इंदोरीकर देशमुख महाराज हे किर्तनकार म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. मला तरी हा माणूस किर्तनकार कधीच वाटला नाही. माझ्या बालपणापासून मी हरिनाम सप्ताहात किर्तन, प्रवचन ऐकत आलो आहे. मला घडवण्यात या किर्तनांचा मोठा वाटा आहे.
बाबामहाराज असोत किंवा खेड्यातील प्रसिध्दी न मिळालेले किर्तनकार असोत. या पंथाची एक डिग्निटी सांभाळली होती या लोकांनी.
हा इंदोरीकर महाराज सासू सून भांडण, बेवडे, पोरींची लफडी याच्याशिवाय काही बोलतच नाही. किर्तनकारानं आपल्या प्रगल्भ आणि अहंकार रहित आचरणातून समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.
आता नवा वाद निर्माण केला आहे. काय तर म्हणे अमुक तमुक तिथीला अमकं काम केले तर तमकं होते.
त्यांच्या वक्तव्याला विरोध करणारांना सोशल मीडिया वर शिव्या दिल्या जात आहेत आणि बहुसंख्य लोक इंदोरीकर महाराज देशमुख यांना सपोर्ट करत आहेत. पण ते स्वत: बॅकफूटवर आले तरीही आपण चुकीचं बोललो नाही असे म्हणतात.
पुढे काय होते ते पाहणं आपल्या हाती आहे. महाराज लोक आपण सर्वज्ञ असल्याचं भासवत काहीही रेटून बोलत असतात. हे म्हणजे पृथ्वी सपाट आहे असं काही लोकांना वाटतं तसं आहे.
इंदोरीकर महाराज नवा वाद
Submitted by आर्यन वाळुंज on 16 February, 2020 - 10:14
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
समाजातच पुत्रसंततीचे महत्त्व
समाजातच पुत्रसंततीचे महत्त्व वाढत गेल्याने त्याच्या पूर्तीसाठी उपाय करणारे निर्माण होणारच.
मग एक्स अनै वाय क्रोमोजोम्सच
मग एक्स अनै वाय क्रोमोजोम्सच काही काम च नाही .
https://www.facebook.com
https://www.facebook.com/106934297331792/posts/184250892933465/
हा व्हिडिओ बघा मंडळी.
काय हे अंधश्रद्ध लोक्स! बाबा
काय हे अंधश्रद्ध लोक्स! बाबा म्हणला काहिबतर लग्गे केस टाकून आरडाओरड
महाराज खूप हुशार निघाले.
महाराज खूप हुशार निघाले. चांगल्या कामाला प्रसिद्धी भारतात कधीच मिळत नव्हती. पण वाईट किंवा वादग्रस्त कामाला मात्र लगेच प्रसिद्धी मिळते. महाराजांच्या पुढच्या प्रवचनाला आता दुप्पट गर्दी होणार, आता काय पुड्या सोडणार ते ऐकायला.
समाजातच पुत्रसंततीचे महत्त्व
समाजातच पुत्रसंततीचे महत्त्व वाढत गेल्याने त्याच्या पूर्तीसाठी उपाय करणारे निर्माण होणारच.>>>
सहमत.
उपाय महाराज लोकांनी निर्माण
उपाय महाराज लोकांनी निर्माण केले. की
विज्ञान नी रस्ता दाखवला हे पाहिले ठरवा. आणि डॉक्टर लोकांनी त्याचा उपयोग करून लोकांना सुविधा. दिली
मागणी तशी पुरावढा.
इथे कायद्यांनी प्रतिबंध केला तरी हा उद्योग शिक्षित समाजानी चालूच ठेवला.
काही महाभाग तर दुबई ल जावू लागले ह्या कामासाठी .
जिथे बंधी नाही.
ह्या मध्ये महाराज लोकांचा काहीच रोल नाही.
साप म्हणून भुई ल thoptayche उद्योग बंद करा.
https://twitter.com
https://twitter.com/IndianAtheists/status/1229050138397696001?s=19
"When a woman delivers twins, one breast will produce one type of milk and the other will produce other type of milk" - Actual quote from Jaggi
This guy is invited to national conference of Gynaecologists as a speaker.
