महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीला जनतेनं कौल दिला होता पण बंद दाराआड निवडणुकीपूर्वी घडलेल्या चर्चेत काय ठरले होते,यावर सेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आणि भाजपने नकार दिला आणि येथेच युतीचे बारा वाजले .बरे जनतेनं कुणा एकाला कौल दिला नाही तर युतीला बहुमत दिले त्यामुळे सेनेशिवाय भाजप सरकार स्थापन करु शकत नाही अशावेळी सेनेने मागिल पाच वर्षाच्या काळात भाजपने केलेल्या अपमानाचा वचपा काढला त्यात गैर काहीच नाही कारण भाजपने सेनेची केलेली फरपट सेना विसरु शकत नव्हती,त्यात आघाडीचे संख्याबळाची साथ घेऊन सेनेचा मुख्यमंत्री बसवणं सेनेला सहजशक्य होते आणि आहे पण सेना भाजप आपणास दिलेला शब्द पाळील या आशेने यानंतर राहिली शब्द काय दिला होता हे जनतेला कधिच कळणार नाही कारण शहांनी आजच सांगितले की बंद दाराआड झालेली चर्चा उघड करण्याची आमची संस्कृती नाही त्यामुळे खोटं कोण बोलतोय हे जनतेला कधिच कळणार नाही.याकालावधीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली त्याच समर्थन शंहांनी केले .आता राज्यात महाशिव आघाडीच्या बैठका सुरू आहेत याचं काळात राणेंनी भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले तर निंबाळकरांनी राष्ट्रवादी चे आमदार संपर्कात असल्याचे सांगितले याचाच अर्थ महाराष्ट्रात भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे कुठलाही विधिनिषेध न बाळगता भाजप सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करणारच हे ठरले आहे. अशा स्थितीत कौन बनेगा मुख्यमंत्री हा प्रश्न जनतेला पडला आहे.
कौन बनेगा मुख्यमंत्री ॽ
Submitted by ashokkabade67@g... on 14 November, 2019 - 12:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सध्याच्या स्थितीत
सध्याच्या स्थितीत मुख्यमंत्रीपदाचा योग्य उमेदवार फक्त एकच आहे. तो म्हणजे 'अभिजित बिचकुले'. माननिय राज्यपाल यांनी दखल घेऊन बिचकुलेला लागलीच मुख्यमंत्री करावे.
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी आणि सेनेचे सरकार बनलं आणि सेना काँग्रेस / राष्ट्र वादी च्या सल्ल्यानी चालली तर bjp ला सात जन्म घ्यावे लागतील सरकार पाडण्यासाठी.
महाराष्ट्र मधील हिंदू कधीच कट्टर आणि धर्म वेडा नव्हता आणि आमचे इथले स्थानिक मुस्लिम बांधव सुद्धा कधीच धर्म वेडे नव्हते.
काही लोकांमुळे भेद निर्माण झाला
एकनाथ शिंदे अजित पवार
एकनाथ शिंदे
अजित पवार
188; Get ur facts right!
188; Get ur facts right!
सध्याच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या प्रचारात आणि एकूण गेल्या पाच वर्षातल्या स्थिर सरकारच्या कालावधीत कुठे हिंदुत्ववाद दिसला तुम्हाला?
महाराष्ट्रातील राजकारणात धर्मापेक्षा जातीपातीचे राजकारण जास्त चालते आणि ते चालवणारे/आणि त्याला गेली अनेक वर्षे चेतवत ठेवणारे कोण आहेत हे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही.
