टोमॅटो चे लोणचे

Submitted by सायु on 5 February, 2020 - 03:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गावराणी / गावठी टोमॅटो (मी चेरी टोमॅटो घेतले आहेत) - १ की.
लसुण - १ अख्खा
आलं - २ इंच
शेंगदाणा तेल - १ पाव
तिखट - ४ चहाचे चमचे ( एव्हरेस्ट तीखा लाल)
मीठ - अंदाजे

क्रमवार पाककृती: 

ही रेसीपी द्यायला जरा उशीरच झाला. हिवाळ्यात तजेलदार भाज्यांची रेल चेल असते तसेच भाज्यांना चव देखिल असते. म्हणुनच या दिवसात वेगवेगळी लोणची घातली जातात. तर आज मी ईथे टोमॅटो च्या लोणच्याची पा.कृ देते आहे

टोमॅटो धुवुप, पुसुन चिरुन घ्यायचे, मी चेरी टोमॅटो घेतले आहेत आणि हे खुप पटकन शिजतात त्यामुळे मी फक्त दोनच भाग केलेत.
लसुण - आल्याची मिक्सर मधुन फाईन पेस्ट करुन घ्यायची आहे. कढईत तेल तापवुन त्यात ही पेस्ट घालुन मंद आचेवर गुलाबीसर छान परतवुन घ्यायची. आता चिरलेले टोमॅटो घालायचे, चवी नुसार मीठ घालुन झाकण ठेवुन १० मी. शिजु द्यायचे. अधुन- मधुन परतवुन घ्यायचे. १० मी. झालेत की त्यात ४चमचे तिखट घालयचे , छान परतवुन घ्यायचे आणि झाकण ठेवुन पुन्हा १० ते १५ मी. शिजु द्यायचे. टोमॅटो छान एकजीव शिजले आणि तेल सुटु लागलं की लोणच झालंच..
हे लोणचं १०.१२ दिवस छान टिकतं. पण ईतके दिवस उरतच नाही.. ४, ५ दिवसातच संपतं.
पोळी, पराठे, पुरी, भात , खिचडी कशाबरोबर ही छानच लागतं

मेथी चे पराठे आणि हे लोणचं म्हणजे डेडली कॉम्बीनेशन आहे.

वाढणी/प्रमाण: 
लोणचे आहे, काय सांगु!
अधिक टिपा: 

लोणचं म्हटल की तेल आलच.. त्यामुळे तेल सढळ हातानी टाकायचं तसेच लसुण - आल्याची पेस्ट तेलात छान परतवायची, नाही तर लोणचं चवीला उग्र लागतं आणि खराब ही होते.

माहितीचा स्रोत: 
सासु बाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या विजयवाड्याच्या काकी हे लोणचं करतात. मोठ्या प्रमाणत त्या हे लोणचं करतात जे वर्षभर टिकतं. कोणत्या पद्धतीने त्या लोणचं बनवतात ते माहित नाही पण वर्षभर टिकतं ते आणि चव तर एकदम भन्नाट.

लोणचं लवकर संपु नये म्हणुन जास्त तिखट घालुन बघा.. Wink

काय काय करतेस ग बाई तू!
भारीच.
मेथीच्या खुसखुशीत पुऱ्यांबरोबर खरच भारी लागेल.
घरी करणार नाही. खायलाच येऊ.

अरे वा ! रंग सुरेख आलाय. चव कशी असेल? खूप आंबट की आंबटसर?
माझ्यासारख्या ऍसिडीटी पीडित व्यक्तीला टोमॅटोचं लोणचं खाणं शक्य नाही.

सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन छान वाटतय..
मनिम्याऊ, नक्की करुन बघा.
वावे, DJ धन्स +++++लोणचं लवकर संपु नये म्हणुन जास्त तिखट घालुन बघा.. +++ Happy
अरुण कुमार , शाली दा, आभार.. घरी करणार नाही. खायलाच येऊ.++ कधी यणार?
रुचा, धन्स.. +++ रंग सुरेख आलाय. चव कशी असेल+++ आंबटसर पण चमचमीत..
चिन्नु, BLACKCAT, स्वाती २ , मन्या, ऋतुराज सगळ्यांचेच आभार....../\......