गुड न्यूज - चित्रपट परीक्षण

Submitted by सनव on 28 December, 2019 - 16:35

गुड न्यूज चा ट्रेलर बघून एकूण चित्रपट धमाल विनोदी असणार हा अंदाज होताच. थिएटरमध्ये जसं टेस्टी यम्मी जंक फूड मिळतं तसा हा मुव्ही टाईमपास आहे.

दीप्ती (करीना कपूर खान) आणि वरुण (अक्षय कुमार) बत्रा हे श्रीमंत, करियर माइंडेड जोडपं. मूल हवं म्हणून एका आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जातात. तिथे दुसरं एक जोडपं असतं - दिलजीत (हनी) आणि कियारा (मोनिका) बत्रा. एकाच आडनावाच्या दोन जोडप्यांच्या आयुष्यात स्पर्मची अदलाबदल झाल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्याला विनोदी ढंगाने दाखवलं आहे.

अक्षय कुमार आणि करीनाने चित्रपटात धुमाकूळ घातला आहे. त्या तुलनेत हनी आणि मोनिका तसे दुय्यमच ठरतात. यशस्वी , लग्नाला 7 वर्ष झालेल्या जोडप्याला मूल नसण्यावरून विचारले जाणारे प्रश्न, त्यांच्यावरचा दबाव आणि त्यातून नात्यावर येणारा ताण हे सर्व चित्रपटात नेमकं दाखवलं आहे आणि ते दाखवताना थोडा तिरकस ,sarcastic सूर पकडल्यामुळे विनोदाची भट्टी जमली आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भागच मला सर्वात जास्त आवडला. पंचेस भारी जमले आहेत.

पुढे शेवटाकडे सरकताना कथानक काहीसं awkward होतं. एकीकडे अक्षय कुमारची over acting दुसरीकडे दिलजीतची over acting. आणि शेवटच्या टप्प्यात इमोशनल मोडमध्ये जाऊन चित्रपट त्याच्या लॉजिकल एन्डकडे पोचतो.

ओव्हरऑल एक वेगळ्या विषयावरचा, बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह, आजच्या काळातील समस्या मांडणारा आणि मुख्य म्हणजे हसवणूक करणारा धमाल चित्रपट आहे.

करीना शाईन्स थ्रू द मुव्ही. कॉमेडी असो वा शेवटचे भावनिक क्षण असोत, तिने कमाल काम केलंय. तिचं स्टायलिंग, wardrobe एकूणच लुक आवडला. अक्षय कुमार परफेक्ट विनोदी टायमिंगच्या जोरावर भाव खाऊन जातो. अजूनही कसला फिट आणि देखणा दिसतो. कियारा आडवाणी आणि दिलजीत डोसांझ यांनीही त्यांच्या वाटयाला आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. मुख्य चारी कलाकार प्लस आयव्हीएफ डॉक्टर्स या सर्वांची कामं दमदार झाल्यामुळे चित्रपटाची भट्टी जमली आहे.
यात करीना एक मॉडर्न करियर वुमन आहे. तिला उगाच घरात स्वयंपाक करताना, सासरच्यांनी मर्जी सांभाळताना दाखवलेलं नाही. हे मला फार आवडलं. तिला नवरा हवा आहे पण एका मर्यादेपलीकडे ती त्याचं ना काही ऐकून घेते ना ती त्याच्यावर अवलंबून असते. अशी कॅरेक्टर आणखी लिहिली जायला हवीत.

अशा छान जमलेल्या मुव्हीला मध्येच रिग्रेसिव्हपणाचे मूड स्विंग येणं म्हणूनच खूप इरिटेट झालं. आई होण्यात बाईच्या लाईफचे सार्थक, गर्भपात म्हणजे पाप वगैरे ट्रॅकवर मध्येच मुव्ही जाऊ लागतो. मग परत खूप डिरेल व्हायच्या आत सीन बदलतो. पण तरी का? व्हाय- हा प्रश्न पडतोच.
याव्यतिरिक्त एकूणात एका हायली सेन्सिटिव्ह विषयाच्या जास्त खोलात न शिरता वरवरचाच विचार केल्यामुळे चित्रपट उथळही वाटू शकतो.