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी
एकदा काँग्रेस ,राष्ट्र वादी आणि सेनेचे सरकार बनलं आणि सेना काँग्रेस / राष्ट्र वादी च्या सल्ल्यानी चालली तर bjp ला सात जन्म घ्यावे लागतील सरकार पाडण्यासाठी.>>>>>> अहो भाजपा कशाला प्रयत्न करेल ते पाडण्याचा. ज्यांना सत्तेशिवाय होत नाही, ते सेनेला कितपत पाठिंबा देतायत ते बघा. महत्वाची सारी खाती ( म्हणजे ज्यात भरपूर खाता येतं ते ) महसूल, गृहमंत्रालय, सार्वनजनिक बांधकाम अशी अनेक खाती घड्याळ व पंजाच वाटुन घेतील. सेनेला घंटा काय मिळतयं ते बघा. सुरुवात झालीय, घोडा मैदान दूर नाही.
कुणी का बनेना.... हे असल
कुणी का बनेना.... हे असल धेडगुजरी सरकार चालवायच म्हणजे डोक्याला तापच असणार आहे त्याला!
प्रचारातल्या बाता, आघाडीतल्या लाथा आणि विरोधात भाजपा.... करा मज्जा
>>>> सध्याच्या भाजपाच्या
>>>> सध्याच्या भाजपाच्या महाराष्ट्रातल्या प्रचारात आणि एकूण गेल्या पाच वर्षातल्या स्थिर सरकारच्या कालावधीत कुठे हिंदुत्ववाद दिसला तुम्हाला? >>>
हिंदुत्ववाद अजिबात दिसला नाही, पण येनकेन प्रकारेण खुर्ची टिकवेन वाद भरपूर दिसला.
आणि (अनेकांनी अनेक प्रकारे
आणि (अनेकांनी अनेक प्रकारे ती घालवण्याचा प्रयत्न करुनही) टिकवली पण.... येन केन प्रकारेण असती तर परत सत्ता मिळाली नसती.
आता सेनेने दगाफटका केला नसता तर आत्तापर्यंत परत एकदा मुख्यमंत्री होवून त्यांनी काम पण सुरु केले असते!
धेडगुजरी
धेडगुजरी
भाजपाचे केंद्र सरकार 45 पक्षांचे आहे
एका मोठ्या पक्षाला पाठिंबा
एका मोठ्या पक्षाला पाठिंबा दिलेले ४०-४५ चिटूर पक्ष आणि सारख्याच सीट्स घेवून आलेले अतिशय भिन्नविचारी पक्ष यातला फरक कळतोय का?
नसणारच! एकंदर इथला वावर सांगतोय काय लेव्हल आहे ती.... असो!
कसले भिन्न विचार ? समान विचार
कसले भिन्न विचार ? समान विचार होते तर तुमच्या लाडक्या 2 पक्षांचा तलाक का झाला?
चिटूर पक्ष म्हणे!
चिटूर पक्ष म्हणे!
एकच खासदार असलेल्या पक्षालाही मंत्रिपद दिले आहे
>>> येन केन प्रकारेण असती तर
>>> येन केन प्रकारेण असती तर परत सत्ता मिळाली नसती. >>>
कोठे मिळाली परत?
>>> आता सेनेने दगाफटका केला
>>> आता सेनेने दगाफटका केला नसता >>>
सेना म्हणते भाजपने दगाफटका केला. खरे खोटे शहा-उद्धव जाणे.
राज्य पातळीवर हिंदुत्व घेऊन
राज्य पातळीवर हिंदुत्व घेऊन काय करणार ?
चिटूर शब्द तुम्हाला इतका
चिटूर शब्द तुम्हाला इतका झोंबून घेवू नका..... तुमचे पक्ष नाहीत चिटूर.... सत्ता करणारेत ते आता स्थापन ब्लॅकमेलर पार्टीला घेवून
< महसूल, गृहमंत्रालय,
< महसूल, गृहमंत्रालय, सार्वनजनिक बांधकाम अशी अनेक खाती घड्याळ व पंजाच वाटुन घेतील. सेनेला घंटा काय मिळतयं ते बघा>
युतीच्या सरकारात ही खाती कोणाकडे होती बरे?
गृह आणि नगरविकास (एफ एस आय वालं) खातं फडण२.० कडे आणि महसूल सा र्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील. सेनेला घंटा.
