औरत की हँसी / सरिता स्निग्ध ज्योत्स्ना

Submitted by सामो on 5 February, 2020 - 11:19

मध्यंतरी कविताकोष साईटवरती एक कविता वाचनात आली होती . तिचा मतीतार्थ हा होता की स्त्रियांवरती जे अत्याचार होतात, त्यांना जखडून ठेवलं जातं ते काही नवीन नाही. फार पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. अर्थात काही ठळक उदाहरणे उदा - सीतात्याग माहीत आहेच परंतु द्रोपदीचे देखील 'हसणे'.
या हसण्यातून महाभारत घडले - अंध राजाचे पुत्रही अंध असतात हे माहीत नव्हते असे काहीसे उद्गार तिचे होते असे वाचल्याचे स्मरते.
हे वाक्य की एका स्त्रीमुळे महाभारत घडले हेच मुळी खटकण्यासारखे आहे.
ती हसली असेल हे मान्य आहे, तिचे उद्गारही मान्य आहेत. पण मुख्य ते घडले कारण ती स्त्री होती. आणि स्त्रियांनी (निखळ अथवा कुचेष्टेने) कसेही हसणे हे आपल्या समाजात मान्य नव्हते
एक स्त्री हसली हे आपल्याला महाभारत होण्याचे कारण म्हणून बिंबवले जाते. हेच मूळात चूकीचे आहे.
ती भले बोलली असेल, कुचेष्टेने हसली असेल पण दुर्योधन मूर्ख होता की इतका रिअ‍ॅक्टीव्ह अर्थात रड्या होता की त्याने वस्त्रहरणाची प्रत्यक्ष कृती घडवावी.
तिचे निव्वळ उद्गार होते त्याची प्रत्यक्ष कृती होती आणि तरीही आपण हे शिकतो की एका स्त्रीने महाभारत घडवले.
.
http://kavitakosh.org/kk/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%80_...
.
.
>>>>>>>>>शायद उस औरत को पता नहीं था
औरत के हँसने का मतलब
जो उसे जहन्नुम का रास्ता दिखाता है
उसने सुनी नहीं होगी
पांचाली की अनोखी कहानी
जिसकी उन्मुक्त हँसी
कठघरे में होती है खड़ी बार-बार
आज भी महाभारत रचने के जुर्म में
>>>>>>>

हा मुद्दा इतक्या वेळा महाभारताचा संदर्भ येउनही, माझ्या तरी लक्षात आलेला नव्हता. माझ्याकरता नवीन होता. तुमच्याकरता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो जी दुर्योधन तिला पत्नी बनवू इच्छित होता, पणात हरल्यावर द्रौपदी अर्जूनाची/ शत्रूची पत्नी झाली हे शल्य अगोदरच बोचत असेल. त्यात तिच्या उद्गारांनी त्याला उद्विग्न केले असेल.

नंतर बहुधा. का बरं? त्याचा काही संबंध? जाणुन घेण्यासाठी, जेन्युइनली विचारते आहे.

पांचाली तिच्या सौंदर्यासाठी अद्वितीय होती. दुर्योधनाला ती पांडवांची पत्नी बनली या गोष्टीचा फार राग असावा. मित्र कर्ण पण जिंकू शकत होता. पण त्याला नाकारले हेसुद्धा सलत असेल. मनुष्य स्वभाव गहन आहे. पांडव काही धुतल्या तांदळाचे नसणार. येता जाता दुर्योधनाच्या जखमेवर मीठ चोळत असणार. त्याशिवाय दुर्योधन एवढ्या टोकाला जाणार नाही.

सामो जरा कुठे तुम्हाला बरं समजायला लागलो तर तुम्ही भलत्याच निघालात. असो. माबोवर मी नेहमी असेनच, कृपया चांगला वाईट कसाही तुमचा प्रतीसाद नको.

पहा आता! सामो मी याच दिवसाची वाट पहात होतो. तुम्हाला खरं रुप कळेल हे मला माहीत होते. घ्या आता. तुम्ही कुणाचा द्वेष करत नाही पण तुम्हाला असे अनुभव इथे येतील.
तुमचं लिखाणाचं/ अनुभवांचं पोटेन्शियल खूप मोठं आहे. हे तुम्हाला मागे खेचू पाहतील. सावध रहा. ते तुमच्या कडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहतात. खूप असे खूनशी लोक इकडे भेटतील.

