थेट काम होईल.
>> भारतात स्त्री सुरक्षित नाही, अजाण बालिकांपासून ते वृद्ध स्त्रिया अत्याचाराला बळी पडतात. मुलगी लग्न होऊन सासरी जाते हे बंद करून तिला वाटेल तसं जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सक्तीनं आईवडिलांच्या मालमत्तेचा वाटा तीला गेलाच पाहिजे. समाजानं स्त्रिला दुर्बळ बनवलं आणि तिची अब्रू घराण्याची प्रतिष्ठा बनवली. कायदा कडक नसल्याने गुन्हेगार अत्याचार करु धजावतात. निर्भयाच्या गुन्हेगारांना एका आठवड्यात फाशी दिली असती तर गुन्हेगारांना वचक बसला असता. समाजाच्या दुटप्पी वागण्यामुळे मुलगी झाली तर संकट मागं लागेल या मनोवृत्तीचे अडाणचोट लोक मुलीचा गर्भ नष्ट करु पाहतात. स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनल्या की बरेच प्रश्न सुटतील.
Pages