ओळखा पाहू .... एक गंमतखेळ: क्रिकेट

Submitted by स्वरुप on 27 November, 2019 - 04:04

यावर्षीच्या गणेशोत्सवात खेळलेल्या "ओळखा पाहू .... एक गंमतखेळ" या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्या प्रतिसादावरुन प्रोत्साहित होवून हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवावा अशी एक कल्पना सहज मनात आली.
यातली रंगत कायम ठेवण्यासाठी दर एखाद महिन्याने आपण सर्वानुमते पुढच्या महिन्यासाठीचा विषय ठरवू शकतो.

अर्थात या खेळातली गंमत पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे.... गणेशोत्सवात दिलेल्या प्रतिसादाइतकाच भरभरुन प्रतिसाद मिळेल ही रास्त अपेक्षा!

जे लोक हा खेळ आधी खेळले नाहीयेत त्यांच्यासाठी थोडक्यात कल्पना देतो

मायबोलीकरांमध्ये क्रिकेट फार लोकप्रिय आहे म्हणून तोच आपल्या या खेळासाठी पहिला विषय म्हणून घेवूया.

विषय: क्रिकेट

यामध्ये क्रिकेटशी संबंधित एखाद्या व्यक्तीबद्दल (खेळाडू/पंच/समालोचक/समिक्षक/मार्गदर्शक/सपोर्ट स्टाफ/पदाधिकारी) एखादा क्ल्यू देईल जसे की टोपणनाव/एखादा विक्रम/ठराविक लकब/ प्रसिद्ध किस्सा/ मास्क केलेला फोटो/इतर माहिती त्यावरुन आपल्याला त्या व्यक्तीचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
नेटवेस्टच्या त्या प्रसिद्ध फायनल विजयानंतर दादा पाठोपाठ शर्ट काढण्याचा प्रयन्त करणारा अजुन एक भारतीय खेळाडू कोण होता?
उत्तर: हरभजनसिंग

किंवा
९० च्या दशकात कुठल्या भारतीय खेळाडूला त्याच्या संघ सहकाऱ्यांनी " ज्यॉंटी ऱ्होड्स" हे नाव पाडलेले
उत्तर: नवज्योत सिद्धू

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी या खेळातला पहीला क्ल्यू आहे: (एकदम सोप्पा)

पदार्पणाच्या T20 सामन्यात सलग तीन षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण होता?
तो केंट कडून काउंटी क्रिकेटही खेळला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> युनिस अहमद >>>

याने भारताविरूद्ध १९८७ मध्ये कसोटी पदार्पण केले तेव्हा तो ३८ वर्षांचा होता. हा कदाचित विक्रम असावा.

त्या मालिकेतील एका कसोटीत गावसकर फलंदाजी करत असताना हा स्लिपमध्ये उभा होता. गावसकरवर काहीतरी कुजकट कॉमेंट केल्याने गावसकर संतापून बॅट उगारून याच्या अंगावर धावून गेला होता. मैदानातच दोघांची मारामारी सुरू होता होता वाचली. इतर खेळाडूंनी मध्ये पडून दोघांनाआवरले होते.

बरोबर भाचा!
हो त्याचा किस्सा असा की विराट ज्युनिअर लेवलला खेळताना बऱ्यापैकी गुबगुबीत होता... एकदा तो खुप बारीक हेअरकट करुन आला त्यामुळे त्याचे आधीच मोठे असलेले कान अजुन उठुन दिसत होते आणि त्यामुळे दिल्लीच्या एका कोचला तो चंपक या कॉमिक्समधल्या 'चीकू द रॅबीट' सारखा वाटला आणि तेंव्हापासून त्याला चीकू हे नाव पडले.

एकाच मालिकेत २ द्विशतके केलेला भारतीय खेळाडू कोण?

Submitted by पुरोगामी on 28 November, 2019 - 13:16
>>>>
विनोद कांबळी ?

एका कसोटीत एक संपूर्ण षटक सुरू असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाचे १२ खेळाडू क्षेत्ररक्षण करीत होते. हा १२ वा खेळाडू कोण? हाच खेळाडू आयर्लंडचा नसूनही आयर्लंडच्या बाजूने एका अनधिकृत कसोटी सामन्यात खेळला होता.

