ओळखा पाहू .... एक गंमतखेळ: क्रिकेट

Submitted by स्वरुप on 27 November, 2019 - 04:04

यावर्षीच्या गणेशोत्सवात खेळलेल्या "ओळखा पाहू .... एक गंमतखेळ" या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्या प्रतिसादावरुन प्रोत्साहित होवून हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवावा अशी एक कल्पना सहज मनात आली.
यातली रंगत कायम ठेवण्यासाठी दर एखाद महिन्याने आपण सर्वानुमते पुढच्या महिन्यासाठीचा विषय ठरवू शकतो.

अर्थात या खेळातली गंमत पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे.... गणेशोत्सवात दिलेल्या प्रतिसादाइतकाच भरभरुन प्रतिसाद मिळेल ही रास्त अपेक्षा!

जे लोक हा खेळ आधी खेळले नाहीयेत त्यांच्यासाठी थोडक्यात कल्पना देतो

मायबोलीकरांमध्ये क्रिकेट फार लोकप्रिय आहे म्हणून तोच आपल्या या खेळासाठी पहिला विषय म्हणून घेवूया.

विषय: क्रिकेट

यामध्ये क्रिकेटशी संबंधित एखाद्या व्यक्तीबद्दल (खेळाडू/पंच/समालोचक/समिक्षक/मार्गदर्शक/सपोर्ट स्टाफ/पदाधिकारी) एखादा क्ल्यू देईल जसे की टोपणनाव/एखादा विक्रम/ठराविक लकब/ प्रसिद्ध किस्सा/ मास्क केलेला फोटो/इतर माहिती त्यावरुन आपल्याला त्या व्यक्तीचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
नेटवेस्टच्या त्या प्रसिद्ध फायनल विजयानंतर दादा पाठोपाठ शर्ट काढण्याचा प्रयन्त करणारा अजुन एक भारतीय खेळाडू कोण होता?
उत्तर: हरभजनसिंग

किंवा
९० च्या दशकात कुठल्या भारतीय खेळाडूला त्याच्या संघ सहकाऱ्यांनी " ज्यॉंटी ऱ्होड्स" हे नाव पाडलेले
उत्तर: नवज्योत सिद्धू

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी या खेळातला पहीला क्ल्यू आहे: (एकदम सोप्पा)

पदार्पणाच्या T20 सामन्यात सलग तीन षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण होता?
तो केंट कडून काउंटी क्रिकेटही खेळला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डेमियन मार्टिन. बरोब्बर. ह्या सामन्यात डेनिस लिलीही खेळला होता. सचिन आणि तो एकत्र खेळण्याचा हा एकमेव प्रसंग असावा. Happy

भारतीय संघात "ग्यानबाबा" हे नाव कुणाला पडले होते?

हे नाव पडण्यामागे कारण होते की या माणसाकडे प्रत्येक गोष्टीची एक थेअरी असायची!

झहीर खान ना? पण ते थिअरी असायची म्हणून, की गोलंदाजांना आणि कप्तानाला सल्ले द्यायचा म्हणून? Proud

कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला कसोटी सामना १८७७ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. बरोबर १०० वर्षांनी १९७७ मध्ये पुन्हा एकदा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला गेला.

या दोन्ही सामन्यात असणारे अजून एक साम्य कोणते?

कसोटी इतिहासात दोन कसोटी सामने असे झालेत ज्यात एका विशिष्ट दिवशी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पहिल्या डावाचा शेवट, गोलंदाजी करणाऱ्या संघाचा पहिला डाव, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा दुसरा डाव व प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात असे चारही डाव एकाच दिवशी खेळले गेले.

हे कसोटी सामने कोणते?

एक तर भारत-न्यूझीलंड
२००२-२००३ मध्ये आहे ना? दुसरं अगदी जिभेवर आहे पण आत्ता आठवत नाही.

आठवलं. दक्षिण आफ्रिका - ऑस्ट्रेलिया २०११. पण अजूनही एक आहे बहुधा. :विचार करणारा बाहुला:

भारत-अफगाणिस्तान धरला तर ४ होतात. >>

हो. सामन्यातले सर्व डाव एकाच दिवशी, असाही प्रश्न होऊ शकेल. पण सामन्यात दोन किंवा एकच डाव होऊन पावसाने धुवून जाण्याच्या घटनाही बघाव्या लागतील का, ह्याचा विचार करावा लागेल.

Pages