लवकरच आपल्या इंदोरीकर महाराजांना देखील गायनाकोलॉजिस्ट च्या कॉन्फरन्स ला बोलावतील अशी आशा आहे _/\_
तो व्हिडीओ इथे बघू शकता
https://twitter.com/samjawed65/status/1229458893954330626?s=19
अरे चांगलं सांगू सांगू ह्या
अरे चांगलं सांगू सांगू ह्या बाबाचं नरडं दुखाया लागलं,
पण लोकांनी काय घेतलं ? सम विषम तिथी ?
आपल्यालाच ह्यात लै इंटरेस्ट ..
असही ह्या माणसाच्या २ वर्षाच्या तारखा बुकये,
तुमच्या प्रसिद्धीची अगरबत्ती कुड ओवाळत्या ?
असो.. आपल्याला काय चालू द्या
काँग्रेस सत्तेत सहभागी आणि
काँग्रेस सत्तेत सहभागी आणि त्यात परत राष्ट्रवादी ह्या दोघांचे मिश्रण सत्तेवर आहे त्या मुळेच असे वाद निर्माण केले जात आहेत.
तृप्ती पण ह्या पक्षांचीच छुपी एजंट
अहमदनगर, 18 फेब्रुवारी : हभप
अहमदनगर, 18 फेब्रुवारी : हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना इंदोरीकरांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले होते. यानंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी मत व्यक्त केली होती. मात्र इंदोरीकरांनी माफी मागत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एक पत्र जारी केले आहे.
ब्राह्मण समाजात काही वर्ग
ब्राह्मण समाजात काही वर्ग प्रगत होऊन नवमतवादी व जुन्या परंपरा टाकून देत आहे, त्यांचे "प्रबोधन "करण्यासाठी त्या कोण एक बाई रामतिर्थकर आहेत त्या सतत काहीनाकाही बोलत असतात .महाराष्ट्रातल्या सरंजामदार समाजातही हा नवमतवाद येऊ नये म्हणून आत्तापासूनच काळजी घेतली जात आहे. याचे कस्टमरही सरंजामी समाजातलेच आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा इंदुरीकर पुढे आला आहे.समाजाने परपरांना चिकटून रहावं ,जोखड वागवत रहावं त्यासाठी हा प्रयत्न आहे. यापाठीमागे मोठं फंडींग असावं असे वाटते.
फंडिंग वगैरे नाही. एका
फंडिंग वगैरे नाही. एका किर्तनाचे मानधन पन्नास हजार रुपये आसपास घेतात असे ऐकले आहे.
साधं महिलांचं भजनी मंडळ पाच
साधं महिलांचं भजनी मंडळ पाच दहा हजार रु अधिक जेवण अधिक जाण्यायेण्याचा वाहन खर्च घेते.
---------
बाकी महाराजांनी माफीमाघार घेतली आहे तरी आपणही घेऊ. कस्सं?
म्हणूनच मी धागा उडवा अशी
म्हणूनच मी धागा उडवा अशी विनंती अॅडमीन यांना केली होती.
बाबा महाराज सातारकर हे माझ्या
बाबा महाराज सातारकर हे माझ्या समाजातील आहेत. ते तर लग्नात उपस्थिती व आशीर्वाद देण्याचेही मानधन घ्यायचे अशी वदंता आहे.
आणि त्या अपर्णा रामतीर्थकर बाई तर अशक्य आहेत. 5 वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने त्यांच्या भाषणात त्यांच्या समोरच आक्षेप नोंदवला होता.
मग पुढं काय झालं? काय
मग पुढं काय झालं? काय म्हणाल्या अपर्णा रामतीर्थकर ताई?
आताच मी एका वारकरी संस्थेला
आताच मी एका वारकरी संस्थेला इमारत बांधण्यासाठी दहा हजार रुपये देणगी दिली. नंतर काही लोकांनी सांगितले की महाराजांनी कोटी रुपये जमवले आहेत आणि नातेवाईकांना वेगळ्या संस्था काढून दिल्या आहेत. संस्थेतील मुलांना माधुकरी मागायला लावतात वगैरे. पण मी म्हटलं जावू दे निदान धर्म तर नाही बदलला ना?