एक काय तेरा कोटी करेन. भेट होईलच आपली. हा तुझा आयडी जाईल, दुसरा येईल. पण आज ना ऊद्या आपली भेट होईलच.

सामो सकाळी screenshot टाकतो. आईवर ईतक्या वाईट शिव्या देणाऱ्या माणसाला तुम्ही प्रतिसाद देऊन जिवंत ठेवलं. त्याने हाक कोणाला मारली? साधना ऍमी वगैरेंना. साधनाताई म्हणते धागा पाहून प्रतीसाद देते मी. आई बहीन यांचा आदर न करणारा माणूस जरा नामाच्या गप्पा मारल्या तर चालतो का तुम्हाला?

हम्म..मला वाटतं इगो दुखावला जाण्यात पुरुष स्त्री असं विशेष काही नसावं. आता रोड रेज, अगदी साध्या गोष्टीवरून तरुण टोळक्यात मारामारी या बातम्या ऐकतोच ना आपण.एकंदरच आधीच चिडलेल्याला अजून उचकवले तर महाभारत घडत असावे.
द्रौपदी चे राधेय मधले वर्णन वाचून एखादी बिपाशा बसू/मुग्धा गोडसे समोर येते.

होय , या धाग्यावर महाभारत होता होता राहिले.
एकंदरच आधीच चिडलेल्याला अजून उचकवले तर महाभारत घडत असावे. हे मात्र खरं आहे. Happy

असावे. हे मात्र खरं आहे. Happy

नवीन Submitted by सुजाता यादव on 6 February, 2020 - 16:1७>> स्मायली कश्या टाकायच्या सांगता येईल का?

महाभारत हा राजसत्तेसाठीचा संघर्ष! द्रौपदी पांडवांच्या आयुष्यात येण्याआधी लाक्षागृहात पांडवांना मारण्याचा प्रयत्न झाला. म्हणजेच संघर्ष आधीपासूनच होता. त्यामुळे महाभारताला केवळ द्रौपदीचे हसणे कारणीभूत झाले असे म्हणणे मलातरी योग्य वाटत नाही. आधीच असेलेले वैर अजून वाढले असे म्हणता येइल. तसे तर द्युतात पत्नीला पणाला लावणारा धर्म , द्रौपदीच्या विटंबनेला आक्षेप न घेणारी राजसभेतील इतर मंडळी ही देखिल महाभारताला कारणीभूत म्हणायला हरकत नाही. जेत्याने पराजित पक्षाच्या स्त्रीयांना अपमानास्पद वागवणे, त्यांच्यावर अत्याचार करणे हे नेहमीच घडत आले . राजसभेतही हेच घडले.

लाक्षा गृ ह लग्नाच्या आधीचा प्रसंग आहे ऑलमोस्ट ते कुमार असताना. किंवा यंग अ‍ॅडल्ट्स.

ईन्द्रप्रस्थ नगरी मुळातच भपका दाखवायला व भूलभुलैया अशी बनवली होती. ते बघायला मुद्दामुन बोलावलेले कौरव राजपुत्र. त्यात दुर्योधन एका
ठिकाणी मायाजाल असल्या सारखे असते तिथे धडपडतो. म्हणजे दार आहे असावे तिथे दार नाहीच. तळे आहे असे वाटावे तिथे जमीन. जमीन आहे असे वाटते तिथे पाण्याचा सा ठा अश्यामुळे पहिल्यांदी आलेले लोक कायम फसत.

तसाच दुर्योधन धडपडल्यावर त्याची मजा द्रौपदी वरून बघत असते ती अतिशय तुच्छतेने अंधे का पुत्र अंधा. असे म्हणून हसते.
असा अपमान कोणीही सहन करणार् नाही. एक तर वडील व तो पहिला पुत्र बाँड किती स्ट्राँग असतो. तसेच एखाद्याच्य अंधत्वाचा अपमान करू नये. हे तिला कळत नाही. कारन ती मुळातच रूप गर्विता व सुडासाठीच उत्प न्न झालेली अशी आहे.

द्रोपदीवर अकारण ठपका आहे महाभारत घडविल्याचा - या क वितेतील विचाराशी मीही सहमत आहे. कोणी हसलं म्हणुन दुर्योधन जर पिसाळला असेल तर तो दोष त्याच्या पुरुषप्रधान, मानसिकतेचा आहे.

