गुड न्यूज - चित्रपट परीक्षण

Submitted by सनव on 28 December, 2019 - 16:35

गुड न्यूज चा ट्रेलर बघून एकूण चित्रपट धमाल विनोदी असणार हा अंदाज होताच. थिएटरमध्ये जसं टेस्टी यम्मी जंक फूड मिळतं तसा हा मुव्ही टाईमपास आहे.

दीप्ती (करीना कपूर खान) आणि वरुण (अक्षय कुमार) बत्रा हे श्रीमंत, करियर माइंडेड जोडपं. मूल हवं म्हणून एका आयव्हीएफ क्लिनिकमध्ये जातात. तिथे दुसरं एक जोडपं असतं - दिलजीत (हनी) आणि कियारा (मोनिका) बत्रा. एकाच आडनावाच्या दोन जोडप्यांच्या आयुष्यात स्पर्मची अदलाबदल झाल्यामुळे जो काही गोंधळ होतो त्याला विनोदी ढंगाने दाखवलं आहे.

अक्षय कुमार आणि करीनाने चित्रपटात धुमाकूळ घातला आहे. त्या तुलनेत हनी आणि मोनिका तसे दुय्यमच ठरतात. यशस्वी , लग्नाला 7 वर्ष झालेल्या जोडप्याला मूल नसण्यावरून विचारले जाणारे प्रश्न, त्यांच्यावरचा दबाव आणि त्यातून नात्यावर येणारा ताण हे सर्व चित्रपटात नेमकं दाखवलं आहे आणि ते दाखवताना थोडा तिरकस ,sarcastic सूर पकडल्यामुळे विनोदाची भट्टी जमली आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भागच मला सर्वात जास्त आवडला. पंचेस भारी जमले आहेत.

पुढे शेवटाकडे सरकताना कथानक काहीसं awkward होतं. एकीकडे अक्षय कुमारची over acting दुसरीकडे दिलजीतची over acting. आणि शेवटच्या टप्प्यात इमोशनल मोडमध्ये जाऊन चित्रपट त्याच्या लॉजिकल एन्डकडे पोचतो.

ओव्हरऑल एक वेगळ्या विषयावरचा, बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह, आजच्या काळातील समस्या मांडणारा आणि मुख्य म्हणजे हसवणूक करणारा धमाल चित्रपट आहे.

करीना शाईन्स थ्रू द मुव्ही. कॉमेडी असो वा शेवटचे भावनिक क्षण असोत, तिने कमाल काम केलंय. तिचं स्टायलिंग, wardrobe एकूणच लुक आवडला. अक्षय कुमार परफेक्ट विनोदी टायमिंगच्या जोरावर भाव खाऊन जातो. अजूनही कसला फिट आणि देखणा दिसतो. कियारा आडवाणी आणि दिलजीत डोसांझ यांनीही त्यांच्या वाटयाला आलेल्या भूमिका चोख केल्या आहेत. मुख्य चारी कलाकार प्लस आयव्हीएफ डॉक्टर्स या सर्वांची कामं दमदार झाल्यामुळे चित्रपटाची भट्टी जमली आहे.
यात करीना एक मॉडर्न करियर वुमन आहे. तिला उगाच घरात स्वयंपाक करताना, सासरच्यांनी मर्जी सांभाळताना दाखवलेलं नाही. हे मला फार आवडलं. तिला नवरा हवा आहे पण एका मर्यादेपलीकडे ती त्याचं ना काही ऐकून घेते ना ती त्याच्यावर अवलंबून असते. अशी कॅरेक्टर आणखी लिहिली जायला हवीत.

अशा छान जमलेल्या मुव्हीला मध्येच रिग्रेसिव्हपणाचे मूड स्विंग येणं म्हणूनच खूप इरिटेट झालं. आई होण्यात बाईच्या लाईफचे सार्थक, गर्भपात म्हणजे पाप वगैरे ट्रॅकवर मध्येच मुव्ही जाऊ लागतो. मग परत खूप डिरेल व्हायच्या आत सीन बदलतो. पण तरी का? व्हाय- हा प्रश्न पडतोच.
याव्यतिरिक्त एकूणात एका हायली सेन्सिटिव्ह विषयाच्या जास्त खोलात न शिरता वरवरचाच विचार केल्यामुळे चित्रपट उथळही वाटू शकतो.

दिगदर्शक नवीन आहे राज मेहता म्हणून. पहिलाच प्रयत्न उल्लेखनीय आहे. गाणी काही खास लक्षात राहिली नाहीत.