गमतीची गोष्ट आहे कि नाही.
गमतीची गोष्ट आहे कि नाही.
कारण स्त्रीबीज जेंव्हा बीजांडकोषातून बाहेर पडते ते फक्त १२ ते २४ तास फलन होऊ शकते.
तेंव्हा जर स्त्रीचे ऋतू चक्र २८ दिवसाचे असेल तर हे स्त्रीबीज १४ व्या दिव शी , ३० दिवसांचे असेल तर १६ व्या आणि ३२ दिवसांचे चक्र असेल तर २८व्या दिवशी बाहेर पडते.
म्हणजेच ऋतू चक्र २८ दिवसाचे असेल तर मुलगाच हवा म्हणून २-४-६-८-१० आणि १२ व्य दिवशी केलेला संबंध निरुपयोगी असतो. तसेच १६-१८-२०-२२-२४-२६ हेही दिवस असेच भाकड असतात.
इथे आम्ही वर्षानुवर्षे वंध्यत्वाच्या रुग्णांना केंव्हा संबंध ठेवायचे ते सांगत असतो. त्यात हे असलं सम विषम निघाला तर अजूनच गडबड होईल
https://www.yourfertility.org.au/everyone/timing
बाकी इंदुरीकर महाराजांबद्दल मला काहीच माहिती नाही. तेंव्हा शास्त्रीय माहिती सोडून सगळ्याला आपला पास
ही घ्या लोकसत्ता मधील ताजी
ही घ्या लोकसत्ता मधील ताजी बातमी.
नेमकं काय म्हणाले कृष्णस्वरुप दासजी
"ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत"
" मी याआधी तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही सल्ला दिलेला नाही. आपल्या धर्मातल्या काही गोष्टींबाबत बोलू नका असे मला काही संत सांगत असतात. मात्र मी याबद्दलच बोललो नाही तर लोकांना समजणार कसं? " असंही स्वामी कृष्णस्वरुप यांनी म्हटलं आहे
कृपया हलके घेणे,
कृपया हलके घेणे,
प्रत्येक सासू चे म्हणणे असते, की तीचा मुलगा बायकोच्या हातचा नंदीबैल आहे.
"ज्या स्त्रीला मासिक पाळी आली
"ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल. अशा महिलांच्या हातचं तुम्ही खात असाल तर त्या गोष्टीला तुम्हीच जबाबदार आहात. शास्त्रात याबाबत अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्न होण्याच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टी माहित असल्या पाहिजेत"
>>>>
हे बहुधा लोकांना घाबरवून हायजिन कसे जपले जाईल आणि त्या दिवसांत महिलांनाही जरा कामापासून सुटका मिळेल हे बघायला असे पसरवले असावे.
असं मागे मी मायबोलीवरच एका चर्चेत वाचलेले.
पण अज्ञानी लोकांना असे काही सांगणेही घातक. आहे. याचा साईड ईफे क्ट म्हणजे यात स्त्रियांचे अवमूल्यनही झाले.
महाराजांनी हे सांगितलं का की
महाराजांनी हे सांगितलं का की सम किंवा विषम तारीख ही इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे घ्यायची की पारंपरिक भारतीय/हिंदू कॅलेंडर प्रमाणे? बऱ्याचदा दोन्हीत मेळ नसतो म्हणजे इंग्रजी तारीख विषम असेल तर हिंदू कॅलेंडरप्रमाणे तारीख सम असते किंवा vice versa
का चायनीज कॅलेंडरप्रमाणे?
का चायनीज कॅलेंडरप्रमाणे?
ज्या स्त्रीला मासिक पाळी आली
ज्या स्त्रीला मासिक पाळी आली आहे, तिने स्वयंपाक केला तर तिला पुढचा जन्म कुत्रीचा येईल. तिने केलेलं जेवण जो पुरुष जेवेल त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल.
