मला जी वाचायची आहेत ती पुस्तके

Submitted by टवणे सर on 3 February, 2020 - 18:09

बरेचदा नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती आपल्याला विविध मार्गाने मिळत असते. ती सर्वच पुस्तके वाचली जातात असे नाही. कधी अ‍ॅमेझॉनवर सुचवलेल्या पुस्तकात एखादे वाचावेसे वाटणारे पुस्तक दिसते तर कधी न्युयॉर्क टाइम्स बूक रिव्युमध्ये.

या धाग्याचा उद्देश मराठी/इंग्रजी वा इतर भाषांतील एखादे पुस्तक तुम्हाला दुकानात/ऑन्लाइन चाळताना, वर्तमानपत्रे, बूक रिव्यु, गूड रिड्स वा इतर कुठल्याही स्त्रोतातून माहिती झाले व तुमची उत्सुकता चाळवली गेली असेल तर त्याची माहिती इतरांनाही व्हावी हा आहे. पुस्तक शक्यतो २०१९/२०२० मध्ये प्रकाशित झालेले असावे. धागा जर अजून एक वर्ष टिकला तर पुढल्या वर्षी २०२०/२१ असा क्रायटेरिया लावू. पुस्तकाचे नुसतेच नाव वा यादी कृपया इथे डकवू नये. तुम्ही त्या पुस्तकाचे जर परिक्षण वाचले असेल, त्या पुस्तकाच्या ब्लर्बवरील माहिती वाचली असेल, चाळले असेल - तर त्याची त्रोटक माहिती इथे द्यावी व तुम्हाला ते का वाचावेसे वाटत आहे ते देखील लिहावे.

इथे नवीन मराठी पुस्तकांबद्दल अधिकाधिक लिहिले जाईल ही अपेक्षा आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Grey Sunshine (Stories From Teach for India) लेखक : संदीप राय
प्रकाशन २०१९

टीच फॉर इंडिया उपक्रमाबद्दल काही वर्षांपूर्वी वाचलं होतं. त्यावरून हे पुस्तक इंटरेस्टिंग असावं असं वाटतंय. किंडल सजेशन्समध्ये दिसल्यावर विकत घेऊन ठेवलंय.

--------------------

The Cases That India Forgot ( लेखक चिंतन चंद्रचूड)
प्रकाशन २०१९

लोकसत्ता बुकमार्क सदरात या पुस्तकाबद्दल वाचलं. त्याचदिवशी किंडल स्टोअरमध्ये पाहिलं तर ते अत्यल्प किंमतीत मिळत होतं. लगेच घेऊन ठेवलं.
१९५० पासून आजपर्यंत भारतात गाजलेल्या १० कोर्ट केसेसच्या कथा आहेत.

Early Indians: The Story of Our Ancestors and Where We Came From
लेखक Tony Joseph

हे पुस्तक मी वाचायला घेतले आहे. चारपैकी दोन प्रकरणं वाचून झाली. अगदी सगळंच शंभर टक्के समजत नाहीये, पण बऱ्यापैकी समजतंय. रोचक आहे हे नक्कीच!

वावे च्या पोस्टवरुन आठवलं. मराठीत व्यं. मा. यांनी साधारण अशा प्रकारच्या माहितीचं एक पुस्तक लिहिलं आहे. ते ऑस्टृएलियाला गेले होते त्या ट्रीप बद्द्ल.. नंतर बोकिलकाकांनी एका दिवाळी अंकात लेखही लिहिला होता. मी मला वाटतं हायस्कूल मध्ये होते तेव्हा.

आता ते सगळं स्वतः काय शोधणार? विमान पाठवलं तरी आम्ही आहोत तिथेच बरे Wink

गुड लक Happy

मला जी वाचायची आहेत ती पुस्तके,
माणसापेक्षा बरीच आहेत ती पुस्तके.

भ्रांत जीवनाची कसे जगावे कळेच ना,
अश्यावेळी सोबत जी देतात ती पुस्तके

परत करतो म्हणत नेली होती ज्यांनी,
आठवती का त्यांना तरी आज ती पुस्तके

माणसांचे वागणे अहो आता झाले असे,
नेमके कसे सांगणार नाहीत ती पुस्तके.

-राव पाटील (उगाच काहीतरी)

वा वा.
शीर्षकात गझल लपली आहे असं मला उगीच वाटत नव्हतं

Wink

मला यशवंत व्हा हे पुस्तक वाचायचे आहे. मी 2002 साली नववीत असताना वाचले होते.
>>>
ते बोर्डात आलेल्या बहीण भावाच्या डॉ वडिलांनी लिहिलेलं ना, वालाचंदनगरच्या?
नाव नाही आठवत आता

अरुण हातवळणे
मला त्यातलं सगळं पटलं होतं पण कधी अवलंबता आलं नाही ☺️☺️

अनु Happy
पण खरंच, पुस्तक मलापण आवडलं होतं.

त्या पुस्तकात एक वाचाल तर वाचाल नावाचा धडा होता. मी तेव्हढेच फॉलो केले, अवांतर वाचत राहिलो, अभ्यास मागे राहिला.

त्यात त्यांनी Tolstoy ची फोटो लावून (समोर उदबत्त्या पण) जयंती का पुण्यतिथी साजरी केलेली. ते तेव्हा फार भारी वाटलं होतं. आमच्या पालकांनी ते पुस्तक वाचून नशिबाने असले फोटो शोधले नाहीत. किंबहुना काहीच केलं नाही. Lol
कशास भाषा व्यर्थ बोलता एकविसाव्या शतकाची
एक विसावा ही न दिसावा... असल्या जोक नी गहिवरून यायचं वय होतं ते. Biggrin

हो बरोबर... मला तेच वाचायचे आहे... Online कॉपी वगैरे मिळेल का कुठे... विकत घ्यायची तयारी आहे.. अमेरिकेत शिपिंग बंद आहे भारतातल्या पुस्तकांचे ..

टवणे सर,
तुम्ही या धाग्यात उल्लेख केलाय ते Anarchy मी आत्ताच वाचलं. अतिशय वाचनीय पुस्तक आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेपासून ते साधारण 1800 सालापर्यंतचा काळ यात आहे. याबद्दल शालेय इतिहासात त्रोटक माहिती होती पण इथे डिटेलमध्ये माहिती आणि मुख्य म्हणजे analysis आहे. साधारण 1800 ते 1857 हा तसा शांत काळ होता. पुढे 1857 च्या उठावानंतर परत धामधूम सुरू झाली. इथे फक्त 1800 पर्यंतचाच काळ आहे.
हल्ली इतिहास म्हटलं की एकांगी असतो तसा प्रकार नाही. उगाच काहीतरी डावा किंवा उजवा अजेंडा पुढे सारलेला नाही. म्हणून वाचायला जास्त आवडलं.

Pages