स्वप्न - 1

Submitted by 1987 on 18 December, 2019 - 08:38

गोष्ट आहे एका मुलीची. स्वप्नात रमणाऱ्या मुलीची. मेघनाची.
नुकतीच तेहतीशी नुकतीच पूर्ण केलेली. शिडशिडीत बांधा त्यामुळे तिशीची पण दिसायची नाही. दिसायला सुंदर. रंगाने गोरी आणी मनाने निर्मळ.
घरची परिस्थिती बेताची. वडील लवकर गेले. भाऊ मोठा पण घरची जबाबदारी घेणं त्याला काही जमलं नाही. आई नेहेमी घरकामात मग्न. मग काय मेघनाबाई झाल्या झाशीच्या राणी. अगदी सहजपणे घर सांभाळून घेतलं. आलेल्या कोणत्याही परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ते आयुष्य जगता जगताच शिकली. कोणी जवळच मोठ नाही की कुणी मित्र मैत्रीण नाही. जे जमलं जे पटलं ते केल.
पण आयुष्य सगळे दिवस दाखवत. चांगले आणि वाईट सुद्धा. कधी चुकाही झाल्या हातून. वाईट अनुभव तसे जास्त आल्याने स्वभाव थोडा कडवट झालेला. मनात राग. आयुष्यावर, स्वत:वर. मग सडेतोड बोलायला शिकली. राग काढायचा मात्र स्वत:वरच. हातातून झालेल्या चुकांची कबुली स्वत:कडे कधीच दिलेली. म्हणूनच स्वतःवर राग. आणी मग स्वत:भोवती एक कुंपण घालून घेतलेलं. कुणीही जवळ यायच नाही. कुणातही भावनिक गुंतायच नाही. मुळात कुणावर विश्वास नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येकाने त्रास दिलेला. एव्हाडयाश्या आयुष्यात कडू आठवणी जमा तरी किती करायच्या?
नाही म्हणायला एक आवडलेला दोन तीन वर्षांपूर्वी. पण त्याला कुठेच इच्छा नव्हती आयुष्याचा जोडीदार बनायची. डोक्यात प्रचंड राग. राग काढायला दुसऱ्याला जवळ केला. त्याचा अगोदरच लग्न झालेल. पण रागापुढे काहीच दिसल नाही. इतके दिवस स्वतःला जपून ठेवलेल, देऊन टाकल त्याला. तस पण एकविसाव्या शतकात या गोष्टींना महत्व ते किती.
तर अशी हि मेघना. चुकत शिकत आयुष्य जगत पुढे चाललेली. तिच्या वयाच्या मुलींच लाडाच आयुष्य मेघनाच्या नशिबी नाही आल. पण मनाने अगदी निर्मळ राहिली. कोणाचही वाईट कधी तिच्या मनात नाही आला. अनुभवांनी खंबीर बनवल. आयुष्याने इतक शिकवलं की कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला कधीही तयार. तर अशी हि मेघना.
ऑफिस आणी घर. रोजचं रुटीन होऊन गेलेलं. आज शुक्रवार. पूर्ण आठवडा खूप काम झाल्याने मेघना खूपच दमलेली. संध्याकाळी घरी जाताना एकच जमेच गोष्ट डोक्यात होती. दूसरा शनिवार असल्याने सलग दोन दिवस सुट्टी. मेघनाने ठरवलेल, मस्त आराम करायचा. कुठेही बाहेर जायचं नाही की कोणत काम अंगावर घ्यायच नाही. फक्त आराम. पुढच्या आठवड्यात पण खूप काम असणार होतं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults