स्वप्न - २

Submitted by 1987 on 20 December, 2019 - 03:06

घरी येऊन फ्रेश झाली. आई नेहेमी प्रमाणे जेवणाला लागलेली. मोबईल वर एक मूवी डाउनलोड करून ठेवलेला. बिछान्यात आडवी होऊन तो बघायला लागली. डोळा कधी लागला ते कळलंच नाही.
एक छान अनुभवाचा आनंद ती घेत होती. शांत किनारा. समोर वाहणारी नदी. वाहणाऱ्या पाण्याचा एकसारखा आवाज. भोवतालच्या झाडांमधून येणारे पक्षांचे आवाज. जणूकाही सगळं तिच्याशी बोलत होते. हि तीच शांतता होती जिला ती आजवर शोधत होती. एक वेगळ्याच विश्वात ती पोहोचली होती. स्वतःला पूर्ण विसरून.
“कसं वाटतंय?”. आवाजाने तिची तंद्री भंग पावली. कोण तडमडल हे बघायला तिने डोळे किलकिले केले. बाजूला एक छानसा दिसणारी व्यक्ती बसलेली. असेल चार पाच वर्ष मोठी तिच्याहून. पण मेघनाला इथली शांतता सोडून सध्या काशातच स्वारस्य नव्हतं.
“खूपच छान. आपण?” ती फक्त नाईलाजास्तव बोलली. नको असलेल्या लोकांना दूर कसं ठेवायच हि कला तिला व्यवस्थित अवगत होतीच.
“मी देव.”
आता मात्र तिला हसू आवरेना. “अरे देव तर स्वर्गात असतात ना? इथे जंगलात काय शोधताय?” ती हसतच म्हणाली.
“ शोधत नाहीये ग काही. तुला भेटायला आलोय.”
“मला?” चेहेऱ्यावर भल मोठं प्रश्नचिन्ह. “काय देव मला वर द्यायला स्वर्गातून खाली आलेत की काय?” थोड्या मिश्कीलिनेच बोलली ती.
“नाही ग. वर वगैरे काही नाही. म्हटलं मोकळी बसली आहेस तर मारू थोड्या गप्पा.”
“गप्पा? माझ्याशी? तुम्ही देव. मी सामान्य मुलगी. बोलणार तरी कशावर? माझ्याकडे काही नाही शेअर करायला. तुम्हीच बोला.” आलेला राग तिच्या बोलण्यात दिसत होता. एक तर इतक्या सुंदर वातावरणात तिची लागलेली तंद्री त्याने तोडली आणी वर देव आहे सांगून तिची टांग खेचतोय. कोण ऐकून घेणार.
“अरे असं का म्हणतेस? मी प्रत्येकाच्या आयुष्यात असं काहीतरी दिलेलच आहे ज्यावर ती व्यक्ती बोलू शकते, शेअर करू शकते. हा आता शेअर करायचा की नाही हे तू ठरवायचं.“
“ओबवियसली असं तर संगळ्यांकडेच असतं, दिवसाला चोवीस तास असतात आणी माणूस झोपलेला नसला तर काहीतरी करताच असतो. तेच मला पण अप्लाय होता. पण त्यात स्पेशल काय आहे शेअर करण्या सारखं?” तिचा अपेक्षेप्रमाणे खडूस प्रतिप्रश्न.
“अस्स होय. बर. मग सांग तुला काय स्पेशल हव आयुष्यात?” थोडा हसून देव बोलला.
आता मात्र तिला राग आवरेना. “एक काम करा, मला भविष्य बघायची कला द्या. मग पुढे काय होणार ते बघेन आणी काही इंट्रेस्टिंग वाटल तर सांगेन तुम्हाला”
“तथास्तु” देव हसतच म्हणाला.
“जेवायला वाढू क? काय विचारते मी? वाढू क?” आई झोपेतून उठवत होती. आवाजावरुन कळत होतं हि पहिली हाक नव्हे. हो म्हणून ती तोंड धुवायला गेली. तोंडावर पाणी मारून टॉवेल ने तोंड पुसून घेतलं. समोरच्या आरश्यात बघताना तिला स्वप्न आठवून स्वतःवरच हसू आलं.
आईने आजून वाढल नव्हत. ही आधीच म्हणाली “मला भेंडा नको फक्त बटाट्याची भाजी वाढ.”
“बर झोपेत पण वास कळतो.” आईने आश्चर्याने विचारलं. “पण मी बटाट्याची भाजी नाही बनवली आज.”
मेघनाला आठवेना तिला कधी वास आलेले ते. आणी त्यात बटाट्याची भाजी तर बनली पण नाही घरात. मग आपण असे क बोललो.
इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. मेघनानेच उठून दरवाजा उघडला. बाजूच्या काकू दरवाज्यात उभ्या होत्या. दरवाजा उघडल्यावर आत आल्या. हातातली मोठी वाटी आईच्या हातात देत म्हणाल्या “आज बटाट्याची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे. खाऊन काशी झाली आहे ती सांगा हा.” स्वतः बनवलेल इकडे आणून देण हा काकूंचा आवडता उद्योग. मेघनाला माहीत होतं की हाताला चव पण छान आहे त्यांच्या.
“बघ तू बोललीस आणी आली बघ बटाट्याची भाजी.” आई हसून म्हणाली. मेघनाच्या पण लक्षात आल ते. योगायोग दूसर काय. माघासच स्वप्न आठवला तिला. मेघनाला भविष्य दिसत. तिचा तिलाच हसू आल.
जेवण आटपून, किचन आवरून ती झोपायच्या तयारीला लागली. इतक्यात फोन वाजला. तिच्या एकुलत्या एक मैत्रिणीचा कॉल. मधुचा.
“कल दोपहर मूवी जाना है, रेडी रेहेना” डायरेक्ट ऑर्डर देऊन मोकळी. मेघनाला हसूच आल. तस तर तिला सुट्टीच होती. पण क कोण जाणे मूवी नको वाटल. पण नकार देण तिला योग्य नाही वाटल. “सून तो, मूवी नाही शॉपिंग चलते है. मुझे जीन्स लेनी है कबसे” मेघना हळूच म्हणाली आणी मधू कस रियाक्ट करते हे बघत होती. “क्या यार तू भी.” पण थोडीशी हुज्जत घालून झाली तयार. शनिवरचा लंच आणी शॉपिंग चा प्रोग्राम फिक्स झाला.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users