>> मी तर एका मुर्खानं लिहिलेले वाचले होते की, जर एकादशीला जेवण केले तर ते आईच्या खाटेवर जाण्यासारखे पाप आहे. इतकं नीच आणि मुर्खतापुर्ण अकलेचे तारे तोडणारे लोक आहेत आपल्या धर्मात. याच गोष्टींमुळे हिंदू समाज देवभोळा, कर्मकांडी बनून दुष्टचक्रात अडकला होता. धन्य त्या खऱ्या समाजसुधारकांची ज्यांनी वाईट गोष्टींची हकालपट्टी केली.
वाईट गोष्टींची हकालपट्टी
वाईट गोष्टींची हकालपट्टी व्हायला खूप अडचणी आहेत. समाजच किडला आहे.
१) प्रापर्टी मुलाकडे जाते. आता कायद्याने तिचा वाटा आहे पण तो प्रापर्टी विकतानाच मिळू शकतो.
२)मुलग्यावर सासूचा अधिकार पहिला. तो जर सून काढून घेतेय असं वाटलं तर मुलाचा नंदीबैल केला गं हिने ही ओरड सुरू.
३) स्त्री भृण हत्या करू नका हे महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मप्र वगैरे राज्यांत सतत सांगितले जाते याचे कारण काय?
४) गुप्त धन मिळणे, मुल होणे यासाठी जादुटोणा प्रकार अजूनही प्रचलित आहेत.
समाज किडला आहे.
समाज किडला आहे.
समाज म्हणजे कोण्ही परग्रहवासी नाहीत .
आपणच आहोत .
स्वतः मध्ये बदल करा समाज आपोआप सुधारेल.
मी सोडून बाकी सर्व लोक चुकीची वागतात असा विचार हस्ययपद आहे
अहमदनगर : ‘भूमाता ब्रिगेड
अहमदनगर : ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्ह्यात पाय ठेवून दाखवाचं, असं आव्हान देणाऱ्या शिवसेना कार्यकर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्मिता आष्टेकर यांना अहमदनगर पोलिसांनी सुपा टोल नाक्याजवळ ताब्यात घेतलं.(Smita Ashtekar Detained by police)
इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हा, शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असं आव्हान देसाईंना दिलं होतं.
तृप्ती देसाई अहमदनगरला येण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. परंतु नुसती माफी मागून काही होणार नाही, इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं देसाईंनी सांगितलं.
तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
इंदोरीकर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आमचं शिष्टमंडळ अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे इंदोरीकरांची बाजू घेतात, हे दुर्दैवी आहे. बच्चू कडू हे महिला आणि बालकल्याण विकास विभागाचे राज्यमंत्री आहेत, हाच एक विनोद आहे. ते वारंवार महिलांचा अपमान करतात, अशी टीका तृप्ती देसाई यांनी ‘टीव्ही9’ शी बोलताना केली
प्रत्यक्ष समाजावर इंदुरीकर
प्रत्यक्ष समाजावर इंदुरीकर महाराज ह्यांच्या वक्तव्याचा काहीच परिणाम होत नाही.
त्यांनी सांगितलं आणि जनतेनी आचरणात आणले अस प्रत्यक्ष दिसून येत नाही.
स्त्री वर जे नेहमी बलात्कार होतात आणि ते करणारे नालायक इंदुरिकर चे भक्त नाहीत तर गुंड आहेत त्यांना गोळ्या मारून .
मारून टाका.
महाराज indurikar ह्यांनी स्त्री अपमान कुठेच केला नाही.
कुटुंबात होत असलेली वृध्द लोकांची हेळसांड ह्या वर भाष्य केले आहे.
तरी अती शहाण्या लोकांनी हा धागा बंद करावा
तृप्ती देसाई कोणत्या राजकीय
तृप्ती देसाई कोणत्या राजकीय पक्षाची batik aahe he जगजाहीर आहे.
तिला काडी ची किंमत देण्याची गरज नाही
ती काही हुशार,समाज हिताचे काम करणारी स्त्री नाही
Pages