Lol

सचिनशी संबंधित अजून एक प्रश्न -

महम्मद युसूफ, हर्शल गिब्स, महम्मद रफिक, मश्रफे मोर्ताझा, आणि ----------

ह्या यादीतलं शेवटचं नाव काय, आणि ह्या यादीचा सचिनशी काय संबंध आहे?

>>> हे सगळे शून्यावर बाद झालेत त्यांच्या पहिल्या डावात. >>>

सचिनने पहिल्या डावात १५ धावा केल्या होत्या.

>>> एका कसोटीत एक संपूर्ण षटक सुरू असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाचे १२ खेळाडू क्षेत्ररक्षण करीत होते. हा १२ वा खेळाडू कोण? हाच खेळाडू आयर्लंडचा नसूनही आयर्लंडच्या बाजूने एका अनधिकृत कसोटी सामन्यात खेळला होता. >>>

याचे उत्तर कोणालाच माहिती नाही का?

ही यादी पूर्ण बघितली, तर शेन शिलिंगफोर्ड ह्यात सर्वात शेवटचं नाव असेल.>>> सचिनने दोन्ही डावात बाद केलेले फलंदाज (अंदाज)

हाच खेळाडू आयर्लंडचा नसूनही आयर्लंडच्या बाजूने एका अनधिकृत कसोटी सामन्यात खेळला होता>>> एड जॉइस?

सचिनने दोन्ही डावात बाद केलेले फलंदाज (अंदाज) >>>

जवळ आहे, पण हे नाही. उत्तर आहे मोईन खान.

महम्मद युसूफ, हर्शल गिब्स, महम्मद रफिक, मश्रफे मोर्ताझा, आणि मोईन खान हे पाचच फलंदाज कसोटीमध्ये सचिनकडून १ पेक्षा जास्त वेळा बाद झाले आहेत. (प्रत्येकी २ वेळा) Proud

ओह !! माझा मटकाच होता तसाही.. ....
पण ह्यावरुन मोईनला अशक्य गूगलीवर आउट (दांडकं काढल्याचं) केल्याच आठवल आणि दिल खूष झाला !!! :ड

Cheeku

>>> पुरोगामी, हिंट द्या अजुन! >>>

हा खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षण करीत असताना डोक्यात चेंडू लागून कोमात जाऊन त्याचे निधन झाले होते.

>>> रमण लांबा >>>

बरोबर.

१९८६ मध्ये भारत इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना लीड्स येथील दुसऱ्या कसोटीत भारत क्षेत्ररक्षण करत असताना श्रीकांत काही कारणाने मैदानाबाहेर गेल्याने त्याच्या जागी १२ वा खेळाडू रमण लांबा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. काही वेळाने रवी शास्त्री पुढचे षटक टाकण्याआधी श्रीकांत मैदानात परत आला. परंतु तो परत आल्याचे रमण लांबा, पंच व इतर खेळाडूंच्या लक्षातच आले नाही. नंतर शास्त्रीचे पूर्ण षटक सुरू असताना रमण लांबा सकट एकूण १२ खेळाडू क्षेत्ररक्षण करीत होते. सुदैवाने त्या षटकांत फारसे काही घडले नाही. ते षटक संपल्यानंतर श्रीकांत व रमण लांबा समोरासमोर आल्यानंतर गोंधळ झाला व शेवटी लांबा मैदानातून बाहेर गेला.

तो एका अनधिकृत एकदिवसीय सामन्यात आयर्लंड कडून खेळला होता.

तो ढाका प्रिमिअर लीग मध्ये अनेक वर्षे खेळत होता. एका सामन्यात फॉरवर्ड शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजाने जोरात मारलेला एक चेंडू त्याच्या डोक्यावर इतका जोरात बसला की तो लगेच कोमात गेला व २ दिवसांनंतर वयाच्या ३८ वयाच्या वर्षी कोमातच त्याचे निधन झाले.

कोणीच विचारत नाही, तर सचिनवर तिसरा प्रश्न विचारून हॅटट्रिक करतो.

-------- ह्याने सचिनला ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा बाद केले.

नाही. Wink

Pages