का बघावा- डोकं बाजूला काढुन ठेवून चार घटका धमाल करमणूक, वेगळा विषय, प्रोग्रेसिव्ह मांडणी, करीना-अक्षय.

का टाळावा- वेब सिरीज किंवा मालिका टाईप घराच्या दिवाणखान्यात किंवा क्लिनिकमध्ये चित्रपट घडतो. भव्यदिव्य बाहुबली टाईप काही नाही. लहान मुलांना संवाद ऐकून बरेच प्रश्न पडू शकतात.

3.5 out of 5.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

> किंवा, हे सगळं न होता त्या अपत्याबरोबर मस्त आयुष्य झालं तर? ही देखील शक्यता आहेच. त्यामुळे सकारात्मक विचार केलेला बरा. > हे म्हणजे व्यावसायिक सिनेमाला सोयीस्कर- आणि ते सुखाने नांदू लागले - झालं.

> हा एकदम अचुक सिनेमा नाहीचे. पण विचार हाताळणी अगदीच बालीश नाहीये. > नाही. बालिश नाहीय. पण बोल्ड, अपारंपारिकदेखील नाहीय. हटके परिस्थितीवर नेहमीचीच सरधोपट उत्तर निवडणारा आहे.
किंवा गैरसोयीचे प्रश्न अनुत्तरीत ठेवलेत. जसं की
• डॉक्टर ने केलेल्या मोठ्या व्यवसायिक चुकीचं काय?
• दत्तक पर्यायचा विचार
• गर्भपात करण्याच्या हक्काच समर्थन
• सनवने मागील पानावर लिहलेले पालकत्वबद्दलचे प्रश्न
===

हम आपके दिल में रहते है हा अजूनेक चित्रपट आठवला.

चित्रपट अजून पाहीला नाही आहे,पण चर्चा आवडतेय आणि चित्रपट न पाहता केवळ रिव्हू वाचून पडलेले प्रश्न पाहून आश्चर्य,कारण कथा आणि सादरीकरण या दोन वेगळ्या बाबी आहेत .

गर्भपातबद्दलदेखील असंच दाखवतात नेहमी. करायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे स्त्रीचा असला पाहिजे, कोणीच तिच्यावर दबाव आणू नये वगैरे बरोबर. पण तो निर्णय नेहमी गर्भपात नाही केला असाच का दाखवतात?

८० च्या दशकातला सौतन - राजेश खन्ना + टीना मुनीम पती पत्नी - राजेशला मूल हवंय तर टीनाची इतक्यात आई बनायची तयारी नाहीये. मग ती अशी काही वागते की (म्हणजे दिवस गेलेले असताना बाहेर बिनधास्त नाचणे बागडणे पोहणे इत्यादी) की तिचा आपोआपच गर्भपात होतो.

ऐतराज २००० च्या दशकातला - अक्षयकुमार + प्रियांका चोप्रा - लिव इन रिलेशनशिप - अक्षयला मूल हवंय, प्रियांकाला नकोय आणि ती सरळ जाऊन गर्भपात करते.

मातीच्या चूली या मराठी चित्रपटातही गर्भपात होतो असंच दाखवलंय.

सौतन बघितला नाही.

> ऐतराज २००० च्या दशकातला - अक्षयकुमार + प्रियांका चोप्रा - लिव इन रिलेशनशिप - अक्षयला मूल हवंय, प्रियांकाला नकोय आणि ती सरळ जाऊन गर्भपात करते. > या सिनेमाचा शेवट - हे असं सगळं वाईटवाईट वागण्याची शिक्षा मिळाली तिला. बरी अद्दल घडली!!- असा आहे.
===
वेगळा अपारंपरिक शेवट असलेला एक सिनेमा आठवला- शुद्ध देसी रोमान्स.

अरे वा, सुरुवातीला धाग्यावर ' चित्रपट बकवास आहे, फालतू आहे' वाचत होते. आता मात्र मस्त चर्चा चालली आहे. चित्रपट बघितला नाही. अक्षय- करिना कपूरसाठी बघेन. मला त्यान्ची जोडी आवडते.

क्या कहनामध्ये प्रिती झिण्टा स्वत: मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेते. मला 'सलाम नमस्ते' चा शेवट आवडला नाही. क्या कहना स्टाईल असायला हवा होता वाटल.

