Submitted by मन्या ऽ on 5 December, 2019 - 15:52
गणितं..
आयुष्याच्या पाटीवरची
गणितं माझी चुकली
चुका लपवण्यासाठी
मी ती पटापट पुसली
मनाचा शिक्षक आहे थोर
कडक शिस्तीचा
पुसलेली गणितं
परत परत विचारली
उत्तर देता येईनात
झाली पळता भुई थोडी
माझे मनच होऊनी मैत्र
आता माझी शिकवणी घेई
शिकवणी झाली चांगली
मास्तरांनी सांगितला
एक जालिम उपाय
जुनी शिदोरी पाठीला
नवे अनुभव बांध गाठीला
निर्धास्त होऊन जग
मी आहेच तुझ्या सोबतीला
उपाय कामी आला
अन् आनंदीआनंद झाला
नवे लोक नवी आव्हानं
असतील रोज रोज
कशाला दडायचे
आता थेट भिडायचे
मनसोक्त जगायचे
पण ह्यावेळी
गणितं सोडवताना
भान मात्र ठेवायचे!
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
जुनी शिदोरी
जुनी शिदोरी
+ नवे अनुभव
(मनाचा शिक्षक हातचा)
---------------------------
उत्तर: मनसोक्त जगायचे
मस्त ......
मस्त ......
गणित .....गणितं
आव्हान ......आव्हानं
अप्रतिम कविता, आवडली!!!
अप्रतिम कविता, आवडली!!!
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
अप्रतिम कविता आहे
छान कविता, आवडली
छान कविता, आवडली
छान!
छान!
खूप सुंदर
खूप सुंदर
मस्त जमली आहे. आवडली.
मस्त जमली आहे. आवडली.
(दुसऱ्या ओळीत ‘गणीत’ या शब्दावर अनुस्वार हवाय का?)
केवळ सुंदर!
केवळ सुंदर!
सामो, पाभे, राजेंद्र , अज्ञा,
सामो, पाभे, राजेंद्र , अज्ञा, यतीन, कुमारदा, क्युटी, नेहा, अप्पा, साद
प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!!
@राजेंद्र देवी, बदल केला आहे. धन्यवाद!
@ हरिहरजी, आपल्या
@ हरिहरजी, आपल्या प्रतिसादाच्या ओळीत ओळीत ‘गणीत’ या शब्दात पहिली वेलांटी हवी का?
(हळू घ्याल हि अपेक्षा.)
अहो पाषाणभेद, हळू काय घ्यायचे
अहो पाषाणभेद, हळू काय घ्यायचे, माझी प्रचंड बोंब आहे शुद्धलेखनाची. णळाचा आणि बानाचा मी फार गोंधळ करतो.
वेलांटी, उकार यात काही चुक असती तर मी सुचवली नसती पण येथे गणित या शब्दाचे अनेकवचन अभिप्रेत आहे म्हणून अनुस्वार हवाच असे वाटले. म्हणून आवर्जून सुचवले इतकेच.
नेहमी प्रमाने छान लिहीलेस
नेहमी प्रमाने छान लिहीलेस कविता.
अरे वा छान
अरे वा छान
कविता आवडली !
कविता आवडली !
सिद्धि, डॉ.काका, आनंद
सिद्धि, डॉ.काका, आनंद प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
khup chan kavita
khup chan kavita
आजच वाचनात आली. नवीन
आजच वाचनात आली. नवीन वर्षासाठी स्फूर्ती देणारी कविता..
मस्त
मस्त
मस्त आहे, भारीच एकदम.
मस्त आहे, भारीच एकदम.
अक्षय, वेडोबा, बोकलत
अक्षय, वेडोबा, बोकलत प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
बुन्नु, तुमच्या सुंदर प्रतिसादासाठी खुपसारे धन्यवाद!
सर्व प्रतिसादक आणि माबोकरांना हे नवीन वर्ष सुखाचे, आंनदाचे आणि भरभराटीचे जावो! खुप खुप शुभेच्छा!