औरत की हँसी / सरिता स्निग्ध ज्योत्स्ना

Submitted by सामो on 5 February, 2020 - 11:19

मध्यंतरी कविताकोष साईटवरती एक कविता वाचनात आली होती . तिचा मतीतार्थ हा होता की स्त्रियांवरती जे अत्याचार होतात, त्यांना जखडून ठेवलं जातं ते काही नवीन नाही. फार पूर्वापार ही परंपरा चालत आलेली आहे. अर्थात काही ठळक उदाहरणे उदा - सीतात्याग माहीत आहेच परंतु द्रोपदीचे देखील 'हसणे'.
या हसण्यातून महाभारत घडले - अंध राजाचे पुत्रही अंध असतात हे माहीत नव्हते असे काहीसे उद्गार तिचे होते असे वाचल्याचे स्मरते.
हे वाक्य की एका स्त्रीमुळे महाभारत घडले हेच मुळी खटकण्यासारखे आहे.
ती हसली असेल हे मान्य आहे, तिचे उद्गारही मान्य आहेत. पण मुख्य ते घडले कारण ती स्त्री होती. आणि स्त्रियांनी (निखळ अथवा कुचेष्टेने) कसेही हसणे हे आपल्या समाजात मान्य नव्हते
एक स्त्री हसली हे आपल्याला महाभारत होण्याचे कारण म्हणून बिंबवले जाते. हेच मूळात चूकीचे आहे.
ती भले बोलली असेल, कुचेष्टेने हसली असेल पण दुर्योधन मूर्ख होता की इतका रिअ‍ॅक्टीव्ह अर्थात रड्या होता की त्याने वस्त्रहरणाची प्रत्यक्ष कृती घडवावी.
तिचे निव्वळ उद्गार होते त्याची प्रत्यक्ष कृती होती आणि तरीही आपण हे शिकतो की एका स्त्रीने महाभारत घडवले.
.
http://kavitakosh.org/kk/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%80_...
.
.
>>>>>>>>>शायद उस औरत को पता नहीं था
औरत के हँसने का मतलब
जो उसे जहन्नुम का रास्ता दिखाता है
उसने सुनी नहीं होगी
पांचाली की अनोखी कहानी
जिसकी उन्मुक्त हँसी
कठघरे में होती है खड़ी बार-बार
आज भी महाभारत रचने के जुर्म में
>>>>>>>

हा मुद्दा इतक्या वेळा महाभारताचा संदर्भ येउनही, माझ्या तरी लक्षात आलेला नव्हता. माझ्याकरता नवीन होता. तुमच्याकरता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

*द्रौपदीः-*

*भागः-२*

पांचही पांडव द्रौपदीसह निवासस्थानी आलेत बाहेरुनच आईला सांगितले की, आई आम्ही *भिक्षा* आणली आहे. कुंतीने न पाहताच आतुन आज्ञा केली, *सर्वानी समान वाटुन घ्या*. ही झाली आख्यायिका. वास्तविक कुंती फार *दूर्ददर्शी होती*. कुंती तोंडातुन निघालेला शब्द प्राणपणाने जपत असे. जेव्हा तीला समजले की, मुलांनी एका कन्येला आणले आहे. तीने विचार केला, जर बोलणे मागे घेतले तर असत्याचा दोष लागेल आणि आपण सांगीतल्या प्रमाणे मुलं वागली तर सनातन मर्यादेचि लोप होईल. शिवाय तीने मुलांच्या डोळ्यात द्रौपदी बद्दललची अभिलाषा दिसली. *तीला तीच्या मुलांची एकी भंग होऊ द्यायची नव्हती.*

पांच भावांचे एकाच मुलीशी लग्न लागलेले कोणी ऐकले किंवा पाहिलेले नव्हते त्यामुळे कुंती कर्तव्यमुढ झाली. शेवटी सदैव धर्माचे पालन करणार्‍या धर्मराज युधीष्ठीराला विचारले. त्याने सांगीतले की, कर्तव्यनिष्ठ राहुन सत्याची कास सोडू नकोस. दृपद राजाने हरकत घेतल्यावर वेदव्यासांनी द्रौपदीची पुर्व जन्माची कथा सांगीतली की! भगवान शंंकराच्या वरामुळे पांच पांडवाचा विवाह द्रौपदीशी होईल.अशा प्रकारे *द्रौपदीचा विवाह पांच पांडवाशी झाला*. आणि कुंतीच्या सत्यनिष्ठेचा विजय झाला.

आजच्या स्रीचीही परिस्थीती कमी अधिक प्रमाणात द्रौपदी सारखीच आहे. तीलाही नोकरीतील वेगवेगळ्या संबंधीतांचे मन राखावे लागते. जसे द्रौपदीला पांच पतींची मन राखावी लागली होती

द्रौपदी उच्च कोटीची पतिव्रता आणी भगवद्भक्त होती. ती कृष्णाला आपला रक्षक, हितैषी आणी परम आत्मीय मानत असे. कृष्णाची सर्वव्यापकता, सर्वशक्तिमत्तावर तीचा पुर्ण विश्वास होता. तीची कृष्णचरणी अविचल प्रिती होती.

धन्य त्या द्रौपदीची पांच भिन्न स्वभावाच्या पतींना संघटीत ठेवणे तीच जाणे.

द्रौपदीला पांचही पतींसोबत दोन महिने सहा दिवस प्रमाणे एक निष्ठेने प्रत्येक पतीबरोबर व्यतीत करण्याचे ठरवुन दिले. हा काळ पुर्ण आणि पुर्ण त्याच पतीबरोबर राहायचे होते. जर एखाद्या कडून या नियमाचा भंग झालाच तर त्याला बारा वर्षाची शिक्षा म्हणुन निघून जावे लागेल असे ठरवून दिले.

Pages