सौतन, एतराज , मातीच्या चुली मधल्या गर्भपात करण्यार्या नायिकान्ना खलनायिका किव्वा उध्दट दाखवलय. आपल्याकडे सिरियल्स, चित्रपटामध्ये असा निर्णय घेणार्या स्त्रीयान्ना खलनायिका किव्वा वाईट दाखवल जात ( अपवाद युवामधली राणी मुखर्जी).

भाई चित्रपटात सुनीताबाई एकट्या जाऊन गर्भपात करून येतात. त्या अजिबात खलनायिका नसतात उलट अतिशय खंबीर असतात.

अक्षयचं मुल किएरा सांभाळतेय. तिला आपल्या जैविक मुलाची काळजी घेताना बघून अक्षय तिच्याकडे आकर्षित झाला तर? >> Happy मग गुड न्यूज २!! आता वर त्यात "क्या खबर थी जाना तुमसे प्यार हो जाएगा" चा रिमिक्स टाकायला पण स्कोप आहे!!!!!! दिलजित-करिना पेयरिंग झाले तरी काय कॉप्लिकेटेड नाय बा, 'मौजा ही मौजा' चा रिमिक्स टाका नि गुड न्यूज ३ पण काढा वाटल्यास... जसं जे घडेल तसं सुखी रहावं सगळ्यांनी.

ए-लिस्ट हिरवीणी फुल टर्म प्रेग्नंट दाखवणे हेच बर्‍यापैकी अपारंपारिक आहे, बरं. नायतर तिला एखादी उलटी होते की गाणं सुरू होतं आणि ३ मिनीटात छान जावळ असलेलं हसरं हसरं बाळ मिळतं...... बी-लिस्ट सहनायिका असेल तर तिची प्रेग्नन्सी जरा तरी फुटेज खाते. एखादं डोहाळे जेवण होतं, क्वचित हॉस्पिटलला नेताना ट्रॅफिक तापदायक ठरतो, क्वचित एखादे वेळी रक्त बिक्त लागतं....

पर्याय नसेलच तिथे गर्भपात करुन घेणे योग्य पण मूल हवंय कां नकोय हे माहीत नाही म्हणून निष्काळजीपणा केल्यामुळे गर्भपात करायचा का? त्यापेक्षा काळजी घ्या.
अर्थात, चुकून चूक झाली म्हणून आयुष्यभर इच्छा नसताना पालक होऊन ती चूक निस्तरत बसावी का? हा दुसरा valid मुद्दा.

मी हा सिनेमा बघितला नाही पण जे काय वर लिहिले आहे त्याप्रमाणे करीना - अक्षय दोघे एकत्र राहतात ते बरोबर दिसतंय. दोघांनी आपापल्या वागण्यावरून मुलाबद्दल काय भावना आहेत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत ते स्पष्ट केलंय. त्यामुळे कोणी कोणाचं लोढणे नाहीये. त्या दोघांना एकत्र राहायचं आहे म्हणून एकत्र राहत आहेत. Typical मुलासाठी एकत्र राहू असा सीन दिसत नाहीये.

मी अजुन मुव्ही पाहिलेला नाही पण ट्रेलर नुसार स्पर्मची अदलाबदल होते पण बिज तर त्याचे स्वतःचेच असतात ना? मग अक्षय च मुल कियाराच्या पोटात वाढतय हे लॉजिकली बरोबर कस? गर्भधारणा होण्यात स्पर्म आणी बिज याचा ५०-५० वाटा आहे.

@प्राजक्ता- फारच बेसिक प्रश्न आहे Biggrin माझं बायोलॉजी मराठी माध्यमातून नाही झालंय पण माझ्या मते बीज म्हणजेच स्पर्म ना?

# बाकी अ‍ॅबोर्शनचा निर्णय सकारात्मक पध्दतीने दाखवणं बॉलिवुडच काय हॉलिवुडलाही नाहीच जमत.
https://hollywoodlife.com/2017/05/11/greys-anatomy-cristina-yang-abortio...
शेवटी क्रिस्तिना एका करियरच्या संधीसाठी युरोपात मुव्ह होते असा कॅरेक्टरचा शेवट दाखवलाय. मूल नकोच हा निर्णय घेऊन त्याप्रमाणे आयुष्यात नंतर अजिबात पश्चात्ताप न वाटता आनंदात राहणारी,मनासारखी करियर करत असणारी स्त्री व्यक्तीरेखा हॉलिवुडमध्येही कमीच बघायला मिळते. म्हणूनच मला acceptance of childlessness हा फेमिनिझमचा एक फायनल फ्रंटियर वाटतो. स्टिल लाँग लाँग वे टू गो. लॉट्स ऑफ बिग कॉर्पोरेट्स वाँट विमेन टू हॅव किड्स- इट्स ह्युज इकॉनॉमी - वॉलमार्ट /कॉस्टकोच्या बेबी-किड्स सेक्शनचा साईझ बघा- मग तिथे शुकशुकाट इमॅजिन करा.