हिंदुत्वाचा झेंडा नाचवून
हिंदुत्वाचा झेंडा नाचवून सेनेला घंटा मिळाली
म्हणूनच ते आता इकडे आले
सेनेला घंटा.
सेनेला घंटा.
नवीन Submitted by भरत. on 15 November, 2019 - 16:57>>
तेच मागुन पुढे चालत राहील
कॉन्ग्रेस समर्थक शिवसेनेची बाजु घेताना पाहुन जाम मजा येतेय
अहो, मोदींच्या विरोधापायी ते
अहो, मोदींच्या विरोधापायी ते पार इम्रान खानला जावून मिळाले होते.... इथे शिवसेना तर काय घरगुती शत्रू आहे (म्हणजे होता)
भाजप सेना समर्थक आपापसात
भाजप सेना समर्थक आपापसात भांडताना पाहून जाम वाईट वाटतंय.
-
बरं हा व्हिडियो लोकसभेच्या वेळी युतीची घोषणा झाली तेव्हाचा आहे. https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2317916598520588/
सत्तेचं समान वाटप.
हे मान्य नव्हतं तर भाजपने सेनेशी युती का केली?
ठाकरे खोटं बोलत होते, तर तेव्हाच का नाही सांगितलं?
-
भाजप समर्थक स्वत:च सांगताहेत की भाजपने सेनेला घंटा दिला.
मग सेनेने विश्वासघात केला असंही म्हणतात.
चितपट, ओलीसुकी, छाप काटा सगळं आमचंच.
हिंदुत्वाचा झेंडा नाचवून
हिंदुत्वाचा झेंडा नाचवून सेनेला घंटा मिळाली
म्हणूनच ते आता इकडे आले
नवीन Submitted by BLACKCAT on 15 November, 20
कॉन्ग्रेस समर्थक शिवसेनेची बाजु घेताना पाहुन जाम मजा येतेय Lol
नवीन Submitted by मी-माझा on 15 November, 2019
अयोध्या खटला संपला ,मुद्दा पण संपला
अयोध्या खटला संपला ,मुद्दा पण
अयोध्या खटला संपला ,मुद्दा पण संपला
Submitted by भरत. on 15
Submitted by भरत. on 15 November, 2019 - 08:06 >>> भरत हा तोच लोकसभेच्या आधीचा फेब मधला विडिओ आहे का? (लिंक चालत नाहीये)
तोच असेल असे गृहीत धरून... विडिओमध्ये जागांचं सुद्धा समसमान वाटप होणार असे ठाकरे म्हणत आहेत.. मग झाले का समसमान जागावाटप? मागच्यावेळी ९-१० जागेंच्या वाटपावरून युती तोडणारी शिवसेना ह्यावेळी वीसेक जागा कमी घेऊन कशी गप्प बसली.
म्हणजे ह्यावेळी घोषित करूनही जागांचं समसमन वाटप झालं नाही ह्याचा अर्थ ह्या पत्रकार परिषदेनंतर आणि लोकसभेनंतर भाजप आणि शिवसेनेत अजून चर्चा झाल्याच आहेत.
मोदींनी ठणाणा करीत दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र प्रत्येक ठिकाणी सांगितले.. तेव्हा शिवसेना काही म्हणाली नाही आणि आता राऊत म्हणत आहेत की आम्हाला मोदींना खोटे पाडायचे नव्हते म्हणून आम्ही काही बोललो नाही
आणि शहांनी मोदींना मुद्दाम अंधारात ठेवले. 
किती बाष्कळ आहेत हे राऊत.
>>> मोदींनी ठणाणा करीत
>>> मोदींनी ठणाणा करीत दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र प्रत्येक ठिकाणी सांगितले.. तेव्हा शिवसेना काही म्हणाली नाही आणि आता राऊत म्हणत आहेत की आम्हाला मोदींना खोटे पाडायचे नव्हते म्हणून आम्ही काही बोललो नाही Lol आणि शहांनी मोदींना मुद्दाम अंधारात ठेवले. Proud
किती बाष्कळ आहेत हे राऊत. >>>
सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री होणार हे उद्धव व सेना नेत्यांनी अनेकदा प्रचारात सांगितले होते. तेव्हा भाजपवाले काहीही बोलले नव्हते.
