कौन बनेगा मुख्यमंत्री ॽ

Submitted by ashokkabade67@g... on 14 November, 2019 - 12:36

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला जनतेनं कौल दिला होता पण बंद दाराआड निवडणुकीपूर्वी घडलेल्या चर्चेत काय ठरले होते,यावर सेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आणि भाजपने नकार दिला आणि येथेच युतीचे बारा वाजले .बरे जनतेनं कुणा एकाला कौल दिला नाही तर युतीला बहुमत दिले त्यामुळे सेनेशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकत नाही अशावेळी सेनेने मागिल पाच वर्षाच्या काळात भाजपने केलेल्या अपमानाचा वचपा काढला त्यात गैर काहीच नाही कारण भाजपने सेनेची केलेली फरपट सेना विसरु शकत नव्हती,त्यात आघाडीचे संख्याबळाची साथ घेऊन सेनेचा मुख्यमंत्री बसवणं सेनेला सहजशक्य होते आणि आहे पण सेना भाजप आपणास दिलेला शब्द पाळील या आशेने यानंतर राहिली शब्द काय दिला होता हे जनतेला कधिच कळणार नाही कारण शहांनी आजच सांगितले की बंद दाराआड झालेली चर्चा उघड करण्याची आमची संस्कृती नाही त्यामुळे खोटं कोण बोलतोय हे जनतेला कधिच कळणार नाही.याकालावधीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याच समर्थन शंहांनी केले .आता राज्यात महाशिव आघाडीच्या बैठका सुरू आहेत याचं काळात राणेंनी भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तर निंबाळकरांनी राष्ट्रवादी चे आमदार संपर्कात असल्याचे सांगितले याचाच अर्थ महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे कुठलाही विधिनिषेध न बाळगता भाजप सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारच हे ठरले आहे. अशा स्थितीत कौन बनेगा मुख्यमंत्री हा प्रश्न जनतेला पडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे अजित पवार उपमुख्य मंत्री आहेत. पाटबंधारे घोटाळा, ईडीची नोटिस, धरणात मुतणं हे सगळं डिलीट करा बरं मेमरीतून.

तो तंबाखू मळीत बसलेला टेंपोवाला पाठवा बरे आता तिकडे लवकर Wink

Submitted by Filmy on 22 November, 2019 - 21:16 >>

त्याच्या ट्रक चा अक्सलच तुटलाय Lol

>>>>>हा महाराष्ट्र आहे, गोवा नाही. बहुमताची जबाबदारी मी घेतो ~ शरद पवार. <>>><>>>>>
ह्यांचे विजयी उमेदवार एका हाॅटेल मध्ये एका दिवसावर ठेवले नाहीत ईतकी कडक पकड आहे पवार, शिवसेना व काॅंग्रेस यांची !

Biggrin

महत्वाची सारी खाती ( म्हणजे ज्यात भरपूर खाता येतं ते ) महसूल, गृहमंत्रालय, सार्वनजनिक बांधकाम अशी अनेक खाती घड्याळ व पंजाच वाटुन घेतील. सेनेला घंटा काय मिळतयं ते बघा.
<<
ही सगळी खाती गेली ६ वर्शं कोण सांभाळत होतं बरं?
त्यात खाणं होत नव्हतं वाटतं!
बंर!

हीच सारी खाती भाजपा नव्या सरकारात ठेवून घेणार होता विथ मु.मं पद. त्यावरुनच फाटलं ना? त्यातलं मुमं पद उद्धवने परत मिळवुन दाखवलं ऑलरेडी. पैशाची खाती थोडीच सोडणारेत! मिल बाटके खातील की!
आता भक्ताचं सो.गां. निमंत्रण केलं वरुन रडगाणं चालू झालंय. Rofl
अर्थात त्यांच्या मतदारांना जे निर्बुद्ध मुद्दे भावतात त्यावरच ते पोळी भाजणार! मजा मजा बघायला मिळणारे.

अगदी अगदी, बाकीचे सर्व पक्ष केवळ लोककल्याणासाठी एकत्र येतात....
Submitted by मी-माझा on 16 November, 2019 - 10:05
<<
नक्कीच.

भाजपासारखे सामान्यांना लुटणारे निर्णय घेत नाहीत ते.

उदा.* फास्टटॅग बसवला का गाडिला तुमच्या?

पँटच्या गाडी साईडच्या खिशाला कितीचे फुकट भगदाड पडले ते लक्षात येतंय का? लर्न अबाऊट मायक्रोएक्ष्पेंडीचर्स.

फडणवीस मुख्यमंत्री
नेहमी खरं बोलणारे मुख्यमंत्री
मीच परत येईन म्हणाले होते, आले की ! > रजसी तै, परत या. कुण्णी काहि बोलणार नै! Proud

फास्टटॅग बसवला का गाडिला तुमच्या?

पँटच्या गाडी साईडच्या खिशाला कितीचे फुकट भगदाड पडले ते लक्षात येतंय का? लर्न अबाऊट मायक्रोएक्ष्पेंडीचर्स.

Submitted by आ.रा.रा. on 28 November, 2019 - 00:57 >>>

Fasttag बद्धल तुला नक्की काय प्रोब्लेम आहे?

राज्यपालमार्फत 12 आमदार स्वीकृत प्रकरण

राज्यपाल बोलतात की ती यादीच मिळाली नाही म्हणून.

यादी गायब ?

शनवारवाडा ध चा माचा हा आधुनिक प्रयोग दिसत आहे.

अजितदादा एकाच वेळी येडा चंपा अन खुळा तडफडणवीस यांना सणासण फटकारत असतात... त्यातलाच एक षटकार - शिकवणी..!! (एक हि मारा सॉल्लीड मारा Proud )

Pages