## अ‍ॅमीने जे अक्षय कियाराबद्दल लिहिलंय तसं काही चित्रपटात दूरान्वयानेही नाही. म्हणून तर म्हटलं की प्रोग्रेसिव्ह चित्रपट आहे. अन्यथा फर्टिलिटी चॅलेंज असलेली मुख्य नायिका, मग तिने नवर्‍याच्या आयुष्यात फर्टाईल उपनायिका आणणे, मग प्रेमाचा त्रिकोण हा बॉलिवुडच्या पुरुष डिरेक्टर्सचा आवडता फॉर्म्युला आहे. नायिकेला मूल होऊ शकत नाहीये असं दाखवलं जातं पण नायकाच्या बाबतीत असा प्रॉब्लेम सहसा दाखवला जात नाही. (वास्तविक जितक्या केस स्त्री वंध्यत्वाच्या असतात सेम तितक्याच पुरुष वंध्यत्वाच्या असतात. पण विकी डोनर किंवा तवेमरि सोडता हा इश्यू घेतलेला नाही. तिथेही दोन्हीकडे मुख्य नायक वंध्यत्व फेस करताना नाहीच दाखवलेला.) म्हणूनच इथे स्वतःच्या पुअर स्पर्म क्वालिटीबद्दल बोलणारा , जोक करणारा अक्षय दिसणं खूपच प्रोग्रेसिव्ह आहे. अक्षयने हा रोल घेतला याबद्दल त्याचं कौतुकही वाटलं.

हेमा - जितेंद्र चा बऱ्याच नन्तर आलेला एक चित्रपट आहे ज्यात हिरोची पत्नी 8 महिन्याची गरोदर असते हा कथेचा महत्वाचा भाग आहे. हेमाने ईशाच्या वेळेस गरोदर असताना ही भूमिका केली आहे.

अहो सनव त्यांना बीज म्हणजे एग म्हणायचे आहे.
फेमिनिस्ट विचार मांडला आहे. तुम्हाला जमणार आहे का खोडून काढणे???

गर्भपात हा टोकाचा निर्णय.
करीना एकदा अक्षयच्या दबावामुळे करतेही विचार. पण ६-७ वर्षे मुल होण्यासाठी वाट बघणार्या कोणालाही ते सहज शक्य नाही.
त्यात कियारा या अगोदर दोन वेळा miscarriage झाल्याचा उल्लेख करते.

ऋ +1
Wink

{{{ वास्तविक जितक्या केस स्त्री वंध्यत्वाच्या असतात सेम तितक्याच पुरुष वंध्यत्वाच्या असतात. पण विकी डोनर किंवा तवेमरि सोडता हा इश्यू घेतलेला नाही. तिथेही दोन्हीकडे मुख्य नायक वंध्यत्व फेस करताना नाहीच दाखवलेला. }}}

तवेमरि म्हण्जे काय?

अनाहत सिनेमात पुरुष वंध्यत्व हा विषय आहे.

मणी मंगळसूत्र नावाच्या सिनेमातही रवींद्र मंकणी नपुसंक दाखवले आहेत. छान आहे तो चित्रपट. नपुसंक आणि वंध्यत्व वेगळे आहे बहुतेक. नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांचा एक चित्रपट आहे बहुतेक या विषयावर.

अनाहत - मस्त आठवण करून दिलीत. सिनेमा पाहिला नाही पण रिव्ह्यू वाचले
Anaahat: Delving deep into human psyche
Anaahat : The eternity of sex

Female Sexuality बद्दलचा अजूनेक सिनेमा म्हणजे मिर्च. बघितला नसेल तर नक्की बघा.

<<< सिनेमा पाहिला नाही पण रिव्ह्यू वाचले >>>
नुसते रिव्ह्यू वाचून मत बनवण्यापेक्षा चित्रपट बघून मत बनवणे चांगले.

चित्रपट बघून पैसे &/ वेळ वाया घालवण्यापेक्षा रिव्ह्यू वाचून कोणता चित्रपट बघायचा आणि कोणता नाही याचं मत बनवणं चांगलंए.