दिगदर्शक नवीन आहे राज मेहता म्हणून. पहिलाच प्रयत्न उल्लेखनीय आहे. गाणी काही खास लक्षात राहिली नाहीत.

का बघावा- डोकं बाजूला काढुन ठेवून चार घटका धमाल करमणूक, वेगळा विषय, प्रोग्रेसिव्ह मांडणी, करीना-अक्षय.

का टाळावा- वेब सिरीज किंवा मालिका टाईप घराच्या दिवाणखान्यात किंवा क्लिनिकमध्ये चित्रपट घडतो. भव्यदिव्य बाहुबली टाईप काही नाही. लहान मुलांना संवाद ऐकून बरेच प्रश्न पडू शकतात.

3.5 out of 5.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चित्रपटात ivf तंत्राने फलित झालेला अक्षय-करिनाचा गर्भ कियाराच्या ओटीत व त्या दोघांचा यांच्या ओटीत असे होते ना? कारण असे असले तर दोघीही सरोगेट झाल्या व अशा वेळी अक्षय गर्भपाताच्या मुद्द्यावर ठाम असेल तर समजू शकते. पण करिनाच्या पोटातल्या गर्भात तिचे बीज असेल तर निदान 50℅ मूल तरी त्यांचे आहे, मग गर्भपात करायचा प्रश्नच येत नाही.

गर्भपात हा स्त्रीच्या इच्छेवर अवलंबून असतो असे आपल्याला कितीही वाटले तरी डॉक्टरच्या परवानगीशिवाय तो करता येत नाही. परवानगी कधी द्यावी हे कायद्यात लिहिले आहे. कधी त्या विरोधात कोर्टात जावे लागलेच तर कायदा राबवणारेही बहुतांश गर्भपाताच्या विरोधात असतात असे आजवर दिलेल्या निर्णयांकडे पाहून वाटते.

https://m.timesofindia.com/life-style/health-fitness/health-news/women-k...

सगळ्या प्रतिसादावरून मुलावर पुरुषाचा मालकी हक्क असल्या सारखे वाटायला लागले आहे, मूल बदला, अबोरशन करा वगैरे, पुरुषांपेक्षा स्त्री चा हक्क मुलावर जास्त असतो, बीज दुसऱ्याचे असले तरी अंडी आणि गर्भाशय तिचे असणार

नवरा बायकोच्या जोड्या एक्स्चेण्ज करणे हा देखील एक पर्याय आहे .. पण सोपा नाही.>>>माझ्या मनात हाच विचार आला होता. This is the most logical solution. हा जोक नाही.

आपले ते हे.. मी सुद्धा ते जोक म्हणून लिहिले नव्हतेच.
जर दोन्ही आईबाबांसोबत पोरं राहणे गरजेचे असेल तर आईबाबांच्या जोड्या बदलाव्यात. जोड्या बदलल्यानंतर सेक्स केलाच पाहिजे हे गरजेचे नाही. किंवा ती करायची ईच्छा असल्यास मूळ पार्टनरकडे जावे. दोन्ही जोड्या यासाठी एकत्रही राहू शकतात. जे मूल ज्याचे आहे ते त्याने आपले समजावे. दुसरे मूल आपल्या पार्टनरचे समजावे. त्याबद्दलही आपसूक एक सॉफ्ट कॉर्नर येईलच. मुलांनी आपल्या खरया आईबापाची दोघांची नावे लावावीत. आणि आपल्या खरया आईबाबांना मम्मी डॅडी बोलावे. आणि त्यांच्या लाईफ पार्टनरला अंकल आंटी बोलावे. मुलांना लहानपणापासूनच हे क्लीअर असेल तर प्रॉब्लेम येण्याचा प्रश्नच नाही. आणि अजून पंधरा वर्षांनी मुले जेव्हा कळत्या वयाची होतील तेव्हा तर जमाना आणखी फॉर्वर्ड झाला असेल. त्यामुळे हे त्यांना वा त्यांच्या फ्रेंडसर्कलला फार ऑकवर्डही वाटणार नाही.