मला तर उलटे वाटते.. कौरवांचे आधीचे वागणे आणि इतर इतिहासच वैर आणि द्वेश उत्पन्न करायला कारणीभूत होता. वितुष्ट आधीच झालेले होते.
एकदा एखादा माणूस शत्रु पक्षातला आहे म्हंटल्यावर त्याच्याशी तसेच वागणे होणार ना ! त्याच्याकडून शत्रूचे गुणगान करणे का अपे क्षित आहे ?
द्रौपदीचे हसणे महाभारत युद्धाला कारणीभूत ठरले असे म्हणणार्या अभ्यासकांनी "द्युत' , "द्रौपदी वस्त्रहरण" हे धडे ऑप्शनला टाकले कि काय !!

*द्रौपदीः-*

*भागः-१*

द्रौपदी म्हटले की, आजची नोकरीपेशा स्रीची व तीही उच्चपदस्थ स्रीची आठवण होते द्रौपदीला जसे *पांच नवर्‍यांची* आघाडी सांभाळावी लागली तसेच आजच्या नोकरीपेशा स्रीचीश्रस्थिती आहे. तीलाही स्वतःचा नवरा, आॅफीसमधील मॅनेजमेंट, सॅंक्शनींग आॅथार्टी, सायनिंग आॅथार्टी, बाॅस, स्टाॅफ अशा वेगवेगळ्या आॅथाॅटींजना तोंड द्यावे लागते. त्यांचा सामना करावा लागतो. म्हणुनच मला द्रौपदी जवळची वाटते.

पांचाल देशाचा *राजा द्रुपद* यांची द्रौपदी ही अयोनीज कन्या. तीची उत्पत्ती *यज्ञवेदीपासुन* झाली म्हणुन तीला *याज्ञसेना* म्हणत. तीच्या शरीरातुन कमळाचा सुगंध निघे. तो एक कोसापर्यत पसरत असे. ती कृष्णवर्णीय असलेमुळे *कृष्णा* सुध्दा म्हणत. तीचे जीवन तीच्या लग्नापर्यत सुखासीन गेले.

राजकन्या असलेमुळे अभाव असण्याचा प्रश्नच नव्हता. तीच्या जन्माचेवेळी आकाशवाणी झाली. त्यानुसार तीचा जन्मच मुळी क्षत्रियांंचा संहार करण्यासाठी आणि कौरवांचा नाश करण्यासाठी झाला. पुर्व जन्मात तीं शंकराची निःस्सीम भक्त होती.शंकराने तीला प्रसन्न होऊन *ह्या जन्मी पांच पती मिळतील* असे प्रसन्न होऊन वर दिला.

पांडव जेव्हा लाक्षागृहातुन वाचले तेव्हा ते वेश बदलुन फिरत असतांनाच द्रौपदी स्वयंवर असल्याचे पांडवांना कळले आणि त्यानुसार ते स्वयंवराच्या ठीकाणी पोहचले.

द्रौपदी असामान्य म्हणुन तीचे स्वयंवरही असामान्य ठेवण्यात आले.द्रुपद राजाने मत्सयंत्र उभारुन महादुघट "पण" ठेवला होता.खाली सुवर्ण पात्रात पाणी, वर *मत्स्ययंत्र फिरते* ठेवले. त्या मत्स्याच्या डोळ्याचे प्रतिबिंब खालच्या सुवर्णपात्रात बघुन लक्षभेद करायचा.

देशोदेशीचे राजे, महाराजे उपस्थीत होते. बर्‍याच राजांनी प्रयत्न केला पण कोणीही मत्स्याच्या डोळ्याचा भेद ते शकले नाहीत. शेवटी कर्ण उठला. त्याने बाणाने लक्ष साधले. तो बाण सोडणार एवढ्यात त्याचे कानावर शब्द आदळले की, "मी सुतपुत्राला वरणार नाही." त्याने संतापाने, अपमानाने बाण तसाच टाकुन सभामंडपातुन निघुन गेला.

त्यावेळच्या परिस्थीतीनुसार द्रौपदीचा *बाणेदारपणा* लक्षात येतो, ही सामान्य बाब नव्हती. ब्राम्हणवेशातील अर्जुन उठला वत्याने लक्षभेद करुन "पण" जिंकला. त्यावेळी तीथे कृष्ण सुध्दा उपस्थीत होते. तेव्हापासुनच पांडवांची व कृष्णाची जवळीक झाली. पांडवांची आई कुंती ही श्रीकृष्णाची आत्या.

अर्जुनाने "पण" जिंकल्यामुळे द्रौपदीसह पांचही पांडव त्यांच्या निवास स्थानाकडे निघालेत.

Pages