भाई चित्रपटात सुनीताबाई एकट्या जाऊन गर्भपात करून येतात. त्या अजिबात खलनायिका नसतात उलट अतिशय खंबीर असतात. >>>>>>>>> भाई चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे.

दृष्टी चित्रपटात डिम्पल करून घेते गर्भपात दुसरं मूल नको म्हणून. तीच protagonist आहे. >>>>>>>>>> हा आर्ट सिनेमा आहे वाटत. जनरली आर्ट सिनेमे वास्तवाला धरुन असतात. कर्मशिअल सिनेमान्च मात्र तस नसत.

हेमा - जितेंद्र चा बऱ्याच नन्तर आलेला एक चित्रपट आहे ज्यात हिरोची पत्नी 8 महिन्याची गरोदर असते हा कथेचा महत्वाचा भाग आहे. हेमाने ईशाच्या वेळेस गरोदर असताना ही भूमिका केली आहे. >>>>>>> मेरी आवाज सुनो.

ऑर्थोडॉक्स कुटुंबातील, माझ्या एका खमक्या गुजराथी मैत्रिणीने असा एकटीने जाउन, राहीलेला दुसरा गर्भ अ‍ॅबॉर्ट केलेला होता. कौतुकमिश्रीत, कमाल वाटते मला तिच्या निर्णयाची.

अनाहत बघण्यात वेळ वाया घालवू नका. अतिशय गुडी गुडी चित्रपट. हम्पीसारख्या ठिकाणी चित्रीकरण करायला मिळाले, पण चित्रपटात हंपी अजिबात दिसत नाही. विषयाचे गांभीर्य तर अजिबातच दिसत नाही.

त्या तुलनेत मूळ सुरज की अंतिम किरणसे.... हे नाटक खूप छान आहे, विषय अतिशय उत्तम मांडलाय, पात्रांचा मानसिक संघर्ष अतिशय उत्तम उतरलाय. मी झी5वर पाहिले होते, त्यातील अभिनेतासंचाने खूप सुंदररित्या सादरीकरण केले होते.

https://www.zee5.com/videos/details/surya-ki-antim-kiran-se-surya-ki-peh...

.
.

ऑर्थोडॉक्स कुटुंबातील, माझ्या एका खमक्या गुजराथी मैत्रिणीने असा एकटीने जाउन, राहीलेला दुसरा गर्भ अ‍ॅबॉर्ट केलेला होता.>>>

कोणीतरी सोबत असल्याशिवाय व त्यांच्यातील नाते रजिस्ट्रेशन फॉर्मवर लिहिल्याखेरीज डॉक्टर अबोर्शन करत नाहीत. अर्थात स्वतःसंबंधी असा निर्णय घ्यायचे धाडस करणाऱ्या तुमच्या मैत्रिणीचे कौतुक आहेच. अबोर्शन बरे की वाईट हा निर्णय संबंधित स्त्रीवर सोडावा हेमावैम आहे.

चित्रपट बघून पैसे &/ वेळ वाया घालवण्यापेक्षा रिव्ह्यू वाचून कोणता चित्रपट बघायचा आणि कोणता नाही याचं मत बनवणं चांगलंए>>>>

मी रिव्ह्यू वाचते पण त्यावरून मत सहसा बनवत नाही. रिव्ह्यू कोणी लिहिलाय यावरही बरेच काही अवलंबून असते. हल्ली पेड रिव्ह्यू पण बरेच लिहिले जातात.

मी रिव्ह्यू वाचते पण त्यावरून मत सहसा बनवत नाही. रिव्ह्यू कोणी लिहिलाय यावरही बरेच काही अवलंबून असते. हल्ली पेड रिव्ह्यू पण बरेच लिहिले जातात.
___
+७८६

म्हणून ओळखीच्यांची मते विचारावीत. ज्यांची आणि आपली चित्रपटांची आवड जुळते अश्यांना विचारावे. पण अर्थात काही बघायला जाण्याआधी चौकशी करूनच जावे हे योग्य.

आम्ही कॉलेजात असताना करण्ट बूकींगमध्ये तिकीट काढायच्या आधी त्या चित्रपटाचा आधीचा शो बघून आलेल्या लोकांना विचारायचो. वेळ न दवडता सत्य बोलतात. मग तिकीट काढून थेटरात जायचे की बार गाठायचा हे ठरायचे.

आणि बारचा रिव्ह्यू कुणाला विचारायचा ? दारात आडवा पडलेल्याला?

आणि तू सिनेमा अन बार काय करतोस?
मोदी , शिवाजी पुस्तक , अजून कुणी लिहिले नाही

Pages