अबब... कायकाय मार्ग येताहेत? का पण?
आधी ते चौघे गडबडले... पहिलंच मुल होतं. खुप प्रयत्नांनी होणार होतं. मग एक वेगळंच वळण आलं. त्याला सामोरं जाणं सोपं नव्हतं, पटकन मार्ग काढता येण्यासारखा नव्हता.
सगळे मार्ग विचार करुन पाहिले तरी मुळ जी इच्छा होती, पालक बनायची ती काही केल्या गेली नाही. निदान करीनाची गेली नाही. व ती खमकी होती एकटीने मुल वाढवायला हे तिला माहीती होतं, म्हणुन तिने नवर्‍याला 'गेला उडत' असेही म्हटले. पण हळुहळु मार्ग जागेवर आला आणि त्यांनी ठरवले आपापल्या बदललेल्या बाळाबरोबर राहु..... तर काय गर्भपात करायलाच हवा, बाळ बदलायलाच हवं, बापच बदलायला हवा.... आँ??????
बरं, झालं ते मुल मोठं व दिसु लागलं दुसर्‍यासारखं, मग काय बिघडलं? सांगता येईल ना गरज पडल्यावर. ते मुल काय जन्मभर थयथयाट करणार नाहीये वा समाजही करणार नाहीये. ऐकेल, हसेल/आश्चर्य करेल मग विसरुनही जाईल. सगळ्यांना आपापली आयुष्य आहेत. या गोष्टीत कोणाला प्रमाणाबाहेर रस असणार आहे? मुल उलट आभार मानेल, मला मारलं नाहीत, प्रेम दिलंत... सख्खी मुलं काय दिवे लावतात ते पहातो मग असे मुल आहे म्हणुन मारुन टाका? कायतरीच बाई Sad ... उलट हे तर गर्भपातापेक्षा मोठं साहस केलंय त्यांनी व शेवटी त्यांची खात्री पटलीये की त्यांनी बरोबरच केले.

> मुव्ही मध्ये दिलजीत हा अक्षय आणि करीनाच्या सोसायटीत अगदी त्यांच्या बिल्डिंग मध्ये वरच्याच फ्लॅट मध्ये ( हे कस काय ? ) रेंट वर राहिला आलेला आहे असं दाखवलं आहे . फक्त बाळ जन्माला येईपर्यत तो तिथे राहणार असतो . >
अच्छा फक्त बाळ जन्माला येईपर्यंतच तिथे राहणार का? कशाला पण ते तरी? काय अचिव्ह होणारे ९ महिने तिथे राहून?
आणि मग शेवट मी पहिल्या प्रतिसाद मधे लिहलंय तसाच झाला की!!
"आणि मग लॉजिकल एन्ड काये? जीवशास्त्रीयदृष्ट्या आपले नसलेले पण आपल्या बायकोचे असलेले मुल सांभाळायचं?
Submitted by ॲमी on 30 December, 2019 - 13:33"
फारकाहीतरी खास, वेगळा शेवट असल्यासारखं मिसलीड का केलं उगाच मग मला Angry मला वाटलं असा शेवट आहे -> दिलजीत-किएरा कायमचेच तिथं राहणारेत, जरी मुलं आपापल्या जैविक आईसोबतच राहणार असली तरी चौघंजण एकत्र कुटुंब असल्यासारखं राहणार आहेत.
===

