कौन बनेगा मुख्यमंत्री ॽ

Submitted by ashokkabade67@g... on 14 November, 2019 - 12:36

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला जनतेनं कौल दिला होता पण बंद दाराआड निवडणुकीपूर्वी घडलेल्या चर्चेत काय ठरले होते,यावर सेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आणि भाजपने नकार दिला आणि येथेच युतीचे बारा वाजले .बरे जनतेनं कुणा एकाला कौल दिला नाही तर युतीला बहुमत दिले त्यामुळे सेनेशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकत नाही अशावेळी सेनेने मागिल पाच वर्षाच्या काळात भाजपने केलेल्या अपमानाचा वचपा काढला त्यात गैर काहीच नाही कारण भाजपने सेनेची केलेली फरपट सेना विसरु शकत नव्हती,त्यात आघाडीचे संख्याबळाची साथ घेऊन सेनेचा मुख्यमंत्री बसवणं सेनेला सहजशक्य होते आणि आहे पण सेना भाजप आपणास दिलेला शब्द पाळील या आशेने यानंतर राहिली शब्द काय दिला होता हे जनतेला कधिच कळणार नाही कारण शहांनी आजच सांगितले की बंद दाराआड झालेली चर्चा उघड करण्याची आमची संस्कृती नाही त्यामुळे खोटं कोण बोलतोय हे जनतेला कधिच कळणार नाही.याकालावधीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याच समर्थन शंहांनी केले .आता राज्यात महाशिव आघाडीच्या बैठका सुरू आहेत याचं काळात राणेंनी भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तर निंबाळकरांनी राष्ट्रवादी चे आमदार संपर्कात असल्याचे सांगितले याचाच अर्थ महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे कुठलाही विधिनिषेध न बाळगता भाजप सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारच हे ठरले आहे. अशा स्थितीत कौन बनेगा मुख्यमंत्री हा प्रश्न जनतेला पडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मी दिलेल्या सर्व लिंक्स सेनेच्या प्रचारसभांचा माध्यमातून आलेला वृत्तांत आहे. माध्यमांनी खोटा वृत्तांत लिहिला असा दावा असेल तर माझा पास. >> तुम्ही मी लिहिलेले लक्षपूर्वक वाचत नाही असे दिसते. ठाकरे, मुख्यमंत्री आणि प्रचारसभा/पत्रकार परिषद ह्यातले तीनही शब्द सॅटिसफाय करणारा पुरावा तुम्ही द्या मी माझा दृष्टीकोन अपडेट करायला तयार आहे.

सेनेचे नेते काही म्हणोत सुप्रीमो ठाकरे आहेत की नाही. जिथे १ महिना होत आला तरी सेनेचा मुख्यमंत्री होणार की नाही आणि होणार तर कोण? हेच ठाकरे अजून सांगू शकत नाही ह्यावरूनच आधीही त्यांच्या हातात परस्पर ठरवून टाकावे असे काही नव्हते आणि आताही नाही हे मला कळते. जर ठाकरेच काही परस्पर ठरवू शकत नाहीत तर वाचाळ आणि बाष्कळ सेना नेत्यांचे बोलणे आणि पर्यायाने त्यांच्या सभांचे वृतांत्त गांभीर्याने घेण्यात काही अर्थ नाही हे सुद्धा मला कळते.

आता निवडणूक पूर्व युती तोडली. झालं .>>> निवडणूक पूर्व भरत?

मुंबई मनपाच्या कंत्राटदारांवर आयकर खात्याच्या धाडी पडल्यात. >> हे 'राणे अ‍ॅट वर्क' आहे असे दिसते.

इतक्या लिंक्स देऊन सुद्धा मानायचंच नसेल तर माझा नाईलाज आहे. >> पुरोगामी, quantity does not matter in this case. माझं मानणं न मानणं सुद्धा जरूरी नाही. मला मोदी/फडणवीसांचा शब्द वि. ठाकरेंचा शब्द असे बघायला मिळेल तेव्हाच मी त्यातून निष्कर्ष काढून काही मानेन ना?
जेव्हा Your word against my word अशी परिस्थिती येते तेव्हा दोघांचे शब्द परखण्यासाठी ते एकाच डोमेनमध्ये (रीड पब्लिक डोमेन) असणे जरूरी आहे. ईथे मुद्दा मोदी/शहा/फडणवीस काय म्हणाले विरूद्ध राऊत आणि ईतर सेना नेते काय म्हणाले असा नसून मोदी/शहा/फडणवीस वि. ठाकरे असा आहे.

