मला जी वाचायची आहेत ती पुस्तके

Submitted by टवणे सर on 3 February, 2020 - 18:09

बरेचदा नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती आपल्याला विविध मार्गाने मिळत असते. ती सर्वच पुस्तके वाचली जातात असे नाही. कधी अ‍ॅमेझॉनवर सुचवलेल्या पुस्तकात एखादे वाचावेसे वाटणारे पुस्तक दिसते तर कधी न्युयॉर्क टाइम्स बूक रिव्युमध्ये.

या धाग्याचा उद्देश मराठी/इंग्रजी वा इतर भाषांतील एखादे पुस्तक तुम्हाला दुकानात/ऑन्लाइन चाळताना, वर्तमानपत्रे, बूक रिव्यु, गूड रिड्स वा इतर कुठल्याही स्त्रोतातून माहिती झाले व तुमची उत्सुकता चाळवली गेली असेल तर त्याची माहिती इतरांनाही व्हावी हा आहे. पुस्तक शक्यतो २०१९/२०२० मध्ये प्रकाशित झालेले असावे. धागा जर अजून एक वर्ष टिकला तर पुढल्या वर्षी २०२०/२१ असा क्रायटेरिया लावू. पुस्तकाचे नुसतेच नाव वा यादी कृपया इथे डकवू नये. तुम्ही त्या पुस्तकाचे जर परिक्षण वाचले असेल, त्या पुस्तकाच्या ब्लर्बवरील माहिती वाचली असेल, चाळले असेल - तर त्याची त्रोटक माहिती इथे द्यावी व तुम्हाला ते का वाचावेसे वाटत आहे ते देखील लिहावे.

इथे नवीन मराठी पुस्तकांबद्दल अधिकाधिक लिहिले जाईल ही अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फ्लॉवर्स फॉर अल्जेर्नोन चाळले. प्लेटोचे उद्धृत केलेले वाक्य आणि पुस्तकाची कथा यांचा परस्परसंबंध रोचक वाटतोय.

"बावचळलेल्या माणसावर हसण्याआधी तो अंधाराची सवय झाल्यामुळे प्रकाशात गोंधळला आहे, की प्रकाशात राहिल्यामुळे अंधारामुळे बावचळला आहे हे पाहा."

पुस्तकाची गोष्ट सर्जरीद्वारे आकलनक्षमता वाढलेल्या व्यक्तीची आहे.

Doctor Zhivago - Boris Pasternak(ग्रेस चा एक video पाहिल्यापासून विलक्षण ओढ निर्माण झाली या Pasternak बद्दल! रशियन भाषेला पुरुन उरतो म्हणजे काय?!)
Resurrection - Leo Tolstoy (आजोळ वरून आणले होते वर्षभरापूर्वी पण वाचणे झाले नाही अजून)

बाकी मराठी मध्ये,
Specifically सांगता येणार नाही... हातात पडेल ते वाचण्याची तयारी आहे Happy
कोसला नंतर काहीच वाचलेलं नाहीये बरेच दिवसांत.

हिंदू वाचतो आहे नेमाड्यांची. त्यात मराठी शब्दसंग्रहाचा अचाट खजिना आहे! काही काही ठिकाणी इतके वेगवेगळे शब्द त्यांनी लिहिले आहेत, की ज्यांचा अर्थ माहीत असून त्यातले ४०-५०% शब्द आपण कधीच वापरत नाही. प्रदेशानुसार भाषेतही वैविध्य ठेवलं आहे. एक सकस वाचन केल्याचा आनंद मिळतो.

डेब्रा सोहचं पुस्तक भारीये असं म्हणल्यावर sjw रिचर्ड डॉकिन्सवर खवळले आहेत. कारण डावकिनांचा रीच्या आपल्याला आवडतो.
वाचावे म्हणतो.
The End of Gender: Debunking the Myths about Sex and Identity in Our Society -Dr. Debra Soh

आजच्या पेपरमध्ये हरी पुलक्कत यांच्या ' Space. Life. Matter. - The coming of age of Indian science' या पुस्तकाबद्दल वाचलं. भारतातील विज्ञान क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा, स्थित्यंतरांचा आढावा, विज्ञान क्षेत्रातल्या institution builders बद्दल लेखन असं एकंदर पुस्तकाचं स्वरूप आहे. हे पुस्तक वाचायला आवडेल.
(परीक्षणात होमी भाभा आणि जयंत नारळीकर ही दोन ठळक नावं दिसली नाहीत. पण पुस्तकात असली पाहिजेत)

Pages