> आधी करीना अक्षयच्या मनाप्रमाणे आणि तिच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे अबोर्ट करायला तयार असते. त्या करता ती हॉस्पिटल मध्ये सुद्धा जाते. पण डॉक्टरीण तिला स्क्रीन वर बाळाच हृदय धडधडताना दाखवते आणि सांगते कि "या जीवाला तू मारणार आहेस का ? मान्य आहे जे घडलाय ते न निस्तरता येण्यासारखं आहे पण त्यात बाळाचा काहीच दोष नाही. विचार कर . शेवटी अबोर्ट करायच का नाही हा निर्णय तुझा "> अर्रर म्हणजे करिनालादेखील आधी मुल अबोर्ट करायचं असतं!!
> इथे डॉक्टरची लुडबुड पटली नाही. तिला करायचय ना अबोर्ट तर करु दया ना. > +१. ही कोणती डॉक्टर? ivf करणारीच का? की ही वेगळी?
===

बधाई हो बद्दलचे प्रतिसाद वाचले. स्वतःला नवरा, मुलगा, भावीसून, अद्याप न जन्मलेला गर्भ यांच्याजागी ठेऊन पाहिलं आणि नीना मुर्ख, स्वार्थी बाई वाटू लागली. निनाच्या जागी मी स्वतःला ठेऊ शकत नाही > तिला empty नेस्ट syndrome आला किंवा तत्सम कारणं (आता कोणालाच तिची गरज नाही, कोणी तिच्यावर अवलंबून नाही अश्या भावनेने, कोणाला तरी तिची गरज असणं ही तिची गरज असणे) असू शकतात. > हे असले विचार माझ्या कुवतीबाहेर आहेत.... तरीही जर नीना एकटीने त्या बाळाचं पालनपोषण करू शकत असेल तर तिने तिचा निर्णय फॉलो करावा.

> चित्रपटात ivf तंत्राने फलित झालेला अक्षय-करिनाचा गर्भ कियाराच्या ओटीत व त्या दोघांचा यांच्या ओटीत असे होते ना? कारण असे असले तर दोघीही सरोगेट झाल्या > हे म्हणजे अख्ख रामायण सांगून झाल्यावर 'रामाची सीता कोण होती?' विचारणं झालं Lol Lol
पहिल्याच पानावर दीप्ती-हनी आणि वरूण-मोनिका अशी बाळं तयार होतात हे कन्फर्म केलं आहे सिनेमा बघून आलेल्यानी.
===

> पण करिनाच्या पोटातल्या गर्भात तिचे बीज असेल तर निदान 50℅ मूल तरी त्यांचे आहे, मग गर्भपात करायचा प्रश्नच येत नाही. > मुल करीनाचे आहे 'त्यांचे' नाही.

> सगळ्या प्रतिसादावरून मुलावर पुरुषाचा मालकी हक्क असल्या सारखे वाटायला लागले आहे, मूल बदला, अबोरशन करा वगैरे, पुरुषांपेक्षा स्त्री चा हक्क मुलावर जास्त असतो, बीज दुसऱ्याचे असले तरी अंडी आणि गर्भाशय तिचे असणार > जैविकदृष्ट्या विचार करता मुल जवळपास पूर्णपणे स्त्रीचेच असते.
===

मुळात करिना ivf करायला गेली तेव्हा काय विचार होता तिच्या मनात?
१. मला मुल हवंय की
२. मला अक्षयसोबत मुल हवंय
२ असेल तर तिने गर्भपात करायला हवा होता. १ असेल आणि ती मुलाचे एकटीने पालनपोषण करू शकते असेल तिने तिचातिचा निर्णय फॉलो करावा.

अक्षयला मुल जन्माला घालण्यामधे सुरवातीपासूनच फारसा इंटरेस्ट नसतो. He is not that keen and definitely not prepared to be a father असं वाटतंय मला अजूनही. त्याने त्याच्या मतावर ठाम राहायला हवं होतं आणि करिनाला घटस्फोट द्यायला हवा होता.

ऋन्मेष आणि आपले ते हे
ग्रुप मॅरेजचा पर्यायदेखील मी सुचवला आहे पहिल्याच पानावर. असा शेवट दाखवणे फारच बोल्ड मुव्ह झाली असती भारतीय सिनेमासाठी!
एनिवे जे काही वेगवेगळे पर्याय सुचवले जाताहेत ते सगळेच 'लॉजिकल एन्ड' आहेत, ज्याला जो योग्य वाटेल त्याने तो अमलात आणावा.

