सौदेनडीयन लाल चटणी

Submitted by सान्वी on 3 December, 2019 - 23:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

ओले खोबरे- १ नारळ
लसूण पाकळ्या - ४
बेडगी मिरच्या - ७/८
चिंचेचं बुटुक - चवीप्रमाणे
गूळ - चवीप्रमाणे
मीठ - चवीप्रमाणे
जिरे - १ छोटा चमचा
फोडणीसाठी - तेल, मोहरी, मेथीदाणे (ऑपशनल), हिंग

क्रमवार पाककृती: 

पाककृती विभागात पहिल्यांदाच लिहिते आहे, तशी सोपी पण चविष्ट रेसिपी देते आहे, बरेच जण थोड्या फार फरकाने करतही असतील. मी माझे व्हर्जन दिले आहे. तर कृती पुढीलप्रमाणे:
बेडगी मिरच्या गरम पाण्यात साधारण दोन तास आधी भिजत घालून घ्या.
आता खोबऱ्याचे तुकडे धुवून बारीक चिरून घ्या.
त्यानंतर, मिक्सरमध्ये जीरे, लसूण आणि खोबरे बारीक करून घ्या.
त्याच भांड्यात आता मिरच्या, चिंच बारीक वाटून घ्या, त्यानंतर साधारण प्रमाणानुसार मीठ, गूळ आणि पाणी घालून अगदी गंध वाटून घ्यावे, चव तिखट थोडी आंबटगोड अशी झाली पाहिजे, तिखटपणा कमी वाटत असल्यास थोडे लाल तिखट add करू शकता.
आता चटणीला वरून फोडणी द्यायची त्यासाठी तेल चांगले गरम करून मोहरी, मेथीदाणे आणि हिंग अशी चुरचुरीत फोडणी द्यावी, चटणी खायला तयार.

अधिक टिपा: 

बेडगी मिरच्यांचा खूप सुरेख रंग येतो आणि दक्षिणात्य पदार्थांसोबत तर खाऊ शकतोच पण साध्या जेवणात पण तोंडीलावणं म्हणून छान लागते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद वावे... पाककृती लिहिणार असं ठरलं नव्हतं, त्यामुळे फोटो आधी काढला नाही, नंतर आता सवडीने पाककृती देते आहे. ( तसेही फोटो डकवता येत नाही अजून Happy )

अय्यो ! सान्वी ही चटणी हैद्राबाद साईडला वगैरे देतात का डोसा व ईडली सोबत? कारण मी हीच रेसेपी शोधत होते. तुला पोटभरुन धन्यवाद ! Happy

एक टॉमेटोची पण याच पद्धतीची आहे बहुतेक.