मी तुम्हाला पुन्हा एकदा Happy विचारतो, स्वतः ऊद्धव ठाकरे 'शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार' असे जनतेसमोर किंवा पत्रकारांसमोर म्हणतांनाचा विडिओ तुम्ही देऊ शकता का?

तसा विडिओ नसेल तर ऊद्धव ठाकरेंनी स्वतः शिवसैनिकांशी खोटे बोलून त्यांना मिसलीड केले आहे आणि ही राजकीय परिस्थिती जनतेवर लादली आहे असे समजण्यास वाव आहे असे मला वाटते.

शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस मिळून सरकार स्थापन करतील ही शक्यता धूसर होताना दिसत आहे.
उध्यव ठाकरेंना बळीचा बकरा दोन्ही काँग्रेस नी मिळून बनवला अशी शंका येवू लागली आहे

अवांतर - एकाच प्रश्नावरती इथे "कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?" आणि "कौन बनेगा मुख्यमंत्री ?" असे दोन धागे का आहेत ?

https://youtu.be/qfFvrq9VQVk - रामदास कदम >> १) पुन्हा, रामदास कदम म्हणजे ठाकरे नाहीत.
२) त्यांच्यामते ज्यावरून युती तुटू शकते तो क्लेम चंद्रकांत पाटलांनी सुद्धा (नॉट दॅट चंपांचे स्टेटमेंट मॅटर करते) अर्ध्या तासात खोडला होता. मला तरी भाजप कुठेही अडीच वर्षांच्या मुमं पदाला अ‍ॅग्री झालेली दिसली नाही.

https://www.google.com/amp/s/www.financialexpress.com/india-news/next-ma... -आदित्य ठाकरे>>>
Shiv Sena leader and Yuva Sena chief Aaditya Thackeray, 29, has claimed that the next Maharashtra Chief Minister will be from his party, according to a report in The Indian Express.

ईंडियन इक्स्प्रेस्मध्ये कोणाच्या हवाल्याने ही बतमी दिली आहे ते बघूयात का? न जाणो तिथे from our sources असे म्हंटलेले असावे.

खरच, पत्रकारांसमोर पाकिस्तानपासून अमेरिकेपर्यंत कायम अनेक गोष्टी बोलणार्‍या ऊद्धव ठाकरेंनी हे बोललेले मिळू नये, कमाल आहे.

मी ८-९ लिंक्स दिल्या. उद्धव व आदित्यने मुलाखतीत जे जाहीररित्या स्पष्ट शब्दात सांगितले त्याच्याही लिंक्स आहेत.

परंतु कोणत्याच माध्यमांने दिलेल्या कोणत्याही बातमीवर विश्वास न ठेवण्याचा निर्धार केला असल्याने माझा पास.

परंतु कोणत्याच माध्यमांने दिलेल्या कोणत्याही बातमीवर विश्वास न ठेवण्याचा निर्धार केला असल्याने >> निर्धार वगैरे नाही केलेला.
तुम्ही नव्याने दिलेल्या लिंक बघतो आणि लिहितो.

अरे बाळु BLACKCAT, राममन्दीर म्हणजे काय मागास लुटारु लोकांनी दुसर्यांच प्रार्थनास्थळ पाडुन घाईघाईत बान्धायच झोपडं आहे?
त्याला वेळ लागणारच. कारण त्यावरील "कोरीव काम" व "कला" वेळ घेणार. असो, कला, गायन, मुर्ती (दुरुस्तीबद्धल धन्यवाद पुरोगामी) व कोरीव काम ज्या धर्मात निषिद्ध मानले जातात त्या धर्मीयांनी राममंदिराची उठाठेव करु नये.

एव्हढीच उत्सुकता आहे तर राममंदीर बांधुन झालं की रामाचं दर्शन घेउन ये.