बाकी गर्भपातासाठी 'मारलं नाहीत, मारुन टाका, भ्रूणहत्या' असले शब्द वापरणे सगळ्यांनीच जाणीवपूर्वक टाळले तर बरं होईल.
सगळ्या गर्भधारणा आणि जन्मलेली मुलं जाणीवपूर्वक, दोन्ही पालकांची (खासकरून आईची) इच्छा, कपॅसिटी विचारात घेऊन झालेल्या नसतात. त्यामुळे मुल जन्मणे हा त्या तिन्ही जीवांसाठी आनंदसोहळा असेलच असे नाही.

पण समजा अक्षय ने जैविक दृष्ट्या फक्त करिनाचे असणारे मूल स्वतःचे समजून वाढावायचे ठरवले आणि तसे केले सुद्धा आणि 2 3 वर्षांनीं त्या दोघांना मिळून पुन्हा एखादे मूल झाले तर अक्षय काय करेल?कारण मुळातच आधी त्याला ते बाळ नको होते नंतर करिनावरच्या प्रेमापोटी तो स्वीकारत असणार बाळ,बाळाची मानसिक फरफट नाही होणार का?

अर्थात हा मुव्ही आहे,सो काहीही होऊ शकतं पण असाच आपला एक विचार

सस्मित चित्रपट असला तरी उद्या हे तुमच्या आमच्या ईथल्या कोणाच्याही घरात होऊ शकते. देव न करो माझ्या घरात झाले तर तेव्हा धागा काढायचेही सुचणार नाही. आयती चर्चा हाताशी असणे केव्हाही फायद्याचे.

सिनेमावर एवढी चर्चा, एवढ्या पोस्टी.>>काय हरकत आहे पण,बेसिक मध्ये लोचा नाही वाटत,चुकून असे घडू शकते कदाचित,अगदी रेअर असली तरी अशी परिस्थिती होणारच नाही कशावरून

काय हरकत आहे पण,बेसिक मध्ये लोचा नाही वाटत,चुकून असे घडू शकते कदाचित,अगदी रेअर असली तरी अशी परिस्थिती होणारच नाही कशावरून>>>>झाली तरी हॉस्पिटल दडवून ठेवणार नाही याची काय खात्री.

पिक्चर च्या केसमध्ये बाळं झाल्या झाल्या एक्स्चेंज करणे हा सोपा उपाय वाटतोय >>>> अरे वा! बाप बायोलॉजिकल फादर आहे म्हणून बाळ त्याला द्यायचं हे फारच भारी सोलुशन आहे. त्या आईचं काय बॉ, तिला एक बाळ मिळाल्याशी मतलब.

सस्मित चित्रपट असला तरी उद्या हे तुमच्या आमच्या ईथल्या कोणाच्याही घरात होऊ शकते. देव न करो माझ्या घरात झाले तर तेव्हा धागा काढायचेही सुचणार नाही. >>>>>

आधीची दोन मुले आहेत ना, नैसर्गिकरित्या झालेली? मग आता ivf वर पैसे का खर्च करावे माणसाने? आणि हल्ली तुमच्या आमच्या सगळ्या घरात फक्त ivf होते म्हणजे एकतर भारत प्रचंड श्रीमंत झालाय किंवा ivf प्रचंड स्वस्त... पण तरी जे काम निसर्ग फुकट करून देतो त्यासाठी पैसे कोण देईल?

सस्मित चित्रपट असला तरी उद्या हे तुमच्या आमच्या ईथल्या कोणाच्याही घरात होऊ शकते. देव न करो माझ्या घरात झाले तर तेव्हा धागा काढायचेही सुचणार नाही. आयती चर्चा हाताशी असणे केव्हाही फायद्याचे.
>>>>
I really don't have to say it again and again but, you are impossible Lol
Anyone can take a cheap shot on you after this comment. Rofl

बाकी गर्भपातासाठी 'मारलं नाहीत, मारुन टाका, भ्रूणहत्या' असले शब्द वापरणे सगळ्यांनीच जाणीवपूर्वक टाळले तर बरं होईल. >> ओके अ‍ॅमी.