नाही. त्यात जागांचं समान वाटप
नाही. त्यात जागांचं समान वाटप नाही, असं स्पष्ट म्हटल़ंय.
सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री
सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री होणार हे उद्धव व सेना नेत्यांनी अनेकदा प्रचारात सांगितले होते. तेव्हा भाजपवाले काहीही बोलले नव्हते. >>ही कालचीच चर्चा पुन्हा सुरू झाली. मी कालही ह्याबद्दल सविस्तर लिहिले होते.
मागची पाच वर्षे कायम घरचा आहेर देत पोकळ शालजोडीतले आणि बढाया मारणार्या शिवसेनेच्या ह्या बढाया भाजपाने जुनी खोड म्हणून सिरिअसली घेतल्या नाहीत हे खरे. जे त्यांचे चुकले आणि ह्या चुकीची मोठी किंमत ते भरत आहेत.
'लांडगा आला रे आला' नेहमीचेच झाले म्हणून भाजप धावले नाही पण शिवसेना राखत असलेल्या बकर्यांमध्ये आपल्याही बकर्या आहेत हे भाजप विसरली.
>>विडिओमध्ये जागांचं सुद्धा
>>विडिओमध्ये जागांचं सुद्धा समसमान वाटप होणार असे ठाकरे म्हणत आहेत.. मग झाले का समसमान जागावाटप? <<
"जबाबदार्यांच्या अधिकाराचं समान वाटप" असं वाक्य आहे ते. याचा अर्थ - जागा म्हणजे निवडणुकिच्या नाहि, निवडुन आल्यावर नेमण्यात येणार्या मंत्रीपदाच्या, मुमं धरुन...
आता तुम्ही त्यात मुमं पदाची २.५ वर्ष हा शब्द शोधणार असाल तर बघु नका...
>>> 'लांडगा आला रे आला'
>>> 'लांडगा आला रे आला' नेहमीचेच झाले म्हणून भाजप धावले नाही पण शिवसेना राखत असलेल्या बकर्यांमध्ये आपल्याही बकर्या आहेत हे भाजप विसरली. >>>
तसं नाही झालं. सेनेला विरोध केला तर मतदानाआधीच युतीत भांडणे सुरू होतील व त्याचा परीणाम जागावाटप व मतांवर होईल हे ओळखून भाजपने सेनेच्या प्रचारात केल्या जाणाऱ्या दाल्याला विरोध केला नाही. निकालानंतर सेनेची अजिबात गरज लागणार नाही हा फाजिल आत्मविश्वास सुद्धा त्यामागे होता.
मुख्यमंत्री जे बोलले ते
मुख्यमंत्री जे बोलले ते तुम्हांला कळलं का?
समान जागा, जबाबदाऱ्यांचं आणि अधिकाराचं समान वाटप.
ज्याच्या जास्त जागा तो मुख्यमंत्री हे मी स्वीकारलेली नाही.
आपला मुख्यमंत्री होणारच.
असे उद्धव ठाकरेंचे शब्द आहेत.
फेसबुकवर maxmaharashtra चं पेज पहा.
यांचा फडणवीसांबद्दलचं विश्लेषण करणारा एक व्हिडियो व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांची वेबसाइट हॅक झाली म्हणे.
Caste,Misgovernance, arrogance, असे तीन मुद्दे आहेत.
एबीपी माझावर भाजपचे एक जुने
एबीपी माझावर भाजपचे एक जुने नेते की प्रवक्ते म्हणाले होते की १९९९ ला सेनेच्या जागा पाडायचं पाप आम्ही केलं होतं. पण यावेळी ते केलेलं नाही.