>>> कला, गायन, मुर्त्या व कोरीव काम ज्या धर्मात निषिद्ध मानले जातात त्या धर्मीयांनी राममंदिराची उठाठेव करु नये. >>>

+ ७८६

मुर्त्या - चूक
मूर्ती - बरोबर

मीपण तेच बोलतोय , खूप अवघड काम आहे , लवकर जाऊन बांधा,

नवीन Submitted by BLACKCAT on 19 November, 2019 - 23:03 >>

ज्यांना जायचंय ते जातील, तुला काही मदत करण्याची इच्छा असेल तर तुझेही स्वागत तिकडे होईल... दगड बैलगाडीवरून वाहून न्यायला बैलांची गरज पडेलच म्हणा..

कौन banega मुख्य मंत्री म्हणून सुरू झालेल्या ह्या धाग्याच्या शेवट कोई भी नहीं बानेगा मुख्य मंत्री असाच होणार आहे.
ह्याची शास्वती होत चालली आहे

टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज दाखवताय. पवारला म्हणे २०२२ ला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिलीय विथ तीन मंत्रीपदे आत्ताच्याला पाठिंबा दिला भाजपला तर. त्याचेच कोण खासदार दबाव टाकून राहिलेत त्याच्यावर यासाठी हिबी खबर हाय त्यात. मायला निवडणुकीत कायबी मज्जा नाय आली पण खरी मजा आताच सुरु होणार

कायप्पा वरील एक फॉरवर्ड.

शरद पवारांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी.

1. बुद्दीमत्तेला अनुभवाची जोड मिळाली तर विजयी होण्याच्या आशा वाढतात.
२.अनोळखी व्यक्तीबरोबर भागीदारी करण्यापेक्षा माहित असलेल्या आतल्या गाठीच्या व्यक्तीबरोबर भागीदारी करण्यात शहाणपणा असतो.
३.जेव्हा इतर लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी कट रचत असतात तेव्हा ते तुमची अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची मदत करतील यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे.
४.जेव्हा एच. आर. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा आणि तुमच्या पात्रतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक पगार देणार असतात तेव्हा नेहमीच संधीचा पुनर्विचार करावा.
५.कधीही खूप लवकर विजयोत्सव साजरा करू नये. आधीच्या कंपनीच्या शेवटच्या दिवशी मित्रांना पार्टी देण्याऐवजी नवीन कंपनीमध्ये जॉइनिंगच्या पहिल्या दिवशी पार्टी द्यावी.
६.विद्यार्थ्यांनी नेहमी खूप अभ्यास करावा, मेहनत घ्यावी आणि चांगले मार्क्स मिळवावे ज्यानेकरून कंपन्या स्वतः विद्यार्थ्यांपर्यंत पोचतील जॉबसाठी.

मुर्त्या - चूक
??

३ असनार आहेत ना ?

राम जी,सितामाता आणि लक्श्मण ?

नियम ४ : ई-कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यतः या-कारान्त होते.

उदा. एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन कळी कळ्या आई आया बांगडी बांगड्या सुई सुया बी बिया सुरी सुऱ्या स्त्री स्त्रिया वाटी वाट्या अपवाद दासी दासी दृष्टी दृष्टी युवती युवती मूर्ती मूर्तीhttps://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%A8_(%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)

ओह
बरो बर आहे

उद्धवला मुख्यमंत्री करुनही त्याचा रबर स्टँप ( म्हणजेच तो कुठलाही निर्णय करु शकणार नाही ) कसा करुन ठेवता येईल यावर तोडगा निघाला नाहीये. Proud

न्यूज पेपर आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चा उपजत स्वभाव आहे .
सनसनाटी निर्माण करायची हा तर उभाळून येत नसेल
रोज उलट्या सुल्ट्या बातम्या देत आहेत.

पेढ्यांची ऑर्डर गेलीय समजा, गोड बातमी लवकरच; राऊतांचं वॉकटॉक
http://mtonline.in/6f2H0b?dga via @mataonline: http://app.mtmobile.in

आधी मुनगंटीवार म्हणत होते की १-२ दिवसांतच गोड बातमी येईल. पण २-३ आठवडे उलटूनही गोड बातमी नाही.