पण अ‍ॅमी, करण जोहरने ही चर्चा वाचली तर त्याला त्यात भाग२, भाग३ काढायचे सामर्थ्य दिसेल. Happy Happy उलट ते खरंच आव्हानात्मक असेल. पण तो विनोदी पद्धतीने दाखवेल. जा बरे आता सिनेमा पहा. Happy

पण तरीही बाळ बदल, वडील बदल हे 'लॉजिकल एंड नव्हे'. असे जगात कोणीच करेल असे वाटत नाही. फारतर दोघे वेगळे होतील वा आधीच गर्भपात ही शक्यता समजुन घेता येईल.

गर्भपात करून घेणारी स्त्री वाईटच का? किंबुहुना मुळात, गर्भपात हा वाईटच असा का सूर आढळतो?
काहीही ( मेडिकल, मानसिक, अपघाती, बलात्कार, लहान वय, एकटी स्त्री, बळजबरी मातृत्व वगैरे) कारण असो..

ह्याकडे बघताना केस बाय केस मध्ये फरक असल्याने , सिनेमात 'कारण' दाखवायलाच पाहिजे का ते जस्टिफाय करायला? किंवा 'कारण' असलेच पाहिजे का? ज्यांना नाईलाजस्तव गर्भपात करावा लागतो, त्यांनी गिल्टमध्येच करावा का? किंवा लपवून ठेवावा का?

मेडिकल कारणाने , गर्भपात करणारी नात्यातील स्त्रीला , इतके टोकाचे एकावे लागले व नको ती चर्चा झेलावी लागली; तो बरोबर का चूक हि चर्चा निष्फळ आहे. शेवटी, स्त्रीलाच सावरायचे असते.

करीयर करणारी स्त्री म्हणजे अशीच वा तशीच मग ती असेच करणार वा मूलच नको असे लेबल ठरवणे म्हणजे विचित्र मानसिक्ता आहे.

दुसर्‍या एका उदाहरणात हॉस्टेलमध्ये, आपले जीवन मजेत जगण्यामध्ये लैगिंक अनुभव घेण्याच्या सवयीने, गरोदर राहिलेल्या मुली पाहिल्या आहेत व स्वछेने गर्भपात करणार्‍या सुद्धा. लहानश्या क्लिनिक मध्ये पैसे फेकल्यास, एकटीने सुद्धा ह्या मुली जावून करून येतात. तेव्हा संमती वगैरे प्रकार नसतो सगळ्याच ठिकाणी.

तेव्हा, गर्भपात हा फक्त स्त्रीचा निर्णय असावा. कोणीच चर्चा सुद्धा करू नये त्या स्त्रीबरोबर 'जर तिला चर्चा नको असेल तर आणि कारणं तर विचारून नये.'

तेव्हा, गर्भपात हा फक्त स्त्रीचा निर्णय असावा. कोणीच चर्चा सुद्धा करू नये त्या स्त्रीबरोबर 'जर तिला चर्चा........

>>>>

झंपी, ईथे तरी का सरसकटीकरण करता आहात? वर तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हे सुद्धा केस बाय केस ठरावे ना? की पुरुषांना भावनाच नसतात?

{{{ जर या सगळ्यांना, स्वतःला खरंच मुल हवं असतं तर त्या गर्भपात करून घेणाऱ्या १.६ कोटी बायका (एका वर्षात!) कुठून येतात? }}}

या प्रश्नाचं अजून एक उत्तर - ज्याप्रमाणे बाळंत झालेल्या महिलेला सहा महिने (पूर्वी ३ महिने होती) भर पगारी रजा मिळू शकते, त्याचप्रमाणे शासकीय नोकरदार महिलेला गर्भपात केल्यास एक महिना भरपगारी रजा मिळते. बाळंतपणाची रजा ही संपूर्ण नोकरी कालावधीत कमाल दोनदाच मिळते पण गर्भपाताची महिनाभर सवेतन रजा ही वर्षातून एकदा मिळते व कारकीर्दीत अशी रजा किती वेळा घ्यावी याची कमाल मर्यादा नाही.