बघितला विडिओ.
बघितला विडिओ.
भरत,
हा ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद आहे... ठाकरे त्यांच्या शिवसैनिकांशी खरे -खोटे काय बोलतात तो त्यांचा प्रश्न आहे सामान्य नागरिक म्हणून मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही. त्या विडिओचे महत्व खरंच काही नाही.
मोदींनी प्रचार सभेत जनसमुदायासमो 'देवेंद्र मुख्यमंत्री' असे सांगितले आहे.. ठाकरेंनी पत्रकार परिषदेत वा प्रचार सभेत भाजप नेत्यांच्या ऊपस्थितीत 'अर्धाकाळ शिवसेनेचा मुख्यमंत्री' सांगितले असेल असा विडिओ असेल तर नक्की शेअर करा. मला माझे मत अपडेट करायला आवडेल.
मला तर हा विडिओ बघून जे मुख्यमंत्र्याच्या म्हणण्याचा अर्थच नव्हता तो बदलून शिवसैनिकांच्या गळी ऊतरवण्याचा ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न दिसतो आहे.
व्हिडियो नाही. पण बातमी
व्हिडियो नाही. पण बातमी मिळाली. जुलै २०१९
https://hindi.theprint.in/opinion/before-maharashtra-assembly-elections-...
हा कुठचा पेपर आहे भरत? तो
हा कुठचा पेपर आहे भरत? तो तुम्ही आम्ही वाचतो का? त्यात ठाकरे परिवारापैकी कोणी असे म्हणाले असे आहे का?
त्यात असेही लिहिले आहे की शिवसेना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पुढे करीत आहे, हे कधी झाले? शिवसेना अधिकृतरित्या असे केव्हा म्हणाली हा आमचा मुख्यमंत्री पदाचा ऊमेद्वार?
मिडिया स्पेक्युलेशन नको .. from horses mouth काहीतरी येऊ द्या. ते ही प्रचार सभेत किंवा पत्रकारांना ऊद्देशून म्हंटलेले.
सत्तेत आल्यास सेना आणि भाजप मुख्यमंत्रीपद वाटून घेणार ही एवढी मोठी न्यूज झाडून सगळ्या चॅनल्स, न्यूजपेपर ( आणि मुख्यत्वे सामना ) मध्ये आल्यावाचून, चघळल्यावाचून राहिल असे तुम्हाला वाटते का? सगळ्या लिडिंग पेपर आणि चॅनल्सने ती जाणूनबुजून दाबून ठेवली असे वाटते का?
https://hindi.theprint.in
https://hindi.theprint.in/opinion/before-maharashtra-assembly-elections-...
पहले शिवसेना शिवाजी की लड़ाकू सेना होती थी. अब वह शिवजी की बारात हो चुकी है. >> एक नंबर
पण त्या बर्गाला काय पटायचं नाय बगा. त्याचं पाल्हाळ एका बाजूला शिरलं की दुसऱ्या बाजू झापड लावून बंद करतो तो
१) ठाकरे जे काही म्हणाले ते
१) ठाकरे जे काही म्हणाले ते शिवसैनिकांसमोर.
२) मोदी जे काही म्हणाले ते ठाकरेंसमोर.
३) १३ तारखेला अमित शहा यांनी "शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमन्त्रीपद नाही" हे टीव्हीवर स्पष्ट्पणे सान्गितले.
ठाकरे व अमित शहा यापैकी कुणीच दुसर्याने काय म्हटले ते ऐकले / पाहीले / वाचले नसावे ( क्र २ सोडुन) वा माहीत पडुनही दुर्लक्ष केले असावे.
हाब यांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचा सन्धीसाधुपणा यावेळी भाजपने दुर्लक्षित केला आणि त्याची शिक्षा भाजपला भोगावी लागतेय. असो, भाजपला एक ठेच लागलीच आहे जी आवश्यकच होती.