आता राऊत म्हणतोय की १-२ दिवसांतच उद्धव गोड बातमी देईल आणि पेढे मिळतील.

मी काय म्हणतो, गोड बातमी द्या किंवा देऊ नका, पण पेढे नक्की द्या.

हे भाजपाचे (कागदि) चाणक्य आता दिवसेंदिवस विनोदि होत चालले आहेत. सोशल मिडियावर तर भाजपाचे समर्थक सोर लुझर्स वाटतांयत. सेनेने अनपेक्षित कोंडी केल्यावर आता या चाणक्यांची अवस्था नाक दाबल्यावर तोंड उघडते अशी काहिसी झालेली आहे...

महाराष्ट्र्रा सारख्या राज्यात हातातोडाशी आलेली सत्ता घालवणे हि चांगली बाब नाहि. भविष्यात हा महाराष्ट्र पॅटर्न इतर राज्यांत राबवला गेला तर भाजपाचं काहि खरं नाहि...

माननीय मुख्यमंत्री आ. देवेंद्रजी फडणवीस यांनी खुर्ची सोडली तरच पुढचा मुख्यमंत्री बनेल ना !

अहो, खुर्ची बुडाखालुन निघाली आहे म्हणुन तर हा सगळा खटाटोप. सेनेचं सोडा, कॉमन सेंस बाळगणारा देखिल समजुन चुकलांय कि धिस जेस्चर इज टू लिटल टू लेट... Proud

अहो, खुर्ची बुडाखालुन निघाली आहे म्हणुन तर हा सगळा खटाटोप. सेनेचं सोडा, कॉमन सेंस बाळगणारा देखिल समजुन चुकलांय कि धिस जेस्चर इज टू लिटल टू लेट... Proud

नवीन Submitted by राज on 22 November, 2019 - 06:40. >>>

माझा कॉमन सेन्स ती बातमीच खोटी असल्याचं सांगतोय.

तशी काही ऑफर भाजपने शिवसेनेला दिली असती तर संजय राऊतने पत्रकार परिषद घेऊन तुम्ही म्हटले तेच सर्व सांगितले असते.

निवडणूकीच्या अगोदर भाजपाने सेनेला मु मं पदाची ऑफर दिलेली होती (असे भाजपा चे नेते खाजगीत म्हणतात).... निवडणूकीनंतर नेहेमी प्रमाणे शब्द फिरवला...

निवडणूकीच्या अगोदर भाजपाने सेनेला मु मं पदाची ऑफर दिलेली होती (असे भाजपा चे नेते खाजगीत म्हणतात).... निवडणूकीनंतर नेहेमी प्रमाणे शब्द फिरवला...

नवीन Submitted by उदय on 22 November, 2019 - 10:33 >>>

असं कुठले भाजपा नेते खाजगीत म्हणतात? तुम्ही ऐकलंय का ते ?

निवडणूकीनंतर नेहेमी प्रमाणे शब्द फिरवला... >>>> राफेल वरुन एकदा तोन्डावर आपटुन सुद्धा कॉन्गि गुलामांची पुरावाहीन वक्तव्य करण्याची सवय काही सुटत नाही.

महाराष्ट्र्रा सारख्या राज्यात हातातोडाशी आलेली सत्ता घालवणे हि चांगली बाब नाहि. भविष्यात हा महाराष्ट्र पॅटर्न इतर राज्यांत राबवला गेला तर भाजपाचं काहि खरं नाहि...

Submitted by राज on 22 November, 2019 - 06:01 >>>

Lol आतापर्यंत तीन पॅटर्न झालेत. एका ठिकाणी (कर्नाटक) तिथला छोट्या पक्षाचा मुख्यमंत्री रोज विष पित बसला होता. दुसर्या ठिकाणी (बिहार) घटस्फोट होउन बायको पुन्हा पहिल्या नवर्याच्या घरी आली ! तिसर्या ठिकाणी (उत्तर प्रदेश) "निवड्णुकीआधी" एकत्र झालेल्यांच मस्त पानिपत झालं

 फडणवीस मुख्यमंत्री 
नेहमी खरं बोलणारे मुख्यमंत्री 
मीच परत येईन म्हणाले होते, आले की !

Pages