या भरपगारी १ महिन्याच्या रजेकरिता संपूर्ण नोकरी कालावधीत १५ ते २० वेळा गर्भपात करुन घेणार्‍या महिलांबद्दल लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत काही वर्षांपूर्वी एक लेख आला होता. (इंटरनेट वर इतर साईट्सवरील माहितीसोबत लोकसत्तेच्या लेखातली माहिती जुळत नाही. https://www.maayboli.com/node/49235 इतर ठिकाणी संपूर्ण नोकरी कालावधीत कमाल ४५ दिवस इतकीच रजा गर्भपाताच्या कारणाकरता मिळेल असे लिहिलेले आढळले. पण मला तरी मी आधी लिहिले आहे तसेच लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीत वाचल्याचे खात्रीने आठवत आहे.)

कागदोपत्री गर्भपात दाखवणाऱ्या यंत्रणाही कार्यरत असतील जर हे खरे असेल तर. म्हणजे वर दिलेल्या आकड्यातील खरोखरचे गर्भपात कमी असू शकतात.

१.६ कोटी गर्भपात वर्षाला हा आकडा कायच्या कायच आहे.
आपली लोकसंख्या काय त्यात महिला किती त्यात त्या ठराविक वयातल्या किती त्यातल्या गरोदर किती मग त्यातले गर्भपात किती .. मूळात जन्माला येणारी मुले किती आहेत दरवर्षी?

इतर ठिकाणी संपूर्ण नोकरी कालावधीत कमाल ४५ दिवस इतकीच रजा गर्भपाताच्या कारणाकरता मिळेल>>>>GR असाच आहे,संपुर्ण सेवा कालावधीत मिळून 45 दिवस ,मग पाहिल्यावेळी गर्भपात करून 45 दिवस रजा घेतली आणि पुन्हा गर्भपात झाला तर ही विशेष रजा मिळणार नाही,आणि ही गर्भपात विशेष रजा जर 1च अपत्य असेल तरच मिळते,2 अपत्य असतील तर 45 दिवस रजा एकदाही मिळत नाही

हा सिनेमा amzon prime वर बघायला सुरुवात केली. करीना-अक्षय लॅब बघतात तिथवर पोचले. मला कंटाळा येतोय, करीना च पात्र फारच bossy दाखवलंय. तिला पण फार काही मुलात interest आहे असे वाटत नाही तरी उगीचच अक्षय ला घोड्यावर बसवते आहे. आजिबात breathing space देत नाहीये. एवढं frustrated असल्यावर अवघड आहे.

> Submitted by झंपी on 17 January, 2020 - 07:48 > +१
===

बिपिनचंद्र,
नाही ओ. लिंगसापेक्ष गर्भपात, पगारी रजा मिळावी म्हणून फेक गर्भपाताचे सर्टीफिकेट असलं काही नाहीय. फक्त अनप्लॅन्ड &/ अनवॉन्टेड गर्भधारणा आहेत.
===

> १.६ कोटी गर्भपात वर्षाला हा आकडा कायच्या कायच आहे.
आपली लोकसंख्या काय त्यात महिला किती त्यात त्या ठराविक वयातल्या किती त्यातल्या गरोदर किती मग त्यातले गर्भपात किती .. मूळात जन्माला येणारी मुले किती आहेत दरवर्षी? > २०१७ची बातमी 1.6 crore abortions a year in India, 81% at home: Study

A total of 15.6 million (1.56 crore) abortions took place across India in 2015, against the 7 lakh figure the Centre has been putting out every year for the last 15 years, according to a research paper published in
The Lancet Global Health medical journal on Monday.

Pages