पण मला एक कळत नाही, आता मारे मोठ्मोठ्याने बोम्बलणारे शिवसेनेचे दोन नेते (राउत व ठाकरे) त्या सभेवेळी मोदींना गाठुन शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद पाहीजे"च" हे सांगु शकत नव्हते? बरं त्यावेळी नाही तर त्या सभेनन्तर मोदींशी बोलायला शिवसेनावाल्यांचे फोन चालत नव्हते की राउत व ठाक्रे यांच्या तोंडात बोळे कोम्बलेले होते?
आधी जे ठरते ते प्रेडिक्शन
आधी जे ठरते ते प्रेडिक्शन असते,
नंतर समजा सेनेने 100 जिंकल्या असत्या, अन भाजपाने 90 जिंकल्या असत्या, तर सेना आपली अट बदलुही शकेल ना ? जे ठरले ते लेखी नव्हतेच तर मग ते नाकारण्याचा अधिकार दोन्ही पार्टीना तितकाच रहातो
मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना,
मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या होऊ घातलेल्या 'महाआघाडी'वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच हिंदुत्वाशी तडजोड करणार नाहीत अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. तसंच सावरकर यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याच्या मागणीवरून ठाकरे मागे हटणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
----
महाराष्ट्रात अर्धवट सत्ता, केंद्रात फाटलेले
मग आता ठाकरे वचन कसे पाळणार ?
>>> ) ठाकरे जे काही म्हणाले
>>> ) ठाकरे जे काही म्हणाले ते शिवसैनिकांसमोर.
२) मोदी जे काही म्हणाले ते ठाकरेंसमोर.
३) १३ तारखेला अमित शहा यांनी "शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमन्त्रीपद नाही" हे टीव्हीवर स्पष्ट्पणे सान्गितले. >>>
उद्धव व्यासपीठावर असताना "पुढील मुख्यमंत्री फडणवीस" असे सांगितल्यानंतर उद्धवने विरोध दाखवला नाही म्हणजे मोदी जे बोलले ते उद्धवला मान्य होते असा अर्थ निघत नाही. पंतप्रधान काही सांगत असलेले मान्य नसले तर उद्धवने जागेवरून उठून मोदींना थांबवून "नाही, अडीच वर्षे सेनेचा मुख्यमंत्री होणार. मोदी चुकीचे सांगत आहेत." असे सांगून व्यासपीठावरच भांडणे करायची होती का?
ह्यांची सुद्धा खूप दिवस फक्त
ह्यांची सुद्धा खूप दिवस फक्त चर्चाच चालू आहे...
काही तरी ठरवा आणि सरकार निर्माण करा नसेल जमत तर नाही सांगा .
फेर निवडणूक जाहीर करून दोषी पक्ष आणि नेते ह्यांना चांगला धडा जनतेनी शिकवावा
व्यासपीठावरच भांडणे करायची
व्यासपीठावरच भांडणे करायची होती का?
नवीन Submitted by पुरोगामी on 15 November, 2019 - 22:30 >>>
तुम्ही फक्त "व्यासपिठावर मोदी व उद्धव यांनी बोलावं" असा समज करून घेतलाय का?
पुरोगामी,
पुरोगामी,
'सामना' कशासाठी आहे?
मोदींचे म्हणणे न खोडता किंवा हा करार झाला त्यानंतर लागलीच सामन्यातून भाजप आणि सेनेचा अर्धी टर्म मुख्यमंत्री ह्याचे स्पष्ट सूतोवाच करता आले असते. जे शिवसैनिकांना समजाऊन सांगितले ते सामन्यातून जनतेलाही सांगता आले असते.
>>> तुम्ही फक्त "व्यासपिठावर
>>> तुम्ही फक्त "व्यासपिठावर मोदी व उद्धव यांनी बोलावं" असा समज करून घेतलाय का? >>>
असा मी समज करून घेतलेला नाही.
पंतप्रधानांनी भाषणात काहीतरी सांगितल्यानंतर लगेच उठून ते खोडून काढणे योग्य दिसले नसते. तसं करणे शिष्टाचाराला धरून नव्हते व औचित्यपूर्ण नव्हते. याचा अर्थ ते उद्धवला मान्य होते असा होत नाही. मोदींच्या भाषणापूर्वी व नंतरही अनेक प्रचार सभांमध्ये सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होणार हे उद्धवने व इतर काही सेना नेत्यांनी अनेकदा सांगितलंय.
>>> मोदींचे म्हणणे न खोडता
>>> मोदींचे म्हणणे न खोडता किंवा हा करार झाला त्यानंतर लागलीच सामन्यातून भाजप आणि सेनेचा अर्धी टर्म मुख्यमंत्री ह्याचे स्पष्ट सूतोवाच करता आले असते. जे शिवसैनिकांना समजाऊन सांगितले ते सामन्यातून जनतेलाही सांगता आले असते. >>>>
मी सामना नावाची रद्दी वाचत नाही. त्यामुळे सामनात काय लिहिलं होतं ते माहिती नाही.
परंतु मोदींच्या भाषणापूर्वी व नंतरही अनेक प्रचार सभांमध्ये सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होणार हे उद्धवने व इतर काही सेना नेत्यांनी अनेकदा सांगितलंय.
मोदींच्या भाषणापूर्वी व
मोदींच्या भाषणापूर्वी व नंतरही अनेक प्रचार सभांमध्ये सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होणार हे उद्धवने व इतर काही सेना नेत्यांनी अनेकदा सांगितलंय. >> बाकी सेना नेत्यांचे जाऊदे ते बरेच काही बरळत असतात... ऊद्धव ठाकरेंचा प्रचार सभेचा वा पत्रकार परिषदेचा विडिओ असल्यास जरूर शेअर करा , का ते थोड्यावेळात लिहितो.
सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे
सेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होणार हे उद्धवने व इतर काही सेना नेत्यांनी अनेकदा सांगितलंय.
नवीन Submitted by पुरोगामी on 15 November, 2019 - 23:36. >>>
असे सांगितलंय? कधी आणि कोणाला उद्देशून?
भाजपच्या प्रचारसभांत सेनेचा
भाजपच्या प्रचारसभांत सेनेचा पूर्ण अनुल्लेख केला जाई. अगदी नरेंद्र मोदींनीसुद्धा सेनेचे नाव ही घेतले नाही,अशी एका प्रचारसभेनंतरची लोकसत्तेची सबहेडलाइन होती. स्वबळावरचा सूरही अनेकदा लावला गेला होता. म्हणजेच निकालानंतर सेनेला डंप करायचं , हे ठर ल्यात जमा होतं. तरीही युती केली. सेनेच्या कोट्यातल्या म्हणून मित्र पक्षांना ज्या जागा दिल्या तिथेही कमळ हे चिन्ह दिलं.
भाजप आपले पत्ते असे खेळत असेल, तर सेनेने आपले पत्ते आधी उघड करायला हवे होते का?
हे सगळं अर्थातच प्रचारसभांत. एकमेकांशी बोलताना सगळं छान छान.
प्रचारसभांत काय चाललं होतं?
या बातम्या
१. जनसत्ता
२. लोकसत्ता
शिवसेने आदित्यला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट क रतेय हे फडणवीसांपर्यंत पोचलं होतं.
३. मुख्यमंत्रिपदावरून फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले… - कोण काय बोलतं याचा विचार केला जाणार नसल्याचं ते म्हणाले. - लोकसत्ता
१.
४. राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. आदित्य ठाकरेंसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल असं सांगितलं
“मी भाजपाचा मुख्यमंत्री आणि आणि शिवसेनेचाही. हे युतीचं सरकार आहे,” असंही मुख्यमंत्री फडणवीस बोलले आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना पुढील मुख्यमंत्री करण्याच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “आदित्य ठाकरे काय करणार किंवा त्यांना कोणतं पद दिलं जाईल हा शिवसेनेचा निर्णय असेल. जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील”. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र कोणताच संभ्रम नाही. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हे सर्वांनाच माहिती आहे असं सांगत फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.
म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सेनेच्या प्रचाराला उत्तर म्हणून (सुद्धा) सांगितलं जात होतं.
सेनेच्या प्रचारात मुख्यमंत्री आपलाच हा मुद्दा होता, हे स्पष्ट व्हायला या बातम्या पुरेशा असाव्यात.
आता ठाकरे याबद्दल मोदीशहाफडणवीस यांच्याशी का नाही बोलले याचं उत्तर मोदीशहाफडणवीस सेना असा प्रचार करत असतानाही ठाकरेंशी का नाही बोलले ?
आता ठाकरे याबद्दल
आता ठाकरे याबद्दल मोदीशहाफडणवीस यांच्याशी का नाही बोलले याचं उत्तर मोदीशहाफडणवीस सेना असा प्रचार करत असतानाही ठाकरेंशी का नाही बोलले ?
नवीन Submitted by भरत. on 16 November, 2019 - 07:38 >>>
संवादाची दारे कुठून बंद झाली यावर वरील प्रश्नांचे उत्तर अवलंबून आहे, वकीलसाहेब,
मी माझ्या प्रतिक्रियेत तेच म्हटलं. दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं.
माझी प्रतिक्रिया शिवसेनेनं दिलेल्या त्या वक्तव्यावर आहे जिथे ते म्हणतात की मोदींच्या आदरापोटी सभेत काही बोललो नाही. पण आता विविध प्रकारच्या संपर्कमाध्यमांच्या जमान्यात त्या सभेनंतर लगेच वा दुसऱ्या दिवशी शिवसेनेला मोदींशी बोलता आले नाही काय?
_--------------------
भाजपच्या प्रचारसभांत सेनेचा पूर्ण अनुल्लेख केला जाई. अगदी नरेंद्र मोदींनीसुद्धा सेनेचे नाव ही घेतले नाही,अशी एका प्रचारसभेनंतरची लोकसत्तेची सबहेडलाइन होती. स्वबळावरचा सूरही अनेकदा लावला गेला होता. म्हणजेच निकालानंतर सेनेला डंप करायचं , हे ठर ल्यात जमा होतं. >>>
अरेरे असं झालं का? आता काँग्रेस बरोबर युती असल्याने मांजरीला चांगले गोंजराले जाईल ही अपेक्षा करतो. बाकी असे मित्रपक्षावरच फटकारे मारणारी मांजर कोणाबरोबर नीट राहू शकेल असा प्रश्न मला कधी कधी पडतो.
सरकार स्थापण्यास आणखी वेळ
सरकार स्थापण्यास आणखी वेळ लागणार - इति शरद पवार.
आणखी एखादा महिना घालवला की मांजर एकतर काकुळतीला येईल किंवा फटकारे मारायला सुरू करेल. पहिलीच शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत फक्त मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, बाकी सगळे मंत्री म्हणजे दोन काँग्रेसचे बोके असतील.
फटकारे मारू लागली की परत जुन्या मालकाकडे जाणे वा स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाणे हे दोनच पर्याय उरतात.
मांजरी ने स्वबळावर निवडणूक लढवली तर दोन्ही काँग्रेसची मजा...
मोदींबद्दल आदर म्हणजे शहा
मोदींबद्दल आदर म्हणजे शहा-फडणवीसांबद्दल नाही. रीड बिटवीन द लाइन्स.
दुष्यंत चौताला मोदींबद्दल जे बोललाय ते शोधून इथे देतो. त्यांच्याशी म्होतूर लावलाय न्हवं? नखं मारणार्या मांजरीला गोंजारलंच शेवटी.
सत्तेसाठी काहीही हे भाजपचं आता एकमेव तत्त्व आहे.
Pages